त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी

Submitted by Rajesh Kulkarni on 30 November, 2015 - 13:25

त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी
.

सुरूवातीला केवळ चेहरा गोरा वगैरे ठेवण्यासाठी क्रिमची जाहिरात केली जाई. त्यानंतर आता दंड, पाठ, ब्राच्या बंदाखालची त्वचा हेही वेगळ्या छटेचे दिसू नयेत म्हणून अशा क्रिम्सच्या जाहिराती चालू आहेत. काही दिवसात प्रत्येक घरात या क्रीमचा एक टब ठेवा आणि गोरे दिसावे म्हणून सगळे शरीरच त्यात डुंबवावे, अशा जाहिराती आल्या तरी आश्चर्य वाटायला नको. कारण मग इतर अवयवांनी तरी काय घोडे मारले? आपण या कंपन्यांच्या काव्याला बळी पडत आहोत याची जाणीव तरी या सुशिक्षित महिलांना असते का? सूर्यप्रकाशामुळे बाह्यांखालची त्वचा व दंडाची-हाताची त्वचा यांच्या रंगात फरक पडणारच, त्यात वावगे ते काय, असा प्रश्न महिलांना पडतच नाही का?

स्त्रियांना त्यांच्या हाता-पायावरचे केस किंवा लव काढायचा आदेश आधी वडील व नंतर नवरे किंवा इतर कोणी देतात काय या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा मारणा-यांपैकी किती स्त्रियांची या पुरूषांनीच त्यांच्यावर लादलेल्या बंधनातून सुटका करून घेण्याची खरोखर इच्छा असते?

मात्र करणेषु दासी, शयनेषु रम्भा हे ऐकवा, मग पहा काही जणी कसा अवतार धारण करतात ते. वर सोयीस्करपणे आम्हाला हवे ते आम्ही करू हेही ऐकवले जाते.

बुरख्याचेही काही स्त्रियांकडून होणारे समर्थन आपण पाहतोच की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या हाता-पायावरचे केस काय दाढी किंवा डोक्यावरच्या केसांसारखे बांधून ठेवावेत इतके वाढतात की काय? दाढीचा उल्लेख केला म्हणून म्हटले.

पुरुषांमध्येही असते की, मर्दोवाला क्रीम, फेअर अ‍ॅण्ड हॅण्डसम, आणि मग हे फेअर अ‍ॅण्ड हॅण्डसम लावणारे कानात मुलीसारखे रिंग घालतात, दंडावर बायकांसारखे टॅटू काढतात, पोरींसारखे थ्री फोर्थ घालतात, पण थ्री फोर्थ घालताना पायाच्या पोटर्‍यांवरचे केस काढायला विसरतात, पिंक गुलाबी रंगाचे शर्ट घालतात, दंड मोकळे सोडत स्लीवलेस टीशर्ट घालतात.. एकंदरीत पाहता माझ्यामते पुरुषांची फॅशन हल्ली खूप गंडलीय आणि स्त्रियांपेक्षा जास्त पुरुष या फॅशन मार्केटींगचे बळी पडत आहेत.

पण दुसर्‍या किनार्‍यावर उभे राहून विचार केला तर एका अर्थी पुरुष या सौंदर्यप्रसाधनांचा वापर वाढवत एक पाऊल स्त्री पुरुष समानतेकडे टाकत आहेत असे म्हणू शकतो.

अजून एक मुद्दा इथे लक्षात घ्यायला हवा ते या ईंडस्ट्रीमध्ये महिलांना रोजगार मिळायची जास्त संधी उपलब्ध होते. अगदी गल्लोगल्ली जे ब्यूटी पार्लर उघडले गेले आहेत ते मुख्यत्वे महिलाच चालवतात.

अगदीच राहावत नाही म्हणून हा उल्लेख करतो, जेव्हा शाहरूख खान सारखा सुपर्रस्टार हिरोईनींसारखे लक्स सौंदर्य साबणाची जाहिरात करतो तेव्हा स्त्रियांमधील एक सुप्त अहंकार नेहमीच सुखावत असेल.

