Absurdle व Dordle ! वर्डलच्या २ पाउले पुढे...

Submitted by कुमार१ on 24 January, 2022 - 11:26

इथे काही दिवसांपूर्वीच माबोकर व्यत्यय यांनी काढलेला Wordle चा धागा लोकप्रिय झालाय (https://www.maayboli.com/node/80915)
तो खेळून अनुभवी झालेल्यांसाठी सादर आहे या खेळाची नवी आवृत्ती Absurdle !

नवोदितांनी प्रथम Wordle शिकून त्याचा आठवडाभर तरी सराव करावा. दैनिक Wordle खेळ इथे असतो : https://www.powerlanguage.co.uk/wordle/

Absurdle हा नवा खेळ Wordle च्याच धर्तीवर आहे. म्हणजे तीनरंगी चौकटींचा अर्थ पूर्वीप्रमाणेच. या खेळातील बदल/वैशिष्ट्ये अशी आहेत :
१. इथे निर्मात्याने गुपित ठेवलेला ओळखायचा शब्द पक्का नसतो. खेळाडूच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर तो बदलत जातो. परंतु खेळाडूने आधी ओळखलेल्या अक्षरांवर त्याचा परिणाम होत नाही.
२. खेळाचे एकूण प्रयत्न तसे अमर्यादित ठेवले आहेत. वर्डलप्रमाणे पक्के ६ नाहीत.

३. अशा प्रकारे खेळत आपण एका ‘योग्य’ शब्दाशी पोचतो. आता आपल्याला वाटते की आपण जिंकलो; पण नाही !
४. खेळाची यंत्रणा लगेच बदलून नवा शब्द अपेक्षिते. अशा बदलत्या अपेक्षित शब्दांची संख्या बर्‍यापैकी असू शकते. उदाहरणार्थ मी खेळून पाहिलेला spool हा शब्द बघा :

Absurdal screen.jpg

५. तो मी ८ प्रयत्नात सोडवलाय. यात तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या ओळीतच मी एक अधिकृत इंग्लिश शब्द scoot शोधला होता. पण तो अपेक्षित नव्हता.
६. चौथ्या प्रयत्नात मी spoof हा शब्द ओळखला पण लगोलग त्यांची यंत्रणा बदलली आणि spoo* अशी रचना असलेले पण शेवटचे अक्षर भिन्न असलेले अजून काही शब्द त्यांनी खेळात सोडले.
७. शेवटी spool हा शब्द आला तेव्हा त्यांचा हा साठा संपला. म्हणून ते उत्तर बरोबर ठरले !
.....
हा खेळ एकत्रित स्वरुपात कायमस्वरूपी उपलब्ध आहे :
https://qntm.org/files/wordle/
याचा दैनंदिन प्रकार नसावा; मला तरी सापडला नाही. म्हणजेच, इथे अमुक एक कोडे क्रमांकचे उत्तर सर्वांसाठी एकच हा प्रकार नाही. प्रत्येक खेळाडूच्या चालीनुसार त्यांची यंत्रणा अपेक्षित शब्द बदलत राहते. पहिल्या चालीसाठी आपल्याला जर स्वतःचा शब्द सुचत नसेल तर त्यांनी Random guess चा तयार पर्याय ठेवलेला आहे. ते बटन दाबले तरी चालते.

सारांश : या खेळात निव्वळ तर्कापलीकडे जाऊन निर्माता आपला शब्दसंग्रह पूर्ण खुला करुन ‘बाहेर’ काढायला उद्युक्त करतो. इथे लवकरात लवकरच्या पायरीवर उत्तर आले याचे कौतुक नसून ते आपला खेळ मुद्दाम अधिकाधिक लांबवत नेतात. तीच या खेळाची मजा आहे.

वर्डलव्यसनी मित्रहो,
आता तुमच्या व्यसनांमध्ये याही खेळाची भर घालून टाका !

पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!

तर्कबुद्धी तर तल्लख होईल आणि शब्दसंग्रह सुद्धा विकसित होईल !!! Happy
………………………………………………………………………………………………………………………
Dordle हे जुळे वर्डल असून इथे खेळता येईल:
https://zaratustra.itch.io/dordle

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज भूगोलाचे Worldle सोडवले आणि चक्क दुसऱ्या प्रयत्नातच बरोबर आले. पहिला देश मी मनाने लिहिला होता त्यावर 13970 किलोमीटर लांब आणि मार्गदर्शनाची दिशा दाखवण्यात आली. त्यावर मी नकाशा न बघता अंदाजे टाकला आणि मटका मस्त बसला !
Screenshot_20220217-111832_Docs.jpg

मला आजचा देश पहिल्याच फटक्यात ओळखता आला. त्या देशाबद्दल काही गोष्टी आवडतात. आणि नकाशात तो आकार ठळकपणे लक्षात राहिला आहे.

