माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे एक लिहावेसे वाटतेय. राधिका ही भैताड, बावळट, काकुबाई आणी अजून बरीच काही आहे.( मी पण तिला नावे ठेवलीत ) पण मग या सगळ्याचा अर्थ असा आहे का की तिच्या दिसण्या बोलण्यामुळे तिचा नवर्‍यावर, संसारावर काहीच अधिकार नाहीये? एकंदरीत सर्व महिला प्रेक्षक वर्ग हा शनाया च्या दिसण्या वागण्यामुळे व तिच्या फॅशन सेन्सने भारावुन गेलाय. शानायाचा चेहेरा आणी वरचा कमनीय बांधा सोडला तर ती बेढबच दिसते. सतत चड्ड्या घालुन , जाड जाड मांड्या का दाखवते देव जाणे? माझ्या मुलीने ते पहाताच मला विचारले की ही एवढी शॉपिंग करते मग चड्डी घालुन का फिरते?

दुसरी गोष्ट, गॅरीभाऊ जेव्हा अथर्व करता खेळणी घेऊ पहातात तर ही नीचपणा आणी स्वार्थीपणा दाखवुन पैसे संपवु नकोस असे सांगते, स्वतः मात्र अफाट खरेदी करते. प्रत्येक वेळा दुसर्‍या विषयी वाईटच बोलते. मग गावठी राधिका हिच्यापुढे केव्हाही उठुनच दिसते, निदान मला तरी.

तिच्या दिसण्या बोलण्यामुळे तिचा नवर्‍यावर, संसारावर काहीच अधिकार नाहीये? >> रश्मी, इथे असं कुणीच म्हणलं नाहीये. आणि कुणीच शन्याची बाजुही घेतली नाहीये. राधिकाच्या कॅरेक्टरचं वागणं भैताड आणि ते कॅरेक्टर शन्याला धडा शिकवण्यासाठी जे काही बालिश चाळे करते ते डोक्यात जाणारे आहेत. शन्याचीच कही चुक आणि माझा नवरा कस्सा निर्दोष हे संताप आणणारं आहे.
दिसण्याच्या बाबतीत शन्या छान दिसते असं बरेच जण लिहितात. मी ही लिहिलंय बरेचदा. आणि ते खरंच आहे.

मग गावठी राधिका हिच्यापुढे केव्हाही उठुनच दिसते, निदान मला तरी.>>> मग हेच तर हवंय की त्यांना. शन्याला वाईट नाही दाखवलं तर राधाक्का कशी उठुन दिसणार? शन्याला वाईटच ठरवायचं तर ह्या गोष्टी दाखवण भागच आहे की.

रश्मी...... राधाक्का ला आम्ही जरी बावळट, भैताड म्हणत असलो तरी तिच्याच बाजूने आहोत की. रादर, गॅरीला तिने चांगला धडा शिकवावा, सतत त्याला झाकून घेऊ नये असेच आम्हाला वाटते. शनाया तर आहेच स्वार्थी. पण हिने केवळ तिला दोषी न ठरविता आपल्या घरात काय जळतं आहे हे जाणून घ्यायला हवं. लेखकाने अत्यंत मूर्ख पणाने व अविचाराने तिची व्यक्तिरेखा रंगविली आहे. तिचा विचारांचा बेसच चुकीचा दाखविला आहे.

नाही सस्मित हा माझा आरोप नाहेय, पण एकंदरीत सूर तसा दिसला म्हणून लिहीले. शनाया उर्फ रसिका ही दिसायला मला ही आवडते, पण सिरीयल मध्ये ती डोक्यात जाते. अर्थात, ती आणी गॅरीच्या अभिनयला मागे मी दाद दिलीय, पण स्टोरी आणी अभिनय बघीतला की दोघाना बदडावेसे वाटते.:फिदी:

मला त बै फक्त राधाकालाच बडवावं वाटतंय. कैच्याकै करुनर्हायली न ती >>> मला पण कारण ती गुरुला बडवायचा विचार करत नाही आणि शनायाला धडा शिकवायला काहीतरी फालतूपणा करते

राधिकाच कॅरॅक्टर येवढं फालतु दाखवलय की शनाया बरी वाटावी
ती चुकिची आहेच पण तिचा स्वतःचा एक स्टँड आहे.. आणि ती ते मान्य पण करते.. पाहिजेत पैसे .. नाही करायचय लग्न..
इथे राधिका जे मेन कॅरॅक्टर आहे.. तेच ढिलं आहे.. तिला गुरु किती खराब आहे ते शंभर वेळा दिसुन तो बरोबर वाटतो आणि शनायाने त्याला नादाला लावलं असा तिचा स्टँड आहे..
बोलणं चालणं दिसणं सोडलं तरी स्वभावच किती बकवास आहे तिचा..म्हणुन दगडापेक्शा वीट मऊ म्हणुन शनाया बरी वाटते
अजुन नवरा बायको मधे खाणं पिणं जेवण सोडलं तर अजुन काही नातं आहे
दाखवतच नाहित..
मनं पण जुळली पाहिजेत..
तो शनाया बरोबर रहात होताअ मग त्यांच्यात फिजिकल काही झालं असेल असं वाटणे ई. अँगलने काहिच दाखवलं नाहिये..

