जपानीमधलं "इतादाकिमास!" म्हणजे आपल्या "वदनिकवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचेऽ" च्या जवळपास जातं. जपानमधल्या वास्तव्यात जपानी खाद्यजंत्रीची बर्यापैकी ओळख झाली. काही गोष्टी आवडल्या, काही जाम आवडल्या! त्यातल्याच काही निवडक गोष्टींची थोडीशी ओळख करून द्यावी म्हणतोय, गोड मानून घ्या 
पहिला मान 'सुशी' चा!
'सुशी' पहिल्यांदा खाऊन बघितली, ती २००६ मधे!
"यक्क!!! लोकांना कायकाय आवडतं रेऽ देवा... " हे माझेच शब्द होते...
"तसं बगाऽ आमच्या जपानमदे पन.. म्हंजेऽऽ पूर्वी तसं नानवेज खात नवते. तेवा निसता भात आन काईकाई
भाज्या. पन भाताबर्बर खायचे ते म्हंजी 'मासं!' " असाच एक 'श्री. तानाका' बोलला होता.
" 'सुशी' तशी म्हनलं तर मुळची "चू-गोकूची" बर्का. म्हंजे तुमचा 'चायणा.' नंतर आमी लोकांनी बाकी गोष्टींबर्बर 'सुशी' पन इंपोर्ट केली आनि आता बगा ती आमच्याच संस्कृतीत अशी काय मिळून मिसळून गेलेली आहेय, की काय इचारता? "
"आता 'सुशीमंदी आसं काय चांगलं?' म्हनलात, तर 'प्रोटीन' हाय! ताजं ताजं मासं हायत! भात हाय!
अहोऽ, म्हनून तर अगदी परदेशापतूर पोचलीये सुशी! आगदी तुमच्या आमेरिका, इंग्लंड, आस्ट्रेलियापत्तूर!"
"कशी खायची म्हंता? सांगतो की!"
"पन टोक्यो वगैरे शहरात तुमाला दुकानातच भेटनार सुशी. दुकानाला म्हंत्यात 'खाईतेनझुशी'!
म्हंजे काय, तेबी सांगतो.. "
सुशी दुकानात गेलात की तितं डिस्प्ले आसत्यात. अशे: -
"ओतारू खाईतेनझुशी"
उजवीकडचा त्यो गोलगोल फिरतेला बेल्ट दिसतोय नै? त्यावरनं त्ये सुशीच्या प्लेटा फिरत असत्यात. आपली आवडीची सुशी आली, की उचलून घ्याची. कोनी घेईपर्यंत त्या तितंच फिरत रात्यात...
सम्जा जर आवडीची सुशी दिसली न्हाई! किंवा म्हना, लईच भूक लागली आन वाट पाह्वेना!
तर मंग ह्ये "टच प्यानल" वापरायचं आनि डायरेट आर्डर द्यायची! शिम्पल!
"खायाचं कसं??? " सांगतो...
"एक रिकामी प्लेट घ्यायची आनि त्यात 'वासाबी' टाकायची. आणि वर 'शोऽयु'!
मिक्सं करून ठेवायचं आन एकेक सुशी त्यात हकलंच 'डीप' करून खायची!
* हां!!! हितं आदीच सांगून ठेवतो, 'वासाबी' संगट जास्ती शानपना करायचा न्हाई! न्हाई म्हंजे न्हाई!!!
"तुमच्या देशात लय तिकट खातात बितात असं ऐकलंय. पन वासाबी ती वासाबी!
अशी काय तिकट लागून जाती, की पार वाट लागून जाती... तर मुद्दा काय, तर वासाबीचं ध्यानात असूद्या! "
तेवडं लक्षात र्हायलं, की मग निसती सुशी खायची, नी मज्जा घ्यायची बगा!
चला मंग, म्हणा तर, "इतादाकिमास!!!" म्हंजे तेच ते तुमचं, "वदनी कवळ घेता... "
अॅवोकाडो एबी मियोमिज.. फ्रेशेस्ट एवर !
" 'शिजनल' वरनं आठवलं बघा.... 'पूर्वी आसं नवतं!'
म्हंजे, पूर्वी मासं खात हुते लोक, पन मागनी इतकी नव्हती, नै??
पर जशी जशी मागनी वाडू लागली, झालं कायऽऽ? तर समुद्रकिणार्याजवळचे मासे लागले सपायला!
पन लोकास्नी आवड जुनी! काय करनार??
मच्छिमार आमचे लय दर्यावर्दी बगा.. गेले की समिंद्रात. आत आत. आनि तितून ताजं मासं घेऊन आले.
मासं पकडायचं, शीतकपाटामंदी टाकायचं आनि मंग देशात आनून खायचं.
