माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो बाम नसतोच राधिकाने ते जाणुन बुजुन उचललेले दाखवलेय. पण गुरुची अवस्था मात्र तोंड दाबुन बुक्क्यांचा मार अशी झाली होती जेव्हा राधिकाने बकुळाला ते कॉम्पॅक्ट भेट दिले. त्याची किंमत दोनशे डॉलर होती? बाबौ!

उद्याच्या भागात कपूर सर गुरुबाळाला विचारतांना दाखवलेत की सिंगापूरला तू कोणत्या क्लायंटला भेटलास जो मला माहीत नाही. गुरुला उत्तर सुचत नाही.

अनिता दातेने काम छान केलंय पण. अविश्वासाबद्दल घुमसतेय हे जाणवलं तिच्या अभिनयातून. फक्त आता जबरदस्त दणका हवाय.

गुरूची ना ढोलकी केली पाहिजे शनाया आणि राधिका दोघींनीही. म्हणजे दोन्हीकडून थपडा.
कर म्हणावं मजा...
हापिसात पण साहेब ओरडतो ना सिंगापूर व्हिजिट विषयी? आता गुरूची मजा येईल आज बहुधा तोच एपिसोड आहे.

दोनशे डॉलर ची गिफ्ट मैत्रीणीला?! तो काही इतका श्रीमंत वाटत नाही. मी मध्ये कंबोडियात एक मस्त परफ्यूम व लिप्स्टिक घेतले तर ११०$ झाले मुख्य म्हणजे फिरताना ते हातात काहीच बॅग पिशवी बेल्ट लावून नाहीत. डॉक्स बरोबर लागतात की फिरताना पैसे वॅलेट कार्ड काय काय. गुरू कॅरेक्टर युसलेस आहे. त्याला चांगले वाजवून घरातून मुला सकट बाहेर पडले पाहिजे तिने पण मुझे नही लगता उससे हो पायेगा. उसका नौकरी जाना मंगता. फिर रोडपे आएगा.

शनाया व तिच्या कपड्यांसाठी सेरीअल बघ णारा एक प्रेक्षक वर्ग आहे. तिचे फॅनच.

दोनशे डॉलर्स..? नॉट अ बिग डील.... ! १०,००० रुपये म्हणजे काही फार नाहीत गुरुसाठी.

(सिंगापोर डॉलर्स अझ्युम करुन!)

अरे पण दुसृयाण्दा ही फसवणुक झाल्यावरही रधक्का हेच बालिश खेळ खेळतेय का? >> माझ्या मते आता ते खेळ ती कडक करणार असेल . गुरु ची नोकरी गेली तर खरी मजा . मग बच्चा आपोआपच सोडून जाईल त्याला . मग त्याचे पण डोळे उघडतील आणि राधिकाने पण "उठ म्हटलं कि उठ आणि बस म्हटलं कि बस" करायला पाहिजे . त्याच जीण मुश्किल करणार ना ती ? Happy

बकुळामावशी ची गिफ्ट बघताना मजा आली. >>> हो ना , तिचा चेहरा मस्त फुलला होता . पण बकुळामावशीला मेकप बॉक्स म्हणजे जरा जास्तच होतं. कोणीतरी दूसरं हवं होतं .
मालिका ख-या अर्थाने आता सुरू होईल असे वाटतेय. राधिकाचा आतल्याआत धुमसणारा राग अनिताने उत्तम दाखवलाय. आज तिने हातातला कप फोडला तो सीन छान होता. गुरूच्या आईनेही मुलावरचं आंधळं प्रेम आणि वडिलांनी डोळस प्रेम छान दाखवलय. >>>> + १००००० .

गुरु ची नोकरी गेली तर खरी मजा . मग बच्चा आपोआपच सोडून जाईल त्याला >>> पण मग ह्यात साधिकाच काय क्रेडिट? हे सगळं होईल ते त्याच्या मुर्खपणामुळे.

पण मग ह्यात साधिकाच काय क्रेडिट? हे सगळं होईल ते त्याच्या मुर्खपणामुळे.>>>> नैत काय. ही कसा काय धडा शिकवणार म्हणे? डोळ्यात बाम भरुन?

त्याला चांगले वाजवून घरातून मुला सकट बाहेर पडले पाहिजे>>> नाही. ते घर अर्ध राधिकाच्या नावावर आहे ना? मग तिने त्याला हाकलले पाहिजे. तसही त्याच्या वडिलान्नी एकदा अर्थवकरवी इनडायरेक्टली गुरुला धमकी दिली होती कि पुन्हा तुझ्या बाबान्नी तशी चुक केली तर तुझी आई त्यान्ना घराबाहेर हाकलेल.

