शेवळांच्या ४-५ जुड्या
काकड १ वाटा
कोणतही बिरड किंवा कडध्यान्य किंवा नॉन व्हेज हव असल्यास ओली किंवा सुकी कोलंबी
कांदे २ चिरुन
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट १ चमचा
कांदा खोबर वाटण २ चमचे
अर्ध्या लिंबाएवढा चिंचेचा कोळ
हिंग, हळद, मसाला, मिठ गरजे नुसार
फोडणीसाठी लसुण- ३-४ पाकळ्या
२ पळ्या तेल
गरम मसाला अर्धा चमचा
पहिला शेवळ साफ करुन घ्यायची (खाली साफ करण्याची पद्धत देते). ती चिरुन पाण्यात टाकुन उकळुन घ्यायची. पाणी काढुन टाकायचे. आता भांड्यात लसणाची फोडणी देउन कांदा गुलाबी रंगावर शिजवावा. आल, लसुण, मिरची कोथिंबिरची पेस्ट घालावी. हिंग, हळद, मसाला, घालून बिरड किंवा कडध्यान्य घालाव. त्यावर शेवळ घालावीत मग काकड ठेचुन त्याच्या बिया टाकुन गर घालावा. आता बिरड शिजवुन घ्याव. शिजला की चिंचेचा कोळ, गरम मसाला, मिठ, कांदा खोबर्याचे वाटण घालावे. व थोड्या वेळाने ढवळून गॅस बंद करावा.
ही शेवळ कोलंबीत जास्त छान लागतात.
व्हेज मध्ये हवा असल्यास थोडा गुळ घातला तरी चालेल. चिंच जास्त घालु नये कारण काकड आंबट असतात. ह्या शेवळांना खाज असते सुरणा सारखी ती जाण्यासाठी काकड घालतात.
कुरडूची भाजी - http://www.maayboli.com/node/9313
कंटोळी - http://www.maayboli.com/node/9329
टाकळा - http://www.maayboli.com/node/9351
भारंगी - http://www.maayboli.com/node/9381
कुलू - http://www.maayboli.com/node/9406

