Absurdle व Dordle ! वर्डलच्या २ पाउले पुढे...

Submitted by कुमार१ on 24 January, 2022 - 11:26

इथे काही दिवसांपूर्वीच माबोकर व्यत्यय यांनी काढलेला Wordle चा धागा लोकप्रिय झालाय (https://www.maayboli.com/node/80915)
तो खेळून अनुभवी झालेल्यांसाठी सादर आहे या खेळाची नवी आवृत्ती Absurdle !

नवोदितांनी प्रथम Wordle शिकून त्याचा आठवडाभर तरी सराव करावा. दैनिक Wordle खेळ इथे असतो : https://www.powerlanguage.co.uk/wordle/

Absurdle हा नवा खेळ Wordle च्याच धर्तीवर आहे. म्हणजे तीनरंगी चौकटींचा अर्थ पूर्वीप्रमाणेच. या खेळातील बदल/वैशिष्ट्ये अशी आहेत :
१. इथे निर्मात्याने गुपित ठेवलेला ओळखायचा शब्द पक्का नसतो. खेळाडूच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर तो बदलत जातो. परंतु खेळाडूने आधी ओळखलेल्या अक्षरांवर त्याचा परिणाम होत नाही.
२. खेळाचे एकूण प्रयत्न तसे अमर्यादित ठेवले आहेत. वर्डलप्रमाणे पक्के ६ नाहीत.

३. अशा प्रकारे खेळत आपण एका ‘योग्य’ शब्दाशी पोचतो. आता आपल्याला वाटते की आपण जिंकलो; पण नाही !
४. खेळाची यंत्रणा लगेच बदलून नवा शब्द अपेक्षिते. अशा बदलत्या अपेक्षित शब्दांची संख्या बर्‍यापैकी असू शकते. उदाहरणार्थ मी खेळून पाहिलेला spool हा शब्द बघा :

Absurdal screen.jpg

५. तो मी ८ प्रयत्नात सोडवलाय. यात तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या ओळीतच मी एक अधिकृत इंग्लिश शब्द scoot शोधला होता. पण तो अपेक्षित नव्हता.
६. चौथ्या प्रयत्नात मी spoof हा शब्द ओळखला पण लगोलग त्यांची यंत्रणा बदलली आणि spoo* अशी रचना असलेले पण शेवटचे अक्षर भिन्न असलेले अजून काही शब्द त्यांनी खेळात सोडले.
७. शेवटी spool हा शब्द आला तेव्हा त्यांचा हा साठा संपला. म्हणून ते उत्तर बरोबर ठरले !
.....
हा खेळ एकत्रित स्वरुपात कायमस्वरूपी उपलब्ध आहे :
https://qntm.org/files/wordle/
याचा दैनंदिन प्रकार नसावा; मला तरी सापडला नाही. म्हणजेच, इथे अमुक एक कोडे क्रमांकचे उत्तर सर्वांसाठी एकच हा प्रकार नाही. प्रत्येक खेळाडूच्या चालीनुसार त्यांची यंत्रणा अपेक्षित शब्द बदलत राहते. पहिल्या चालीसाठी आपल्याला जर स्वतःचा शब्द सुचत नसेल तर त्यांनी Random guess चा तयार पर्याय ठेवलेला आहे. ते बटन दाबले तरी चालते.

सारांश : या खेळात निव्वळ तर्कापलीकडे जाऊन निर्माता आपला शब्दसंग्रह पूर्ण खुला करुन ‘बाहेर’ काढायला उद्युक्त करतो. इथे लवकरात लवकरच्या पायरीवर उत्तर आले याचे कौतुक नसून ते आपला खेळ मुद्दाम अधिकाधिक लांबवत नेतात. तीच या खेळाची मजा आहे.

वर्डलव्यसनी मित्रहो,
आता तुमच्या व्यसनांमध्ये याही खेळाची भर घालून टाका !

पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!

तर्कबुद्धी तर तल्लख होईल आणि शब्दसंग्रह सुद्धा विकसित होईल !!! Happy
………………………………………………………………………………………………………………………
Dordle हे जुळे वर्डल असून इथे खेळता येईल:
https://zaratustra.itch.io/dordle

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या Worldle देशाची राजधानी भारतीयांना चांगलीच ओळखीची
>>>> अगदी ! सकाळी मनाशी हेच म्हणालो..

पण आपण मराठीत त्याचा उच्चार करताना शेवट बदलतो.
* * * करार , चित्रपट..

Warning - Worldle बद्दल थोडे venting करणार आहे Lol

Worldle मधे नक्की कोणत्या देशांना 'border countries' म्हणतात हे फार random आहे. परवा तैवान होता, तर शेजारी देश म्हणून हाँगकाँग आणि मकाव हे 'countries' होते Uhoh (आमचे चायनीज मित्र तर तैवान सुध्दा वेगळा देश मानत नाहीत Proud ) साऊथ कोरिया आणि व्हिएतनाम हे शेजारी देश होते पण जपान नाही. अक्च्युअली जपानची काही बेटे तैवानच्या खूप जवळ आहेत.
त्यानंतर फ्रान्स होता. आता हाँगकाँग आणि मकाव त्यांच्या autonomous status मुळे वेगळे 'countries' असतील तर त्या लॉजिक ने फ्रान्सचे शेजारी Bailiwicks of Jersey and Guernsey दोन्ही पाहिजेत. ते तर युनायटेड किंग्डम चा भाग सुद्धा नाहीत (ते UK च्या sovereignty मधे असले तरी ते United Kingdom चा भाग नाहीत)

