अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

software engineer detailed at JFK and given a test to prove he is an engineer << नेक्स्ट टाईम घरी परतण्याच्या तयारीत भारतात शॉपिंग बरोबरच इन्टर्व्यु साठी ची तयारी करायला विसरु नका... आणि विकी मधुन अभ्यास करा.

'शक्ती' चित्रपटात एक सीन आहे. दिलीप कुमार अमिताभ ला अमिताभ पोलिस कस्टडीत असताना भेटायला जातो. तेथे म्हणतो की "आज मै तुमसे एक पिता की हैसियत से नहीं, एक पुलिस इन्स्पेक्टर की हैसियत से बात करने आया हूँ". त्यावर बच्चन म्हणतो "कौनसी नयी बात है, आपने मुझसे हमेशा एक पुलिस इन्स्पेक्टर की हैसियत से ही बात की है"

आजचा जेफ सेशन्स बद्दलचा वाद वाचून ही सलीम जावेद ने फेमस केलेली 'हैसियत' आठवली. त्याची अॅटर्नी जनरल म्हणून निवड होण्यासाठी होत असलेल्या सिनेट कन्फर्मेशन हिअरिंग्ज मधे त्याला विचारण्यात आले होते रशियाशी तो किंवा ट्रम्प कॅम्पेन मधले इतर कोणी बोलल्याबद्दल. तेव्हा त्याने तो स्वतः अजिबात बोलला नाही असे उत्तर दिले होते. आता निष्पन्न झाले की तो सिनेट (आर्म्ड सर्विसेस) कमिटी मधे होता व त्याच्या रशियन डिप्लोमॅट्स बरोबर एक दोन दा मीटिंग याच काळात झाल्या होत्या.

यात गोंधळ असा आहे की तो प्रश्न "मुळात रशियाशी बोलण्याबद्दल" होता "की ट्रम्प च्या कॅम्पेन मधल्या सहभागाशी संबंधित बोलण्याबद्दल" होता. म्हणजे कॅम्पेन सरोगेट की हैसियत से, की सिनेट कमिटी की हैसियत से. शॉन स्पाइसर व सेशन्स च्या समर्थकांचे म्हणणे ऑब्व्हियसली असे आहे की तो प्रश्न कॅम्पेन बद्दल होता. याउलट विरोधकांचा आरोप आहे की तो सिनेट समोर खोटे बोलला.

ही ती क्लिप. बघा व "ज्याचे त्याने ठरवा" - की प्रश्न कॅम्पेन संदर्भात होता की जनरल प्रश्न होता Happy
https://www.youtube.com/watch?v=2BpgHcanjCQ

जेफ सेशन्सनी जाहिर केलं आहे कि या प्रकरणाबाबतच्या पुढिल चौकशीत ते सहभाग/ढवळाढवळ करणार नाहित. विश सिमीलर जेश्चर वाज शोन बाय लोरेटा लिंच आफ्टर मिटिंग बिल क्लिंटन आॅन टारमॅक... Happy

डेम्स/लिबरल्स यांनी व्हाइट हाऊस (ट्रंप ॲडमिनीस्ट्रेशन) शी संबंधीत प्रत्येक दोर, सुतळ, धाग्याला साप-साप म्हणुन धोपटुन, स्वत:चंच हसु करुन घेणं, हे थांबवण्याची वेळ आलेली आहे...

यस योग्य निर्णय. रेक्युज करण्याचा.

हे थांबवण्याची वेळ आलेली आहे >> ते हे करणार नाहीत. पॅटर्न ऑलरेडी सेट झालेला आहे हिलरीच्या इमेल्स च्या वेळेस. तेव्हा ते ओरडत होते, आता हे ओरडतील. त्यात हे अ‍ॅडमिनिस्ट्रेशन भरपूर खाद्य पुरवत आहेत. पहिल्यांदा फ्लिन आणि आता सेशन्स.

राज, हसु केलं का नाही हे कळायला चौकशी पर्यंत थांबा की! एक ती सिनेट बायपार्टीसन, आता एफबीआय ... रशिया गोंधळ काही संपत नाही.

>>राज, हसु केलं का नाही हे कळायला चौकशी पर्यंत थांबा की!<<

अरे हि चौकशी पुर्विच्या रशियन हस्तक्शेप, ट्रॅप - रशीयन होर्स कनेक्शन इ. याच मार्गावर चाललेली आहे... Happy

इन एनीकेस, धिस इज इदर ए विचहंट आॅर ए वाइल्ड गुझ चेज; अटर वेस्ट आॅफ टॅक्स डालर्स...

