अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे जॉब बाहेर गेलेत तिथली लोक काही फार शिकलेली नाहित पण ती आपली कामे कंपनीला त्रास न देता करतात. >>

:). कारण ते असंघटित आहेत, तेथील कायदे व सत्ताधारी या कंपन्यांना धार्जिणे आहेत. नाहीतर इथले व तिथले यात काही फरक नाही. कामगार असंघटित असेल तर त्याची पिळवणूक होते. तोच युनियन मधे आला आणि कायदे समतोल असतील तर कंपन्यांच्या डोक्यावर बसतो. हे जागतिक सत्य आहे.

याचा त्यातल्या त्यात बॅलन्स मी फक्त पुण्यात टाटा मोटर्स मधे (पूर्वीची टेल्को) अगदी जवळून पाहिलेला आहे. तेथील कामगार संघटित होता/आहे. ९० च्या दशकात इतर स्थानिक कंपन्यांतील कामगारांपेक्षा टेल्को तील कामगारांना चांगला पगार व इतर सोयी होत्या. पण त्याचबरोबर कंपनी पॉलिसीज ना युनियन्स डोईजड होत नसत. लोक लोकल मॅनेजमेण्ट ला शिव्या घालत पण 'टाटा' बद्दल आदर होता - जे आर डी टाटा जेव्हा भेट द्यायला आले तेव्हा तो मी बघितलेला आहे. तसेच आधीच्या दशकातील मूळगावकर वगैरे लोकांबद्दलही. आता कसे आहे माहीत नाही.

स्वाती२ चांगल्या पोस्टी.
पण >>निव्वळ फायद्यासाठी इथून कंपनी मेक्सिकोत आणि इतरत्र हलवणे आणि नंतर तो माल इथे आणणे याला माझाही विरोध आहे. >> हे विधान मात्र सरसकट पटलं नाही. योग्य balance हवा, फक्त योग्य म्हणजे किती इज मिडॉक्वे. लो पेईग प्रोडक्शन बाहेर जाऊन हाय पेईग सर्विस येणं हे प्रगतीचं लक्षण मानतात. पण पूर्वीच्या स्कीलसेट लोकांनी नवी स्कील शिकली नाहीत तर ते मागे पडणार आणि ते मतदार स्विंग स्टेट मध्ये असल्याने चाकं उलटी फिरवणाऱ्याला मत देणार.

बाकी धनिशी सहमत. हेच स्टील वापरा, इथेच आणि हेच काम करा हे रिपब्लिकन प्रेसिडेंट करतो म्हणजे वर्स्ट ऑफ बोथ साईड झालं. कठीण आहे.

अमितव म्हणूनच निव्वळ फायदा असे लिहिलेय. कुठलाही व्यवसाय हा प्रॉफिटसाठीच केला जातो. पण प्रॉफिट वेगळा आणि ग्रीड वेगळी. मी ग्रीड या अर्थाने बोलतेय. काहीवेळा कामगारांचे पगार एवढेच कारण नसते तर इथली इतर सेफ्टी, पर्यावरण वगैरे रेग्युलेशन्स देखील नको असतात.

या शतकातील पहिल्या सोळा वर्षात रिपब्लिकन नि डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांचे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले. काँग्रेस मधे सुद्धा आलटून पालटून दोन्ही पक्ष बहुमतात होते. उगाच बदल नको म्हणून गेली २४ वर्षे तीन माणसांना प्रत्येकी आठ वर्षे राहू दिले त्या पदावर.
तरी जनतेमधे समाधान नाही.
म्हणून "बाहेरचा " माणूस. त्याच्याबद्दल कितीहि वाईट ऐकू आले तरी त्यालाच निवडून दिले - बहुमताने नाही तरी जी काय घटनात्मक पद्धत आहे त्या पद्धतीने.
मग करू दे ना त्याला काय करायचे ते - सुरुवातीला नाहीच आवडत बदल कुणाला - पण निदान दोन वर्षे तरी तरी थांबून बघा काही प्रगति आहे का? घटना चार वर्षे देते एका राष्ट्राध्यक्षाला - अहो सोळा हून अधिक वर्षापासून चालत आलेल्या पद्धति एकदम कशा बदलतील?

