माहिती संकलन

स्त्रीविरोधातील हिंसा नष्ट करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस : २५ नोव्हेंबर! (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 November, 2014 - 01:16

स्त्रियांबाबत केली जाणारी हिंसा ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु दिवसेंदिवस या हिंसेचे वाढत चाललेले उग्र रूप ही एक अत्यंत चिंतेची व शरम आणणारी वस्तुस्थिती बनत चालली आहे. आजूबाजूच्या या परिस्थितीकडे काणाडोळा करून उपयोग नाही, कारण त्याची झळ कधी तुम्हांला लागेल ते सांगता येत नाही. अनेकदा स्त्रियांचे बाबतीत घडणारा हिंसाचार हा त्यांच्या जोडीदाराकडून होतो. इ.स. २०१२मध्ये हत्या झालेल्या स्त्रियांमधील जवळपास अर्ध्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबसदस्याकडून मारल्या गेल्या.

एका 'मार्गदर्शका'ची सेवानिवृत्ती

Submitted by अशोक. on 14 March, 2012 - 12:33

काही वर्षापूर्वीची गोष्ट. कोल्हापूर-सोलापूर प्रवासात असताना राल्फ वाल्डो इमर्सनच्या लेखाचा समावेश असलेले पेंग्विनचे एक पुस्तक वाचत होतो. कवितेसंदर्भात इमर्सनची निरीक्षणे वाचताना त्याने केलेला 'एम्मा लाझारस' या कवयित्रीच्या १८६७ साली प्रसिद्ध झालेल्या 'पोएम्स अ‍ॅण्ड ट्रान्सलेशन' चा उल्लेख वाचला आणि त्याबरोबर एम्मा लाझारसच्या कवितेवर त्याने उधळलेली स्तुतीसुमनेही. त्यावेळेपर्यंत तिची कोणतीही कविता माझ्या वाचनात आली नव्हती, ना तिच्याविषयीची काही माहितीही माझ्याकडे होती. सोलापूर येईपर्यंत इमर्सनसारखा जगन्मान्य असा लेखक तिच्याविषयी आत्मियतेने इतके लिहितो ही बाब मी मनी नोंदवून ठेवली.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

संशोधन क्षेत्रातील मायबोलीकर - भाग १- Experimental Condensed Matter Physics

Submitted by चारुलता on 7 November, 2011 - 07:33

खरतर हा धागा सुरू करायला आजच्या इतका चांगला दिवस कोणता असु शकेल ! Happy
आज पदार्थ विज्ञान आणि रसायन शास्त्र या विषयात अभुतपुर्व कामगिरी करण्यार्‍या डॉ. मेरी क्युरी चा जन्मदिन. तिच्या प्रयोगांनी या दोन्ही विषयातील तत्कालीन संशोधनाला एक नवी दिशा दिली. तिचे नाव हे अनेक अर्थानी मैलाचा दगड आहे. तिचा हा प्रवास सोपा सहज नक्कीच नाही. अनेक अडचणी, अयशस्वी प्रयोग आणि त्यामुळे येणारे नैराश्य या सर्वांवर मात करुन नोबेल मिळवणारी ती पहिले स्त्री सशोधक म्हणुन खूप काही शिकवते. हॅट्स ऑफ टु मेरी !

ज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 16 June, 2011 - 09:58

सत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ.

प्रवासी भाडोत्री गाडीने जवळच्या/ लांबच्या प्रवासासाठी टीपा

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 8 January, 2011 - 06:55

अनेकदा आपण मित्रमंडळी/ कुटुंबियांसोबत जवळपास बाहेरगावी पिकनिक - देवदर्शन - स्थल दर्शनासाठी किंवा अन्य कार्यक्रमासाठी ट्रीप आखतो. जसजसे प्रवासी सदस्य वाढू लागतात तसतशी मोठ्या वाहनाची गरज भासू लागते.
मग प्रवासी कंपन्यांची किंवा खाजगी (भाड्याने) गाड्या देणार्‍या व्यावसायिकांची शोधाशोध सुरु होते.
मिनी बस/ तवेरा/ ट्रॅक्स/ इनोव्हा इत्यादीसारख्या गाड्या बुक केल्या जातात.

विषय: 
Subscribe to RSS - माहिती संकलन