अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>== १. इकॉनॉमी गाळात गेलेली पुन्हा पीक वर आणली,<<

हे वरचं स्टेटमेंट "आल्टरनेटिव फॅक्ट्स" मध्ये मोडतं का?.. Wink

अमेरीकन जीडीपीचा ग्रोथ रेट १.५% आहे/होता, लोएस्ट अंडर एनी प्रेसिडेंट धस फार...

नुसता जीडीपी ग्रोथ रेट मोजणे योग्य नाही. अनएम्पॉयमेंट रेट १०% वरुन ४.६% गेला, घरांच्या किंमतीही पुन्हा वाढल्या हे देखील लक्षात घ्यायला हवे. मात्र ही रिकव्हरी होताना बरेचजण मागे पडले. या मागे पडलेल्या लोकांना आशा आहे की ट्रंप च्या कारकिर्दीत त्यांचीही परीस्थीती सुधारेल. यातील बर्‍याच जणांना स्पेशलाईज्ड स्किल्स नसल्याने रिकव्हरीत नोकर्‍या मिळाल्या नाहित. कंपन्यांनी कामगारांना नव्याने ट्रेनिंग देण्यासाठी काही गुंतवणूक केली तर हे काही प्रमाणात बदलेत मात्र त्याच वेळी बर्‍याच कामगारांचीही नव्याने शिकायची तयारी नसते ही दुसरी बाजू. ही अशी माणसे माझ्या आजूबाजूला राहातात. आजही त्यांना पूर्वीच्याच पद्धतीने जगायचेय पण त्याचवेळी वालमार्टातला आयात केलेला स्वस्त मालही हवाय.

>>अनएम्पॉयमेंट रेट १०% वरुन ४.६% गेला,<<
अनएम्प्लाॅयमेंट रेट कसा काढतात हे वाचलंत तर तो बेरोजगारीचं वास्तववादि चित्र उभं करतो का, हा प्रश्न पडतो...

तो रेट काढताना वापरलेली पद्धत पूर्वी (१० टक्के असताना) आणि आता (४% झाल्यावर) सेम आहे ना? मग अगदी आयाडींअल चित्र नसेल तरी खूपच प्रगतीच आहे.

>> आजही त्यांना पूर्वीच्याच पद्धतीने जगायचेय पण त्याचवेळी वालमार्टातला आयात केलेला स्वस्त मालही हवाय.

Happy

स्वाती२, मस्त.

>>== १. इकॉनॉमी गाळात गेलेली पुन्हा पीक वर आणली,<<

हे वरचं स्टेटमेंट "आल्टरनेटिव फॅक्ट्स" मध्ये मोडतं का?.. Wink >>> मै कब बोला? माझा ओपिनियन आहे तो.

२००८ साली सर्वसाधारण अवस्था काय होती व आत्ता काय आहे इतके ढोबळ बघितले तरी बास आहे. नाहीतर तसे इकॉनॉमी मधे एक फेवरेबल नं धरून त्या बाजूने किंवा एक अनफेवरेबल नं धरून त्या विरोधात असले वाद कधीच संपत नाहीत. तेव्हा हा माझा ओपिनियन आहे. नसेल मान्य तर नसेल.

आजही त्यांना पूर्वीच्याच पद्धतीने जगायचेय पण त्याचवेळी वालमार्टातला आयात केलेला स्वस्त मालही हवाय. >> हे खरे आहे. ही खोच अनेकांना कळत नाही.

मात्र बाकी पोस्ट मधला २००८ च्या नंतरच्या रिकव्हरीचा लोकांच्या मागे पडण्याशी संबंध समजला नाही - जे लोक मागे पडले आहेत ते आधीपासूनच आहेत. पूर्वी जसे मॅन्युफॅक्चरिंग मधे झाले तसे काही २००८ नंतर झालेले नाही - एका स्पेसिफिक स्किल चे लोक, एका स्पेसिफिक इण्डस्ट्रीचे लोक असे घाउक मागे पडलेले नाहीत.