इथे राधिका जे मेन कॅरॅक्टर आहे.. तेच ढिलं आहे.. तिला गुरु किती खराब आहे ते शंभर वेळा दिसुन तो बरोबर वाटतो आणि शनायाने त्याला नादाला लावलं असा तिचा स्टँड आहे..>>>> एकदम बरोबर. फक्त राधिकाची संसाराची ओढ, मोठ्यांप्रती जिव्हाळा आणी माणुसकी सोडली तर तिचे पात्र खूपच विस्कळीत दाखवलेय आणी तिला नवरा हा गुणाचा भांडार वाटतोय.

सस्मित बरोबर आहे तुझे. पण कधी कधी असे वाटते की हे कलाकार लेखकाच्या चूका त्याला दाखवु शकत नाहीत का? की पैशाच्या आहारी गेल्याने चाललेय ते चालू द्या असे यांना वाटतेय देव जाणे.

रश्मी, कशासाठी पोटासाठी गं.
खुप खुप कॉम्पीटिशन आहे ह्या इंडस्ट्रीमधेही. त्यामुळे एखादा रोल, एखादी सिरियल मिळाल्यवर कलाकार निर्माता/दिग्द समोर आपली हुशारी दाखवत नसतील हातचं काम जाईल म्हणुन.

सतत चड्ड्या घालुन , जाड जाड मांड्या का दाखवते देव जाणे? >>> आता जे खर्या आयुष्यात मुली जसे कपडे घालतात तेच तर दाखवलेय ना सिरियलमध्ये? जस राधिकाला साडया नेसायला आवडतात तसेच शनायाला shorts घालायला. पसन्द अपनी अपनी. जसे काही लोकान्ना फक्त भारतीय कपडे शोभतात ( उदा. विदया बालन) तसेच काहि western कपडयामध्येच शोभतात. म्हणून इथे रसिकाला सुन्दर म्हटले गेलेय. शनायाला नव्हे. तशी ती सलवार कमीज, long skirt आणि साडयामध्ये सुद्दा छान दिसलीये. राधिकाने makeover करावा पण मेकओवर करणे म्हणजे modern होणे हा अर्थ चुकिचा आहे. तिने फक्त साडयामध्ये चेन्ज आणायला हवा.

जाड जाड मांड्या का दाखवते देव जाणे? >>> हे मत जर पर्सनल झालय.

गावठी राधिका>>> इथे राधिका गावठी आहे म्हणून कोणीच नाव ठेवलेल मलातरी दिसत नाही.

मुळात Western कपडे घालणार्या मुलीच खलनायिका, वाईट आणि साडया नेसणार्या, सलवार कमीज घालणार्या नायिका सालस, सोज्वळ,अतिसहनशील अस मराठी-हिन्दी मालिकामध्ये दाखवतात तेच चुकीच आहे.

माझ्या मुलीने ते पहाताच मला विचारले एवढी शॉपिंग करते मग चड्डी घालुन का फिरते?>>> हल्ली ५-१० वर्षाच्या मुलीसुद्दा रसत्यावर shorts घालून फिरतात.

सस्मित बरोबर आहे तुझे. पण कधी कधी असे वाटते की हे कलाकार लेखकाच्या चूका त्याला दाखवु शकत नाहीत का? >> नाही ते त्यांचं डिपार्टमेंट नाही . वाट्याला आलेली भूमिका करण एवढच त्यांच काम . आणि वाट्याला आलेली भूमिका तर करायचीच असते . त्यावर तर त्यांची रोजी रोटी अवलंबून आहे . त्यांनी नाकारलं तर दुसरा कोणीतरी काम करायला तयार असतोच Happy

सुलु, दुर्दैवाने आमच्या कॉलनीत आणी आसपासच्या परीसरात कुठलीच लहान मुलगी अथवा कॉलेज गोईंग तरुणीला सुद्धा माझ्या मुलीने असल्या कपड्यात वावरतांना पाहीलेले नाहीये, त्यामुळे मला तिने असे विचारले. आमच्या इथे वातावरण कितीही मॉडर्न असले तरी जवळच्या शाळा-क्लास मध्ये जाणार्‍या मुली कायम पंजाबी ड्रेस, प्लाझो आणी जीन्स मध्ये वावरतात, मग मुलीने तसे विचारले त्यात तिची चूक काय?