पन... लोकास्नी ती टेश्ट मिळंना हो.... "
"आता मच्छिमार आमचे लयच दर्यावर्दी बगा.. जसं गेले समिंद्रात, मासं न मारता पान्यात सोडून जिते घेऊन आले. ताजं मासं, ताजी सुशी!
पन... लोकास्नी ती टेश्ट मिळंना हो.... "
"आता आली का पंचाईती? काय करनार??
पन मच्छिमार आमचे लयच दर्यावर्दी बगा.. जसं गेले समिंद्रात, माशांबरोबर एक 'शार्क'पन घेऊन आले.
'साद्या माशांबरोबर शार्कपन ठेवला म्हंजे ते मासे कसे, पळत राहत्यात, चपळ बनत्यात... "
आनि 'बिंगो' बघा! लोकास्नी येकदम तीच टेश्ट मिळाली!!! 
* आता बगा, मला माझ्या बानं सांगितली ही गोष्ट. खरंखोटं तेच जानोत.. नाई का?
आप्न आपलं ताजी ताजी सुशी खावी!! कसं? घ्या घ्या. 'वासाबी' घ्या... आनि हो! सुशी खाऊन झाली, की मस्त ग्रीन टी प्यायचा. की सगळं कसं छान पचतंय बगा.. मदी मदी काई 'उमेश्युऽ' हवी आसंल तर..... नै का?
अशा ह्या सुशीची कहाणी!
२००६ मधली 'नावडती' राणी, २०१० मधे 'आवडती' झालीच शेवटी
!!!
* संदर्भः - http://sushi-master.com/usa/whatis/history.html
* वासाबी : -
ऋयाम..'प्राणी वैऋआम..'' सुशी
ऋयाम..'प्राणी वैऋआम..''

सुशी माझी फार्फार आवडीची आहे........ स्लर्प.. हॉन्गकॉन्गला सुशी नंबर वन नावाचं एक रेस्टॉरेन्ट आहे..तिकडली सुशीज तर नुस्ती स्लर्प!!!!!!!!!
मला कॅलिफोर्निया रोल, सालमन, क्रॅब ,श्रिम्प खूप आवडतात..
मस्त गोष्ट सुशीची.. नेक्स्ट टायमाला तपनयाकी बद्दल पण लिही
ह्ये सगळं ठीकै, पर त्ये
ह्ये सगळं ठीकै, पर त्ये कच्चंच खाता का काय? मसाला नसतोया का तुमच्या जपानात? तळणं, भाजणं, तिकलं बिकलं काहीच न्हायी? छ्या, छ्या
येक मालवणी हाटेल काढाया हरकत नाय जनू? म्हंजे तुमची सुशी कशी पिशी होऊन येईल बघा आमच्या मालवणी हाटेलात 
फोटो मस्त आहेत
शैलजा
शैलजा
मस्त माहिती. तुझी स्टाइल
मी पूर्ण शाकाहारी, पण ही
मी पूर्ण शाकाहारी, पण ही माहिती वाचायला आवडली.
एखादं छान शीर्षक दे प्लिज, जपानी खादंत्रीला शोभेसं... हे विडंबनात्मक वाटतंय.
मस्त जमलाय, पण सुशीत आणखी
मस्त जमलाय, पण सुशीत आणखी प्रकार पण असतात ना ? मी खाल्ले नाहीत कधी, पण बघितलेत..
छान जमलाय लेख माझी पण सुशीची
छान जमलाय लेख

माझी पण सुशीची चव हळुहळु झालीच डेवलप
सुशीबाईंच्या प्लेटस् नउ ?
सुशीबाईंच्या प्लेटस् नउ ?
धन्यवाद सर्वांना वाचल्याबद्दल
धन्यवाद सर्वांना वाचल्याबद्दल
वर्षूनील, तुमच्याच देशातली होऽ सुशीही
मालवणी हॉटेल हवाच हो
नाव बदललं आहे! सुचनेबद्दल आभार्स!
सुशीचे शेकडो प्रकार असतात अहो
मी थोडेफारच खाल्लेत..
सुशीची टेस्ट हळूहळूच डेव्हलप होते म्हणतात... मी काही मित्राना अजून पटवतोय.. पटतंच नाहीत लेकाचे. काही काही गोष्टींमधे "योग यायला लागतात!" म्हणतात ना, ते असे!.
असुदे, १४ प्लेट्स. दोघांत मिळून :गॉगल्सः
अतिशय आवड्ला लेख पन मी काही
अतिशय आवड्ला लेख पन मी काही ऐकले आहे की सुशी प्लेट मधे अल्या आल्या १० मिनिटात खावी लागते नाही तर विशबाधा होते हे खरे आहे का हे?
