चांगले 'साहित्य' / 'चांगला' वाचक म्हणजे काय ?

Submitted by Adm on 22 November, 2010 - 21:34

'मी वाचलेलं पुस्तक' बाफवर सुरु झालेली चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा.
चांगलं 'साहित्य' आणि 'चांगला' वाचक म्हणजे नक्की काय ? अशी व्याख्या करणं शक्य आणि गरजेचं आहे का?

मेघना भुस्कुटेने टाकलेल्या पोस्टवरून ही चर्चा सुरु झाली.

अवचटांबद्दलची ही एक प्रतिक्रिया वाचनात आली. मला ती बेहद्द आवडली आणि पटली. काहीशी कडवट असूनही.
http://dnyanadadeshpande.blogspot.com/2010/10/blog-post_29.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुष्यभर त्याच तीव्रतेने (intensity ने) आवडणे, त्या लेखकांच्या मर्यादाच न जाणवणे, जाणवल्यास त्या मान्य करता न येणे, आणि तिथेच त्याच जगात थबकून रहाणे,

<<< हे वर वर्णन केलेले काही व्यक्तींबाबत घडत असले तरी इतरांना खरोखर त्याबद्दल प्रॉब्लेम का असावा? ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे, त्याला काटेकोर नियम लावता येत नाहीत.

कंफर्ट झोन मधून बाहेर पडा असे जेव्हा कोणी म्हणते ती व्यक्ति म्हणजे मुद्दाम काहीतरी conspiracy करते आहे, उच्चाभिरूचीची अवास्तव दहशत माजवते आहे असेच का धरायचे?<<<<< असं जरी धरलं नाही तरी त्या व्यक्तीला नसेल इच्छा त्याच्या कंफर्ट झोनातून बाहेर पडायची तर त्या इच्छेचा आपण आदर बाळगायचा की नाही? की जनरलायझेशन करून त्या व्यक्तीला एखादं लेबल डकवून टाकायचं?
(समांतर उदाहरण म्हणजे: एखाद्या सरकारी नोकरीत रमलेल्या माणसाला ’अरे यातून बाहेर पड. बिझनेस करून बघ, नवे अनुभव घे’ वगैरे सांगून त्याने ’नको. आहे ते बरे आहे’ म्हटल्यावर तशा सर्वजणांना ’भित्रट, दर महिन्याच्या पगाराची सवय झालेले लोक’ वगैरे जनरल लेबल लावून टाकल्यासारखे झाले.)

चांगले साहित्य / चांगला वाचक या गोष्टी सापेक्ष आहेत. वैयक्तिक अनुभव, आवड यावर ते ज्याने त्याने आपल्यापुरतं ठरवावं. आपल्याला भावलेलं / न भावलेलं इतरांना सांगावंसं वाटलं तर सांगावं. एकाच साहित्यप्रकाराच्या दहा लेखकांची तुलना करायची तर करावी पण ते आपलं मत आहे, त्यावेगळी मतंही असू शकतात, हेही लक्षात ठेवलं पाहिजे.

मुळात प्रत्येकाने एका ठराविक वाटेने वाचलं पाहिजे (बालसाहित्य, मग अमुक लेखक, मग तमुक लेखक) हे ठरवणारे आपण कोण? आणि काही पुस्तकं वाचल्याशिवाय 'चांगला वाचक' होताच येत नाही, हे मत स्वतःपुरतं न ठेवता जनरलाइज्ड म्हणून मांडणारेही आपण कोण?

बरोबर. कुठलेही मत मांडायला आपण कोणीच नाही. म्हणुन मतच मांडायचे नाही असे काही नाही. आपण मांडले तसे त्यांनीही मांडले. झालं.
आपण कोण म्हणजे- आपण कोणीतरी मोठे असतो तरच त्या मताला किंमत असे काही नाही ना?

एकाच साहित्यप्रकाराच्या दहा लेखकांची तुलना करायची तर करावी पण ते आपलं मत आहे, त्यावेगळी मतंही असू शकतात, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. >> अगदी बरोबर. पण इथे तीच मतं व्यक्तं करणे चालू आहे ना? सार्वमतांचा पुरेसा आदर ठेवूनच पोस्टी पडतायेत. म्हणूनच अजून चर्चा भरकटलेली नाही. सगळ्यांमुळेच. Happy

मुळात प्रत्येकाने एका ठराविक वाटेने वाचलं पाहिजे >>> असे ध्वनित होते आहे काय ? तर तसे म्हणायचे नव्हते. पण काठिण्यक्रमाने वाचल्यास वाचकाला समजायला सोपे जाऊ शकते एवढाच मुद्दा होता. निष्क्रम वाचावे की खुशाल, पण कशातही तो दीघर्काळ आणि सदोदीत लेखककल्ट बनू देण्याइतके अडकुन/गुंतुन पडावे का हा प्रश्न आहे. केवळ वेगळे म्हणून, प्रमाण समजल्या जाते म्हणूनच केवळ ते वाचायचे नाही हेही योग्य नाही.
निष्क्रम जरी वाचले तरीपण कशाचेही ग्रेडेशन करता येत नाही (त्यातल्या त्यात) असे होत नसावे. प्रत्येकाला ग्रेडेशन करता येते. अशा अनेकांच्या वर्गवारीतील टॉप १०० म्हणजे प्रमाण साहित्य असे काही असते का? ते 'प्रमाण' का आहे हे मी नक्की समजून घेण्याचा प्रयत्न करेन. त्यात काही विचारकरण्याजोगे सापडलं तर आनंदाने उडी मारुन गणगोताला नक्की सांगेन. बस्स. नाही समजले तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करेन.

http://www.und.nodak.edu/dept/linguistics/wp/1997Meyer.PDF
हे इंट्रेस्टिंग वाटले.
आणि सार्त्रचे ' What is literature' सुरु केले आहे. पूर्ण झाले की मला जेवढे समजले तिथपर तरी नोटस नक्की टाकेन.

