माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो बघितला. मागच्या वर्षीपेक्षा बराच बरा होता. दोन तीनवेळा राणाचा अपमान केला असंही वाटलं मला. पहिला एक तास नाही बघितला.

खरंतर झीने स्वतःचाच अपमान करून घेतला..१-२ वेळेला...अन् speciallyखुकखुचा तेही मोनेंच्या तोंडून ःफिदीः

राणाचा अपमान म्हणजे कसा?
मी थोडाच वेळ बघितला.....मुदलात मला चला हवा येऊ द्या टीम दिसली की संताप येतो...इथे तर सुरुवातच डॉ निलेश साबळेंनी केली!
मग स्कूल गॅदरींग सारखे नाच झाले....
खुकखु वर काय विनोद केले मोनेंनी?

थोडा वेळ बघितलं. मोने परचुरे trp पंचेस छान होते आणि एकंदरीत सिरीयलबद्दल प्रहसन छान होतं. प्रेक्षक महत्वाचे हे फारसं पटलं नाही कारण प्रेक्षकांना गृहीत धरतात बरेच दिवस मग अगदीच trp खाली गेला की बंद करतात मालिका.

मानबा प्रोमो बघितला, ती redhand पकडणार वाटतं गुरूला, एक मुस्कटात का नाही देत त्याच्या असं वाटलं.

शेवटाकडे प्रवास करतेय असं वाटतंय. राधिकापेक्षा बाकीच्या सगळ्यानांच कंटाळा आलाय या लळत लोंबत्याचा असं वाटतंय विशेषत: रेवतीला. रेवती कंटाळली आहे राधिकाच्या रोजच्या रडारडीला, रात्री बेरात्री तिच्याकडे जाऊन गळे काढत असते, हे असे वागून राहिले आणि तसे वागून राहिले.

शेवटाकडे प्रवास करतेय असं वाटतंय. >> असं कसं ? इतक टिआरपी असताना मालिका बन्द करतील होय झी वाले? धन्यच __/\__ सिरियल आहे, कारण मधे मधे प्रोमो दाखवत होते की राधिका मॉड होऊन गुरू आणि शन्याला हापिसात कामाला लावत होती. ( आचरट चाळे करून) आणि दारावर पाटी होती राधिका सुभेदार... सी ई ओ.... Uhoh
राधिकाला सी ई ओ ची पोस्ट मिळायला अजून 'य' वेळ लागेल. खुद्द नवर्‍याच्या आयुष्यात कोणीतरी निराळी बाई आहे हे कळायलाच तिला इतका उशिर लागलाय.
करा मनाची तयारी, अजून दिड वर्ष तर काय हि शिरेल संपत नाही..

करा मनाची तयारी, अजून दिड वर्ष तर काय हि शिरेल संपत नाही..>> नाही ग एवढी नाही चालत बाकीच्या रांगेत तयार असतात ना . अगदीच कुठल्या नसतील तर चालवतील. ती नकटीच्या का नाही संपवत आहेत ? अजून कुठली दुसरी तयार नसेल म्हणून . नाहीतरी तिचा टीआरपी काय आहे ? झिरो असेल बहुतेक .
त्या राणादाचा अपमान केला असं वाटत नाही . उलट बरोबरच लिहिलंय . तो राणा दा काहीच बोलत नाहीत निदान त्या साहेब रावला तरी डायलॉग द्या असं स्क्रिप्ट मध्ये लिहिलंय. राणादा आणि साहेब राव दोघंही काही बोलत नाहीत त्यामुळे बैल कोण आणि माणूस कोण तेच समजत नाही असं लिहिलंय . ते बरोबरच आहे . . राणादाने फक्त चालतंय कि चालतंय कि म्हणत म्हणत बेस्ट नायकाच अवॉर्ड मिळवल Wink

खुकखु वर काय विनोद केले मोनेंनी?>>मोने म्हणाले मालिकेचं काय अचानक काका,काकू, आजी ,आजोबा अचानक गायब झाले तरी कोणाला कळत नाही..शिवाय नायकाच्या व्यवसायाचा काही फरक पडत नाही..फक्त प्रेमप्रकरण दाखवले की झालं...अन् उदाहरणादाखल खुकखु आन् लाझाजीचं नाव पण घेतलं...ते बघताना zee च्या आयोजकांच्या बुद्धीची कीव वाटली..स्वतःचा असा खुलेआम अपमान???

मानबा प्रोमो बघितला, ती redhand पकडणार वाटतं गुरूला>>> प्रोमोत ती त्याला नाही तुम्हाला office मधून काढल तर नाव नाही लावणार सौ. राधिका गुरुनाथ सुभेदार, अस काही तरी म्हणत होती. नक्की काय धमकी दिली तिने ते नीट ऐकू गेल नाही. Uhoh नाही तुमच्या तोन्डावर डिवोर्स चे पेपर्स फेकले अशी धमकी तिने दिली असती तर बर झाल असत.