पोस्ट जर अनवधानाने विस्कळीत वा शीर्षक मुद्दा सोडून झाली असेल तर क्षमस्व. धागा जसा पुढे जाईल तसे माझेही विचार आणखी क्लीअर होतील Happy

बुरखा घालायचा का नाही, कुठल्या रंगाची अंडरवेअर घालायची, कुठले केस कापायचे, फ्लेवर्ड कॉन्डोम वापरायचा की गर्भपात करायचा की आणि काय काय करायचे हे ज्याचं त्याला ठरवू द्या. कायदा मोडता नाहीत तर नाक खुपसायचं कामच नाही.

गर्भपात करायचा की आणि काय काय करायचे हे ज्याचं त्याला ठरवू द्या. कायदा मोडता नाहीत तर नाक खुपसायचं कामच नाही.
>>>>>

गर्भपात गुन्हा नाही का? की पहिल्या २-३ महिन्यात करू शकतो असे काही आहे?
नक्की माहीत नाही कायदा म्हणून विचारतोय.

देशाप्रमाणे नियम बदलतात, जनरली २० ते २४ आठवडेफिटलं फिटल एज पर्यंत कायदेशीर असतं. परंतु
इथे दिल्याप्रमाणे भारतात बाळाला अथवा आईला रिस्क असेल तरच गर्भपात २०व्या आठवड्यापर्यंत करतात.

हा लेख झेपला नाही. जाहिराती बघून त्याप्रमाणे काही करायचे का नाही हा वैयक्तिक चॉईस आहे. त्याला "काउंटर" करायला उदाहरणे दिली आहेत ती स्त्रियांना दुसर्‍या कोणीतरी काहीतरी करायला सांगण्याची आहेत. खूप फरक आहे.

स्त्रियांना त्यांच्या हाता-पायावरचे केस किंवा लव काढायचा आदेश आधी वडील व नंतर नवरे किंवा इतर कोणी देतात काय या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. >>

हे काय झेपलं नाय बा. लग्नाआधी वडील आणि नंतर नवरा हे जे आदेश देतील तेच प्रत्येक स्त्रीने केले पाहिजे असे तुम्हाला वाटतेय का? तिने स्वतःसाठी स्वतःच्या इच्छेने काही करूच नये का?

स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा मारणा-यांपैकी किती स्त्रियांची या पुरूषांनीच त्यांच्यावर लादलेल्या बंधनातून सुटका करून घेण्याची खरोखर इच्छा असते?>>
यात पुरुषांनी लादलेले बंधन कुठले? Uhoh

विषय नीट कळाला नाही.

विशिष्ट मानसिकतेतून अनावश्यक खरेदी पर्यंत मुद्दा ध्यानात आला थोडासा. पुढे गोंधळ उडाला.
विशिष्ट मानसिकता जाहीरातींतून येते कि मुळातच मानसिक गुलामगिरी आहे तिचा जाहिराती फायदा उठवतात हे नीट लिहा.

पुरुषांमध्येही असते की, मर्दोवाला क्रीम, फेअर अ‍ॅण्ड हॅण्डसम, आणि मग हे फेअर अ‍ॅण्ड हॅण्डसम लावणारे कानात मुलीसारखे रिंग घालतात, दंडावर बायकांसारखे टॅटू काढतात, पोरींसारखे थ्री फोर्थ घालतात, पण थ्री फोर्थ घालताना पायाच्या पोटर्‍यांवरचे केस काढायला विसरतात, पिंक गुलाबी रंगाचे शर्ट घालतात, दंड मोकळे सोडत स्लीवलेस टीशर्ट घालतात..
>>
मर्दोवाला क्रीम आणि फेअर अ‍ॅण्ड हॅण्डसम बाबत सहमत.
मात्र,
वर उल्लेखलेल्या बाकी सगळ्या बायकी गोष्टी आहेत (आणि म्हणुन पुरुषांसाठी वाईट आहेत) आणि पुरुषांनी त्या करु नये हे कोण ठरवत?
अशी मानसीकता बाळगणारे आणि महिलांनी बुरख्यातच रहावे, बाहेर पुरुषांसोबत काम करु नये, शिकूच नये, गाडी चालवुच नये अशी मानसीकता असणारे या दोघांत नक्की काय फरक आहे?

