आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१०५७ हिंदी (१९८१-१९९०)
म क ब र ब अ र क
ब म र म अ र क
क ब ब अ र क
ज प च अ र क

सगळ्यांनाच ओळखेल असं कोडं बघू कोण आधी पोचतंय

(मन क्यों बहका रे बहका आधी रात को
बेला महका हो
बेला महका रे महका आधी रात को) -२
किसने बँसी बजाई आधी रात को
जिसने पलकें हो
जिसने पलकें चुराई आधी रात को
मन क्यों ...
बेला महका रे महका आधी रात को

१०५८. हिन्दी २०१०-२०१४
ब ह द क र य द ग स
त न प अ ग ग च

ग म र भ ब अ न च
च भ अ क ग क क च

(नंतरच्या दोन ओळीवरुन ओळखता येईल)

गुलों में रंग भरे बाद-ए-नौ-बहार चले
चले भी आओ के गुलशन का कारोबार चले

माहिती नाही चूक बरोबर गुगुळलेले!

कृष्णाजी बरोबर आहे
हैदर मूवी मधलं अर्जित सिंग ने म्हणलेलं भारी गाणं आहे हे.

बरोबर!
अक्षयजी,'फैज' यांची ही गझल,मेहदी हसन यांनीही गायिलेली आहे!

१०५९.

हिंदी (६०-७०)

क क त छ अ भ क न स
च ज ह ब ख ह अ ग घ म
ब प ह श अ ह थ फ स
अ ज ज
ज ज ज र त ह ज ग
क प म ह प ग
त क प म ह प ग

१०५९:
कली कब तक छुपेगी एक भंवरे की निगाह से
चमक जाती है बिजली खुद ही इन गहरी घटाओं में
बरस पडती है शबनम आप ही ठंडी फिजाओं से
अरे जा जा
जा जा जा रे तुझे हम जान गये
कितने पानी मे हो पहचान गये

:)..शब्द पाहिले आणि क्लिक झालं गाणं.

१०६०: हिंदी (१९९१-२००१)
म म ज क क ग स म
क म क छ क ब क
र क न ज र क न ज
अ त म म ल
र क न ज र क न ज

मधुबन में जो कन्हैय्या किसी गोपी से मिले
कभी मुस्काये, कभी छेड़े, कभी बात करे
राधा कैसे ना जले, राधा कैसे ना जले
आग तन मन में लगे, राधा कैसे ना जले

१०६१.

वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षी ही सुस्वरे आळविती

१०६२.

हिंदी

सोप्पे

अ म ह अ स स ह
प क अ न ज ज ह
स भ अ ह ह ह भ अ ह
ब अ अ अ ह म स ह

१०६२. हिंदी सोप्पे -- उत्तर
आँखों में हमने आप के सपने सजाये हैं
पलकें उठा के आप ने जादू जगाये हैं
सपना भी आप ही हैं, हक़ीक़त भी आप है
बस, आप आप, आप ही, मुझमें समाये हैं

१०६३ मराठी ५०-६०
भ ग प द फ
द ब श न (कोरस)
स क प ब, व ग न म
ब श क ग ब, ब च ल द
स ब श न प
फ क द च त म
प ब झ व, द ब श न

भरजरी ग पीतांबर दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हांसी मी
पाठची बहीण झाली वैरिण
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण

१०६४ हिंदी (१९५५-१९६०) -- उत्तर
आंखो ही आंखो में इशारा हो गया
बैठे बैठे जीने क सहारा हो गया

Pages