आपण मांडले तसे त्यांनीही मांडले. झालं.>>>> ज्ञानदा देशपांडे केवळ मत मांडून मोकळ्या न होता वेगळे मत असणार्‍यांबद्दल जनरलाइज्ड विधान करत्या झाल्या, त्या विधानावरून सुरू झाली ना ही चर्चा?

म्हणुन मतच मांडायचे नाही असे काही नाही.
आपण कोण म्हणजे- आपण कोणीतरी मोठे असतो तरच त्या मताला किंमत असे काही नाही ना?<<<<<<
"जनरलाइज्ड म्हणून" हे शब्द आहेत की तिथे... मतं मांडायला कुणाचीच ना नाहीए, चर्चेत लिहितायत त्यांच्यापैकी. आपलं मत हे कुणाला पटलं नाही तर त्या व्यक्तीबद्दल / समूहाबद्दल 'अशांचं सगळं पॅकेजच उमगून येतं' अशी ठाम विधाने करू नयेत, हे लिहिलं आहे काहींनी. बाकी, मोठे असलो की आपल्या मताला सर्वत्र किंमत प्राप्त होते, असंही काही नाही.

पण कशातही तो दीघर्काळ आणि सदोदीत लेखककल्ट बनू देण्याइतके अडकुन/गुंतुन पडावे का हा प्रश्न आहे. <<<< हाही 'ज्याचा त्याचा प्रश्न' आहे.जागतिक/वैश्विक स्तरावर याचं एकच, सर्वमान्य उत्तर कसं देता येईल?

केवळ वेगळे म्हणून, प्रमाण समजल्या जाते म्हणूनच केवळ ते वाचायचे नाही हेही योग्य नाही.<<<<< पुन्हा जनरलायजेशन! सर्वच लोक वेगळं, प्रमाण(तथाकथित) साहित्य केवळ वेगळं/प्रमाण वगैरे आहे, म्हणून केवळ वाचत नाहीत, हे गृहितक नक्की कसे आले?

श्रध्दाच्या पोस्टीला अनुमोदन. एकतर उत्तम वाचक ही व्याख्या करायची का? वरच्या बर्‍याचशा पोस्टीतून सजग वाचक कसा असावा याचेच मुद्दे येत आहेत. आयुष्यभर फक्त शेक्सपीयर वाचत राहिलं तर तो उत्तम वाचक ठरणार की नाही मग? आणि वाचनानं समृध्द व्हावं वगैरे उच्च हेतू बाळगलाच पाहिजे असं कुठं आहे! विंदांचेच उद्गार इथे नमूद करावेसे वाटत आहेत -
सामान्य वाचक बिचारे स्वतःच्या आनंदासाठी वाचतात; कसलाही आव नसतो. 'उच्चभ्रू'पणाची ऐट आणणारी माणसं त्यांच्याहून अधिक घातक असतात. सामान्य माणूसही आपल्या कुवतीनुसार निवड करत असतो. आपण त्यांना काहीच कळत नाही असं कसं म्हणायचं? आणि उच्चभ्रूंना तरी सगळं कळतं असं कुठं आहे? वाचकांचे अनेक थर आहेत, यांतला कोणताही एक थर वंचित ठेवणं हे पाप आहे. म्हणून त्या लोकप्रिय लेखकांनी लिहू नये असं म्हणण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही. आपल्याला ते आवडत नसेल तर आपण वाचू नये. ही गुळमुळीत तडजोड नव्हे; ही जीवनाच्या वस्तुस्थितीची थोडी उशिराच घेतलेली दखल आहे. मी जोपर्यंत लिहीत होतो तोपर्यंत ही दखल मी घेतलेली नव्हती. लोकांनी हे वाचू नये, ते लिहूही नये, असा आग्रह असे. पण आता अनेक प्रकारच्या व अनेक दर्जाच्या लेखनव्यापारांची अर्थपूर्णता पटू लागली आहे.

ज्ञानदा देशपांन्डें व त्याना सपोर्ट करणरे यांचा हा तुच्छ अथवा शिष्ट भाव हा मोठ्या लेखकातही दिसून येतो. बहुधा गंगाधर गाडगीळच म्हणत जी एंच्या कथेला कथा तरी का म्हणावे हे कळत नाही. आणि नेमाडे? त्यांच्या इतकी असहिष्णु विधाने मराठी साहित्याच्या इतिहासात क्वचित कुणी केली असतील. व्यक्ती म्हणून हा हलकटपणाचाच भाग आहे असे मला वाटते. असेल राजहंसाचे चालणे सुंदर , मग इतरानी चालूच नये काय ? असे कुणी म्हटले आहे बरे?
पानिपत या कादंबरीबद्दल एका नवप्रवाही लेखकाजवळ विषय काढला तर तोंड कडू करून ते म्हणाले अगदी भिकार चोपडे आहे ते. साहित्यमूल्य शून्य. हं , अगदी साहित्यव्यवहार म्हणून एक मराठी पुस्तक चांगले खपते आहे, लोक विकत घेऊन वाचत आहेत एवढीच समाधानाची बाब. (त्यानी पानिपतला अगदीच् कालनिर्णयच्या पातळीवर आणून ठेवले होते :))
हे म्हणजे एखाद्या खाष्ट पुणेर्‍याला नाटक कसे वाटतेय असे मध्यंतरात विचारले की त्याने म्हणावे 'पोरांनी नक्कल चांगली पाठ केलीय' तसे झाले Happy

