१२५ ग्रॅम चॉकलेट स्लॅब. मी चॉकलेटं करण्यासाठी स्लॅब विकत आणलेली , त्यामुळे ती वापरली. त्याजागी प्लेन कॅडबरी डेअरीमिल्क वापरले तरी चालेल.
१२५ ग्रॅम अनसॉल्टेड बटर. मी अमुल बटर वापरले
३ अंडी
पाऊण कप साखर
पाव कप मैदा
१. ओवन २०० डिग्री सेल्सिअसला तापायला लावा.
२. चॉक्लेट आणि बटर एकत्र विरघळवुन घ्या. गॅसवर करायचे असेल तर पाव भांडे भरुन पाणी गरम करत ठेवा आणि त्यात अर्धे आत/अर्धे बाहेर राहिल असे दुसरे एक भांडे बसवुन त्यात चॉक्लेट आणि बटर टाकुन विरघळवा. थेट गॅसवर चॉक्लेट आणि बटर ठेऊन विरघळवु नका. ही स्टेप मायक्रोवेवमध्येही करता येईल.
३. अंडी (योकसकट), साखर आणि मैदा एकत्र करा आणि चांगले फेटून घ्या. बेकींग पावडरची गरज नाही.
४. वरील मिश्रण चांगले फेटले की त्यात चॉकलेटचे मिश्रण थोडे थोडे घाला. (थोडे मिश्रण घाला, सगळे चांगले मिक्स करा, परत थोडे घाला, मिक्स करा असे सगळे चॉकलेट संपेपर्यंत करा)
५. माझ्याकडे छोटे केक्स बेक करायची वेगळी भांडी नाहीत म्हणुन मी आपले चहाचे सिरॅमिक कप वापरले. कप्सना आतुन बटर लावुन घ्या. आणि प्रत्येकात कप ३/४ भरेल इतके मिश्रण ओता.
६. ओवनमध्ये मोजुन १० मिनिटे बेक करा.
७. बाहेर काढुन दोन मिनिटे थंड होऊ द्या. मग केकच्या बाजुने सुरी फिरवुन केक सोडवुन घ्या, कपावर छोटी ताटली ठेऊन कप उलटा करुन केक बाहेर काढा.
८. गरमगरम खायला द्या... 
१. केक मोजुन १० मिनिटे बेक करा. जास्त वेळ बेक केल्यास केक पुर्णपणे बेक होतो आणि लाव्हा रस पाहिल्याचा आनंद मुलांना मिळत नाही. तसेच केक करुन बराच वेळ झाल्यासही लाव्हा सुकतो. त्यामुळे जराजरा गरम असतानाच मुलांना द्या.
२. मावेत हा केक नीट होत नाही. मुलीने करुन पाहिला पण मावेतला केक आतुन बाहेर बेक होत आला त्यामुळे सेंटर बेक झाले आणि लाव्हा बाहेरच्या बाजुला राहिला 