>>२००८ साली सर्वसाधारण अवस्था काय होती व आत्ता काय आहे इतके ढोबळ बघितले तरी बास आहे. <<
एक (मायापिक) "ओपिनीयन" म्हणुन ठिक आहे पण कारकिर्दिचा आढावा घ्यायचा ठरवलं तर ओबामाच्या कारकिर्दिला अबिज्मल या व्यतिरिक्त दुसरा शब्द मला तरी सुचत नाहि. क्लिंटन साहेबांनी तशाच प्रकारच्या परिस्थितीत ग्रोथ रेट २ वरुन ४% वर नेउन ठेवला, याउलट ओबामांनी धाकल्या बुशच्या कारकिर्दितला २% रेट १.५% वर आणला - तरी मेरा ओबामा महान?.. Lol

फारेंड, २००८ नंतर जेव्हा हळूहळू रिकव्हरी सुरु झाली तेव्हा ज्यांच्याकडे असोशिएट डिग्री किंवा काही ट्रेडचे ट्रेनिंग जसे की वेल्डिंग होते त्यांना चांगल्या नोकर्‍या मिळाल्या पण त्याच वेळी बर्‍याच जणांकडे ट्रेडचे ट्रेनिंग नव्हते, हायस्कूल सोडून बराच काळ लोटल्याने पुन्हा शिकणे अवघड वाटणे/इच्छा नसणे होते. त्या लोकांना कमी पगाराच्या नोकर्‍यांवर समाधान मानावे लागले. एका स्पेसिफिक इंडस्ट्रीचे / स्किलचे लोकं मागे पडले असे मी म्हणतच नाहिये. कुठलीही इंडस्ट्री घेतली तरी मुळातच तंत्रज्ञान बदललयं. हायस्कूल नंतर नोकरी मिळाली तरी चार वर्षात असोशिएट डिग्री पूर्ण करा ही अट बर्‍याच ठिकाणी आहे. पण तसे करण्यापेक्षा ट्रंप अमेरीका ग्रेट करणार आहे आणि आपली स्थिती सुधारणार आहे हे स्वप्न पहाणे सोपे आहे.

८ वर्षे झाली. आता काय मायोपिक. इकॉनॉमी मधे ४ फेवर मधे तर ४ उलटे इण्डिकेटर कोणालाही सहज काढता येतात. सर्वसामान्य लोकांना जे भेडसावते ते सुधारले आहे का हे सर्वात प्राथमिक प्राधान्य आहे. त्याबाबतीत ही कारकीर्द यशस्वी आहे.

बाकी बाबतीत प्रत्येक मुद्द्यावर ओबामाला डिफेण्ड करण्यात मला इंटरेस्ट नाही. ट्रम्प ने काही त्यापेक्षा चांगले केले तर त्याची अ‍ॅक्नॉलेजमेण्ट करायला कोणतेही जुने बॅगेज मला रोखत नाही. तो निवडून आला आहे. त्याची कारकीर्द अमेरिकेकरता, जगाकरता यशस्वी होणे हेच सर्वांकरता चांगले आहे. त्यामुळे दर वेळी त्याचे अपयश शोधून काढण्यात मला काही इंटरेस्ट नाही.

पण ओबामाला 'डिसमिस' करताना त्याचे चांगले प्रयत्न ही तितकेच अ‍ॅक्नॉलेज केले जावेत.

स्वाती२ - मुद्दा लक्षात आला आता. मला असे म्हणायचे आहे की त्या अवस्थेशी रिकव्हरीचा काही संबंध नसावा. एक मोठा वर्ग मागे पडला आहे तो गेली अनेक वर्षे. त्यांना काही सकारात्मक व प्रत्यक्षात अमलात आणण्यासारखी दिशा देण्याऐवजी "ट्रम्प आता सगळे फिक्स करेल" हा आशावाद जास्त सोपा आहे 'विकायला' (ते 'स्वप्न पाहणे सोपे आहे' शी सहमत).

यातील मूलभूत प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाहीये. ना डेम्स ना रिपब्लिकन्स.

>>पण ओबामाला 'डिसमिस' करताना त्याचे चांगले प्रयत्न ही तितकेच अ‍ॅक्नॉलेज केले जावेत.<<

सहमत. फक्त "चांगले प्रयत्न" मेजर करण्याचे माझे इंडिकेटर्स तुमच्यापेक्शा "हाय" आहेत... Lol