अ‍ॅक्च्युअली एखादा वाचक का वाचतो ह्या वरून तो काय वाचतो हे ठरेल असं मला वाटतं..
उदा. १. माहिती मिळवणे
-- (वर्तमानपत्र/मासिकं(सद्यघडामोडी), माहितीपर पुस्तकं/साईटस(एखाद्या स्पेसिफिक विषयाची/कालखंडाची माहिती))
२. आपण घेऊ शकत नसलेलो पण दुसर्‍यानं घेतलेले अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करणे.
(ह्यात 'ज्ञान'ही आलं)
३. आपल्याला पटलेलं/न पटलेलं तत्वज्ञान दुसर्‍याच्या दृष्टीकोनातून वाचणं - अ‍ॅनॅलाईज करणं - त्यावर विचार करण्ं आवडतं म्हणून
४. लेखकाची शैली आवडली म्हणून
५. साहित्यप्रकार आवडतो म्ह्णून
६. अनुभवांना रिलेट करू शकते/तो म्हणून
७ निव्वळ करमणूक
८. हाताशी वेळ आहे आणि दुसरं कुठलं पुस्तक आजूबाजूला नाहिये म्हणून...
९. इतर काही कारणं (जसं एखादं पुस्तक वाचाताना आपल्या नकळत छानसं काहीतरी उलगडून जातं..)
मी तरी वरच्या कारणांकरता वाचते..प्रत्येक कालावधीत एखादा प्रकार वाचायची आतून उर्मी आलेली असते (वर्तमानपत्र सोडून - हा प्रकार मी केवळ कारण ८ करता वाचू शकते - पण शक्यतो नाहीच)-
जेव्हा डोक्याला खूप त्रास असतो - तेव्हा कधीकधी निव्वळ करमणूक हवीशी वाटते. मग तेव्हाच्या पुस्तकांनी डोक्यातनं त्रासदायक विचार जायला मदत करावी ह्यापलिकडे मला काही द्यावं अशी अपेक्षा नसते.. (हे फक्त उदा.. अहेतूक मूड हे ही कारण असू शकतं)
जेव्हा ऑफिसमधे डोक्याला खुराक कमी पडतो तेव्हा माहितीपर (उदा एखादा विषय पकडून पुस्तकातून/नेट वरून माहिती मिळवायची) किंवा माझी अ‍ॅनॅलिटिकल स्किल्स वापरली जातील अशी पुस्तकं वाचली जातात (ही पुस्तक निवड खूप सटल लेवल ला होते - आणि माझ्या नकळत हे होतय हे कळायलाही मला कित्येक वर्ष जायला लागली..)

पण अर्थात ह्या पुस्तक वाचण्यामागच्या माझ्या गरजा झाल्या.. काहीजण फक्त करमणूक म्हणून वाचत असतील (पुन्हा करमणूक कशातून मिळेल हा ही एक वेगळाच मुद्दा).. काहींना माझ्या गरजांपलिकडचं काही लागत असेल पुस्तक निवडीसाठी...

पहिले ३ स्टेटमेंट्स पटले.
हाही 'ज्याचा त्याचा प्रश्न' आहे>> सर्वच प्रश्न ज्याचे त्याचेच असतात. They are choices one makes.
जागतिक/वैश्विक स्तरावर याचं एकच, सर्वमान्य उत्तर कसं देता येईल>> उत्तर अजिबात देता येणारच नाही असे मी तरी ठामपणे नाही म्हणु शकत.
हेही योग्य नाही. >>> इथे हेही म्हणजे असाही विचार करणारे कोणी असतील तर तेही असे अभिप्रेत होते. मुद्दा व्यक्तिस्वातंत्र्याचाच आहे तर असाही एक वाचकवर्ग असू शकतोच की.

मी जोपर्यंत लिहीत होतो तोपर्यंत ही दखल मी घेतलेली नव्हती. लोकांनी हे वाचू नये, ते लिहूही नये, असा आग्रह असे. पण आता अनेक प्रकारच्या व अनेक दर्जाच्या लेखनव्यापारांची अर्थपूर्णता पटू लागली आहे.>> म्हणजे हा त्यांचा मतप्रवास झाला नाही का ? ज्या ज्या वेळेला त्यांना ते वाटले, ते त्यांनी निर्भीडपणे आणि प्रामाणिकपणे मांडले. अष्टदर्शने लिहीले. साहित्याचे अध्यापन केले.लालभडक विचारसरणी न घाबरता अंगीकारली आणि त्याहुन न घाबरता सोडली. त्यात काय चुकले? की ते विंदा, त्यांना मत बाळगण्याचा आणि ते बदलण्याचा अधिकार आहे म्हणुन ते ठिक? किंवा उलटपक्षी विंदा कोण लागून गेले असेही कोणी म्हणू शकते. (होपफुली नॉट. पण मुद्दा व्यक्तिस्वातंत्र्याचा असल्यासारखे आरग्युमेंट आहे म्हणुन). Happy

आणि वाचनानं समृध्द व्हावं वगैरे उच्च हेतू बाळगलाच पाहिजे असं कुठं आहे>> कशानेही? for argument sake कशानेही/ कुठल्याही कलेने का समृद्ध व्हावं, समृद्धच कशाला व्हायला पाहीजे असे प्रत्येक गोष्टीबाबत आपण म्हणू शकतो.

