माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागेच घेतली स्कूटर, शन्या व्हेरिएबल नसून कौन्स्टंट आहे हे कळलं नं तिला म्हणून श्रेयस खोटं बोलला हे ही उमगलं

इथे वाचून मी दोन दिवसाचे एपिसोड्स बघितले. मला ऑफिसमधली मूव खूप आवडली. राधिका छान काम करतेय, तिचा बदललेला attitude छान आहे. श्रेयसला पण छान सुनावते. क्रेडीट कार्ड वाली रिस्क होती मात्र. पण ती गुरुनाथला सोडेल असं वाटत नाही. त्याच्या बदफैलीपणाचा बदला घेऊन त्याला सोडावं तिने. तो फार गयागुजरा वगैरे आहे.

हो नं अंजू, तिने तिथल्या तिथे त्याच्या समोर सांगितले हे बघून गहिवरून आलं....इतके दिवस तिचं आंधळं प्रेम अजिर्ण झालं होतं

क्रेडीट कार्ड वाली रिस्क होती मात्र >>> रिस्क पेक्षा मला ते चुकीच वाटल. त्या बाईला हिने सरळ सरळ चोरी करायला लावली. बिचारी पकडली गेली असती तर

त्या दोघांच्यात भांडणं लावायला क्रेडिट कार्ड ची आयडिया भारी होती खरंतर, पण त्या बाईला पणाला लावायला नको होतं. बिचारी पकडली गेली असती तर त्या इशा आणि त्या शन्या ने तिचा जीव खाल्ला असता. शिवाय गुरूची सहानुभुती परत शन्यालाच.. बघ तुझी बायको कसे किडे करते म्हणायला मोकळी..

अरे...!? असं कसं होईल...? आता लेखकानेच मनावर घेतलंय ना राधिकाला वरचढ दाखवायचं?
नाहीतर मग आधीही अशा बर्‍याच रिस्क्स होत्याच की ज्यातून गुरु सही सलामत सुटला...लेखकाच्या कृपेने!

नाहीतर मग आधीही अशा बर्‍याच रिस्क्स होत्याच की ज्यातून गुरु सही सलामत सुटला...लेखकाच्या कृपेने! >>>>> करेक्ट. ऑफिसच्या पैशाने मजा मारणे किती फाल्तुपणा आहे.

आणि बाय द वे....ह्या दोघी काल ज्या दुकानात गेल्या होत्या ते किती साधारण होतं! गुरुला लगेच समजेल की स्टेटमेंट वरुन की हि खरेदी आपल्या बिल्डींग च्या समोरच्या दुकानातून झालीये ते. शनाया सारखं दाखवायचं होतं तर जरा मॉल मधे जाऊन जीन्स, शॉर्ट्स वगैरे तरी खरीदायच्या....लांब लांब, रंगी बेरंगी कुडते घेत बसल्या! गुरुला समजल्या खेरीज राहील का की कुणी केलेत हे उपद्व्याप ते !
निदान मी गुरवाच्या जागी असते तर मला नक्की समजले असते!

रिस्क पेक्षा मला ते चुकीच वाटल. >>> नो डाऊट, साफ चुक होती ती, राधिका नाहीच म्हणत होती. पण दुसरा पर्याय नव्हता ना. अर्थात त्या पुष्पाला चोरायला लावणं ही रिस्क आणि चुक होतं.

निदान मी गुरवाच्या जागी असते तर मला नक्की समजले असते! >>>>> मी तर म्हणते कुठे जाय्चं कशाला, ऑनलाईन घ्यायचं ना काहीतरी. राधिका नाही पण रेवती आहे की स्मार्ट तेवढी. वेळही नसता लागला. आणि जी खरेदी उगाच आहे त्यात चॉइस कशाला वेळ घालवायला ? काहीही उचलायचं , नाहीतरी पिन राधाक्काला माहीत नसणारचं होता. एक टेक्निकल शंका - नक्की गुरवाला काय मेसेज गेला ? चुकिचा पिन टाकल्याने डिक्लाईन्ड ? का लिमिट क्रॉस झाली ? पण राधिकाला काय माहीत की लिमिट संपलं आहे ?