==यातील बर्‍याच जणांना स्पेशलाईज्ड स्किल्स नसल्याने रिकव्हरीत नोकर्‍या मिळाल्या नाहित. कंपन्यांनी कामगारांना नव्याने ट्रेनिंग देण्यासाठी काही गुंतवणूक केली तर हे काही प्रमाणात बदलेत मात्र त्याच वेळी बर्‍याच कामगारांचीही नव्याने शिकायची तयारी नसते ही दुसरी बाजू. ही अशी माणसे माझ्या आजूबाजूला राहातात. आजही त्यांना पूर्वीच्याच पद्धतीने जगायचेय पण त्याचवेळी वालमार्टातला आयात केलेला स्वस्त मालही हवाय.
==
अत्यंत असहमत. अत्यंत सवंग उदाहरणे.
वॉलमार्टमधील स्वस्त माल हवा का उपजिविकेचे साधन हवे असे दोन पर्याय ठेवले तर केवळ डोकेफिरू माणूसच वॉलमार्टची मागणी करेल.
डेट्रॉईटमधे कारच्या कारखान्यात काम करणारे लोक हे कुशल यंत्रज्ञ नव्हते का? नक्कीच होते. पण युनियनबाजी आणि पेन्शनचा असह्य बोजा ह्यामुळे जनरल मोटर आणि ख्रायसलर सारख्या कंपन्यांचे कंबरडे मोडले.

तुम्ही खरोखर कुठल्या जनमतचाचणीचा आधार घेऊन सांगत आहात का की वॉलमार्टमधील स्वस्त टिनपाट मालाकरता श्रमिक अमेरिकन माणूस आपले उपजिविकेचे साधनही गमावायला तयार आहे? निव्वळ एक दोन लोकांना विचारुन आपले मत करणे ठीक नाही. मी अशी दोन चार लोक अशी दाखवेन ज्यांना वॉलमार्टमधील मेड इन चायना लिहिलेल्या तमाम गोष्टींचा तिटकारा आहे. पण हेही लोक सामान्यांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.
सरकारने परक्या मालाच्या आयातीला मुक्त परवानगी दिली. चीनमधे प्रदूषण कायदे, पर्यावरण कायदे धाब्यावर बसवले जातात ह्याकडे लक्ष न देता केवळ एकतर्फी करार करून त्यांना मोकळे रान दिले. लोकांचे काय होईल ह्याची पर्वा केली नाही आणि त्याची फळे लोकांना भोगायला लागत आहेत. अमेरिकेत रस्ट बेल्ट नामक मोठा प्रदेश बनला आहे जिथे एकेकाळी उद्योगधंद्याची भरभराट होत होती ती पार रयाला गेली आहे.

लोकच शिकत नाहीत म्हणून त्यांची वाट लागली असे वर म्हणून त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे संतापजनक आहे. अमेरिकेत असे भाग आहेत जिथे मेक्सिकन लोकांची बांधकाम क्षेत्रात रॅकेटे आहेत. त्या क्षेत्रात ते अन्य कुणाला येऊन देत नाहीत. आले तर अडवणूक, दमदाटी करून त्यांना पळवून लावतात. अशा लोकांनी कॅलिफोर्निया व अन्य आसपासच्या राज्यात आपले बस्तान बसवले आहे. बेकायदा घुसखोरांची भरती करुन त्यांची पिळवणूक करून भक्कम पैसा मिळवला आहे.

ओबामासारखा ज्याला निव्वळ ऊर्वरित जगाचेच भले करायचे आहे अमेरिका गेली खड्ड्यात असा दृष्टीकोन बाळगणार्‍या माणसाने अशा लोकांना दुर्लक्षित ठेवले आणि हिलरीने त्याचीच री ओढली म्हणून ती हरली.

==
कारण त्यांच्या प्रत्येक गोष्टींना तुम्ही अमेरिकेत बसुन समर्थन देत असतात,
आता ओबामाने कर्ज वाढवले तर तुमच्या डोळ्यात कसे खुपले बरे?
==
१. आपण अत्यंत बिनबुडाचे खोटारडे दावे करत आहात. मी मोदींच्या प्रत्येक गोष्टीला समर्थन देतो हा जावईशोध आपण कसा लावलात?
२. मी अमेरिकेत रहातो. अमेरिकेच्या डोक्यावर कर्ज असेल तर माझे, माझ्या मुलाबाळांचे भविष्य संकटात जाणार अशी मला भीती आहे. मला गुजराथेत कोण मुख्यमंत्री होता, त्याने गुजराथी लोकांच्या डोक्यावर किती कर्ज लादले ह्याचा माझ्याशी काहीही थेट संबंध नाही.
३. ह्या बीबीचा विषय हा अमेरिकन निवडणूका असा आहे. अमेरिकेचा नुकताच निवडून आलेला व नुकताच पदमुक्त झालेला राष्ट्रपती ह्यांचा विषयाशी बराच संबंध आहे. भारतातील कुठल्यातरी राज्याचा मुख्यमंत्री आणि त्याचे अर्थव्यवहार हा ह्या बीबीशी संबंधित विषय नाही. अगदी दुरूनही संबंधित नाही. तेव्हा आपल्याला ओबामा आणि मोदी ह्यांचा तौलनिक अभ्यास करणारा विषय सुरू करायचा असेल तर अन्य कुठल्यातरी व्यासपीठावर जाऊन करावे ही नम्र विनंती. इथल्या चर्चेला भरकटवण्याचा प्रयत्न करू नये. इतके दिवस इथे विषयाला धरून चर्चा होत आहे त्याला गालबोट लावायची गरज नाही.