अरे कसलं डोंबलाचं खाद्य पुरवतायत? >>> डोंबलाचं? एक आख्खा नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅडव्हायजर ज्यावरून २०-२५ दिवसांत पदच्युत होतो. तर दुसरा अ‍ॅटर्नी जनरल शपथेवर बोलताना गोंधळ करतो. हे खाद्य नाहीतर काय आहे.

http://www.business-standard.com/article/current-affairs/wife-of-slain-i...

आय मिन सिरियसली? या अशा परिस्थितीत तिला वर्क विसाची काळजी आहे? फारच प्रॅक्टिकल व्यक्ती आहे. अमेरिकेतच कायम राहावसं वाटणं - नवरा जिवंत असो वा नसो- यात चूक काहीच नाही पण आधी तिने जे बोललं होतं की मला आधीपासूनच असुरक्षित वाटत होतं, असं काही होईल अशी भीती होती- ते सगळं असूनही आता फ्युनरल झाल्या झाल्या लग्गेच ती विसा मिळवण्याच्या मागे आहे- हे दुटप्पी वाटतं.

ते सगळं असूनही आता फ्युनरल झाल्या झाल्या लग्गेच ती विसा मिळवण्याच्या मागे आहे- हे दुटप्पी वाटतं. >>> मी वाचलं त्यावरून मला तिला परत अमेरिकेत येता येइल का याची काळजी आहे, ती बरोबरच आहे की.

भीती आधीही वाटत असेल, आणि तरीही अमेरिकेतच राहायचे असेल, it's her call. किंबहुना अमेरिकेतच राहायचे असेल म्हणूनच ती भीती जास्त आहे.

होपफुली अमेरिकन इमिग्रेशन वाले स्पेशल केस धरून काहीतरी करतील.

मला नाही दुटप्पी वाटत. किती झाले तरी व्यवहार हा आहेच ना! नवर्‍याच्या एच१ वर तिचा एच४ होता. कायद्यातील नव्या तरतुदीनुसार ती एच४ वर नोकरी करत होती. आता नवर्‍याचे निधन झाल्यावर तिच्या एच४ ला अर्थ नाही. फ्युनरलसाठी देशात परतल्यावर इथे व्यवहार पूर्ण करायला परत यायचे म्हटले तर स्टेट्स काय? इथे घर घेतलेले, कारचे लोन आणि इतरही आर्थिक व्यवहार असणार. सगळे मार्गी लावायला वेळ लागणारच ना. काळजी वाटणे साहाजिक आहे. स्वतःचा एच१ करुन इथे नोकरी करुन सगळे व्यवहार मार्गी लावावे असा विचार केला , त्या दृष्टीने प्रयत्न केले तर तर काय चूक?

असा प्रॉब्लेम जर एच १ वाला नॉर्मल सर्कमट्न्स मधे वारला असता तरीही आला असता ना? त्या केस मधे कायद्याने काय प्रोव्हीजन आहे?

मैत्रेयीचा प्रतिसाद कशाला उद्देशून आहे कळले नाही पण सनव यांनी जे लिहीले तिथून पुढच्याचा अमेरिकन निवडणुकांशी काय संबंध आहे हे कळले नाही. मुळात २० जानेवारीनंतर निवडणूक प्रकरण संपले. आता राजकारण. तेंव्हा या धाग्यावर लोक का लिहीतात? दुसरा धागा आहे ना अमेरिकेतील राजकारणावर?

स्वाती२ शी सहमत.... प्रत्येक जण जगण्यासाठी धडपड करत असतो. आणि त्यात तिचे काही चुकले असे वाटत नाही.
बातम्यात वाचल्यानुसार त्या बाईचा प्रेमविवाह झाला होता आणि तिचे जवळचे नातेवाईक हे संकट कसे घेत असतिल ह्याबद्दल आपल्याला काही कल्पना नाही. कदाचित तिला अमेरिकेतच कंफर्ट वाटत असेल. शेवटी हे तिचे खाजगी आयुष्य आहे.

>>आता राजकारण. तेंव्हा या धाग्यावर लोक का लिहीतात? दुसरा धागा आहे ना अमेरिकेतील राजकारणावर?<<

नंद्या४३शेटशी सहमत. ॲडमीन, प्लीज ये धागेको लाॅक किया जाय...

Pages