तर आता जर नवीन राष्ट्राध्यक्षांनाहि विरोध करून यशस्वी होऊ दिले नाही तर कुणाला बोलवायचे राज्य करायला? पुटिनला का चिनि माणसाला का कुणा आयातोल्ला ला?

आय ति मध्ले जोब्स सोदा अनि बोर्देर वर चला भिन्त बन्धयला ...
खूप मोथि बोर्देर आहे , मोथि भिन्त बन्धयच प्लन आहे ककन्चा...५ वर्शे जोब गेरेन्ति ....

>>पण निदान दोन वर्षे तरी तरी थांबून बघा काही प्रगति आहे का? घटना चार वर्षे देते एका राष्ट्राध्यक्षाला <<

नंद्याशेट, पासवर्ड बदला माबो आय्डिचा - अकाउंट हॅक झालेलं आहे... Wink

नंद्याशेट, पासवर्ड बदला माबो आय्डिचा - अकाउंट हॅक झालेलं आहे... Wink
Happy तसे काही नाही हो. हे मीच लिहीले.
तसे ट्रंप या व्यक्तीबद्दल नि त्याच्या sycophant चमच्यांबद्दल मला नितांत घृणा आहे. पण आता झाला ना तो राष्ट्राध्यक्ष? मग? त्याच्याशी भांडून काय होणार? तो नको, मान्य आहे. पण इतर कुणि निवडणूक लढवून निवडून येण्याचे कौशल्य दाखवले का? का नाही? नसेल जमत तर मुकाट्याने झाले ते मान्य करा.

खरे तर या अमेरिकेची घटना, इलेक्टोरल कॉलेज, यांचा पुनर्विचार व्हायला पाहिजे.
सोशल सेक्युरिटी, वेलफेअर, मेडिकेअर यांचा इतिहास पाहिला तर त्या वेळच्या नि आजच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे. हा फरक हळू हळू झाला, पण त्याकडे जसे लक्ष द्यायला पाहिजे होते तसे देण्यात आले नाही.

माझ्यापेक्षा जाणकार लोक इथे आहेत त्यांना जास्त विषद करून सांगायला नकोच.

>> नसेल जमत तर मुकाट्याने झाले ते मान्य करा<<
ये हुईना बात! पण काय आहे ना, तेव्हढी मचुरीटि, विज्डम सो काॅल्ड लिबरल्स, डेम्सना नाहि. तेंव्हा त्यांची हि सर्कस थोडेदिवस बघणं आपल्या नशीबात आहे... Happy

एन्रिके पिन न्याटोशी तासभर फोनवर बोलल्यावर आता ट्रंप वॉल बद्दल पब्लिकली बोलणार नाहीये. ट्विटरपण लिहिणं पब्लिक बोलणं समजतात हे सांगा त्याला, अर्थात तोंडावर पडला तरी कॉनवे बाई आणि शेंन बरोबर अर्थ काढून आम्हाला सांगतीलच.

तर आता अमेरिकन निवडणुकी नंतर असा धागा काढा!

काय आहे, पूर्वी निवडणुकीत निवडून आलेले लोक सभ्य, सुसंस्कृत, जबाबदारीची जाणीव असणारे होते. आपल्या प्रत्येक शब्दाकडे जग लक्ष ठेवून आहे याची जाणीव होती त्यांना .
आता मात्र .....
काहीहि अतिशयोक्ति करावी, धडधडीत खोटे सांगावे, कुणाचाहि अपमान करावा नि चमच्यांना त्याचे स्पष्टीकरण द्यायला लावावे. कुणि टीव्ही वर काही बोलले, वर्तमानपत्रात लिहीले तर त्याला विरोधी पक्ष म्हणावे.
हे सगळे आता "राज"मान्य झाले आहे.
तर अश्या नवीन युगात फक्त ट्रंपचे गोडवे गाणारा धागा काढा!
(अगदी विनोदी लेखनमधेच, लै विनोदी होईल राव, - पण जपून, मागे भारतीयांविरुद्ध लिहील्याबद्दल एका आयडी ला जबरदस्त ताकीद दिली मायबोली च्या चालकांनी. आता मायबोली च्या चालकांच्या आधीच इथले लोक ट्रंपला सांगून आपल्याला जेल मधे किंवा परत भारतात पाठवतील! )

