चित्रपट

नवीन काहीतरी चित्रपटात (Creativity)...

Submitted by छोटी on 31 August, 2013 - 01:46

चित्रपटात नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला जातो...
जस प्रेमाची गोष्ट मध्ये फोन कोणाचा आला ह्या साठी कॉर्नर ला फोन यायचा आणि कोणाचा फोन
आहे ते दिसायचा...
किंवा एक डाव धोबीपछाड मध्ये किशोरी शहाणे आणि अशोक सराफ ह्याचा भूतकाळ दाखवण्यासाठी त्यांच्या जुन्या चित्रपटातलं 'हेमा माझ्या प्रेमा' गाण..... ह्या धाग्यावर लिहूया चित्रपटातलं नाविन्य ..

'इन्व्हेस्टमेंट'च्या निमित्ताने सुप्रिया विनोद यांच्याशी संवाद

Submitted by योकु on 30 August, 2013 - 11:11

या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला 'इन्व्हेस्टमेंट' हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतोय. ज्येष्ठ साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं आहे.

पैसा, प्रगती, महत्त्वाकांक्षा यांच्या गर्तेत सापडलेल्या कुटुंबाची कहाणी या चित्रपटात आहे. सुप्रिया विनोद यांची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे.

विषय: 

लघुचित्रपट

Submitted by विजय देशमुख on 29 August, 2013 - 22:52

इथे उत्तमोत्तम चित्रपटांची चर्चा होत आहेच. त्याच धर्तीवर तुम्हाला आवडलेल्या लघुचित्रपटांविषयी इथे लिहुया.

खरं तर चित्रपटाविषयी जितकं वाचायला मिळतं, तितकं लघुचित्रपटाविषयी, खासकरुन मराठीत वाचायला मिळत नाही. काही आवडलेले लघुचित्रपट पुढे नाव विसरल्याने शोधताही येत नाही. त्यासाठी हा धागा उपयोगी पडेल.

इथे युट्युबच्या लिंक दिल्या तर चालतील का? बहुदा कॉपीराईटचा प्रश्न येणार नाही.

सुधा मूर्तींच्या कादंबरीवर आधारित 'पितृऋण' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 August, 2013 - 12:23

आयएमई मोशन पिक्चर्स निर्मित व नितीश भारद्वाज दिग्दर्शित 'पितृऋण' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कृष्णाच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेले व दोनदा खासदार असलेले श्री. नितीश भारद्वाज या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.

विशेष म्हणजे हा चित्रपट ख्यातनाम लेखिका श्रीमती सुधा मूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे.

pitrurun.jpg

अजून एक आनंदाची बाब म्हणजे तमाम चित्रपटरसिकांच्या लाडक्या अभिनेत्री तनुजा या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मराठीत झळकणार आहेत.

बालनाट्य आणि मी - श्रीमती सुलभा देशपांडे

Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 August, 2013 - 12:06

लहान मुलांमध्ये असलेल्या प्रचंड ऊर्जेला योग्य वळण लागलं नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतात, असं हल्ली वर्तमानपत्रांमध्ये अल्पवयीनांकडून घडणार्‍या गुन्ह्यांच्या, आत्महत्यांच्या वाढत्या संख्येबद्दल, लहान मुलांना सामोरं जाव्या लागणार्‍या ताणाबद्दल बोलताना समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ सांगतात.

उत्तमरित्या चित्रित झालेले सीन

Submitted by माधवी. on 28 August, 2013 - 09:29

नंदिनीच्या अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक या धाग्यावरून ही कल्पना सुचली. कधी कधी चित्रपटातील काही सीन वेगवेगळ्या कारणांमुळे आवडून जातात.

मला आवडलेला एक सीन म्हणजे 'ओमकारा'मधला शेवटचा सीन:
डॉलीचा (करिना कपूर) ओमी (अजय देवगण) गळा दाबून खून करतो. तेव्हा ते दोघं झोक्यावर बसलेले असतात. डॉली तशीच झोक्यावर पडलेली असते. नंतर केसु फिरंगी (विवेक ओबेरॉय) येतो तोपर्यंत ओमीचा गैरसमज दूर झालेला असतो, तो केसुसमोर स्वतःला गोळी घालून घेतो आणि बरोबर झोक्याशेजारी पडतो. झोका हलत असतो तेव्हा एकदा आपल्याला झोक्यावरची डॉली दिसते आणि झोका मागे गेला की खाली पडलेला ओमी!

विषय: 
शब्दखुणा: 

'इन्व्हेस्टमेंट' प्रदर्शित होतोय २० सप्टेंबरला...

Submitted by माध्यम_प्रायोजक on 27 August, 2013 - 02:21

बलात्कार, खून, भ्रष्टाचार यांच्या बातम्या आता आपल्या सवयीच्या झाल्या आहेत. इतक्या सवयीच्या की अनेकदा आपण या बातम्यांकडे दुर्लक्ष करतो.

काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी यांनी एका दिवाळी अंकात कथा लिहिली. पैशाचं आकर्षण असणार्‍या, बरंच काही मिळवण्याच्या मागे धावणार्‍या आणि आपल्या मुलानं यशस्वी राजकारणी बनावं यासाठी धडपडणार्‍या जोडप्याची ही कथा होती. वाचकांनी या कथेचं प्रचंड कौतुक केलं.

औरंगजेब - परीक्षण

Submitted by फारएण्ड on 26 August, 2013 - 01:14

"औरंगजेब" हा मध्यंतरी येउन गेलेला चित्रपट नुकताच पाहिला. त्याचे थोडक्यात परीक्षण. काही काही गोष्टी स्वतः थेट बघितल्यास जास्त परीणामकारक होतील म्हणून जास्त येथे लिहीत नाही.

पहिल्या पाच मिनीटांत या चित्रपटाने जे खिळवून ठेवले ते शेवटपर्यंत सोडले नाही. दोन मिनीटे उठताना सुद्धा "पॉज" करून उठावे लागणे हे हिन्दी चित्रपटांच्या बाबतीत फार कॉमन नाही. मात्र यात, त्यातही सुरूवातीला, तुम्ही नीट लक्ष दिले नाहीत तर महत्त्वाचे क्लूज निसटतील. अत्यंत लक्ष देऊन पाहण्याचा चित्रपट आहे हा.

विषय: 

मद्रास कॅफे: भारताच्या विएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी

Submitted by बावरा मन on 25 August, 2013 - 01:43

अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्‍या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे.

Pages

Subscribe to RSS - चित्रपट