Submitted by shashank pratapwar on 9 August, 2010 - 11:49
मयुरेशची ही मुळ कविता...
हे व्यथे... http://www.maayboli.com/node/17391
कशी दिवेलागण करायची समाजात
तु असताना?
कुठल्या जिवाष्म पुराव्याने नाकारु
बेगड्या दगडांच्या प्रती?
जेवतील असंख्य माणस
अन लोळेलही देवालयापुढले भिकार..
पण खिसा फाटल्यावर देणगी
कुठुन आणायची?
हे प्रथे मी अपुर्णच
कितीही स्विकारल तरी
ये ये बुचकळव तुझी प्रथा
माझ्या प्रथेत!!!
बघ गाण्यातला कोरसही
वाजवु लागेल खंजीर्या
मग चुकल्या शब्दांची भक्तीगीतमाला
व्हायला कितीसा वेळ लागेल...
हे प्रथे, ये तु,
ये आणि एकदा संपवुनच बघु दे तुला
मरेपर्यंत.. परिपुर्ण....
ये प्रथे, कुठल्या कुठल्या कोन्यात पसरलीयेस युगानुयुगे?
हे प्रथे...
- शशांक प्रतापवार
गुलमोहर:
शेअर करा
भन्नाटच की... जीयो!!!!
भन्नाटच की...
जीयो!!!!
हे विडंबन आहे? आणखी गंभीर
हे विडंबन आहे? आणखी गंभीर वाटतेय!
विडंबन वाटत नाहीए तर एक
विडंबन वाटत नाहीए तर एक स्वतंत्र कविता वाटतेय....
उत्तम कविता. अमितला अनुमोदन.
उत्तम कविता.
अमितला अनुमोदन. ही नुसत्या 'कविता' या सदरात टाका.
सर्वांचे
सर्वांचे आभार..
@मंदार_जोशी
आता कविता सदरात टाकलीये...
सणसणीत हाणलत प्रथेला ….
सणसणीत हाणलत प्रथेला …. आवडल.
(पण व्यथा ही आहे की घातक प्रथा,
समाजमनाला घट्ट विळखा घालून बसलेल्या असतात.)
भन्नाट. हाडाचा विडंबनकार
भन्नाट.
हाडाचा विडंबनकार आहेस.
आवडले.
आवडले.