कानातले दागिने, टॅटू, ई गोष्टी आदीमानवाच्या काळापासुन स्री पुरुष दोघेही करत आलेले आहेत.
गुलाबी रंग, थ्री फोर्थ आणि स्लिवलेस टीशर्ट हा कोणाचा व्यक्तीगत चॉईस असु शकत नाही का - प्रोवायडेड ते भडक न दिसता सुट होत असेल तर?

आपण फार त्रोटक लिहीले आहे. तरीही मुद्दा पटला. मलाही याचे उत्तर ठाऊक नाही. एक प्रकारचा स्फोट झाल्यासारखा वाटतो.

ग्रुमिंगच्या नावाखाली जे (जे) काय काय करतात स्त्रिया, तो कायदा नसला तरी पियर प्रेशर असतंच.
त्यात consumption ही किती वाढतं, तसेच हे सर्व पाण्यात जाते literally.
त्याचा पर्यावरणाशी संबंध ?
पूर्वी तरी निदान स्वयंपाकघरातील घटक थापण्यावर भर असयाचा. आता सर्व रासायनिक प्रक्रिया. हे सर्व वाहून कुठे जाते ?

तसेच- (सतत) सुंदर, सुडौल दिसावे लागणे, याचा मानसिक (आणि आर्थिक) तणाव.
(इश्श्य त्यात काय, एकदा करावे लागले की सवय होऊन जाते !! )

consumption patterns किती बदलले आहेत आणि आपण त्यात नुसते वाहून गेलो आहोत हा विचार का करता येऊ नये ?
जगण्याचेच निकष (साधी राहणी उच्च विचारसरणी, ई टिपिकल मराठी मध्यमवर्गीय विचारसरणी बदलत जाऊन)
एकाही घरगुती समारंभालाही एकही ड्रेस/साडी रीपीट होऊ नये इथपर्यंत सर्व बदलत गेले आहे आपल्याच आणि आपल्याच अवतीभोवतीच्या कुटुंबात. सर्व गोष्टींचे समारंभीकरण करण्याचा अट्टाहास म्हणा किंवा बदललेले सामाजिक संकेत म्हणा. त्यासाठी अविरत शॉपिंग आणि अविरत धडपड.
या सगळ्याचा कंटाळ कसा येत नाही ?

मी एका पूर्वेकडील देशात काम करते. महिनोन्महिने (जेवणा ऐवजी) हर्बल काढे पिऊन उपास करुन सुडौल राहणे, अंगावरचे केस जाळुन टाकायच्या सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट रुटीनमध्ये करणे, रोज पाऊण ते दीड तास मेकपला लागणे, अगदी २० वर्षे जून्या नवर्‍यालाही बिनमेकपचा चेहरा (कधीही) न दाखवणे, डोळे सुंदर दिसावेत म्हणून कोरियाला जाऊन सर्जरी करवून घेणे, मध्यमवयात त्वचेवर पिगमेंटेशन आले म्हणून चेहर्‍यावर भीषण ट्रीटमेंटस करुन घेणे, डॉ़क्टरी सल्ल्याच्या विरुद्ध सतत हाय हील्स घालणे, कसल्या कसल्या किरणांचा मारा करुन एकदम त्वचेला टॅन आणून घेणे, केस कधीही घरी न धुणे .. इ. इ. नेहमी पाहते. काय म्हणावे कळत नाही. Uhoh

