पोलीस

Leading From the Front

Submitted by सतीश कुमार on 16 October, 2019 - 01:04

Leading From the Front

मी, पक्या, म्हेश आन सदू नऊचा पिक्चर सुरु जाल्यावर पंदरा मिंट संपली तशी म्होरल्या नानाच्या टपरीत घुसलो आन चा मागवला. नानाच्या टपरीत आत मंदी आमची पेशल जागा व्हती.

" लई न्यारं रे बाबा " पक्या बोलला, " शंबरचं दोन्श्याला इकला आपून अाख्खं बंडल….पूर्ण बुकिंग खल्लास.. आपला हीरो देवानंद…काला बाजार…. सकाळीच चौकीत हप्ता देऊन आल्तो म्हून वाघमाऱ्या फिराकलाच न्हाई".

"कसं फिरकल अक्खा सात दिसाचा मलिदा भेटल्यावर," सदू म्हणला, " नवी बुलट घितली वाघानं.. डागss डागss डागss डाग आवाज काढीत सुसाट फिरतुया आन ते बी आपुन म्हात्मा गांदीचं बंडल देतो म्हूंन…"

विषय: 

हिट विकेट

Submitted by सतीश कुमार on 13 October, 2019 - 06:20

चा वाली टपरी ते ब्रेबोर्न स्टेडियम.

मी, पक्या, म्हेश आन सदू नऊचा पिक्चर सुरु जाल्यावर पंदरा मिंट संपली तशी म्होरल्या नानाच्या टपरीत घुसलो आन चा मागवला. नानाच्या टपरीत आत मंदी आमची पेशल जागा व्हती.

" लई न्यारं रे बाबा " पक्या बोलला, " शंबरचं दोन्श्याला इकला आपून अाख्खं बंडल….पूर्ण बुकिंग खल्लास.. आपला हीरो देवानंद…काला बाजार…. सकाळीच चौकीत हप्ता देऊन आल्तो म्हून वाघमाऱ्या फिराकलाच न्हाई".

तीन पोलीस, एक गुन्हेगार आणि मी

Submitted by नितीनचंद्र on 12 July, 2019 - 01:59

व्यवसाया निमीत्ताने पुणे ते बेळगाव महिन्यातून एकदा प्रवास बरेचदा मी करतो. ११ जुलैला ( ट्रेनचे नाव , कपार्टमेंट आणि माझा सीट नंबर मुद्दमच लिहलेला नाही ) __नंबरची सीट शोधून बसताना " तुमचा नंबर __ का " अशी विचारणा झाली. छाप पडेल असा तांबुस वर्णाच्या धडधाकट माणसाने विचारताना मी त्याच्या कडे पाहीले. त्याची नजर बहूदा माझा व्यवसाय, व्यक्तिमत्व न्याहाळतना दिसली. ८ माणसे झोपतील अश्या कंपार्टमेंट मधे एकच माणूस डोक्यावर पांघरुण घेऊन संध्याकाळी सात वाजता झोपलेला आणि या तरतरीत माणसाच्या सोबत अजून दोन माणसे.

विषय: 

पोलीसांची ' सुरक्षा'

Submitted by संजयb on 24 September, 2016 - 23:19

प पोलीसांवर हल्ले का होतात हा प्रश्न सध्या पोलीसांसह सगळ्यांनाच सतावतो आहे.ज्यांनी जनतेच रक्षण करायचे तेच असुरक्षीत का झाले आहेत याचे ऊत्तर शोधावेच लागेल.पोलीसांची भुमीका तशी विचीत्रच आहे. या जगात सध्या पटकन निर्णय व लगेच परिणाम अशा पद्धती सार्वजनीक व खाजगी क्षेत्रात रूढ होत असताना पोलीसांना मात्र न्यायलयाच्या काहीश्या गूढ व बरचश्या वेळखावू यंत्रणेवर परिणाम मिळण्या साठी अलवलंबून राहावे लागते.त्या मूळे पोलीस कामच करत नाहीत,पोलीसांनी केलेल्या तपासातून काही निष्पंन्न होत नाही ही भावना जनतेत वाढीस लागली आहे.ज्यांचा काही ऊपयोगच दिसून येत नाही त्यांच्या बाबत काय आदर राहाणार.

विषय: 
शब्दखुणा: 

वृत्ते! अस्वस्थ करणारी! [१]युवकांच्या बाइक्सवरील कसरती

Submitted by मी-भास्कर on 29 July, 2013 - 07:14

वृत्ते! अस्वस्थ करणारी! [१]युवकांच्या बाइक्सवरील कसरती

निदान तीन एक महिन्यांपासून वाहिन्यांवर दिल्लीत बाईक्सवर बेरात्री धोकादायक कसरती करणार्‍या युवकांची धाडसी कृत्ये दाखविली जात होती. दिल्ली पोलिस हे कसे काय खपवून घेतात असे प्रश्नही उद्भवत होते. अशा तरुणांची खरी जागा एक कमांडो शिबिरात वा बंदीगृहात असायला हवी असेही पहाणार्‍यांच्या मनात येणे स्वाभाविक!
अशा वेळी दोन दिवसांपूर्वी अचानक
" दिल्लीत बाईक्सवर बेरात्री धोकादायक कसरती करणार्‍या युवकांना काबूत आणण्यासाठी केलेल्या गोळीबारत एक युवक ठार आणी दुसरा जखमी."

हे वृत्त !

विषय: 

महामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 20 March, 2013 - 02:18

दिनांक १०.०१.२०१३ रोजी मी पुण्याहून अहमदनगर, औरंगाबाद, वेरूळ मार्गे धुळे येथे येत होतो. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कन्नड घाट ओलांडून पुढे आल्यावर पोलिसांच्या तपासणी पथकाने माझे वाहन (मारूती ओम्नी एम एच १४ बीएक्स ६२८७) थांबविले. माझा वाहन चालविण्याचा परवाना मूळ स्वरुपात आणि वाहनाच्या दस्तऐवजांच्या प्रती छायांकित स्वरुपात तपासल्यावर तपासणी पोलिसाने मला वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात नसल्याबद्दल दंड भरावा लागेल असे सूचित केले. त्यावर मी खासगी वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात बाळगण्याची गरज नसून छायांकित प्रती चालतात हे त्यास सांगितले.

विषय: 

आज त्यांचेही आभार मानूया

Submitted by मंदार-जोशी on 25 January, 2012 - 22:46

आज, प्रजासत्ताक दिनी आपापल्या घरी आरामात बसून त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत बोलताना, त्यांच्या मग्रूरीबद्दल चर्चा करताना, आणि त्यांच्या अकार्यक्षमतेवर ताशेरे ओढताना आपण त्यांच्या त्यागाचीही आठवण काढूया. कारण आज त्यांच्यामुळेच आपण रात्री सुखाची झोप घेऊ शकतो आहोत, आज त्यांच्यामुळेच कसाबसारख्या अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आणि पाकिस्तानचा खरा चेहरा पुराव्यासकट जगासमोर मांडण्यात आपल्याला यश आलं आहे.

आज त्यांचे आभार मानूया, त्यांना मनःपूर्वक वंदन करुया - ते म्हणजे अर्थातच आपले - पोलीस!

TheUniform.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पोलीस