सामाजिक बांधिलकी

उत्तम सामाजिक उपक्रम, कार्यक्रम व प्रकल्पांच्या माहितीचे संकलन

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 17 September, 2015 - 01:56

आपल्याला वेगवेगळ्या माहिती स्रोतांद्वारे अनेक खात्रीशीर, सेवाभावी व लोकहितकारी अशा सामाजिक प्रकल्प व उपक्रमांची माहिती नित्यनियमाने मिळत असते. सोशल मीडियातून तर अशी माहिती रोजच प्रसृत होत असते. खात्रीलायक, नोंदणीकृत संस्थांद्वारे जसे मोठे उपक्रम व सेवाकार्य प्रकल्प हाती घेतले जातात तसेच अगदी छोट्या पातळीवरही एकट्या दुकट्या लोकांनी मोठ्या तळमळीने चालू ठेवलेल्या कल्याणकार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते खरी, परंतु ही माहिती इतर लाटांमध्ये विरूनही जाते. तर या धाग्याचा उद्देश हा की, अशा प्रकारचे चांगले काम व उपक्रम संकलित स्वरूपात आपल्या माहितीसाठी एकत्र पाहाता यावेत.

सामाजिक बांधिलकी म्हणजे काय रे भाऊ ?

Submitted by प्राक्तन on 4 June, 2011 - 02:28

सामाजिक बांधिलकी म्हणजे काय रे भाऊ ?

खरच काय असतं हे ? कारण आपण लहानाचे मोठे होताना ५६ वेळा ऐकतो हा शब्द. एखादा शब्द वापरताना त्याचा अर्थ माहित असलाच पाहीजे अशी पद्धत अजूनतरी आपल्याकडे नाही आहे. मोठे मोठे शब्द वापरून जन निर्माण करण आणि अजून मोठे शब्द वापरुन ते टिकवणं महत्वाच.

तर विचारायचा हेतू निर्मळ आहे. मला याचा अर्थ हवाय. कारण बांधिलकी आपण बरयाच नात्यांत पाहतो. रक्ताचीच असतात बहुतेक नाती. मग समाजाच काय? तो मधेच कुठून आला? मी माझ्या समाधानासाठी अर्थ काढलाय पण परत असंख्य प्रश्न निर्माण झालेत. तर मी आधी अर्थ सांगतो आणि प्रश्न विचारतो.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - सामाजिक बांधिलकी