भारतात फार वेगळी परिस्थिती आहे असे वाटणार्यांसाठी
- आपल्याच घरी आपलेच प्रतिडोई कपडे, पादत्राणे, ब्यागा, अ‍ॅक्सेसरीज यांचा ५ वर्षांपूर्वीपर्यंतचा खर्च आणि आत्ताचा याचा अदमास घ्या
- आपण कितव्या वर्षी वॅक्सिंग सुरु केले अणि आता मुली कितव्या वर्षी सुरु करतात ?
- ब्युटी पार्लरचा मासिक खर्च आणि विकत आणलेली ब्युटी प्रॉड्क्टस यांचा count. (त्यातली खरोखर वापरुन संपवली किती हा वेगळाच मुद्दा आहे) यांचाही अदमास घ्यावा.

बापरे रैना, तो शेवटचा परिच्छेद म्हणजे एकप्रकारची स्लेवरीच आहे.
हे असलं टीव्ही सिनेमातल्या लोकांनी व्यवसायाची गरज म्हणून केलं तर ठीक, पण सगळ्यांनीच!

साती आता तुला काय(काय) सांगु. गुलामगिरीच आहे ती एक प्रकारची.

चाळीशीतला नवा दागिना म्हणजे हिरेजडित दातांच्या क्लिपा म्हणे. त्याने म्हणे पन्नाशीत दंतपंक्ती नीट राहतील. रुटीनमध्ये लग्ना आधी डेंचर्स लाऊन घेणे.. व. व.

पूर्वीच्या काळी health and cosmetics हे वेगवेगळे असायचे ना? तो काळ आणि हिपोक्रॅटिक ओथ दोन्हीही गेले बहुतेक. जवळजवळ प्रत्येक स्पेशालिस्टाकडे एक कॉस्मेटिक विभाग असतो.

शि़क्षणाने नक्की काय साध्य झाले ? most women are consumers. कसले ना कसले फ्रस्ट्रेशन विविध गोष्टी खरेदी करुन काढत राहणे हे horrifying वाटते खरोखर.
इकडे शिपिंग इंडस्ट्री जोरात आहे. त्यातल्या भारतीय स्त्रियांचेही क्लब असतात. त्यांची विचारसरणी पाहिल्यावर मला अशिक्षित स्त्रिया बर्‍या वाटतात कधीकधी.

रश्मी- खरंय.

रैनांच्या पोस्ट्ससारख्या पोस्ट्समुळे तद्दन सुमार मांडणी केलेला आणि काहीच्या काही खासगी विषयावरचा धागा अचानक 'चर्चेबल' होईल ह्यात शंका नाही. कुलकर्णी, तुम्ही काहीही म्हणा, पणः

१. तुमच्या धाग्यावर कोणी प्रतिसाद द्यावेत हे तुम्ही सांगू शकत नाही

(म्हणून मी प्रतिसाद देत आहे - की)

२. विविध धाग्यांचा रतीब घालण्यापेक्षा एक विषय घेऊन शक्य तितकी सखोल माहिती मिळेल असा धागा काढलात तर अर्थपूर्ण वाटेल. हे केवळ मत आहे. हे तुम्ही धुडकावू शकता ह्याची जाणीव आहे.

रैना,

विविध उत्पादकांनी व्यक्तीमत्त्व कसे असावे ह्याच्या काल्पनिक आदर्शांच्या संकल्पनांचा जो भडिमार चालवलेला आहे त्यात माणसे भरडली जात आहेत. सुमारे चार दशकांपूर्वी मुलांनीच काय, मुलींनी पार्लरमध्ये जाणे हेही 'अगोबाई' सदरात मोडत असे. परफ्यूम वापरणे म्हणजे आंघोळ न केल्याचे लपवणे किंवा आकर्षक वाटण्याचा स्वस्त (चीप) उपाय योजणे असे होते.

पण हा विषय इतक्या ढिसाळ पद्धतीने चर्चिला जाऊ नये असे फार वाटत आहे. तुमच्या पोस्ट्स छानच!