आज डावीकडच्या शब्दाने घाम काढला. वाटला तितका साधा न्हवता Proud उजवीकडचा शब्द परत "शेवटचे ४ लेटर्स" वाला. पण सुदैवाने पहिल्या लेटरचे बरेच ऑप्शन्स एलिमिनेट झाले होते.

dordle_12.jpg

ना बु
आज त्यांना भूतकाळात चरायचे होते Happy

दोन तीन मिनिटे ट्राय केला. काहीच समजले नाही.
काळी अक्षरे रंगीत पण झाली नाहीत. पुढच्या ओळीलाही गेले नाही.

सुरूवातीला चुकून Dordle वर क्लिक केलं होतं आणि त्यात Wordle / Absurdle प्रमाणे आपोआप रंग बदलण्याची वाट पाहत होतो. Happy

आज dordle खेळताना लागलेला अचाट शोध - एकाच दिवशीचे शब्द कम्प्युटर वर आणि मोबाईल वर खेळले तर वेगळे वेगळे असतात का???

हे मोबाईल वरुन
dordle_mob.jpg

हे कम्प्युटर वरुन
dordle_comp.jpg

मी दोन्ही ठिकाणी पहिले दोन गेस सेम वापरले आहेत.

कुमार१, असे वेगळे वेगळे शब्द मोबईल आणि कम्प्युटर वर दिसत असतील तर एका गोष्तीचा उलगडा होतो आहे. कधी कधी तुमच्या शब्दासंबण्धी कमेण्ट्स आणि मी ओळखले शब्द जुळत नाहीत असे वाटते. तेव्हा मलाच तुमच्या कमेंट्स चा अर्थ कळत नसेल असे obviously वाटत होते. पण आपण एकच शब्दांच्या जोडीबद्दल बोलत नसू ही सुद्धा शक्यता आहे Lol

ना बु
तुमचा अनुभव अजब म्हटला पाहिजे. आज मला लॅपटॉप वरून जी उत्तरे आली ती मी मुद्दाम मोबाईल वरून खेळून घालून बघितली तर दोन्हीकडे तेच शब्द दाखवत आहेत.
तसेही आपण दोघेच इथे सोडवत आहोत म्हणून शब्द लिहितो
Glory & Suite.
तुमचे ?

गंमतच आहे!
GLORY and SUITE मला कम्प्युटर वर खेळले तर दिसतात.
मोबाईल वर OZONE and PESKY आहेत. इत्के दिवस मी मोबाईल वरच खेळत होतो.

आता मी मोबाईल वर webpage रिफ्रेश केले तर मोबाईल वर सुद्धा GLORY and SUITE आले Uhoh मी पूर्ण पेज कधी actively रिफ्रेश करायचो नाही. पेज मोबाईल च्या ब्राउजर वर ओपन असते. इतके दिवस तो गेम नंबर बरोबर दाखवुन शब्द मात्र वेगळे का होते कळत नाही.

किंवा
दोन्ही शब्दांना पर्यायी उत्तर असू शकते असा तर त्यांचा खेळ नसेल ना ?

तुमचे तसे असेल तर मग खरच गंमत आहे
मी घरातील अन्य मोबाईल वर तुमची उत्तरे थेट लिहून पाहिली तर ती चुकीची दाखवत आहेत
मात्र glory व suite हे दोन शब्द घातल्यावर बरोबर आले Happy
ब्राऊझर वेगळा वापरला तर काही फरक पडत असेल??

बरोबर !
अजून एक माझी तांत्रिक शंका विचारतो
जर का आपला लॅपटॉप आणि मोबाईल हे sync केलेले असतील तर मग वरील प्रकार व्हायलाच नको ना ?

आजच्या भूगोल खेळात मला देश दुसऱ्या प्रयत्नात जमला
#Worldle #31 2/6 (100%)

हा खेळ खेळताना मी त्यांनी दिलेला नकाशाचा आकार बघून खेळत नाही कारण मजा यायला पाहिजे.
मी पहिल्यांदा मनाला येईल तो देश लिहितो. नंतर त्यांनी अपेक्षित देश किती किलोमीटरने लांब आहे आणि योग्य दिशा दाखवल्यानंतर मग प्रत्यक्ष जगाच्या नकाशात बघून ठरवतो.

भूगोलाचे Worldle जास्त आवडले. पण जगाच्या नकाशाची मदत घ्यावी लागली.
१३००० किमी पश्चिमेला म्हणजे किती देश सरकायचे याचा काही अंदाजच आला नाही. १३% proximityचा चुकीचा अर्थ घेऊन तिथेच फिरत राहिले. उद्या बघू कसे जमते.

Pages