कारण मधे मधे प्रोमो दाखवत होते की राधिका मॉड होऊन गुरू आणि शन्याला हापिसात कामाला लावत होती. ( आचरट चाळे करून) आणि दारावर पाटी होती राधिका सुभेदार... सी ई ओ.>>> झाला ना तो एपिसोड? ती राधिका शनायाला हाउसकिपिन्गची कामे सान्गत होती.

चला हवा येऊ द्या मध्ये असत काय स्त्री वेषातला भाऊ कदम आणि पुरूषाच्या वेषात निलेश साबळे.

पहा!! पहा!! आम्ही आमच्याच मालिकांची थट्टा करतो बरं कित्तीsss ते मोठ्ठ मन आमच.

आज शेवटी राधाक्काने भोकाड पसरले, यांना काही कश्याची जाणच राहिली नाही- कोणाची पडलेलीच नाही-अपमान-फसवणूक-लाज चा पाढा पुन्हा एकदा म्हटला.

सगळा गाव का बरं गोळा केला राधिकाने (नेहेमीप्रमाणे). पोलीसांनाही बोलवा असंही म्हणालं का कुणीतरी. पानवलकर म्हणाले रघु म्हणजे एखादा पुरूष माणूस असू द्या बरोबर,तिथे जाऊन राधिका मा-यामा-या करणार आहे का. ती गुंडं अाहे हे गणपतीत दाखवून झालंच. गुरूच्या हापिसातल्या लोकांना काही कामं नसतात का. मला खरंच वाटलं होतं की आज उद्याकडे संपेल पण हाय रे दैवा :दु:खी: बायको म्हणून अपमान झालाय ना मग घटस्फोट हीच सुटका नाही का. राधिका गुरूच्या हापिसात त्याच्या हाताखाली काम करत असती आणि गुरूने हापिसात पदोपदी अपमान केला असता तर बाॅस होऊन दाखविन हे ठीक झालं असतं. नवरा बायकोच्या नात्याचं काय, अथर्वचं काय. ती बाॅस झाली तर गुरूला ती आवडायला लागेल का. मला तर काई कळूनच नै राहिलय.

झीने स्वत:चा अपमान करून घेतला असं आपल्याला वाटतंय पण त्यांन्ना ते सगळं कौतुकास्पद वाटत होतं. मला झीचा एकंदर अॅटिट्यूड माजोरडा वाटला की आम्ही काहीही दाखवलं तरी लोकंं बघतातच. राणाला बैल म्हटलं ते मला खटकलं. तुमाब्रे वरही काही कमेंट्स होत्या पण नीट बघितला नाही पूर्ण कार्यक्रम, त्यामुळे लक्षात नाही. पेठेंनी सुंदर नेकपीस दिला अक्षयाला.

प्रोमोवरुन मुलगा आजारी असतानापण गुरुला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, फक्त शनाया त्याच्या आयुष्यात महत्वाची आहे असं वाटतंय. तो एक बाप म्हणून मुलाशी जे वागतो ना ते खरंच disgusting आहे.

गुरुला मुलाशी काही घेणदेणा नाहिये हे तर माहीतीच आहे पण मुलाला १ ताप असताना घरी काही औषधपाणी न करता लगेच दवाखान्यात न्यायचे म्हणाजे जरा अतीच होते. बर तो तसा बरा दिसत होता एवढे घाबरुन नवर्याला हापिसातुन घरी बोलवण्याची काहेच गरज नव्हती.

आणि मुलगा एवढा आजारी आहे तर त्याला शेजार्यांवर सोपवुन गुरु आणि शन्याला रेड हँडेड पकडायला जान्याची पण काही गरज नव्हती. असा चान्स परत परत मिळेल की.

गुरुला मुलाशी काही घेणदेणा नाहिये हे तर माहीतीच आहे पण मुलाला १ ताप असताना घरी काही औषधपाणी न करता लगेच दवाखान्यात न्यायचे म्हणाजे जरा अतीच होते. बर तो तसा बरा दिसत होता एवढे घाबरुन नवर्याला हापिसातुन घरी बोलवण्याची काहेच गरज नव्हती. ...]]]]] अथर्व सांगत असतो बाबांना बोलव म्हणून ती गुरू ला फोन करते...त्यात गुरू चा वाढ दिवस ही असतो ..अथर्व ला बाबांना surprise द्यायचं असतं....बिचारा अथर्व ..

चंपा... मलाही हे कळलं नाही....गुरुच्याच ऑफीसात जाऊन त्याचा बाॅस होण्यात काय हंशील? ही कोणती पद्दधत त्याला धडा शिकवायची? नवरा
बायकोच्या नात्याचे काय ? आणि ऑफिसातले लोकही सगळे रिकामे? हिच्या सोबत यायला? आणि समिधा अचानक बदलली कशी? तिने गुरुला कळविले नाही?