बाजो - पानिपत आणि कालनिर्णय यांत आत्ता इथेच एका वाक्यात आपण प्रतवारी करुन निकालात काढले ना? ज्ञानदाबै आणि त्यांचे सपोर्टस ही दुसरी कॅटॅगरी. शिष्ट लेखक तिसरी. कित्येक समुह तुम्ही एका फटक्यात तयार केलेतच ना?
तुलना, प्रतवारी आणि जनरलायझेनशन्स कोणालाही चुकले नाहीत हो. कमीजास्त मात्रेत एवढाच काय तो फरक.

नानबा - पोस्ट आवडली.
मृदुला- गद्य साहित्याबाबचा हा विचार सुचलाच नव्हता. थँक्यु.

असो. आता मात्र खरेच लेखनसीमा. मी वाचते आहे. वाचत राहणार आहे. पण याहून जास्त काही मुद्दे माझ्याकडे नाहीत.

मस्त चर्चा!!
ज्ञानदा देशपांडेंनाही इथे चर्चेस येण्याचे आमंत्रण द्यावे असे वाटते..

रैना,

माफ करावेत, पण आपल्याकडे 'त्याहून जास्त काही मुद्दे नाहीत' हे वाचून फार बरे वाटले.

-'बेफिकीर'!

तारे आपल्यापासुन इतके दूर असतात की ते टींबस्त्रोत (pointsources) वाटावेत. पण जेंव्हा संगणकावर त्यांची छबी मिळवल्या जाते तेंव्हा प्रकाशकणांच्या प्रवाहावर वातावरणाचे, दुर्बीणीचे व CCD (Charge-Coupled Device) चे संस्कार झाले असतात व त्यामुळे ती लंबगोलाकार भासते. खरे स्वरुप अभ्यासायचे असल्यास deconvolution नामक प्रकार करावा लागतो.

आपण जे वाचतो ते अनेकदा आपल्यावरील संस्कारांमुळे ठरते - घरगुती वातावरण, मीत्र, नातेवाईक, शेजारी, जवळपासची वाचनालये ई. त्यातुन आपल्या आवडीनिवडी ठरतात, व कधीकधी थीजतात व आपले कुपमंडुकात परिवर्तन होते. कुपमंडुकाचा कुपमंडुक असण्याला विरोध असतो का? नाही. ते त्याचे बौधत्वच (Buddha nature) आहे.

आपल्याला आक्षेप असावा का? Mayh be. असल्यास असे काही वाचा की जे तुमच्या हातात पाहुन तुमची आराध्यदैवते लाजतील. मग ते टाकायचे (आणि पुढच्या genre कडे वळायचे) की कुरवाळायचे हे तुम्हीच ठरवायचे.

सगळे काही वाचणे शक्य नसते (केवळ wowbagger ते स्वप्न पाहु शकतो) त्यामुळे कधीतरी थोडेफार थीजावे लागु शकते. पण breadth-first मुळे जास्त आनंददायी अनुभव यायची शक्यता वाटते.

जाताजाता: त्यावेळची सर्वात महागडी दुर्बीण, हबल, ही वातावरणाचा प्रभाव टाळण्याकरता अवकाशात स्थापण्यात आली. पण त्यातील आरशाच्या चुकीच्या वक्रतेमुळे काही वर्षे ती बऱ्यापैकी निष्प्रभ होती. वाचायला गेलो एक आणि ...

वाचनानेच ग्रोथ होत नाही,आणि वाचनानं समृध्द व्हावं वगैरे उच्च हेतू बाळगलाच पाहिजे असं कुठं आहे,वाचनाने माणुस म्हणुन ग्रोथ होइलच असे नाही इत्यादी इत्यादी ...>> अगदीच मान्य.
पण ह्याला supplementry विधान मी करेल. माझी माणुस म्हणुन ग्रोथ , जी माझ्या वाचनामुळेच झाली नसेल कदाचित ,माझ्या वाचनाच्या बदललेल्या आवडींमधे दिसु शकते.
९वी १०वीत असताना सुनीता देशपांडेंचे "आहे मनोहर तरी.." कंटाळवाणे वाटले तरी ते engg. शेवटच्या वर्षाला गेल्यावर परीक्षेच्या आदल्या दिवशी झपाटल्यासारखे वाचुन काढले जाते.
मंगला गोडबोलेंचे विनोदी लिखाण विनोदी न वाटता , कंटाळवाणे वाटायला लागुन त्यांचे ललित लेख जास्त आवडायला लागतात,कधी काळी लहानपणीच्या श्रीखंड(इथे कुठलाही पारंपारीक पदार्थ घ्या) ,वाड्याच्या,शेजार्‍यापाजार्‍यांच्या आठवणी काढणारे ललित लेख वाचायला छान वाटत पण आता पुरे ते लेख पाडणे त्यापेक्षा दिवसाचे भविष्य बरे इतके अजीर्ण होतात.. हे सगळे माणुस म्हणुन माझ्यात होणार्‍या बदलाचे reflection आहे, आणि ही ग्रोथ कदाचित काही लोक भाव खाण्यासाठी वापरत असतीलही पण म्हणुन सगळ्यांचा 'फक्त भाव खाणे' किंवा 'आम्ही कसे भारी' असा हेतु असेलच असे नाही.

खूप छान चर्चा. रैना अवचट अगदीच वाचवत नाहीत हे सोडल्यास तुझ्या पोस्ट्स पटल्या. गेल्या २-४ वर्षात अवचटांचं नविन काही वाचल्याचं आठवत नाही. त्याआधीचेही दिवाळी अंकातले वैगरे लेख आता नीटसे आठवत नाहीत. परंतू शाळेत असताना वाचून भारावून गेलेलं "माणसं" आत्ता दोन आठवड्यापूर्वी परत वाचूनही आवडलं. अवचट म्हणल्यावर मला तरी पूर्वी वाचलेली पुस्तकंच आठवतात आणि ते अजूनही आवडतात.