बेफिकीर,
कोणी प्रतिसाद द्यावा व नाही हे मी सांगू शकत नाही हे खरेच. त्या प्रतिक्रिता मुद्द्याला धरून असाव्यात एवढी माफक अपेक्षा आहे.
तुम्ही ज्याला खासगी विषय म्हणताय त्यावरच पोस्टमध्ये भाष्य केलेले आहे. तुमच्या लक्षात कसे आले नाही याचे आश्चर्य वाटते.
रैना यांच्या कमेंटबद्दल काय लिहिले आहे ते माझ्या लक्षात आले नाही. माझ्या द्र्ष्टीने त्यांची कमेंट योग्य आहे. मी केवळ स्त्रियांची परंपरागत गुलामी या अनुष्गाने लिहिले आहे. त्यांनी उल्लेख केलेला रासायनिक तत्वांचा मुद्दा अगदी योग्य आहे. शिवाय या रसायनांचा त्वचेवर व शरीरावर होणारा विपरित परिणाम हाही मुद्दा महत्त्वाचा आहे.
रतीब याचा कोणता अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे माहित नाही.

मुळात सुंदर दिसण्याच्या ज्या कल्पना प्रचलित आहेत त्या पुरुषांनी व आता कॉस्मेटिक्सच्या कंपन्यांनी स्त्रियांवर लादलेल्या आहेत.
स्त्रिया त्यालाच आपले स्वातंत्र्य समजून त्याच्या आहारी जातात हा मुद्दा आहे.
अलीकडे या कल्पना पुरुषांच्याही गळी उतरवण्याचा प्रकार चालू आहे. पण तो मुद्दा वेगळा.

कुलकर्णी,

तुमच्या ह्या विधानाबाबतः

>>>स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा मारणा-यांपैकी किती स्त्रियांची या पुरूषांनीच त्यांच्यावर लादलेल्या बंधनातून सुटका करून घेण्याची खरोखर इच्छा असते? <<<

किती स्त्रियांची इच्छा असते हाच प्रश्न का विचारला जातो? किती पुरुषांकडून ह्या बाबतीत काही खास प्रयत्न होतात असे एक पुरुष म्हणून तुम्हाला कधी विचारावेसे वाटले का?

मुळात सुंदर दिसण्याच्या ज्या कल्पना प्रचलित आहेत त्या पुरुषांनी व आता कॉस्मेटिक्सच्या कंपन्यांनी स्त्रियांवर लादलेल्या आहेत.
<<
कॉस्मेटिकवाले सोडा,
पण कोणतीही स्त्री/पुरुष/व्यक्ती बहुतांशी वेळा अपोझिट सेक्सला अ‍ॅट्रॅक्टिव्ह दिसावे यासाठीच धडपडत असते. तेव्हा स्त्रीला (एक लिंग) सुंदर केव्हा म्हणावे, याची कन्सेप्ट पुरुषी नजरेतून (अपोझिट लिंग) नाही तर काय एल्जीबीटी नजरियातून येईल कि क्वॉय? Light 1

रैना, हे पद्धतशीरमध्ये पूर्वेकडच्या देशात पसरवलेले लोण आहे.
९०स मध्ये अचानक पूर्वेकडच्या मुली मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स होऊ लागल्या, भारताच्याही.
मग अचानक कधी नव्हे ते काँप्लेक्शन , टॅन , ब्लीच असे काय काय शब्द अगदी सर्रास कानावर येऊ लागले.
आमच्या एम बी बीएस च्या वर्गात वेल ग्रूम्ड मुली अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या असत. बाकी सगळ्या अगदी साध्या. आज ११-१२ वीतल्या मुलीही आयब्रोज, लाईट मेकप करून ज्युनिअर कॉलेजला जातात.