तेच मलाही समजेना.... कारण ती काउंटरवरची मुलगी (निराशेने?!) 'नाही नाही' चीच मान हलवत होती.... म्हणजे यांचे ट्रांझॅक्शन डिक्लाईन झाले? पिन चुकीचा होता? गुरवाने बदलला असणार!!!
आणि एकाच दुकानात चारदा कशाला स्वाईप.....? सगळे पेमेंट एकदाच घेतात की!

नक्की गुरवाला काय मेसेज गेला ? चुकिचा पिन टाकल्याने डिक्लाईन्ड ? का लिमिट क्रॉस झाली ? >> लिमिट क्रॉस झाल्याचा मेसेज गेला. रधाक्का ने मुद्दाम खुप खरेदी केली, गुरवाला वाटावे कि शनायाने खूप पैसे खर्च केले आणि त्यांच्यात भांडण व्हावे म्हणुन.

पण शनायाची पीन राधिकाला कशी माहीत झाली? इतके सोपे असते हे? मी कार्डस वापरायच्या भानगडीत पडत नाही, बर्‍याच ठिकाणी, म्हणजे किमान ९८ % वेळा तरी पैसेच वापरलेत. आणी पीन अंदाजपंचे बरोबर लागली का?

पुढील भागात राधिका, श्रेयसला वाजवताना दाखवलीय तो खोटं बोलतो म्हणून. आता मालिका खर्‍या अर्थाने रंगायला लागलीय.

पण शनायाची पीन राधिकाला कशी माहीत झाली? >>
कार्ड गॅरीचं आहे.. शनाया वापरते ते. गॅरी ने पिन पाठवतात ते envelope तसंच ठेवलंय ते राधिकाने पाहिलं आणि पिन मिळवला

मी तर म्हणते कुठे जाय्चं कशाला, ऑनलाईन घ्यायचं ना काहीतरी.>> online transaction साठी otp लागतो ना बऱ्याचदा.. अर्थात एवढ्या detailing ची झी कडून अपेक्षा नाही.. कदाचित राधिकाला ऑनलाइन शॉपिंग येत नसावं

आणि आॅनलाईन खरेदी केल्यास जर गुरूने तक्रार केली तर आयपी अॅड्रेसवरून कुठून केली ते कळू शकतं. अर्थात एवढा विचार झीने केला नसणार. श्रेयसने कसा संसार मोडला जर गुरूलाच ही आवडत नाही. हीच थोबाडीत गुरूला फार पूर्वीच मारली असती तर...

श्रेयस ला थोबाडीत मारायच्या आधी गुरुलाच का नाही मारली. ? "आता बघाच मी तुमच जिणं मुश्किल करेन " म्हणून मारे मोठे मोठे डायलॉग मारले . आता काय करतेय ती जिणं मुश्किल करायला ? त्यांच्या पाठी पाठी जाते . मुदामून स्कुटर गाडीसमोर आडवी घालते . हि सगळी नाटक कशाला ? डायरेकट समोर जाऊन उभी राहा ना

ती गुरूचा शब्दच्छळ करतेय आणि प्रेक्षकांचाही. ती साबासाबूना सांगायला जाणार आणि तेव्हाच त्यांना गावाला जावं लागणार हे अगदी टिपीकल. शनाया त्या लाल ड्रेसमध्ये खूप छान दिसत होती. गुरू एवढा घाबरतो राधिकाला तर कशाला असले धंदे करत फिरतो.

