स्वरुप यांचे रंगीबेरंगी पान

सांग ना तू तरी....

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

माझ्या मनाचा खेळ हा
की भावनांशी ही फितुरी
मी असा का वागतो
सांग ना तू तरी....
हितगुज मी जे बोलतो
नसे ते माझ्या अंतरी
फसतो की मी फसवितो
सांग ना तू तरी....
एक माझा चेहरा अन
लाख मुखवटे त्यावरी
का लपवितो मी स्वताला
सांग ना तू तरी....
साथ तुझी मज हवी
पण मोह मी तो आवरी
का दुरावा हा असा
सांग ना तू तरी....

प्रकार: 

"आजोळचे दिवस"

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मी तसा मुळचाच खुप नॉस्टेल्जिक माणुस... मला माझा आजचा 'आज', उद्या परवा 'काल' म्हणुन आजच्या 'आज' पेक्षा जास्त आवडतो... असो! "आजोळचे दिवस" हा तर माझा सगळ्यात आवडता नॉस्टेल्जिया!
या आठवणी सुरु होतात साधारणत: मी पहिली-दुसरीत असल्यापासुन... त्याकाळी आम्ही रहायचो इस्लामपुरला आणि माझे आजोळ कोल्हापुर, म्हणजे जेमतेम एका तासाच अंतर, त्यामुळे फारच फ्रिक्वेंटली आजोळी येणं व्हायच.
बर्‍याचदा शनिवारची शाळा झाली की आमची स्वारी दुपारच्या एसटीने कोल्हापुरला यायची... कोल्हापुर स्टँडवरचं यळगुड दुध आणि सहकारची बिस्कीटे हे सगळ्यात पहिल आकर्षण... तिथच पहिला स्टॉप पडायचा.

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - स्वरुप यांचे रंगीबेरंगी पान