गुरु ची नोकरी गेली तर खरी मजा . मग बच्चा आपोआपच सोडून जाईल त्याला . मग त्याचे पण डोळे उघडतील आणि राधिकाने पण "उठ म्हटलं कि उठ आणि बस म्हटलं कि बस" करायला पाहिजे . त्याच जीण मुश्किल करणार ना ती ?++++ ११११११

नैत काय. ही कसा काय धडा शिकवणार म्हणे? डोळ्यात बाम भरुन?>>> एटलिस्ट, ती त्याला धडा तरी शिकवते ते काय कमी आहे का? नाहीतरी ह्या धाग्यावर कुणीतरी म्हटल होत की, अश्या बायकान्ना घटस्फोट जरी घेता नाही आला तरी त्या विचित्र वागून नवर्याची मजा बघत असतात. राधिका तेच करत असेल.

पण तिने देवापुढे जाऊन "मी माझ्या नवर्याला, परमेश्वराला त्रास देत आहे, त्याचे मला वाईट वाटत आहे. मला माफ कर देवा." असे काही बरळू नये म्हणजे मिळवल. नाहितर सगळ Planning केरात. Angry

पण मग ह्यात साधिकाच काय क्रेडिट? हे सगळं होईल ते त्याच्या मुर्खपणामुळे >> नाहीतरी कपूर साहेब आधी मोदकांच्या प्रकरणावरून राधिकाला शनायाला गुरु च्या आयुष्यातून बाहेर काढण्याचं क्रेडिट देतच होते ना ? तेव्हा तिने माफ केल नसत तर शनाया त्याचवेळी पुण्याला निघून गेलीच असती ना पण मग त्याचा तिने काय उपयोग केला ? काहीच नाही नुसती जमीन पुसायला लावली आणि तिला माफ केलाय असा कपूर साहेबाना फोन केला Happy

मला तरी गुरु सुधारलेला वगैरे अजिबात पटणार नाही. हिने केस करून त्याला आत टाकायला हवं आणि divorce घ्यायला हवा. हिला फसवतोय त्यात हिचा मूर्खपणा हे एका बाजूला ते पटण्यासारखं नाहीच पण मुलासाठी पण मनात प्रेम नाही याच्या आणि कदर नाही हे बघून तरी हिने त्याला सोडावा पण भारी शिक्षा देऊन. मुलाबरोबर तो जे वागतोय ना ते disgusting.

आणि ही सिन्गापुरला त्याला भेटली नाही असे का सान्गत सुटल्ये?
साबुसाबांना तरी सत्य सान्गावे ना तिने
मठ्ठ बाई

आणि ही सिन्गापुरला त्याला भेटली नाही असे का सान्गत सुटल्ये? >> अजून सहा महिने चालवणार वाटत. टीआर पी भरपूर दिसतोय . ते नकटीच्या लग्नाला संपल का ? ती काय समजूनच नाही राहील Happy

मला तरी गुरु सुधारलेला वगैरे अजिबात पटणार नाही. हिने केस करून त्याला आत टाकायला हवं आणि divorce घ्यायला हवा. + १२३

मला तरी गुरु सुधारलेला वगैरे अजिबात पटणार नाही. हिने केस करून त्याला आत टाकायला हवं आणि divorce घ्यायला हवा. >>>> मग ती सोशिक सदगुणाचा पुतळा सुन ठरणार नाही ना

अरे मी म्हणते अशा राधिका सोडून का नाही देत अशा नतद्र्ष्ट नवर्‍याला>> रेवती सुद्धा राधाक्काला तेच सांगते, तेव्हा राधाक्का म्हणते कि सोडुन देणं ही फार कमी शिक्ष होईल.. मी त्याचे जीने मुश्किल करणार.

सोडुन देणं ही फार कमी शिक्ष होईल.. मी त्याचे जीने मुश्किल करणार >>> ते त्याचे नसेल, प्रेक्षकांचे असेल कदाचित Proud

राधाक्काची दूसरी चाल : शन्याला ह्यान्च्याकडून मिळणारे पैसे बन्द करायचे . देर आये दुरुस्त आये .

रच्याकने , ते कपूर साहेबाना काय शेन्डी लावली?

रच्याकने , ते कपूर साहेबाना काय शेन्डी लावली?>> शेंडी लावण्याचा प्रयत्न करत असताना रा तो प्रयत्न हाणून पाडते आणि शेंडी गळून पडते.

राधिकाने स्कूटर कधी घेतली आणि श्रेयसबद्दल तिला कसं कळलं. मारे श्रेयसला धमकावत होती पण ती वेणी कुठे अडकली स्कूटर चालवताना तर हिचंच राम नाम सत्य होईल. ईतकी सगळी सोविनीयर्स अगदी सगळ्या स्टाफसाठी, प्रेक्षकांनाही पाठवायचीना काही

Pages