रॅव्हिओली सारण -
खजूर : ४-५
काजु - ७-८
बदाम - ७-८
अक्रोड - ५-६
तूप - १ चमचा
रॅव्हिओली आवरण (उकड) -
तांदूळ पिठी - १/२ वाटी
पाणी - १/२ वाटी
तेल - १ चमचा (फोटोत ठेवायचं राहिलं)
मीठ (अर्धी चिमूट)
रस/ सॉस
ओलं खोबरं - १/२ वाटी
गरम पाणी - १/२ वाटी
खजूर सिरप - २ चमचे
१) रॅव्हिओली सारण -
अ) तूप घालून सगळी ड्राय फ्रुट्स मिक्सरवर भरड वाटून घ्या.
रॅव्हिओली आवरण
अ) तांदूळ पिठीची उकड काढा. गरम असतानाच मळून त्याचे दोन भाग करुन दोन पोळ्या लाटा. शक्य तितक्या पातळ पोळ्या लाटा.
ब) सारणाचे छोटे चपटे गोळे करुन चित्रात दाखवल्याप्रमाणे एका पोळीवर मांडा. प्रत्येक गोळ्याभोवती पाण्याचे बोट फिरवा
क) त्यावर दुसरी पोळी ठेवून चित्रात दाखवल्याप्रमाणे बाजूने दाबून चिकटवून घ्या.
ड) कातण्याने चित्रात दाखवल्याप्रमाणे कापून घ्या.
इ) हे चौकोन वाफवून घ्या.
रस/ सॉस
अ) नारळाचे दूध काढून घ्या. जितकं दाट दूध असेल तितकं चांगलं (विकत आणलं तर हा वेळ वाचेल)
ब) त्यात २ चमचे किंवा गोडाच्या आवडीप्रमाणे खजूर सिरप घाला.
असेंब्ली
अ) आधी वाफवलेल्या स्वीट रॅव्हिओली मांडा आणि त्यावर गोड नारळाचं गोड दूध घाला.
खायला तयार
१) फक्त करंज्या करून नारळ दूध न घालता तशाच खाता येतील. (खजूराचं प्रमाण वाढवून गोडी वाढवता येइल)
२) आवडीची ड्राय फ्रुट्स घेता येतील. पिस्ते, सुकं अन्जीर हे चालेल. माझ्याकडे संपले होते म्हणून वगळले
सहीच आहे fusion रेसीपी! चव ही
सहीच आहे fusion रेसीपी! चव ही छान असेल!
मस्त आहे कल्पना आणि सादरीकरण
मस्त आहे कल्पना आणि सादरीकरण
अभिनंदन साक्षी !
अभिनंदन साक्षी !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
अभिनंदन...
अभिनंदन...
अभिनंदन साक्षी..!
अभिनंदन साक्षी..!
अभिनंदन!!
अभिनंदन!!
अभिनंदन साक्षी...
अभिनंदन साक्षी...
@संयोजक , प्रशस्ति पत्रकासाठी
@संयोजक , प्रशस्ति पत्रकासाठी धन्यवाद! पण प्रशस्तिपत्रकावर पदार्थाचे नाव चुकिचं लिहिलंय. तेवढं दुरुस्त करून देणार का?
Pages