शेंडे मग तुम्ही पण भारतातील बाबींवर नाक खुपसु नका. तुमचा संबंध नाही ते आता तुम्हीच जाहीर केले आहे. लक्षात असूद्या

ओबामा आता पर्यंतचा सर्वात चांगला आनि जवाबदार अध्यक्ष होता हे आता सगळे मान्य करतील. ट्रंम्प हे अमेरिकेला पडलेले ६ वर्षाचे दु:खद स्वप्न आहे. ६ वर्षात काय काय अमेरिकेचे उध्वस्त होईल हे देवालाच ठाऊक
गॉड सेव अमेरिका

शेंडेनक्षत्र,
मी मिडवेस्टमधल्या छोट्याशा गावात गेली २३ वर्षे रहात आहे. डेट्रॉइटबद्दल म्हणाल तर आटोमोटिव इंडस्ट्रीवरच घर चालत असल्याने यातले चढ उतार जवळून अनुभवलेत. जोडीला मी आर्थीक दृष्ट्या मागास वर्गातील मुलांसाठीच्या ट्वेन्टी फर्स्ट सेंचुरी स्कॉलर्स या प्रोग्रॅमसाठी फॅमिली सर्विसतर्फे व्हालेंटियर मेंटर म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे सामन्य लोकांत मिसळ्णे बोलणे हे होतेच. आजच्या काळात उपजीवीकेचे साधन हवे तर त्या जोडीला त्यासाठीचे शिक्षणही हवे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असाल तर हे शिक्षण फ्री मिळायची सोय आमच्या राज्यात आहे. तो प्रोग्रॅम तेव्हाचे गव्हर्नर बाय यांनी सुरु केलेला म्हणजे बराच जूना आहे. मात्र डिग्री पूर्ण करण्याचे प्रमाण फार कमी आहे. आत्ताच मेंटरिंग प्रोग्रॅममधली ओळखीची एक मुलगी तिसर्‍या वर्षी शिक्षण सोडले या स्टॅटचा भाग झाली. अशा केसेस भरपूर दिसतील. होंडाच्या प्लांटमधे वेड्यासारखा टर्नओवर आहे. एक्सपांनशन करताना पहिला प्रश्न हाच असतो की कुशल कामगार मिळतील का? नोकरी करताना पार्टटाईम शिकायची सोय आहे. कंपन्या खर्च देतात पण बर्‍याच जणांना शिकायचे नसते. बर्‍याच केसेस मधे आई-आजी मंडळी चे प्रयत्न असतात नातवंडानेने ट्रेड शिकावा म्हणून पण पुढे शिकायचेच नाहिये. ज्यांच्या कडे ट्रेड आहे त्यांच्या हाताला काम आहे. जॉब आहेत पण काम करायला क्वालिफाईड लोकं नाहित असे आहे. एकेकाळी हायस्कूल ड्रॉपआऊट असले तरी नोकर्‍या होत्या. अगदी ऑटोइंडस्ट्रीत होत्या. मात्र बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण गरजेचे आहे. अगदी हायस्कूल टेक्निकल ऑनर्स डिप्लोमा आणि पुढे नोकरी करत असोशिएट डिग्री केली तरी पुरेसे होईल पण .... रोल्स रॉइसचा नवा प्लांट हायटेक आहे. पगार चांगला आहे पण शिक्षण नाही म्हणून तिथे संधी नाही असे झाले. जे शिकायला तयार झाले त्यांना जुन्या प्लांटमधून तिथे बदली मिळाली.
लोकं खरेच वालमार्टात स्वस्त माल खरेदी करतात. उपजिविकेचे साधन इथले हवे तर मालही इथला खरेदी केला पाहीजे ना? तसे होत नाही. माल टिकावू नसला तरी घेतात . गेल्या २०-२२ वर्षात भरपूर स्थानिक उद्योग बंद झालेले बघितले. मेक्सिकन कंस्ट्रक्शन वर्कर्स हा प्रकार मी देखील पाहिलाय. गावात बाहेरच्या कुकीकटर बिल्डरने घरं बांधली तेव्हा गावात कुणालाच सब कॉन्टॅक्ट दिले नव्हते. सकाळी ट्रकात बसून कामगार यायचे आणि संध्याकाळी जायचे. पण त्याच वेळी गावातील कस्टम बिल्डर्सकडे लोकल कामगारांचा तुटवडा आहे हे ही तितकेच खरे आहे. लोकल पब्लिक ४ दिवस कामावर येते आणि पाचव्या दिवशी दांडी मारते/काम सोडते. माझ्याच घराचे काही काम रखडले आहे. कारण जो लोकल विश्वासू व्यावसायिक आहे त्याच्याकडे कामगारांचा तुटवडा. कालच तो येवून गेला. त्याला काळजी कामगारां अभावी हातातून काम जाईल का म्हणून. त्याला सांगितले की तू गावातला आहेस,तुझ्याकडे इलिगल कामगार नाहित म्हणून नेहमी तुला काम दिले, यापुढेही देइन. हे काम दुसर्‍याला देणार नाहिये.
निव्वळ फायद्यासाठी इथून कंपनी मेक्सिकोत आणि इतरत्र हलवणे आणि नंतर तो माल इथे आणणे याला माझाही विरोध आहे. परंतू त्याच वेळी कामगार म्हणून कौशल्य ही वाढायला हवे आहे हे कटू असले तरी सत्य आहे. यात मीठ चोळण्याचा प्रश्नच नाही. आम्ही या गावात रहायला आल्यापासून शिकाल तर तगाल हेच सांगतोय. नवरा देखील प्रसंगी खिशाला खार लावून मार्गदर्शन करतो. खरे तर स्थानिकांसाठी माफक खर्चात कोडिंग शिकवायचे प्रयत्न झाले तर आयटी जॉब स्थानिकही करु शकतील.