आणी जाड जाड मांड्या हे पर्सनल कसे? जे ती दाखवतेय ते खुले आम आहे, मग ती टीका पर्सनल कशी होऊ शकते? हा किंवा याच्या आधीचा भाग / बाफ सुरुवाती पासुन वाच. कुठेतरी कोणीतरी राधिकाला पांढरी माकडीच म्हणलेय. एवढी तर मी पर्सनल झाली नाहीये ना? मला रसिकाबद्दल प्रॉब्लेम नाहीये, तर शनाया या कॅरेक्टर बद्दल आहे.

आणी तसे पहायला गेले तर चेहेर्‍या वरचा थोडा उग्र भाव सोडला तर समिधा, शनायापेक्षा शंभर पटीने सुंदर दिसते. आणी हाच प्रश्न उलट होऊ शकतो की शनायाला जसे शॉर्ट्स घालायला आवडते तसेच राधिकाला साड्या नेसायला.

तिचे पाय जाड नाही आहेत. एक दिवस हिलरोड, लोखंडवाला ईथे चक्कर टाका, सर्रास छोटे कपडे घालतात. अगदी जाड मुलीसुद्धा.

तिचे पाय जाड नाही आहेत. एक दिवस हिलरोड, लोखंडवाला ईथे चक्कर टाका, सर्रास छोटे कपडे घालतात. अगदी जाड मुलीसुद्धा.>>>बै!! जाड पाय बघायला कशाला जायचे? Lol

तसे नाही हो. हिलरोड, लोखंडवाला सर्रास छोटे कपडे घालत असतील मुली/बायका, पण सगळीकडेच तसे नसते ना.... आणि मालिके मध्ये फक्त शनायाच तशी दाखविली आहे, तिची कोणतीच मैत्रिण-शेजारी नाही पण त्या परिसरातही कोणी असे दाखविले नाहीत. गुरुचे आई-बाबा पण तिला पाहून तिच्या कपड्यांबद्दल बोलताना दाखविले आहेत.
बाकी कसलेही कपडे घातले तरी शनाया ते छान कॅरी करते आणि तिला ते शोभतात.

सोनाली, मला तेच म्हणायचे आहे. राधिकाला श्रेष्ठ ठरवण्याच्या नादात लेखकाने/ निर्मात्याने शनायाचे पात्र भीषण बनवले आहे. जी आई बापाचीही चौकशी करत नाही, लहान मुलांशी बेदरकार वागते, सतत पैसा-पैसा करत रहाते ( जशी खुलता कळी खुलेना मधली मोनिका दाखवलीय) ऑफिस मध्ये काम न करता थिल्लरपणा करते. मला नाही वाटत की प्रत्यक्ष आयुष्यात असे कोणी असु शकेल.

आणी गुरुला मॉडर्न च बायको हवी आहे तर मग रेवतीचे उदाहरण समोर आहेच की. ती किंवा समिधा कुठलाही थिल्लरपणा न करता मॉडर्न दिसतात.

फार फालतु आहे हे सगळं..
लेखकाच आणि दिग्दर्शकाच नावं नोट करुन ठेवाव आणि परत कधी त्यांच्या सिरिअल बघु नये..

हो? या रोहिणी निनावेंनी अवंतिका, दामिनी अश्या मालिका लिहील्या आणि आता मानबा मधे का बरे इतका बेकार परफॉर्मंस?

अगदी सुरवातीला मालिका जेव्हा सुरु झाली तेव्हा पटकथा आणि सवांद लेखन रोहिणी निनावेच होत पण आजकाल संवाद लेखक म्ह्णून अभिजित गुरु च नाव येतंय. कदाचित काही एका काळानंतर किंवा अधून मधून काही एपिसोड्स च लेखन तो करत असावा Happy

माफेलेचा पूर्ण सोहळा आणि सविस्तर जाहिरात करून झाल्यावर राला हे दोघं दिसणार वाटतं. दिसल्यावर राला खूप राग येतो आणि ती सरळ मुंबईला जाऊन घटस्फोटाचे पेपर्स बनवते असे दाखवले तर किती बरे होईल.

बर्‍याच दिवसांनी मगाशी फक्त एक ओझरती झलक पाहिली मालिकेची. एका पब मधे राधिका, गुरु-शनयाला डॅन्स करताना पाहते, टीपे गाळते आणि मग दृढ निश्चय करते की आता मी खमकी होणार वगैरे वगैरे. यात नवीन असं काय ! असे तिचे निर्णय (खमकी होण्याचे) आतापर्यंत अनेक वेळा झाले होते की !
झी वाले हा बाफ अधून मधून पहात असतील, तर एक फु.स.:- राधिकेचा मेक ओव्हर कराच, तिला तिचा 'अय्या' सिनेमातला लूक द्या, आणि मग बघा मजा Wink

Pages