आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रुश्नाजी ,दादा देत नाहियेत त्यामुळे मी देतेय...माझ मन मला बोलले दे तू म्हणून Happy

१०३६ हिन्दी (२०१२-२०१६)
ब त द अ अ अ द क द...(२)
च क ख स ज ज ज ह क द ,
ह य क अ स ज च अ क क न...

एकदम सोप्पे आहे...

बनके तितली दिल उड़ा ,उड़ा, उड़ा है, कहीं दूर
चलके खुश्बू से जुड़ा, जुड़ा, जुड़ा है, कहीं दूर
हादसे ये कैसे, अनसुने से जैसे
चूमे अंधेरों को कोई नूर

१०३८.

मराठी
सोप्पे

अ स त र व
अ म ब ब ज ज ह

परफेक्ट!
अक्षय, एकदम झटपट सोडविले!

१०३९.

नभ उतरु आलं
चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झाल हिरव्या बहरात

१०४०.

मराठी
सोप्पे

अ ल स म च ख ग
र म ह क क ज म भ ग
ह स त अ क ग
ल अ य म क ज म भ ग
न र न ल ल न भ
ह न त ज अ अ र
क ब

हा अतिशय उत्तम अष्टपैलू अभिनेता अपघाती अकाली गेला!
अभिनेत्री मराठी हिंदीत बरीच कामे केली पण ह्याच दिग्दर्शकासोबात!
गाणं खुप गाजलेले

एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
या एकांताचा तुला इशारा कळला गं
लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं
नको रानी नको लाजू, लाजंमधे नको भिजू
इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू
का बघत्यात

क्ल्यु हवाय का? खूप सोप्पय.
अक्षय, एव्हाना लिहायला हवे होते तुम्ही तर! >>ट्रेडिंग चा हाच तर disadvantege आहे आपल्याला काम असतं नेमकं तेव्हाच कस्टमर येत. त्यामुळे उशीर झाला बाकी शब्द बघितले तेव्हाच गाणं लक्षात आलेलं.

ट्रेडिंग चा हाच तर disadvantege आहे आपल्याला काम असतं नेमकं तेव्हाच कस्टमर येत.>>>>>>
इथे कोडी सोडवणं हे काय काम आहे का? कस्टमरकडे लक्ष देणं काम आहे. ट्रेडींगच्या कामाचा काहीही दोष नाही यात

बाकी खूपच फास्ट कोडी सोडवता तुम्ही.

कोडे क्र १०४१ हिंदी
मुड मुड के ना देख मुड मुड के
जिंदगानी के सफर मे तू अकेला ही नही है
हम भी तेरे हमसफर है

Pages