==शेंडे मग तुम्ही पण भारतातील बाबींवर नाक खुपसु नका. तुमचा संबंध नाही ते आता तुम्हीच जाहीर केले आहे. लक्षात असूद्या

आपल्याला मराठी समजण्यात अडचण आहे का? मी गुजराथशी संबंध नाही असे म्हटले आहे. गुजराथवरून पूर्ण भारतावर आपण उडी कशी घेता? आणि मला मतस्वातंत्र्य आहे. बीबीचा विषय असेल तर त्या विषयावर मत मांडण्याचा अधिकार मला आहे. आपण आपल्या पोकळ धमक्या बंद करा. हे ह्याविषयावरील शेवटचे पोस्ट.

वरच्या पोस्टबद्दल शें.न. यांना अनुमोदन.
दीपस्त - हे असलं ट्रोलिंग त्या तिकडे जाऊन करा तुमच्या आवडत्या हमरी तुमरी बाफांवर. इथे काही फायदा नाही. संबंध काय इथे भारतातल्या राजकारणाचा? इथे लिहायचेच तर अमेरिकन निवडणुकांबद्दल बोला.

>>खरे तर स्थानिकांसाठी माफक खर्चात कोडिंग शिकवायचे प्रयत्न झाले तर आयटी जॉब स्थानिकही करु शकतील.<<

१. वर कुठेतरी म्हणताय, लोकांना शिकायचंच नाहि (आळस भरलाय) मग हा उपक्रम यशस्वी कसा होईल? यापुर्वि काहि प्रयत्न झालेत का? नसल्यास का?
२. लोकल बिल्डर/काॅन्ट्रॅक्टर जो अनडाॅक्युमेंटेड लेबर कामावर ठेवत नाहि, त्याच्यावर ट्रंपच्या इमिग्रेशन पाॅलिसीचा काय/किती इंपॅक्ट होणार आहे?
३. डिट्राॅयट मधले जाॅब्स आॅटोमेशन, आउटसोर्सींग, लोकाॅस्ट लेबर मुळे गेले कि कुशल कामगार उपलब्ध नसल्याने?