एन डी टिव्हीवरचे 'बँड बाजा बाराती ' सारखे कार्यक्रम पूर्वी मी हौसेने बघायचे. त्यात लग्नं ठरल्याठरल्या चेहर्‍यावर छोटीशी कॉस्मेटीक सर्जरी किंवा ट्रीटमेंट, डेंटल ट्रीटमेंट , मेकप कसा करायचा असं सगळं असतं.
लग्नासाठी वगैरे लोक तीन महिने आधीपासून ब्युटी ट्रीटमेंट चालू करतात हल्ली. भारतातही.

कित्तीतरी शरीरातल्या गोष्टी ज्या अगदी नैसर्गिक असतात उदा. प्रेग्नन्सीनंतरचे काहीना येणारे स्ट्रेच मार्क्स. ते ही येऊ नयेत, आले तर दिसू नयेत, दिसले तर सर्जरी करून काढून टाका असले खुळचट प्रकार गरज नसलेल्या लोकांतही वाढू लागलेत.

कधी नै तो तुमच्या धाग्याचा विषयाशी सहमत.
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये.... इथे तर अ‍ॅड एजन्सीमार्फत (बहुसंख्य परदेशी) कंपन्यांची फौजच तुम्हाला झुकवायला उभी...... इतकी की त्या अन्निसवाल्यांनी जरा अक्कल चालविली, तर हिंदु धर्माने जितके नुकसात होत नाही त्यापेक्षा कितीतरी शेकडो पटींनी "कायदेशीररित्या" अंधविश्वास पसरवुन, सौंदर्याबद्दल्/दिसण्याबद्दल भिती घालून, इर्ष्या उत्पन्न करण्यास भाग पाडणार्‍या या प्रकारांबद्दल जर अन्निसवाले बोलते झाले... तर... जौद्यात, आत्याबाईला मिशा अस्त्या तर तिला काका म्हणले अस्ते.

>>>> काही दिवसात प्रत्येक घरात या क्रीमचा एक टब ठेवा आणि गोरे दिसावे म्हणून सगळे शरीरच त्यात डुंबवावे, अशा जाहिराती आल्या तरी आश्चर्य वाटायला नको <<<<
बायदिवे, आमच्यात याकरता "मृत्तीकास्नान"अस्ते बर्का..... म्हणजे अगदी चिखलाच्या डबक्यात डुकराप्रमाणे लोळायचे अन मग उन्हाला अंग वाळवत बसायचे. Proud

>>>मुळात सुंदर दिसण्याच्या ज्या कल्पना प्रचलित आहेत त्या पुरुषांनी व आता कॉस्मेटिक्सच्या कंपन्यांनी स्त्रियांवर लादलेल्या आहेत.
स्त्रिया त्यालाच आपले स्वातंत्र्य समजून त्याच्या आहारी जातात हा मुद्दा आहे.<<<

कुलकर्णी,

सौंदर्याचे निकष ठरले जाण्यात स्त्रीचाच सहभाग जास्त असण्याची शक्यता वाटते. स्त्रीला विचारशक्ती असते ह्याचा का विसर पडावा? एखाद्या स्त्रीला उपजतच असे वाटणार नाही का की आपण जे काय दिसतो आहोत त्यापेक्षा अधिक बरे कसे दिसू ह्यासाठीचे उपाय योजूयात? 'काय अवतार करून हिंडते' असे बाकीच्या बायकांनी बोलू नये म्हणून कित्येकदा स्त्रिया सोसायटीत खाली भाजी आणायला उतरतानाही व्यवस्थित आवरून उतरत असाव्यात. स्त्रीमधील ह्या भावनेचा कॉस्मेटिक्सवाल्यांनी व इतरांनी तुफान फायदा उचलला आहे व स्त्रीला काही प्रमाणात संभ्रमित केलेले आहे अशी शक्यता वाटते. पण तुमच्या हा वर कोट केलेला प्रतिसादातील मुद्दा मूळ लेखापेक्षा अधिक थेट वाटला व आवडला.

Pages