छे हो अदिती, इकडे लोकांना तेवढा वेळ नसतो, सुपरिणाम/दुष्परिणाम वगैरे पाहायला आणि लिहायला आणि भांडायला, ते काम ते लोक out source करतात Wink

कॉमेडी शो चा नवीन एपिसोड. फॉक्स न्यूज ने स्वीडन चा डिफेन्स एक्स्पर्ट आणि नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅड्व्हायजर म्हणून एकाची मुलाखत घेतली. तुम्हाला प्रचंड आश्चर्य वाटेल पण फॉक्स च्या मुलाखतीत त्याने ट्रम्पची बाजू घेतली Proud
http://money.cnn.com/2017/02/27/media/fox-news-guest-sweden-bill-oreilly...

मग आज खुद्द स्वीडन ने खुलासा केला की त्यांना हा माणूसच माहिती नाही. आता बहुधा स्वीडन चा अधिकृत प्रवक्ताच खोटे बोलतोय अशी घोषणा होईल.

फा, काही फरक पडणार नाही. कारण फॉक्स न्युज बघणारे अजून काही इतर बघत नाहीत, त्यांच्या फेसबुकावर ब्राइटबार्टचे फीड येनार. त्यांना हे कळणारच नाही की हा माणुस फेक होता

हो फॉक्स ने खुलासा केलाय की त्यांनी "अनेकांना विचारून खात्री केली". ते अनेक म्हणजे ब्राइटबार्ट, नॅशनल रिव्यू वगैरे असणार.

फा, Happy

तो मायलो य्यानोपोलस (?) बिल मार च्या शो मध्ये पहिल्यांदा बघितला. बाकी काहिही असो, ओरेटरी स्किल्स मात्र प्रचन्ड चन्ट वाटले मला त्याचे.

ट्रंप प्रेसिडेंसीवर "जागता पहारा" ठेवणारे लवकरच ट्रंप-रशिया कनेक्शनचे सगळे धागेदोरे उजेडात आणतील अशी आशा करुया... Lol

तेथे हिलरीच्या इमेल च्या वेळची स्क्रिप्ट होती तीच चालू आहे. आरोप करणारे वेगळे आणि तो डिसमिस करणारे वेगळे, त्यामुळे काहीतरी गडबड आहे असा कायम संशय असणारे वेगळे. कथा तीच Happy

काल ऑस्कर बघू शकलो नाही. त्यात अध्यक्षीय निवडणुकीच्या खर्‍या विजेत्याचे नाव वाचून दाखवले म्हणे!

>>काल ऑस्कर बघू शकलो नाही<<

बंच आॅफ हिपोक्रिट्स! इराणच्या डायरेक्टरचं वाचुन दाखवलेलं भाषण म्हणजे हिपोक्रसीची परिसीमा. आणि शेवटचा बेस्ट पिक्चरचा मिक्सप तर क्लिनप आॅन आयल २... Happy

ग्लोबल वॉर्मिंग हे एक थोतांड आहे का हो?
अध्यक्ष महोदयांचे टॅक्स रेकॉर्ड जाहीर करणे वाईट आहे का हो?
ACA ला रद्दबादल करुन नवीन प्लान (ज्याचा मसुदा जानेवारी मध्ये तयार होता) कधी अस्तित्वात येणार हो?
मेक्सिकोची भिंत कधी बांधणार हो?
बेकायदा स्थलांतरीत झालेल्या लोकांबरोबर कायदेशीर मार्गाने आलेल्या पण गौर वर्ण नसलेल्या लोकांना पण बाहेरचा रस्ता दाखवणार का हो?

गेल्या आठवड्यात आमच्या कॅन्सास सिटी मधे दोन लिगल भारतिय इंजिनिअर्सवर हल्ला झाला...ट्रंप सपोर्टर कडुन्..एकाचा मृत्यु... खुनी त्यांना गोळी मारण्याचा आधी म्हणाला... गेट आउट ऑफ माय कंट्री.. आता हे ट्रंप जी अँटी इमिग्रेशन ची भाषा वापरत आहे त्यामुळे के के के विचाराचे त्याचे बहुतेक पाठिराखे असे मर्डर करायला मोकळे झाले आहेत. त्यामुळे इतर भारतियांनी पण अश्या ट्रंपनी चिनखवलेल्या खुनी प्रवृत्तीच्या त्याच्या समर्थक खुन्यांना सामोरे जायची तयारी ठेवावी काय? एक प्रश्न...