याची उत्तरं सापडल्यावर नाफ्ता, टिपीपी ई. चर्चा टेबलावर घेउया...

शेंन - तुम्ही जो प्रॉब्लेम लिहीलेला आहे तो मार्केट फोर्सेस चा आहे. तुम्हाला तो दोष ओबामाच्या डोक्यावर टाकायचा असेल तर तुमचे मत. पण हा सगळा निक्सन-किसिंजर च्या जमान्यापासून एकाच दिशेने चाललेला प्रवाह आहे. सरकार कोणाचे ही असो.

त्याची उत्तरे सध्या कोणत्याच पार्टीकडे नाहीत. ट्रम्प कडे आहेत का बघू. तो कोणत्याही लॉबीच्या फंडिंग ने आलेला नसल्याने त्यांना बांधील नाही. पण मार्केट फोर्सेस च्या विरूद्ध जाउन कोणीही हे बदलू शकत नाही. आयसोलेशनिस्ट वगैरे अमेरिकेत होणे अवघड आहे.

समाजातील एका मोठ्या गटाला (किंबहुना अपवाद वगळले तर सर्वांनाच) आपल्याला जर गोष्टी स्वस्तात मिळत असतील तर त्याची सामाजिक किंमत काय आहे, समाजातील इतर लोक त्याकरता काय किंमत मोजतात याचा विचार पडत नाही. वॉलमार्ट, कॉस्टको, अ‍ॅमेझॉन, टारगेट, मेसीज वगैरे मोठ्या रिटेलर्स कडून जेव्हा चीन मधे, होंडुरास मधे वगैरे बनवलेला माल लोक विकत घेतात, तेव्हा आपल्या डाउनटाउन मधल्या स्थानिक विक्रेत्याचा धंदा याने बुडत आहे याची कल्पना असते, पण त्याकरता आपण त्या गोष्टीकरता जास्त पैसे द्यायची लोकांची तयारी नसते.

सगळी गोची इथे आहे. एकदा का परदेशात माल बनवून तो इथे स्वस्त विकायची संधी उपलब्ध आहे असे समजले, की त्याकरता प्रायव्हेट कंपन्या, त्यांच्या लॉब्या, राजकारणी हे सगळे एकत्र येउन त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण करतात. मग लोकांनाही वरकरणी त्यांच्या फायद्याचे असल्याने हे कमर्शियली चालते. हे मार्केट फोर्सेस कोणीही बदलू शकत नाही.

स्वाती२ काही गोष्टी पटल्या नाहित.
खास करुन निव्वळ फायद्यासाठी इथून कंपनी मेक्सिकोत आणि इतरत्र हलवणे आणि नंतर तो माल इथे आणणे याला माझाही विरोध आहे हे तर मुळीच पटले नाही.
ग्लोबलायजेशन मध्ये कंपन्याना जिथे कमी खर्चात उत्पादन होते तिथे घेउन जायचा हक्क आहे. तसेच तसेच देशात टॅलेट नसेल तर दुसर्या देशातुन आणन्याचा (by legal way ) हक्क आहे. कंपन्या भागधारकाना कायद्याचा चौकटीत राहुन जास्तीत जास्त नफा कसा देतिल यासाठी बांधिल आहेत.
मिडवेस्ट मधल्या आटोमोटिव इंडस्ट्री ची समस्या ही सरकारनी नाही तर युनियन च्या नादाला लागुन लोकानीच निर्माण केली आहे. जे जॉब ईडियाना , ओहायो मधुन बाहेर गेलेत त्याला पुर्णपणे युनियन जबाबदार आहे. जे जॉब बाहेर गेलेत तिथली लोक काही फार शिकलेली नाहित पण ती आपली कामे कंपनीला त्रास न देता करतात. मिडवेस्ट मधल्या आटोमोटिव इंडस्ट्री मध्ये २००८ पर्यंत कंपनीला कसे कायद्याचा चकाटीत पकडायचे , वारंवार संप करुन भरपुर पगार वाढ घ्यायची हेच युनियन चे काम होते. याच कारणामुळे सगळे जॉब बाहेर गेले. (मी १९९० पासुन २००८ पर्यन्त मिडवेस्ट मधल्या आटोमोटिव इंडस्ट्री साठी काम करत होतो. २००८ मध्ये कंपन्यानी दिवाळ्खोरी जाहिर केल्यावर कंपनी बदलली)
मिडवेस्ट मध्ये जर लोक जर sincerely काम करत असतिल तर सगळ्य जॉब परत येउ शकतात. या जॉब साठी हायस्कुल ड्रॉप पण चालतात. फक्त नवीन मशिन चालवण्यासाठी ट्रेनिंग आणि चिकाटी लागते प्रसंगी overtime करयाची तयारी लागते ती ह्या लोकाम्ध्ये नाही.