मालिकावाल्यांना नक्की काय दाखवायचं आहे हेच कळत नाहीये. गुरु शनाया एकमेकांत गुंतले आहेत. तर राधिका परत दुसऱ्यांदा त्याला फसवणूकीची जाणीव करून देऊन, त्याला सुधरवणार. धन्यवाद आहे सर्व. हा त्याला शिक्षा दे पण अशा छोट्या छोट्या का देतेय. कायद्याचा बडगा दाखव की आणि कायद्यानुसार तो गुन्हेगार आहे त्यामुळे जी मिळेल ती शिक्षा मिळूदे त्याला आणि मग शनाया काय करते कशी वागते तो भाग तिचा वेगळा पण त्याच्याशी देणं घेणं न ठेवता divorce घे आणि स्वतंत्र रहा की. काही पटत नाहीये मला. कोंडी करून मग त्याने कबूल केलं की गुण्यागोविंदाने संसार करणार का परत त्याच्याशी.

तिला एक घाव दोन तुकडे करायचे नसतील..... कुटून काढायचे आहे !! संदर्भः आजचा तिचा आणि गुरवाचा संवाद
त्याला घर्काम करायला लावणे हे मात्र आवडेश !

कुटलाय का त्याला आज. मग बघते ozee वर जाऊन >>> अंजू तुला फारच अपेक्षा आहेत झी कडुन. तिने फक्त कुटण्याचा डायलॉग मारलाय. कुटले वगेरे अजिबात नाहिये. आणि असा डायलॉग मारुन एक भयाण आणि विकट हास्य पण केले जोडीला.

मार्केटमध्ये नोंद घेतली म्हणजे काय. असा कुठला सर्वे असतो. गुरूची कंपनी नक्की काय बनवते. गुरूला राधिकाच्या यशाची काहीही पडलेली नाहीये. तो तिचा येता जाता अपमान करतो आणि त्या बच्चाने काही केलं तरी तिच्यामागे शेपूट हलवत जातो. तो मोठ्या लेेवलचा अधिकारी वाटतच नाही. त्याला राधिका हळूहळू कुटणार आहे आणिि आत्ता कुठे सुरूवात झाली आहे. सहा महिनेतर नक्की.

गुरूची नोकरी जाणे ही त्याला मोठीच शिक्षा असेल. ती त्याला मिळेल असे रंग आहेत.
बाकी खरेच कायद्याचा बडगा अधिक मोठा आणि चांगला दाखवता येईल.
शिवाय अशा छोट्या शिक्षा आहेतच.

तो तिचा येता जाता अपमान करतो आणि त्या बच्चाने काही केलं तरी तिच्यामागे शेपूट हलवत जातो. >>> अगदी अगदी. चांगला कुटूदे त्याला आणि मग आतपण पाठव आणि मग सोड त्याला. ते अजूनही बच्चा बच्चा चालू आहे ते इतकं इरिटेट होतंना. अनिता दाते काम छान करतेय.

झी मराठी अवार्डमध्ये बेस्ट निगेटिव्ह actor मध्ये एक नामांकन गुरुनाथचे आहे. ते पाहून बरं वाटलं. निदान तो खलनायक आहे हे तरी झीला मान्य आहे.

पण शनायासुद्धा निगेटीव्हसाठी नाॅमिनेटेड आहे जे मला नाही आवडलं. तीसुद्धा मालिकेची नायिकाच आहे. छोटे कपडे घालणा-या आणि छोटे केस ठेवणा-या, स्वत:चे स्वतंत्र विचार असणा-या खलनायिका आणि लांब केसवाल्या, नेहेमी साडी किंवा पंजाबी ड्रेस घालणा-या, अति सोशिक, घरातल्यांचा अपमान सहन करणा-या सकारात्मक नायिका हे झीचं फार पूर्वीपासून आहे, निषेध Angry

हो बरोबर, झीच नाही सर्व channel वर तेच.

पण शनायाला स्वतंत्र विचार दाखवलेत असं मला वाटत नाही. तिचा आयुष्याचा एम फक्त मौजमजा करणे दुसऱ्याच्या पैशावर हाच मला दिसला. इथे वाचून आणि जे काही थोडंफार बघितलं त्यावरून. अनिता दाते आता मात्र सुंदर काम करतेय. श्रेयससमोर तिचे डायलॉग आणि आपण कसे कोणाकडून फसवले गेलो ही भावना छान दाखवली तिने.

Pages