शैलजा, हो, असंच कच्चंच खायचं.
शैलजा, हो, असंच कच्चंच खायचं. नो मसाला.
ऋयाम, फोटो जबरी. एकदम ओईशीसोsssssssssssss
मी ही शाकाहारी, त्यामुळे ह्यातली एकही सुशी खाल्लेली नाही पण वासाबी यम्मी...
सुशी करताना वापरलेलं ते कच्चं
सुशी करताना वापरलेलं ते कच्चं फिश बघूनच खाऊन बघायची हिंमत होत नाही. मासे खायचाच तिटकारा वाटू लागला तर पंचाईत

मजेशीर लिहिलंय आणि फोटोही छान आहेत
मस्त लेख माझा पण योग आलेला
मस्त लेख

माझा पण योग आलेला नाही अजुन. कच्च्या माशाची टेस्ट डेव्हेलप नाही झाली तरी चालेल असे म्हणुन तो योग आणत नाहीए.
खाईतेनझुशी म्हंजे त्ये खै के
खाईतेनझुशी म्हंजे त्ये खै के पानबनारस सारखं वाटतंय वो मास्तर.
बाकी मी इथे दोनदा सुशी खाऊन बघितली. मुख्य म्हणजे माश्याचा फ्लेवर लागला नाही त्यामुळे ठीक वाटली.
आडो, कदाचित ते खाईतेनझुशी
आडो, कदाचित ते खाईतेनझुशी नाहितर उपाशी असं असेल.
ऋयामा, मस्त लेख अगदी तुझ्या
ऋयामा, मस्त लेख
अगदी तुझ्या स्पेशल इश्टाइल मधे 
खाईतेनझुशी .... खाईन्तर सुशी नाहीतर उपाशी
फोटो पण जबराट
आमचा पण सुशी खाण्याचा अजुन योग नाही आला... येण्याची शक्यता ही नाही
तुझ्या सुशी ला माझ्या सुशी चा झब्बू......
सही झब्बु आहे लाजो
सही झब्बु आहे लाजो
लेख आवडला. फोटोंचा कोलाज
लेख आवडला. फोटोंचा कोलाज करून टाकला असता एकाच फोटोत तर जास्त आवडले असते.
इथे Todai नावाच्या जपानी हॉटेलात व्हेज सुशी खाल्ली आहे एक दोन वेळा. आवडायला अजून बर्याच वेळा खावी लागेल. शाकाहारी सुशीला जपानी लोक सुशीचा दर्जा देतील असे वाटत नाही.
मस्तं वर्णन रे ऋयाम. शाकाहार
मस्तं वर्णन रे ऋयाम.
शाकाहार की वजहसे सुशी खायचा योग फारसा आलाच नाही .
तोदाई नावांच सुशी रेस्तराँ रुनी?
मस्त लेख.. मझा पण सुशी
मस्त लेख.. मझा पण सुशी खाण्याचा अजुन योग नाही आला.............
ते सुशीवरील नोरी शीट काळे
ते सुशीवरील नोरी शीट काळे दिसते ते खातात का? का फेकून देतात? परवा इथे अब्रम्हण्यम फ्राइड चिकन सुशी दाखिवली. फ्युजन च्या नावाखाली त्रास निव्वळ. जपानी अन्न अगदी चित्रासारखे सुरेख असते ग्रेट प्रेझेंटेशन व अतिशय ताजे मासे तरच ती सुशी बाईचे सौंदर्य निखरणार. मला एक कळत नाही. हात, चमचे, काटे चमचे वगैरे असताना चॉपस्टिकस नावाचा त्रास का बरे जेवताना. त्या चॉपस्टिक्स ने लोक्स कसे खातात? किंवा म्हणूनच बारीक राहतात बहुतेक. आपण आमटीताक भाताचा भुरका मारणारे नाहीतर हाताने तंदुरी चिकन तोडून खाणारे ( म्यानरलेस!:) )
जपानी जेवणात पूर्वी दुग्धजन्य पदार्थांचा वापर नसे व पहिले पाश्चिमात्य आले तर त्यांना मट्णाचा लोण्याचा वास येतो म्हणून स्थानिक लोक नाक मुरड्त असत. ( संदर्भ गेशा संस्क्रुतीवरील पुस्तक. )
गो सुशी ---> लोकांच्या पोटात!
सह्ही रे ऋयाम मस्त जमलाय लेख
सह्ही रे ऋयाम

मस्त जमलाय लेख
अ.मामी नोरी फेकत नाही. खातात.
अ.मामी
नोरी फेकत नाही. खातात. छान लागतं.