आणि मुलगा एवढा आजारी आहे तर त्याला शेजार्यांवर सोपवुन गुरु आणि शन्याला रेड हँडेड पकडायला जान्याची पण काही गरज नव्हती. असा चान्स परत परत मिळेल की. >>> बरंच झालं की जे प्रेक्षक बघतात त्यांच्या दृष्टीने, म्हणजे सिरीयल जरा तरी पुढे सरकेल नाहीतर दुसरा चान्स मिळायला दोन महिने घालवले तर Wink . तसं पण आत्ता गुरु जास्त गाफील असेल कारण राधिका मुलाचं आजारपण सोडून येणार नाही अशी त्याची कल्पना असणार.

शेवटी अपेक्षेप्रमाणे गुरुनो चोराच्या ऊलटा..केलं.
शनायाला सुद्धा खोटं ठरवलं स्वतःला वाचवण्यासाठी.
तो शन्यावर सगळं ढकलत असताना मला वाटलं परत राधिका पाघळतीये, परत नवर्यावर विश्वास. पण थँक god आता तिचे डोळे खरच ऊघडलेत.

शनाया आज खरंच रडत होती की ते तिचं नाटक होतं?

गुरुच्याच ऑफीसात जाऊन त्याचा बाॅस होण्यात काय हंशील? ही कोणती पद्दधत त्याला धडा शिकवायची? नवरा बायकोच्या नात्याचे काय ? आणि ऑफिसातले लोकही सगळे रिकामे? हिच्या सोबत यायला? आणि समिधा अचानक बदलली कशी? तिने गुरुला कळविले नाही? >> +१२३

समिधा अचानक बदलली कशी? >>>तिला आनंद म्हणतो कि तुला दुसर्‍याचे चांगले करता येत नसेल तर वाईट तरी करु नकोस. मग लगेच ती आपण कशाला यात पडायचे आणि सुधारते Happy
तो शन्यावर सगळं ढकलत असताना मला वाटलं परत राधिका पाघळतीये, परत नवर्यावर विश्वास. पण थँक god आता तिचे डोळे खरच ऊघडलेत.>>+१ ती जेव्हा रेवतीला म्हणते कि असे सगळे करण्यात मला आनंद वाटून नाही राहिला, लाज वाटुन राहिली तेव्हा ती गाडी परत घरी न्यायला सांगते कि काय वाटून घाबरले मी Lol

मला वाटले कि 'तुम्ही आम्हाला का फसवले' यावर उत्तर देताना गुरु म्हणेल कि बाई शनायाला घरात आणून ठेवली, तुला बाहेर काढले, सोडचीठी मागितली तरीही तू मला सोडेना तर मग मी काय करु? तर हा शनायाला पण खोटे ठरवून मोकळा झाला.

मी दोन दिवस बघितलं, मला आवडलं. गुरूचं वागणं मला अपेक्षित होतं, तो टोटल व्हिलन झालाय. राधिकाने दोन चार किमान एकतरी मुस्कटात का नाही लगावली गुरूच्या. माझे हात शिवशिवत होते. किती कातडीबचाऊपणा. आता ती गुरूला टोटल नामोहरम करून divorce देईल. सिरीयल व्यवस्थित handle केली तर राधिकाचा प्रोग्रेस आणि गुरू शनायाचा ऱ्हास असेल. अर्थात राधिका आधी फक्त शनायाला नावं ठेवायची हे चूक होतं. तिचा दुसऱ्यांदा गुरूवर दाखवलेला अतिविश्वास अतिशय चूक होता. पण आता ती आत्मविश्वासाने सामोरी जाईल सगळ्याला. भुमिका छान लिहिली गेली तर अनिता दाते उत्तम सादर करेल. बाकी गुरू सुधारलेला वगैरे दाखवला तर अजिबात पटणार नाही. राधिका जशी शनायाला नावं ठेवत होती, तशीच शनायाही कायम तिला कमीच लेखत होती.

राधिकाने गुरू शनायावर सर्व ढकलत होता तेव्हा ती शनायाच्या बाजूने बोलली ते चांगलं केलं तिने. सर्व डायलॉग्ज परफेक्ट होते, छान trap केलं गुरूला.

पण गुरुच गिरे तोभी टान्ग उपरच चालु आहे, एक दोन वेळेस मला वाटल राधिका नाहि पण खोट पाडल्यावर शनाया तरी गुरुला वाजवेल इथे माझेच हात शिवशिवत होते, पण कसच काय बसल्या रडत, आणि गुरुच वेगळच काहितरी म्हणे वाढदिवस रुइन केला अरे! इथे आयुश्य बरबाद केल तु सगळ्याच आणि बड्डे च काय घेउव्न बसलाय,

Pages