शैक्षणिक समस्या

mypedia बद्दल माहिती

Submitted by मी अमि on 30 September, 2016 - 07:50

mypedia हे अ‍ॅप कोणी वापरते का? काही शाळा या अ‍ॅपचा उपयोग करतात असे कळले. या अ‍ॅप बद्दल अधिक माहिती मिळू शकेल का?

घरच्या घरीच शिक्षण - खरंच सर्वसमावेशक होईल का?

Submitted by शांतीसुधा on 2 July, 2011 - 15:36

दि. १२ जून २०१० च्या दैनिक लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीमध्ये "घरीच शिक्षण किंवा होमस्कूलिंग" या संकल्पनेवर आधारित ‘घरात शाळा’ हा शुभदा चौकर यांचा, तसेच या संकल्पनेचं उदाहरण विस्ताराने सांगणारा प्रयोगाची ’पायवाट’ हा वंदना अत्रे यांचा आणि ’शिकतं घर’ हा अमरजा जोशी यांचा प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण या संकल्पनेवर आधारित एका शाळेची माहिती सांगणारा, असे तीनही लेख वाचनात आले. सर्व शिक्षण अभियानातील घोटाळे, विविध शालेय मंडळांचे अभ्यासक्रम त्यातून पुढे येणारे गुणांचे राजकारण, एकूणच महाग होत चाललेले शिक्षण आणि ढासळत चाललेला शैक्षणिक दर्जा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे लेख आशादायकच वाटतात.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - शैक्षणिक समस्या