पाभे की बात क्र. ९
जनगणना २०२६-२७ साठी सरकारने साहित्य दिलंय ते बघितलं का?
टोपी लहान मुलांच्या डोक्याची, मोठ्या शिक्षकांच्या डोक्यावर बसत नाही. पिशवी पहिल्या दिवशीच चेन तुटते. शार्पनर पेन्सिलला टोक लावायच्या आतच तुटतो. पेन आणि मार्कर उठतच नाहीत. एरीयाच्या झेरॉक्स एकच मिळेल. आपसात झेरॉक्स करून घ्या. कार्यक्षेत्र २० किमी दूर असेल. दोन क्षेत्र असेल तर त्यात ६, ८ किमी अंतर असेल. सगळं सामान अशा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं.
----------------------------------------------------------------
मितरों,
मोदीजींनी केलेली घोषणा बहुतेकांनी ऐकलेली आहे. त्यावर मतमतांतरे असतीलच.
पाहूया, काय वाढून ठेवलंय ते...
निरंजन टकलेंचा व्हिडीओ खूप दिवसांनी बघितला. ते काँग्रेसमन आहेत. त्यामुळे ते जे सांगतात त्याची फॅक्ट चेक करावी लागते.
त्यांनी इराणी प्रेसचं एक ट्वीट शेअर केलं आहे ज्यात असे म्हटले आहे कि अमेरिका इस्त्राएलला साथ देणार्या राष्ट्रांना विशेषतः भारताला, ज्याने नुकताच इराणला धोका दिला, खाडीतून तेल नेता येणार नाही. त्यांनी असंही सांगितलं कि भारतात गोदी मीडीया जे सांगतोय ते म्हणजे इराणने भारटाला दोस्त म्हटलेय आणि तेल न्या म्हटलेय हे सगळे बकवास आहे. तसेच एलपीजी सिलेंडरचा तुटवडा आणि इराण युद्धाचा काही संबंध नाही. कारण एलपीजी आपण आयात करत नाही. हा काळाबाजार आहे.
गुजरात सरकारने २००६ चा विवाह विषयक कायदा अधिक कडक केला आहे.
विवाह कायद्यात अधिक पारदर्शिता आणणे हा कायद्याचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे. तसेच प्रेमविवाहाचा दुरूपयोग रोखणे हे ही सरकारचे एक उद्दीष्ट आहे. यामुळे पालकांना दिलासा मिळू शकणार आहे.
विवाहानंतर जोडप्यांना पालकांची या विवाहास संमती असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. लग्नाचे प्रमाणपत्र ४० दिवसांनी जारी केले जाणार आहे. त्यामुळे या ४० दिवसांमधे पालकांची संमती सादर करावी लागेल. जर पालकांची अनुमती नसेल तर विवाह आपोआप रद्द होईल.
सोळा वर्षाच्या आतल्या अल्पवयीन मुलांना सोशल मीडीयात बंदी असावी का ?
याचे फायदे तोटे काय आहेत ?
दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत हवेतील वाढलेल्या प्रदूषणाविरोधात नागरिक, विद्यार्थी, पर्यावरण कार्यकर्ते आणि अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. धुरकट हवा, वाढता स्मॉग, शाळा कॉलेज बंद ठेवावी लागणारी परिस्थिती, श्वसनाचे वाढते त्रास. यामुळे लोक त्रस्त झाले आहेत.
बिहार विधानसभेच्या 243 सदस्यांची निवड करण्यासाठी सध्या निवडणूक सुरू असून पहिला टप्प्याचे मतदान सहा नोव्हेंबरला झाले तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 11 नोव्हेंबरला आहे. निकाल 14 तारखेला जाहीर होतील.
स्पेशल इंटेन्सीव रिविजन SIR अशा गोंडस नावाखाली मतदार याद्या बदलण्याचं सध्या जे काम चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.
अंदाज
भाजप आघाडी: १८८
राजद+काँग्रेस आघाडी: ५३
इतर: 2
राजद आघाडीच्या जागा अजून कमी होतील बहुतेक.