चित्रपट

राजीव पाटीलची एक्झिट

Submitted by टोच्या on 30 September, 2013 - 08:43

आज सकाळीच राजीव पाटीलकडून फेसबुकवर वंशवेलच्या पेजसाठी इनव्हाईट रिक्वेस्ट दिसली. आणि दुपारी राजीव गेल्याची धक्कादायक बातमी येऊन धडकली. आम्ही सारेच क्षणभर स्तब्ध झालो. कारण ‘नाशिक मटा’च्या कित्येक कार्यक्रमांना राजीवने हजेरी लावली होती. तो नाशिकजवळचाच असल्यामुळे जवळपास सगळ्यांचेच त्याच्याशी मैत्रीचे संबंध होते. ‘जोगवा’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा नाशिककरांतर्फे जोगवाच्या टीमचा जाहिर सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अत्यंत घाईगर्दीत राजीवने मला दिलेली मुलाखत आठवली. मराठीत ‘सावरखेड-एक गाव’सारखा अप्रतिम चित्रपट करून राजीवने मराठी चित्रपटांच्या बदलांची नांदी दिली होती.

विषय: 

अशी ही बनवाबनवी… विनोदाचा अफलातून अविष्कार

Submitted by सह्याद्रीमित्र on 29 September, 2013 - 19:57

सचिन पिळगावकर या अभिनेत्याविषयी मला प्रचंड आकर्षण कम कुतूहल आहे. ईश्वरकृपेने एकदाच मिळालेल्या मनुष्यजन्माची पुरेपूर वसुली करण्याचं कसब मात्र सचिनला पहिल्यापासूनच जमलंय. याला अभिनेता पण व्हायचं असतं सेम टाइम त्याच चित्रपटात गायक पण व्हायचं असतं सेम टाईम त्या चित्रपटाचा निर्माता - दिग्दर्शक पण व्हायचं असतं आणि त्याला तो चित्रपट यशस्वी पण करायचा असतो.यात भर म्हणजे साहेब हल्ली महागुरू पण झाले आहेत. आपल्याला नाय जमत बुवा येवढं सगळं !!!

विषय: 

सौभाग्यवती मालविकादेवी सत्यशील जहागिरदार - सुमित्रा भावे

Submitted by माध्यम_प्रायोजक on 27 September, 2013 - 02:16

एक चित्रपट दिग्दर्शिका.
एक निर्मात्री.
एक लेखिका आणि एक अभिनेत्री.

या दिग्दर्शिकेला एक संहिता लिहायची आहे.
पण या संहितेचा शेवट कसा असावा?

आपली संहिता आपल्याला लिहिता येते का?

या चौघींना आपल्या संहितेचा सुखांत करता येईल का?

सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्स व अशोक मूव्हीज प्रा. लि. यांच्या सहकार्यानं सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्या विचित्र निर्मिती या संस्थेनं 'संहिता'ची निर्मिती केली आहे.

अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजला असून दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं या चित्रपटानं पटकावली आहेत.

इन्व्हेस्टमेंट : आपण आपल्या मुलांना नक्की काय देतोय ?

Submitted by झंप्या दामले on 23 September, 2013 - 14:29

जो साहित्यिक, कलाकार, दिग्दर्शक जितका सातत्याने काळासोबत बदलत राहतो आणि कालसुसंगत कलाकृती घडवत राहतो (मागणी तसा पुरवठा नव्हे) तो कधीच शिळा किंवा कालबाह्य होत नाही आणि खऱ्या अर्थाने काळाच्या कसोटीवर उतरतो. रत्नाकर मतकरी हे याचे ठळक उदाहरण. त्यांच्या कथा,नाटके कायमच वैविध्यपूर्ण आणि कालसुसंगत राहिलेली आहेत. त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा देखील अगदी आजचा विषय मांडतो आणि त्यामुळेच एक अस्वथ करणारा अनुभव देतो

विषय: 
शब्दखुणा: 

पिच्चर बघू काय ? "होय महाराजा !" - (Narbachi Wadi - Marathi Movie Review - नारबाची वाडी)

Submitted by रसप on 23 September, 2013 - 01:33

नारळाचं झाड जरासं नाठाळ असतं. ते सुरुवातीला अगदी हळूहळू वाढतं.. बहुतेकदा तर मालकाचा अगदी अंत पाहतं. वाटतं हे झाड काही उपयोगाचं नाही. पण मग, एकदा ही सुरुवातीची वर्षं सरली की फणा काढलेल्या नागासारखं डौलात उभं राहातं... उंचच उंच ! मग त्याच्या नाठाळपणाचा अनुभव हवेला येतो. कितीही जोरदार वारं वाहिलं तरी काहीही फरक पडत नाही. बरं कित्येक फूट वाढलं, तरी झाडाचा बहुतेक भाग खोडच! नारळ काढायचे म्हणजे झाडावर चढण्या-उतरण्याची कसरत!

विषय: 

राक्षसी महत्वाकांक्षा पुर्ण होण्यासाठी केलेली गुंतवणूक अर्थात....'इन्व्हेस्टमेंट'

Submitted by अश्विनी के on 22 September, 2013 - 02:00

काल मायबोली माध्यम प्रायोजक असलेला ’इन्व्हेस्टमेंट’ हा चित्रपट पाहण्याचा योग आला.

investment.jpg

इन्व्हेस्टमेंट च्या निमित्ताने...

Submitted by घारुआण्णा on 21 September, 2013 - 22:56

इन्व्हेस्टमेंट च्या निमित्ताने...
अयोग्य जागी केलेली गुंतवणुक ही फायदा तर मिळवुन देत नाहीच पण मुळ मुद्दल ही धोक्यात पडतं .
investment 1.jpg

द लंचबॉक्स चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 21 September, 2013 - 09:28

एकटेपणा......

दमविणारा , भिवविणारा, रडविणारा.... दुर्धर रोगांशी साहसाने सामना करणार्‍यांचे कौतूक होते, त्यांच्या लढ्याची पुस्तके छापून येतात, ब्लॉग्स आवडीने वाचले आणि शेअर केले जातात. पण एकटेपणाशी
एकट्यानेच लढा देणार्‍याच्या पदरी फक्त आणि फक्त उपेक्षाच येते. कोरड्या वैराण वाळवंटात भटकणारा जीव जसे आपला मृत्यूच आता शक्य आहे हे माहीत असूनही रोज काही पावले पुढे टाकत जातो मृगजळाच्या मागे भगभगीत वाळूच आहे हे सत्य माहीत असूनही त्या हिरव्या-निळ्या मरीचिकेत रमून जातो तसे एकटेपण भोगणार्‍याचे होते. सर्वकाही असूनही हा एकटा जीव आपल्या वैयक्तिक

विषय: 

'इन्व्हेस्टमेंट' चित्रपटाच्या खेळांचं वेळापत्रक

Submitted by माध्यम_प्रायोजक on 19 September, 2013 - 12:28

ज्येष्ठ साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शन केलेला, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळवलेला 'इन्व्हेस्टमेंट' दि. २० सप्टेंबरपासून महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

मायबोली.कॉम या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.

या चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याचं वेळापत्रक -

listinvestment.jpg

Pages

Subscribe to RSS - चित्रपट