हे असंच विधान मला सगळ्या लेखकांबाबत नाही करता येणार. बर्‍याच लेखक -लेखिकांची काही पुस्तकं पूर्वी खूप आवडली होती. परत १० वर्षांनंतर वाचताना ती पुस्तकं तितकीशी भावत नाहीत किंवा कधी कधी ही पुस्तकं कशी काय आवडली असाही प्रश्न पडतो. पण तरीही कोण्या एका काळी ही पुस्तकं आणि हेच लेखक खूप आवडले होते ही बाब मी नाकारू शकत नाही. कदाचीत सध्या आवडत असलेल्या लेखकांबद्दलही मी अजून १० वर्षांनी हेच म्हणेल. Happy

नानबा, आपण का वाचतो यासाठी दिलेली सगळी कारणं पटली. Happy केदार, आगाऊ, अश्चिग, मृदुला आणि आर्क पोस्ट आवडली. Happy

चर्चा वाचायला आवडली.
रैना, तुझ्या सगळ्या पोस्ट आवडल्या. (पूर्णपणे पटल्या असे नाही)
मला अवचट वाचायला आवडतात. अगदी नवीन लिहिलेले वाचलेले नाही.
नानबा, तुझ्या पूर्ण पोस्टला अनुमोदन. (क्र. २, ३ तर अगदी अगदी)

चांगली चर्चा. मी अवचटांचे काही लेख सोडता बाकी वाचलेले नाही त्यामुळे त्यावर पास. मात्र अभिरूची ही विशिष्ट वर्गाचे पेटंट असते ही व्याख्या मला मान्य नाही. या संदर्भात नंदनच्या अनुदिनीतील विंदांची मुलाखत वाचनीय आहे. त्यातील काही भाग.

"काही लोकप्रिय लेखकांचं उदाहरण घेऊ. मी ते वाचलेले नाहीत, वाचू शकत नाही, हे सोडा. पण असं वाटतं की, नवशिक्षित समाजासाठी या लेखकांची आवश्यकता आहे. त्यांची सांस्कृतिक भूक हे लेखक भागवतात. त्यांची वाचनाची सवय वाढवतात. सामान्य वाचक बिचारे स्वतःच्या आनंदासाठी वाचतात; कसलाही आव नसतो. 'उच्चभ्रू'पणाची ऐट आणणारी माणसं त्यांच्याहून अधिक घातक असतात. सामान्य माणूसही आपल्या कुवतीनुसार निवड करत असतो. आपण त्यांना काहीच कळत नाही असं कसं म्हणायचं? आणि उच्चभ्रूंना तरी सगळं कळतं असं कुठं आहे? वाचकांचे अनेक थर आहेत, यांतला कोणताही एक थर वंचित ठेवणं हे पाप आहे. म्हणून त्या लोकप्रिय लेखकांनी लिहू नये असं म्हणण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही. आपल्याला ते आवडत नसेल तर आपण वाचू नये. ही गुळमुळीत तडजोड नव्हे; ही जीवनाच्या वस्तुस्थितीची थोडी उशिराच घेतलेली दखल आहे. मी जोपर्यंत लिहीत होतो तोपर्यंत ही दखल मी घेतलेली नव्हती. लोकांनी हे वाचू नये, ते लिहूही नये, असा आग्रह असे. पण आता अनेक प्रकारच्या व अनेक दर्जाच्या लेखनव्यापारांची अर्थपूर्णता पटू लागली आहे."

"अशी कल्पना करा की, वाङ्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते, त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणेच जंगलंही पाहिजेत, वाळवंटं पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडं पाहिजेत. जंगलाची शोभा त्यातच आहे! मराठी वाङ्मयाचं दुर्दैव हे, की या जंगलात महावृक्ष नाहीत. याचा अर्थ मराठीत व्यास-शेक्सपिअर-टॉलस्टॉय-डोस्टोव्हस्की नाहीत. ती तक्रार नाही. ते युगा-युगांनंतर येतात. पण आपल्याकडे त्यांच्या आसपास पोचतील असे वृक्षही नाहीत. याचं दुःख वाटलं पाहिजे. त्याऐवजी आपण दुःख कशाचं करतो? तर अमुक लेखक सामान्य लिहितात आणि ते वाचलं जातं, याचं! आपल्या साहित्यव्यवहाराचा एक भाग - एकमेकांना मोठं करणं, आणि दुसरा भाग - सामान्य लेखक सामान्य आहेत, हे पुनःपुन्हा सांगणं. खासगीत त्यांची टिंगल करणं. प्रत्येकालाच 'हॅम्लेट' आवडेल असं कुठे आहे हो? शेक्सपिअरनं असामान्यांना दिलं तसं सामान्यांनाही भरपूर दिलं. तो अभिरुचीच्या अधोगतीबद्दल कुढत बसला नाही. काव्यक्रांत्या वगैरे भानगडीतही पडला नाही. त्या तोलामोलाची प्रतिभा असली की अनेक गोष्टी आपोआप साधतात. जुन्या मराठी काव्यातील ज्ञानेश्वर व तुकाराम हीच दोन नावं मराठीनं जगात मिरवावी अशी. पण आमच्या ज्ञानबा-तुकारामाच्या गजराला आता ते संतही कंटाळले असतील! त्या जागतिक तोलामोलाचं आम्ही काय केलं?"