SPOILER SPOILER SPOILER

आजच्या देशासाठी सुद्धा random पणा सुरूच. सौदी अरेबिया साठी बाहरेन शेजारी देश नाही??!! Uhoh Uhoh अहो त्या दोन देशांमधे चक्क ब्रीज आहे इतके ते जवळ आहेत आणि त्या ब्रिजवर त्यांचे बॉर्डर कंट्रोल स्टेशन आहे! बाहरेन नाही पण इरिट्रिया आणि इजिप्त हे मात्र "शेजारी देश". मग अकाबाच्या आखातात इस्राएल सुध्दा आहे त्याला का नाही धरायचं Uhoh

बहुतेक नशा करून आणि फासे टाकून border countries निवडतात.

https://solitaired.com/crossword
इंग्रजी शब्दकोडे .
तिथेच चार, पाच आणि सहा अक्षरी वर्डल सुद्धा आहेत. हे दर १२ तासांनी नवीन येतात. शब्दकोडे दिवसाला एक.

मला उलट ६ अक्षरी आवडायला लागलेले आहे !
...
https://irfca.org/irfca-wordle/
हे तीन अक्षरी रेल्वे स्थानक संकेतांचे वर्डल पाहिलेत का ?
इथेही अंदाजाने अक्षरे टाकत जायची. कधीकधी छान मटका लागतो.( तीन-चार स्थानकांची वेगवेगळी अक्षरे लक्षात ठेवायची).

Worldle
आजचा देश बघताच क्षणी ओळखू आलाच पाहिजे आपल्याला !

त्याच्या पुढच्या फेरीत त्याचे आठ शेजारी कुठेही न बघता लिहून बघा !!

माझा एक शेजारी चुकला. मी समुद्रातल्या शेजार्‍याचं नाव लिहिलं. बंदिस्त शेजारी लक्षात राहात नाही.

+११
Happy

आजच्या पाच अक्षरी wordle मधील शब्द प्रथमच ऐकला.
एकदम वैशिष्ट्यपूर्ण !
सोडवून पहाच !!

अच्छा !
थोडीशी स्पेलिंगची अदलाबदल केली की एकदम वेगळीच वस्तू . . .

आता 24 तास होऊन गेले असल्याने शब्द लिहायला हरकत नाही ( तसाही हल्ली तो शेवटच्या टप्प्यावर समजतोच) :
voila

तो उद्गारवाचक आहे .
..... , and voila !
..

viola हे वाद्य आहे. ते परिचित असते.

voila >> इथे परदेशात ऐकला आहे. आपण आश्चर्यचकित झाल्यावर 'हायला!' म्हणतो, तसा वाटला होता मला तो. Happy

'हायला!' >>> अगदी !!
काल मी मनात हेच म्हटले होते Happy
..
या पाच अक्षरी शब्दकोड्यात अंत्य a/ i वाले शब्द सटीसहामाशी येत असतात तेव्हा मजा येते.

वर्डल कंटाळवाणं झालंय आता. पहिल्या दोन शब्दात वॉवेल्स आणि एखाद दोन महत्वाची अक्षरं पडताळून घेतली की सुटतं कोडं. त्यापेक्षा तिथले इतर वर्ड गेम्स आवडतात. ते खेळते. कनेक्शन्स, स्ट्रँड्स, स्पेलिंग बी, बॉक्स्ड, मिनि क्रॉसवर्ड

मी wordle, quordle, octordle सोडवतो. तिथे सिक्वेन्स आणि रेस्क्यु गेम जरा आव्हानात्मक राहिलेत . हे खेळ खेळून इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंग्सचे पॅटर्न नीट कळले आणि माहीत नसलेल्या शब्दाचा अंदाजही बांधता येऊ लागला.

https://www.merriam-webster.com/games/quordle/#/

https://www.merriam-webster.com/games/blossom-word-game/
यात एकदा ३००+ स्कोर करता आला. सरासरी २००+ आहे. कधी कधी सरळ शब्दकोश घेऊन बसतो.

छान !
..
Quordle पूर्वी मी सोडवायचो. आता माझा अधिक वेळ या दैनंदिन क्रॉसवर्डमध्ये जातो :
https://puzzles.independent.co.uk/games/daily-crossword
मग मी कधीतरी येता-जाता एकच शब्द शोधायचे पाच व सहा अक्षरी wordle सोडवतो. कधी कधी गंमत म्हणून भारतीय रेल्वे स्टेशन कोड ओळखायचे हे तीन अक्षरी सुद्धा सोडवतो :
https://irfca.org/irfca-wordle/

पाच अक्षरी वर्डल हे मुळात covid ऐन भरात असतानाची आठवण आहे. म्हणून जरी ते आता जुने झाले असले तरी एक सवय म्हणून सोडवतो.
पाच अक्षरी वर्डलमुळे काही बिगर इंग्लिश देशांमधले खाद्यपदार्थही समजले. ते आता सामान्यनाम म्हणून इंग्लिशमध्ये स्वीकारले गेलेले आहेत.
उदाहरणार्थ,
sushi, bagel
तसेच अन्य काही विषयांमधील मूळ जपानी विशेषनामे देखील कळाली.
..
वरील इंग्लिशच्या जोडीला छापील मराठी दैनिकातील चौकटीवाले कोडे.
असे हे दैनंदिन खाद्य !

Pages