जाबरवोका

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बिलबिलाट होता आणि ते घसरडे तोव्ह
घुमत आणि फिरत होते वाबात।
सगळं मीम्सी होतं बोरोगोव्ह,
आणि मोम होते राथाडत।

जाबरवोका पासुन सावध रहा माझ्या बाळा!
जबडा जो चावतो, आणि पंजे जे पकडतात!
सावध रहा जुबजुब पक्षापासुन,
आणि फ्रुमित बंदरओढ्यापासुन।

घेतली त्याने त्याची वोरपल तलवार हाती:
कधीपासुन या मांक्सोम शत्रुचा तो घेत होता शोध।
थोडा आराम केला त्याने टुमटुम झाडाखाली,
आणि थोडा उभा ठाकला विचारात।

आणि असा तो उफिष विचारात गढला असतांना,
ज्वाळांसमान डोळे असलेला जाबरवोका,
आला वीफाकत टल्गी जंगलातुन,
आणि बरबेलला येता-येता।

एक-दोन! एक-दोन! आणि आर आणि पार,
ती वोरपल तलवार बोलली सनक-झनक!
पडु दिले त्याने ते धड तिथेच, आणि शिर घेवुन
निघाला गलंफत परत।

"आणि तु जाबरवोकाला मारलेस?
माझ्याजवळ ये माझ्या बीमीश बाळा!
काय हा फ्राब्जस दिन! हुर्रे! झकास!"
तो त्याच्या आनंदात चरटाळला।

बिलबिलाट होता आणि ते घसरडे तोव्ह
घुमत आणि फिरत होते वाबात।
सगळं मीम्सी होतं बोरोगोव्ह,
आणि मोम होते राथाडत।

Lewis Carroll यांच्या Through the Looking Glass, and What Alice Found There (1872) मधील Jabberwocky चा [अनेक वर्षांपुर्वी केलेला] स्वैर(?) अनुवाद

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

अरभाट, मला ही कवीता यामुळे जास्त आवडते की अनेक शब्द हे कृत्रीम असले तरी त्यांच्या texture मुळे ते खरे असु शकतील अशा संशयाला वाव असतो. ऑस्ट्रेलीआ खंडातील काही बेटांवर दोन भाषांच्या मिश्रणाने नवीन तयार होत असलेल्या भाषांसंबंधी तो मुद्दा पुढे आला होता. विदेशी भाषेतील एखादा शब्द मराठी नाही हे सांगणे सोपे असते पण मराठी सदृष्य (सशृण? सशृण्य?) शब्दांबद्दल ते सोपे नाही.

Steven Pinker ने या सारख्या गोष्टींबद्दल चांगले लिहिले आहे. मला त्याने बनविलेले हे वाक्य खुप आवडते:
Colorless green ideas sleep furiously. वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध आहे त्यामुळे ऐकतांना खटकत नाही. पण लागोपाठचे कोणतेही दोन शब्द घेतल्यास मात्र मेंदुची तारांबळ उडते.
colorless green
green ideas
ideas sleep
sleep furiously

green ideas metaphorically make sense now. त्या ऐवजी तांबडा किंवा असा कोणतातरी रंग आता वापरावा लागु शकतो.
ideas sleep also metaphorically could make sense जर तुम्ही ज्याच्या कल्पना आहेत तो झोपला आहे असे समजलात तर.

सगळ्यात अर्थ शोधलाच पाहिजे का? मला तर निरर्थक/ अगम्य अर्थ असलेले किंवा वेगळ्याच प्रतलावरचे काहीतरी वाचायला अधुन मधुन आवडते. अगदी छोटी मुले बोलायच्या अगोदर त्यांना हव्या त्या, व आपल्याला गूढ वाटणार्‍या भाषेत बोलत असतात. त्यात नाद, लय, ध्वनी आणि त्यांच्या परीने एक अर्थ असतो. आपल्याला कळतोच असे नाही. पण ती समांतर भाषा छान वाटते ऐकायला.... त्यामुळे हा वरचा अगम्य जाबरवोका मजकूर त्यातील अर्थ न कळताही मजेदार वाटला.

(अवांतर : लहानपणी मी एका समांतर भाषेत बोलायचे, जी भाषा फक्त मलाच कळायची असे माझे आईवडील मला सांगतात. त्यातील काही काही शब्द त्यांना कालांतराने कळू लागले होते. उदा : कोंबड्याला आमण्णा म्हणायचे. चमच्याला तमळेनाना म्हणायचे. मला व्यवस्थित बोलता येऊ लागले, बोबडे बोल मागे पडले तशी मी ती भाषा विसरले. पण ही वरची कविता अशाच एका भाषेतील रचना असणार!! :-))

जॅबरवॉकी वाचल्यावर मला नेहमीच वाटते की पूर्ण कविताभर अर्थहीनता सांभाळणे हे कसले अवघड असेल!>>माझ्या दुर्दैवाने मी जॅबरवॉकी हितगुजवरच्या काही कविता वाचल्यानंतर वाचली असल्यामूळे मला असे काही वाटले नाही. तोवर सवय झाली होती Lol

वाचली गं. वरिजिनल वाचली आणि परत ही पण २-३ वाचली. पण हा प्रकार काही झेपला नाही मला. माझ्या डोक्यावर परिणाम होईल हे परत परत वाचलं तर Lol

हा अस्चिग काय काय शोधून काढतो !