काट्याचमच्यानी खाण्यापेक्षा चॉपस्टीकने खाणे अगदी सोपे असते. खरतर दोन बोटांचे एक्टेंन्शनच वाटावे. दोन बोटांनी उचलुन पदार्थ तोंडात घालणे जितके सोपे तसेच. शिवाय जपानी जेवण सोबा, उदोन, सुशी वगरे हाताने किंवा चमच्याने पण जेवता येणार नाही नीट. लहान मुलांनापण चॉपस्टीक देतात.
चॉपस्टीकने खातात म्हणुन बारिक रहातात असं नाही. ते आपल्या पेक्षा प्रचंड वेगाने जेवतात आणी खुप जास्त खातातही. मी कधीच रेस्टाँ. मधलं जेवण संपवु शकत नाही पण इथल्या जपानी मुली सगळं एकदम साफ करतात! बारिक रहाण्याची कारणं वेगळी आहेत. नेहेमीचे भरपुर चालणे, व्यायाम, खेळ, सिझनल खेळ, आणि वाईट्ट म्हणजे बारिक रहाण्याची औषधे!
रच्याकने जपानी पण आता तंदुरी चिकन आणि नान चे फॅन झालेत बरं. घरी नान कसा बनवता हा प्रश्न ऐकुन कंटाळा येईल इथे आलात की.
सावली आमच्या इथे एक फॅन्सी
सावली आमच्या इथे एक फॅन्सी दुकान आहे तिथे फिश( फ्रोझन) व सुशी राइस खास जो मिळतो तो आहे पण ते शीट नाहीये. वासाबी पण मिळेल. मला शिकायचे आहे चॉपस्टिकनी खायला. जरा स्टायलिश वाट्ते. पण ते विनोदी ही दिसेल अशी भीती वाट्ते.
मला बेंटो कि बेंतो बॉक्सेस बद्दल पण जाम आकर्षण आहे. त्या बद्दल ही माहिती द्या.
मामी ते नोरी नसेल तरी चालेल
मामी ते नोरी नसेल तरी चालेल ना. खरतर नुसत्या ऋयामने वर दाखवलेल्या सुशीमधे ते नाही वापरत. ओनिगिरी (राईसबॉल्स) आणि माकी (रोल्स) -(पुर्ण नाव आठवत नाहिए) मधे वापरतात. इथे येताय का? आपण जाऊ एकत्रच जपानी जेवण चॉपस्टीकने जेवायला.
माकी (रोल्स) -(पुर्ण नाव आठवत
माकी (रोल्स) -(पुर्ण नाव आठवत नाहिए) मधे वापरतात>>
सावली, नोरीमाकी किंवा माकीझुशी म्हणायचय का तुला?
चला, आता पुढचं सुशी गटग करुयात अ.मा. बरोबर
हो हो मंजिरी नोरीमाकी आणि
हो हो मंजिरी नोरीमाकी आणि माकीझुशीच

सुशी गटग विथ अश्विनी मामी
ह्म्म्म्म्म, एक माणूस
ह्म्म्म्म्म, एक माणूस भारतातुन जपान मधे आला कामा निमित्त अनेक वर्षे राहिला. त्यातली पहिली २ ते ३ वर्षे शाकाहारी रहाण्याची खटपट केली. नंतर असे वाटू लागले की एकदा मासा खाऊन पहावा, कारण उत्सुकता आणि बिजिनेस नीड. मग या माणसाने आयुष्यात सर्वात प्रथम नोनव्हेज काय खावे तर सुशी.
आणि चक्क हळूहळू टेस्ट डेव्हलप वगैरे काही नाही. पहिल्या फटक्यात जपान्यांबरोबर त्यांच्या प्रमाणे खाऊन टाकली सुशी, मग साशिमी, याकीझाकाना, इ. आता हा माणूस अगदी नेहेमी नाही पण कधी तरी मासा खाऊ शकतो.
अरे अब तो कलकत्ते जानाही
अरे अब तो कलकत्ते जानाही पडेगा
सॉरी सॉरी तोक्यो 
मस्त रे ऋयामा. मी सर्वात
मस्त रे ऋयामा. मी सर्वात पहील्यांदा जपानला गेलो तेव्हा सुशीकडे बघीतलेही नव्हते. पण नंतर एकदा जपान्यांसोबत पार्टीला (पर्यायच नसतो सुशीशिवाय. फक्त प्यायला लागत मग) गेलो तेव्हा वासाबी शोयु करत इतादाकले होते त्यानंतर मात्र आवडले.
एकदा सुशीसोबत बासाशीमी (घोड्याचे कच्चे मास) पण खाऊन बघ. 
महेशा माणसा.
मामी जाना था कलकत्ता पहुंच गये तोक्यो?
Pages