हे सगळे खुप भारी आहे !! म्हणजे रिप्स जे फ्री मार्केट , ग्लोबलायझेशन , लेस रिस्ट्रिक्शन च्या बाजूचे आहेत असे म्हणतात आता त्यांचा नेताच या सगळ्याच्या विरोधात आहे आणि काँग्रेस कुठल्या दिशेने जावे अशा द्विधा मनस्थितीत आहे असे वाटते. काही दिवसांनंतर डेम्स आणि रिप्स च्या आडियालॉजी मध्ये काहीच फरक जाणवणार नाही असे झाले तर happy0009.gif

हे एक ईंटरेस्टिंग वाटते

http://www.businessinsider.com/alibaba-jack-ma-davos-america-history-glo...

शेंडेनक्षत्र, आटोमेशन हे नुसते येत नाही त्याच्या जोडीला वेगळ्या कौशल्याचे लोकं लागताच ना? कमी कौशल्याच्या जागी वेगळे जॉब आले ते शिक्षणाने मिळू शकतील ना. डेट्रॉइइटमधे आत्ता जॉब मार्केट चांगले आहे. मात्र नुसत्या हायस्कूलवर चांगल्या जॉबची अपेक्षा ठेवणे हे वास्तवाला धरुन नाही.
शिकायचे नाही याचा अर्थ आळस भरलाय असे मी म्हटलेले नाही. हे तुम्ही काढलेले अनुमान. हायस्कूल जमेल तसे पूर्ण करायचे आणि फॅक्टरीत जॉब. तिथे ओवरटाईम करायची तयारी. पण हायस्कूल नंतर पुढे शिक्षण घेण्याकडे कल नाही. योग्य पद्धतीने अभ्यास करायची पण सवय असावी लागते. हे आपल्याला जमणार नाही असे वाटत असते. मी हायस्कूलच्या मुलांना मदत करताना ही विचारातली तफावत जवळून बघितली आहे. साधे सकाळी आणि संध्याकाळी रोज फक्त २० मिनीटे मॅथ आणि वोकॅबुलरीसाठी दिली तरी सॅट स्कोअर वाढेल हे पटवायला सुद्धा किती कठीण जाते ते मी प्रत्यक्ष अनुभवलेय. हायस्कूल ग्रॅड्युएशन रेट वाढवायला आमच्या गावाने खूप मेहनत घेतलेय. आता कॉलेज पूर्ण करण्यासाठी मेंटरिंग सुरु आहे. ४ एच, शाळेत रोबोटिक्स टीम यातून कोडींग आणि तत्सम गोष्टींसाठी प्रयत्न सुरु आहेत. पण त्याला वेळ लागणार ना? हे जमतेय, आवडतेय, यात शिक्षण घेता येइल हे नव्या मुलांना उमजेल तशी प्रगती होईल.
लोकल बिल्डर इलिगल लोकं ठेवत नाही. त्याच्यावर काय परीणाम होणार? त्याचा प्रॉब्लेम लोकल शिकावू/कुशल कामगार अभाव हा आहे. त्याचे पोट हातावर. माझ्याकडचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला पैसे नाहीत. माझे एवढेच म्हणणे आहे की काम शिकायची तयारी असेल तर त्याच्याकडे द्यायला नोकरी आहे.

साहिल ज्या काळात युनियनवाले जॉब बाहेत गेले त्याच काळात जपानी आटोमोटिव कंपन्यांमुळे नॉन युनियन जॉब आले. काही कंपन्यांनी युनियन बरोबर पेस्केल निगोशिएट केले आणि कमी पगारावर जॉब इथे ठेवले. काही वेळा युनियन ग्रीडी होती तर काही वेळा कंपन्यांनी देखील निव्वळ लोभीपणा केला.

Pages