पूल

पुण्यातले पूल (Bridges in Pune)

Submitted by bhatkyajoshi on 10 February, 2011 - 09:51

पुण्यातले पूल, भलतेच Cool,
कधी Z ब्रिज, कधी राजाराम पूल,
संपर्क प्रस्थापित करणारे,
दोन टोकांना जोडणारे...

पुण्यातले पूल, भलतेच Cool,
संध्याकाळ झाली की, सगळेच Full...
संध्याकाळी हे पूल तरुण होतात,
दोन तीरच नव्हे, दोन जीवही जोडतात..

पूलांचे कट्टे भरू लागतात,
दुचाकींचे नंबर वाढू लागतात,

आडोशाआड गप्पा फुलतात अन्
गर्दीच्या चेहऱ्यात माणसे हरवून बसतात..

अंधारात डोळ्यात डोळे घालून, काहीतरी शोधायचा प्रयत्न करतात..

मध्येच Long Drive चे खूळ निघतं,
पल्सर, डिस्कवरचं चाक फिरतं,
क्षणात कात्रज बायपास दिसू लागतो,
भन्नाट वेगात रस्ता सरत जातो...

शब्दखुणा: 

अविस्मरणीय - ५ व ६ ऑगस्ट २०१०

Submitted by अनिकेत आमटे on 20 August, 2010 - 07:57

अविस्मरणीय - ५ व ६ ऑगस्ट २०१०
समीक्षा (माझी पत्नी) आमच्या ११ दिवसांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन ४ ऑगस्ट रोजी २ महिने आराम करण्यासाठी माहेरी पुण्याला गेली. नागपूरला डॉ.मंगला केतकर यांच्या दवाखान्यात २४ जुलै २०१० ला तिने बाळाला जन्म दिला. तिला व मुलाला ४ तारखेला ला संध्याकाळी नागपूरला रेल्वे स्टेशनवर सोडले. सोबत तिची आई होती.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पूल