त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी

Submitted by Rajesh Kulkarni on 30 November, 2015 - 13:25

त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी
.

सुरूवातीला केवळ चेहरा गोरा वगैरे ठेवण्यासाठी क्रिमची जाहिरात केली जाई. त्यानंतर आता दंड, पाठ, ब्राच्या बंदाखालची त्वचा हेही वेगळ्या छटेचे दिसू नयेत म्हणून अशा क्रिम्सच्या जाहिराती चालू आहेत. काही दिवसात प्रत्येक घरात या क्रीमचा एक टब ठेवा आणि गोरे दिसावे म्हणून सगळे शरीरच त्यात डुंबवावे, अशा जाहिराती आल्या तरी आश्चर्य वाटायला नको. कारण मग इतर अवयवांनी तरी काय घोडे मारले? आपण या कंपन्यांच्या काव्याला बळी पडत आहोत याची जाणीव तरी या सुशिक्षित महिलांना असते का? सूर्यप्रकाशामुळे बाह्यांखालची त्वचा व दंडाची-हाताची त्वचा यांच्या रंगात फरक पडणारच, त्यात वावगे ते काय, असा प्रश्न महिलांना पडतच नाही का?

स्त्रियांना त्यांच्या हाता-पायावरचे केस किंवा लव काढायचा आदेश आधी वडील व नंतर नवरे किंवा इतर कोणी देतात काय या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा मारणा-यांपैकी किती स्त्रियांची या पुरूषांनीच त्यांच्यावर लादलेल्या बंधनातून सुटका करून घेण्याची खरोखर इच्छा असते?

मात्र करणेषु दासी, शयनेषु रम्भा हे ऐकवा, मग पहा काही जणी कसा अवतार धारण करतात ते. वर सोयीस्करपणे आम्हाला हवे ते आम्ही करू हेही ऐकवले जाते.

बुरख्याचेही काही स्त्रियांकडून होणारे समर्थन आपण पाहतोच की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला नाही. गूगलला.
प्रतिशब्द विनंती इथल्या सुचवा जाणणार्‍या इंग्रजी शब्दांना चपखल.
पल्लवीत आशा होतील.

>>>> दिडम्या दिडम्या , तुला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे झाले आहे. काय आयडिया आहे... <<<< सहमत....

दिडम्या... धाग्याचे विषयांतर करु नकोस. हा विनोदी धागा नाहीये. धागाविषयाचे गांभिर्य पाळ.... Proud

अरे त्या गूगल ट्रान्सलेट्रचा उप्येग फक्त खालील अथवा तत्सम वाक्यांपुरताच मर्यादित आहे.

रामा गावाला जातो
सीता आंबा खाते
मगन हरण बघ
रशीद कमळ बघ....

उद्या तुम्ही त्यात ज्ञानेश्वरी टाकाल. आणि बाहेर गिरणीसारखा डबा ठेवाल !

अहो कुलकर्णी काका,

शरिराच्या कोणत्या भागावर केस उगवायचे, उगवल्यावर ठेवायचे की नाही, किती ठेवायचे, कोणत्या रंगाने रंगवायचे, रंगवायचे की नाही हा प्रत्येकाचा पर्सनल प्रश्न आहे! त्याची तुम्हाला का पंचाईत?

आणि सर्वात महत्वाचं,
टीव्हीवरील जाहिराती पाहून ब्यूटी प्रॉडक्ट्स विकत घेण्याइतक्या सगळ्या बायका बिनडोक आहेत असं तुम्हाला वाटतं का? आणि ते कशावरुन?

सायो,
माझ्या इतरत्र केलेल्या पोस्टवरील एक कमेंट आहे ती. त्यात मूळ लेखिकेचे नाव असले तरी सदर मूळ लेख माझ्या पाहण्यात नाही.

त्यात मूळ लेखिकेचे नाव असले तरी सदर मूळ माझ्या पाहण्यात नाही. >>>

तुम्ही नेमकी कशाकशाची आणि कोणती मुळं पाहता?

ऋत्विका,
तुम्हाला पोस्टचा आशय समजलेला दिसत नाही. तुमची पुढची कमेंटही त्याला अनुसरून दिसत नाही. तेव्हा कमेंट करू शकत नाही. क्षमस्व.

निधी,
त्यांचं मूळ वाक्यंच तसंच होतं!
मी पुढची कॉमेंट केल्यावर त्यात आता मूळ लेख अस बदल झाला आहे.
आणि वर माझी कॉमेंट न कळल्याचं वेड पांघरुन पेडगावला जाण्याचं नाटक सुरु आहे!

>>>> कमेंट की कॉमेन्ट ? ( ए भा प्र) <<<<
आमच्या उच्चारशास्त्र व स्वातंत्र्यानुसार,
कमेंट म्हणजे एखाद्या विषयावर केलेल अभ्यासपुर्ण टिप्पण्णी.
कॉमेन्ट म्हणजे एखाद्या व्यक्तिबाबत केलेली कुत्सित टिप्पण्णी
इतकाच काय तो फरक आहे... Proud

त्यांचं मूळ वाक्यंच तसंच होतं!
मी पुढची कॉमेंट केल्यावर त्यात आता मूळ लेख अस बदल झाला आहे.>> अय्या हो गं. मी वाचलं तेव्हा पण लेख हा शब्दच नव्हता त्या वाक्यात म्हणूनच तर मलाही अर्थ कळला नाही.

कमेंट की कॉमेन्ट ? ( ए भा प्र)>>

भारतीय / ब्रिटिश असाल तर कमेंट
अमेरिकन असाल तर कॉमेंट

जसं भारतीय असाल तर कॉस्च्युम
आणि अमेरिकन असाल तर कॉस्ट्युम Wink

ऋत्विका,
मूळ लेख यात लेख लिहायचे राहिलेच होते. ती दुरूस्ती नंतर केलेली आहे. त्यात लपवण्यासारखे काही नाही. मात्र आधी म्हटल्याप्रमाणे तुमच्या कमेंटवर कमेंट करण्यासारखे काही नाही. छोट्याछोट्या गोष्टींवरून वेड पांघरून वगैरे म्हणण्यावरून तुमचा एकूण आवेश कळला. तुमचे चालू द्या. ही अखेरची कमेंट.

Pages