Interesting चर्चा चालली आहे... पण तरीही एक दोन लहानसे मुद्दे उपस्थित करावेसे वाटतात...
१. मुळात ज्या 'जनरलाइझेशन करण्यावरून' चर्चा चालू झाली, त्या मुद्द्याचं पुढे काय झालं ?
म्हणजे जनरलाईझेशन करू नये हे इथल्या सगळ्या चर्चा करणा-यांना मान्य आहे का?
असेल... तर फारएंड, आपण इस खुशीमे एक चहा प्यायला मोकळे (कारण आपला तितकाच साधासा मुद्दा होता.. नाही का? Happy )
नसेल.. तर त्या मुद्द्यावर चर्चा पुढे चालू Happy
२. दहा बारा वर्षापूर्वी 'वाद स्पर्धेला' कोणी हा विषय दिला असता तर मी मुळात 'चर्चेच्या विषयापासूनच' वाद घालायला सुरुवात केली असती.
चांगला वाचक/चांगलं साहित्य हे शीर्षकातच लिहिताना आपण तिथेच 'गटवारी' करत आहोत असं नाही का वाटत?
म्हणजे विषय/आवाका हा आधीच झापडं लावून कमी करायचा आणि मग त्या कुंपणाच्या आत 'कक्षा कशा रुंदावल्या पाहिजेत' वगैरे वगैरे चर्चा करत राहायचं असं काहीसं होतंय असं नाही का वाटत आहे Happy

>>खालची एक कॉमेंट वाचून तर मजा आली: पुलं एवढे लोकप्रिय कारण मराठी माणसाला विनोदातील फारसे वैविध्य >>वाचायला मिळाले नाही. हे म्हणजे रिचर्ड्स आणि गिलख्रिस्ट भारतीय संघात नाहीत म्हणून सचिन लोकप्रिय आहे >>म्हणण्यासारखे झाले.

Happy
असे म्हणायचे नव्हते. मतितार्थ इतकाच होता की इंग्रजी साहित्यात जी प्रचंड विविधता आहे त्या मानाने मराठीत ठराविक नावेच परत परत दिसतात. अर्थात या दोन्ही भाषांचा आवाकाही वेगळा आहे त्यामुळे सरल तुलना तितकी योग्य नाही.

शीर्षकात कोणतीही गटवारी केलेली नाही. तिथे उपहास आहे. म्हणूनच चांगले आणि वाचक शब्दांना कोट्स आहेत. बाकी सगळ्यांना हे कळलय असं वाटतय.
जनरलायजेशनचा मुद्दा मागे पडला हे बरोबर आहे पण चर्चा चांगली चालू आहे.
मी काही येऊन वाचेपर्यंत ७० पोस्टी पडलेल्या होत्या.. Happy आणि मला मांडायचे मुद्दे फारेंडाने, बाळू जोशींनी आणि श्रद्धाने कव्हर केले आहेत.

चांगले "साहित्य" मधल्या "साहित्य" ला कोटस आहेत.. चांगले ला नाहीत !
"चांगला" वाचक मधल्या "चांगला" ला कोटस आहेत.. वाचक ला नाहीत !
Happy
(मुद्देसूद वादच घालायचा असेल तर या वरच्या दोन कोट्स मधे असलेल्या आणि नसलेल्या शब्दांवरही घालता येईल!)
पण असो... बाकी सगळ्यांना जे कळलंय ते कदाचित मला कळलं नसावं हेच योग्य वाटतंय !
क्षमस्व Happy

सॉरी.. पोस्टमध्ये लिहिताना कोट्स इकडचे तिकडे झाले.. Happy ते एडिटायला येईपर्यंत दुसरी पोस्ट आली म्हणून खालीच लिहितो.. Happy

चांगले "साहित्य" मधल्या "साहित्य" ला कोटस आहेत.. चांगले ला नाहीत ! >>> हो.. कारण अर्नाळकरांचे साहित्य हे साहित्यच नाही असे पोस्ट आधी पडले होते. नंतर ते एडीट झाले (कारण तसे म्हणायचे नसावे). म्हणून साहित्य म्हणजे काय ? असे विचारणारी पोस्ट होती म्हणून साहित्य ला कोट्स दिले आहेत.
"चांगला" वाचक मधल्या "चांगला" ला कोटस आहेत.. वाचक ला नाहीत ! >>>> वाचणारा तो वाचक. मग "चांगला" आणि वाईट हे कसं ठरवतात हे मला कळत नव्हतं. म्हणून तिथे चांगला ला कोट्स आहेत.

असो. शीर्षकात वर्गवारी वगैरे अपेक्षित नाहिये... त्यामुळे झापडं न लावता आपण मुळ मुद्यांकडे वळूया... Happy

काय बरं होता मूळ मुद्दा?
फॉसिलायझेशन?
माझा फॉसिलायझेशनला संपूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळेच आपल्याला खनिज तेले, कोळसा इ. उर्जा उत्पन्न करण्याची साधने मिळतात.
की 'मध्यापर्यंत पूर्ण त्रिज्या असेल तर ठिकै' हा?
आता त्रिज्या जर मध्यापासून काढायला सुरुवात केली तर जसजसे क्षितीज विस्तारत जाइल, तसतशी ती क्षितीजापर्यंत पोचेल म्हणजे ती नेहेमीच पूर्णच असेल.