== खुनी त्यांना गोळी मारण्याचा आधी म्हणाला... गेट आउट ऑफ माय कंट्री.. आता हे ट्रंप जी अँटी इमिग्रेशन ची भाषा वापरत आहे त्यामुळे के के के विचाराचे त्याचे बहुतेक पाठिराखे असे मर्डर करायला मोकळे झाले आहेत.
==
आता ट्रंपने त्या माथेफिरुला सुपारी देऊन दोन देशी लोकांचा काटा काढायला सांगितले एवढेच म्हणणे बाकी आहे. ट्रंपने कुणाला गेट आउट ऑफ माय कंट्री म्हटले? जे बेकायदा घुसलेले आहेत आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांना हाकलून देणे हे ह्या खुनाच्या तोडीचे कृत्य आहे का? तसे असेल तर ओबामाचे अतिरेकी मुस्लिम लांगूलचालन हे सॅन बर्नार्डिनोच्या अतिरेकी जोडप्याला स्फूर्तीदायक वाटले आणि म्हणून त्यांनी ते कृत्य केले आणि म्हणून त्याला ओबामा जबाबदार म्हणायचे काय? ओबामाने बेकायदा घुसखोरांची पाठराखण केली त्यामुळे काही बेकायदा घुसखोरांना नवा हुरूप आला आणि त्यातील एका हलकटाने केट स्टाईनली ह्या निरपराध बाईला गोळ्या घालून मारले म्हणून त्यालाही ओबामा जबाबदार धरायचा का?

तो जो कुणी माथेफिरू कॅन्ससमधे हिंसाचार करता झाला त्याला ट्रंपमुळे फुस मिळाली किंवा कसे हे अद्याप उघडकीस आलेले नाही. ट्रंपने त्याला पाठिशी घालण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही. एक दोन वर्षात तो मारेकरी फासावर लटकेल असे मला वाटते. त्यामुळे केवळ नावडता आहे म्हणून ट्रंपला ह्याकरता जबाबदार ठरवणे अतिरेकी वाटते.

ट्रंपच्या पाठिराख्यात किती के के के चे आहेत आणि त्यातील किती लोक तळहातावर शीर घेऊन कुठल्याही भारतीय माणसाला ठार करायला उत्सुक आहेत ह्याची माहिती असेल तर जरूर कळवा.

मुकंद पहिल्याचवेळी मला तुमचा प्रतिसाद अतिरेकी वाटला. बहुदा तुमच्या एरियात हा प्रकार झाल्यामुळे असेल. शेंडेनक्षत्र यांचे उत्तर आवडले. ते आणि राज ज्या पद्धतीने येथे ट्रम्प यांची साईड लावुन धरतात ते खरच कौतुकास्पद आहे. भले त्यांचे विचार पटत नसतील.

एकीकडे एक भारतीयाला गोळ्या झाडून ठार मारले काय जाते
दुसरी कडे त्याच विचारसरणीला पाठिंबा देणारा दुसरा भारतीय निर्माण होतो.
संबंध पोस्टीमधे साधा निषेध नोंदवता आला नाही. इतकी ट्रंप भक्ती? मानले बुवा.

>>येथे ट्रम्प यांची साईड लावुन धरतात ते खरच कौतुकास्पद आहे<<

कौतुकास्पद वगैरे काहि नाहि हो, जस्ट काॅलिंग स्पेड ए स्पेड, चांगल्या अर्थाने. ट्रंप काहि महान आत्मा वगैरे नाहि, त्याच्यात हि त्रुटि आहेत पण सद्यपरिस्थितीत त्याच्यासारखंच नेत्रुत्व आवश्यक आहे. राजकिय नेते आश्वासनांपासुन घुमजाव करण्यात पटाईत असतात; ट्रंपने आत्तापर्यंत तरी तो पायंडा मोडलेला आहे, कदाचीत तो "बाहेरचा" असल्याने असु शकेल. काल त्याने काॅंग्रेस समोर केलेलं भाषण आणि त्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनने आखलेली दिशा, धोरणं अंमलात आणली गेली तर एक कार्यकुशल अध्यक्श म्हणुन ईतिहास त्याची नोंद घेईल...

Pages