शिवाय कुणाच्या बाबतीत मध्यापासून क्षितीज विस्तारत जाउन ते हायपरबोला च्या आकारत असेल, कारण निरनिराळ्या दिशांनी अजूनहि त्या व्यक्तीचे क्षितीज विस्तारतच असेल. त्यात अर्नाळकर, अ‍ॅगाथा ख्रिस्ती, स्वामी चिन्मयानंद, स्टीव्हन हॉकिंग्स, आयझॅक असिमोव्ह, शंकर पाटील, मायबोलीवरील लेखन हे सर्व काही मजेत सामावले जाते. त्याला त्रिज्या नाही. वर नानबा यांनी लिहिलेल्या आठव्या प्रकारातला(ली) वाचक असेल तर लगेच तो/ती 'वाईट' वाचक? का वाचत असलेले 'साहित्य' वाईट?

की व्यक्ति तितक्या प्रकृति, म्हणून जाऊ दे झाले, कुणि काहीहि लिहा, नि काहीहि वाचा. पण उगाच काय चांगले ('चांगले') याची चर्चा करून एकमेकांना दुखावू नका, हा माझा मुद्दा.

यात कुणाचा अपमान झाला असेल किंवा हे निरर्थक वाटत असेल, तर आबुदोस. उगाच डोस्क्यात राख घालून 'चिडचिड होते' असे म्हणू नका! नि कुणि लिहीले आहे ते आधी बघून, वाचण्याचे कष्ट घेऊ नका!

Happy Light 1

हो रार, माझाही फक्त जनरलायझेशन चाच मुद्दा होता Happy पण त्यातही थोडे मतभेद दिसतात ("विद्वानांच्या भाषेत अज्ञानाला मतभेद म्हणतात" असे ज्यांची पुस्तके यत्ता पहिली दुसरीनंतर वाचू नयेत असे बरेच लोक म्हणतील अशा लेखकाचे मत आहे Happy ).

बाजोंच्या पोस्ट मधल्या "ज्ञानदा देशपांन्डें व त्याना सपोर्ट करणरे यांचा हा तुच्छ अथवा शिष्ट भाव" यात जनरलायझेशन कसे झाले? त्या ब्लॉग पोस्ट मधे तसा भाव जाणवतो. त्या मुद्द्यांवर त्यांना सपोर्ट करणार्‍यांचे ही (किमान त्या बाबतीत) तसेच मत असणार असे वाटणे हे साहजिक आहे (नाहीतर मग सपोर्ट कशाला?). पण त्यांचे असे मत आहे म्हणून त्यांचे पूर्ण व्यक्तिमत्त्व, साहित्यिक समज ई. आम्हाला समजले असे कोणी म्हणाले तर (माझ्या मते) ते या ब्लॉगच्या लेव्हलचे जनरलायझेशन होईल.

कदाचित मला माझ्यासारखी मते असलेल्या पोस्टी आपोआप बरोबर वाटत असतील Happy त्यामुळे याविरोधी मते वाचायला आवडतील.

rajkashana (उच्चार काय आहे?) - त्या बाबतीत मला वाटते की एखाद्या लेखकाची/कलाकाराची लोकप्रियता त्याच्या वाचकांना/प्रेक्षकांना इतर काय उपलब्ध आहे यावर अवलंबून नसावी.

हे एक जनरलायझेशन बर्‍याच जणांना पटेलः बाळबोध, मध्यमवर्गीय वाचक मराठी आणि इंग्रजी नावांचे लोकप्रिय लेखक वाचतात. वरच्या दर्जाचे वाचक फक्त स्पॅनिश आणि फ्रेन्च आणि त्यातही उच्चारांवरून स्पेलिंग हमखास चुकेल अशा नावांचेच वाचतात. Happy

बरिच चर्चा चालली आहे. पण मला काही प्रश्न आहेत. कदाचित अगदीच बाळबोध असतील . पण इथे लिहिणारे बरेच जण (सगळे नाही!) "लेखक"च वाचतात का? "पुस्तकं" नाही वाचत का?
"अमुक लेखक हा असाच, तमुक तसाच" असं म्हणण्यापेक्षा "अमुक पुस्तक असं आणि तमुक पुस्तक तसं" हे म्हणणं जास्त सोपं ,योग्य नाही का? ती चर्चा तुम्ही दुसर्‍या बाफ वर करत असाल तर मग इथे नक्की कशाची चर्चा आहे.
समजा एखाद्या नावडत्या ऐतिहासिक कादंबरी फेम लेखकाने सायन्स फिक्शन कादंबरी लिहिली तर विषय आवडता असुनही लेखक नावडता म्हणुन ती वाचणार नाही का? तो जनरलायझेशन वाला मुद्दा खोडून काढताना परत एकदा जनरलायझेशन झालय अस वाटत नाही का?

अरभाट यांचा "रिलेट" वाला लेख परत एकदा वाचुन काढीन म्हणते.

फारएन्ड : सहमत आहे. नसेलच. लोकप्रिय नावांची रेंज कमी आहे असे म्हणायचे होते. पण एकुणातच माझे वाक्य गोंधळात टाकणारे होते असे आता वाटते आहे. Happy
kashana चा उच्चार : काशाना - घर. गालिबच्या एका लै आवडलेल्या गझलेत हा शब्द पहिल्यांदा भेटला.

छान चाललिय चर्चा. विचारांची दिशा फारेण्ड, चिनुक्स, रार ह्यांच्या बाजुची असल्याने त्यांच्या पोस्ट्स पटल्या.

सावली, तुझा मुद्दा अगदी रास्त आहे वाचणार्‍यांनी "लेखकांऐवजी पुस्तक" वाचलित तर जनरलायझेशन निकालात निघेल पण अस होत नाहि म्हणजे कोणि ठरवुन करत अस नाहि पण जो तो आपापल्या पिंडाप्रमाणेच निवड करणार. उदा मला पु. ल. आवडतात म्हणजे त्यांनि लिहलेल प्रत्येक पुस्तक आवडत अस नाहि पण उद्या चेतन भगत आणि पु ल ह्यांच्यामध्ये निवड करायची झालि तर आपोआपच पुलंची केलि जाइल चेतन भगत वाचलेला नसुन सुध्धा! किंवा मोठ्या प्रवासात वाचायला म्हणुन विमानतळावरच्या दुकानातुन काहि घ्यायच झाल तर हॅरी पॉटर सिरिज मधुन काहि घेण्याऐवजी टाइम मॅगझिन किंवा रिडर्स डायजेस्ट घेइन. मुद्दा फक्त इतकाच आहे की भगत, किंवा रोलिंग्स चे फॅन आहेत म्हणुन कुणाचि अभिरुची माझ्यापेक्षा कमी दर्जाची ठरत नाहि किंवा काफ्का, डोटोव्हस्कि, टॉलस्टॉय वाचतात म्हणुन कुणाची अभिरुची माझ्यापेक्षा श्रेष्ट दर्जाची ठरत नाहि.

ह्याहि पलिकडची पायरी म्हणजे सगळे भगत वाचक उथळ किंवा हॅरी पॉटर वाचणारे सगळे अ‍ॅडल्ट्स बालिश आहेत अस जनरलायझेशन करण. इथल्या बहुतेकांना ते चुक वाटल म्हणुन इथे ज्ञानदा बाईंना विरोध होतोय.

"लेखक"च वाचतात का? "
अर्थातच. "पुस्तकं" नाही वाचत का?" नाही.

एकदा ठरवले की अमुक 'लेखक' वाचणाराच फक्त श्रेष्ठ, की इतरहि काही 'लेखन' वाचले असे म्हणण्याची चोरी! आपोआप उथळ किंवा बालीश ठरणार. ज्यांचे क्षितीजच मुळी मर्यादित, वर्तुळाकार, ज्यांना त्रिज्या पूर्ण (मर्यादित) हवी असते, त्यांना हायपरबोला ला च्या अनंत, अमर्यादित क्षितीजाची कल्पना कुठून येणार?

म्हणजे मग एकच 'लेखक' वाचला की पुरे. भरपूर मराठी साहित्य वाचले तर कदाचित् इंग्रजी शब्दांच्या कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत, पण जिथे खर्‍या अभ्यासापेक्षा नुसता ज्ञानाचा आभास निर्माण करायचा आहे तिथे मोठ मोठे इंग्रजी शब्द वापरायचे, म्हणजे लोकांना वाटते, व्वा, काय पण हुषार! (साठ वर्षे होऊन गेली परकीय गुलामगिरी संपून तरी!) अजून दोन वाक्ये इंग्रजी शब्दांच्या कुबड्या घेतल्याशिवाय लिहिता येत नाहीत, नि 'मराठी साहित्याच्या' गप्पा!!

इथे मायबोलीवर सुद्धा काय लिहीले यापेक्षा कुणि लिहीले याला जास्त महत्व आहे! विशेषतः भारतीय व्यक्ति अमेरिकेत आहे म्हंटल्यावर 'त्यांना काय कळते' असे ठरले असल्याने वाचण्याचे कष्ट नकोत!

Proud

>>>>> चांगलं 'साहित्य' आणि 'चांगला' वाचक म्हणजे नक्की काय ? अशी व्याख्या करणं शक्य आणि गरजेचं आहे का? <<<<<<
मी हा आख्खा बीबी वाचला नाहीये, त्या दृष्टीने मी चान्गला वाचक नाहीये
मात्र, लहानपणापासून जे शिकत आलोय पूर्वासूरीन्कडून, त्यानुसार, जो तो ज्याच्या त्याच्या "लायकीनुसार" लिहीत अस्तो/बोलत अस्तो, व त्यास वाचक वा श्रोते देखिल त्या त्या लायकीचेच मिळतात. जसे की सुगम सन्गित ऐकणारा, एकदम शास्त्रीय सन्गितात रममाण होऊ शकेल असे नाही, वा भजनात गुन्तणारा चौफुल्यावरच्या लावणीच्या फडावर दिसणार नाही, साधारण तसेच लेखक व वाचकाचे नाते असते, त्या त्या लेखकूस व त्याच्या वाचकास ते ते लेखन "उत्कृष्टच" वाटत असते. यात सन्तसाहित्यापासून यल्लोबुक्स पर्यन्त सर्व साहित्यप्रकार येतात व त्यान्चा वाचकवर्ग अस्तो.
काल देखिल यावर मात करू शकलेला नाहीये असे वाटत असले तरी व्यक्तिचे वय वाढत जाते, तसतसे बहुधा त्याचे वाचनविषय बदलत जातात, व शेवटी काल मात करतोच!
सबब मला तरी, व्याख्ख्या वगैरे करणे निरर्थक वाटते कारण हे सर्व व्यक्ति व तिच्या कुन्डली सापेक्ष अस्ते.
बाकी, सध्या पुण्यात म्हणे, महाराष्ट्र टाईम्स, अकरा रुपयात चार महिन्याची दैनिके देणारे, केतकराच्या लोकसत्ताला वैतागलेला मी अकरा रुपयातली ही ऑफर बहुतेक स्विकारणार! आता तुम्हीच मला सान्गा, मी (व माझ्यासारखे अनेक)कशाप्रकारचा वाचक आहेत? Proud

बाळू जोशी चांगले 'वृत्तपत्र-वाचक' नाहीयेत असं दिसतंय Wink Light 1

Pages