अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानलं बाबा अमेरिकेला,
असे 5 लाखाच्या आसपास लोक जमून आम्हाला हा प्रेसिडेंट असल्याची लाज वाटते म्हणतात, देशभर कित्येक ठिकाणी हा प्रेसिडेंट नको म्हणून निदर्शने करतात, तरी त्यांना कोणी देशद्रोही म्हणून लेबल करत नाही, सरकार अटक करत नाही.
च्यायला इकडे माबो वर 1-2 फुटकळ मोदी विरोधक धागे काढले भक्त पिसाळतात Happy

अमेरिकेला काल 'आल्टरनेटिव्ह फॅक्ट्स' ही नवीन टर्म शिकायला मिळाली आहे. त्यांचे सत्य व आमचे सत्य अशी आजकाल दोन सत्ये असतात.

फा, Happy

केलीअ‍ॅन कॉनवे इज् अ टफ नट? Happy

"आल्टरनेटिव्ह फॅक्ट्स" ही कल्पना वरवर पहाता पोकळ वाटली तरी खालील उदाहरणे पहा
१. ९/११ चा हल्ला
अ. इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांनी अमेरिकेच्या द्वेषापोटी घडवून आणलेला भीषण अतिरेकी हल्ला.
ब. उन्मत्त अमेरिकेला धडा शिकवण्याकरता १९ बहादूर गाझी इस्लामच्या बंद्यांनी घडवून आणलेला नेत्रदीपक हल्ला.

२. ट्रंपचा निवडणूक विजय
अ. एका फासिस्ट, वर्णद्वेष्ट्या, स्त्रीद्वेष्ट्या, श्रीमंत माणसाने भावनेला हात घालून श्वेतवर्णीय मतदारांना घाबरवून मिळवलेला विजय.
ब. एका राजकारणातील नवख्या माणसाने जनमानसाची नस ओळखून, अचूक मुद्दे उचलून धरून, काळजीपूर्वक मोर्चेबांधणी करून, अमाप मेहनत करुन माध्यमे व अन्य वलयांकित लोकांच्या नाकावर टिच्चून मिळवलेला विजय.

अजून अनेक उदाहरणे देता येतील. तेव्हा सग़ळी वास्तवे ही सूर्य पूर्वेला उगवतो अशी वादातीत नसतात. (तसेही सूर्य कायम पूर्वेला उगवत नाहीच. काही काळ दक्षिणेकडे तर काही काळ उत्तरेकडे सरकतो. विषुववृत्ताचा अपवाद. पण ते जाऊ द्या!)

शेंन - वरती तुम्ही १ व २ च्या पुढे जी घटना लिहीली आहे, त्याच फक्त फॅक्ट्स आहेत. ती खालची वर्णने नव्हेत. त्या 'फॅक्ट्स' ज्या आहेत त्याला आल्टरनेटिव्ह फॅक्ट्स असू शकत नाहीत. डीसी मेट्रो मधून किती लोक आले - तो नंबर सब्जेक्टिवली बदलू शकत नाही.

त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ट्रम्प ला पिक युअर बॅटल्स सांगणारे कोणी निघाले नाही का. पहिलीच पत्रकार परिषद 'आमची गर्दी कमी नव्हती' इतक्या महत्त्वाच्या विषयावर?

बाकी एफसीसी वर भारतीय वंशाचा माणूस (अजित पै) आला म्हणून चांगले वाटले. पण तो म्हणे नेट न्युट्रॅलिटी च्या विरोधात आहे (आत्तापर्यंत तरी होता)

शेंडेनक्षत्र,

तुम्ही दिलेली उदाहरणे पहाता :
१) अ - मारले गेलेले मूलतत्त्ववादी = १९ ब - शहीद झालेले लोक = १९ त्यामुळे त्यात काहीच अल्टरनेट नाही
२ ) अ = ब काहीच अल्टरनेट नाही. जनमानसाची नस ही ८ वर्षे घाबरवून ठेवलेलीच होती. अगदी टी पार्टी पासून

आता जी अल्टरनेट फॅक्ट म्हणत आहेत ती म्हणजे सगळे फोटो - अगदी विजुअल एव्हिडन्स सांगतात की २००९ ला जास्ती लोक आले होते. ढळढळीत दिसते आहे फोटोंमधून. आणि तुम्ही म्हणता नाही २०१७ लाच जास्ती लोक आले होते. https://www.youtube.com/watch?v=ahh9kLmI7Cs

त्यामुळे तुम्ही दिलेली उदाहरणे या संदर्भात येत नाहीत. जरा बरोबर उदाहरणे शोधून आणा

अजीत पै साहब नेट नुट्रलिटी का बॅंड बजानेवाले है... >>> हो ना आधीच यु एस मध्ये खराब ब्रॉडबँड महाग आहे. आता अजून महाग होईल. होऊ द्या आम्ही देऊ जास्ती पैसे. किंवा मग माबो वापरणे बंद करू biggrin.gif

फा, धनि +१

फॅक्ट्स कधीही "ऑल्टरनेटिव्ह" असूच शकत नाहीत. तुम्ही कुठले फॅक्ट्स लक्षात घेताय आणि ते कसे इंटरप्रिट करता हे मात्र माणसागणिक बदलेल. (अशानेच स्टॅटिस्टिक्स चं नाव खराब होतं, इतकं की काही लोक त्याला सायन्स मानायला तयार नाहीत). Happy

आणि मुळात असल्या किरकोळ गोष्टीत (किती गर्दी जमली होती) एवढ्या हाय लेव्हल च्या लोकांनी पडायचेच कशाला?

ट्रम्प निवडून आल्यावर कॅम्पेन मधला आक्रमकपणा सोडून काही सेन्सिबल बोलला होता. इव्हन ते एथिक्स वॉचडॉग बद्दल त्याने रिपब्लिकन्स लोकांना चाप लावला होता. इथे सरळ 'हाय रोड' घेउन मोकळा होउ शकला असता. पण ट्रम्प सकट किमान ४ लोक गेले दोन तीन दिवस विविध मीडियाशी गर्दीबद्दल वाद घालत होते (केली अ‍ॅन कॉनवे, रिचर्ड प्रीबस आणि स्पायसर)

दोन तीन दिवस विविध मीडियाशी गर्दीबद्दल वाद घालत होते >> हो ना ! गर्दी चं काय घेऊन बसलाय मी हा चांगला निर्णय घेतला वगैरे बोलायला पाहिजे.

बाकी हा वाद सोडला तर पहिल्या पॉलिसी बदलांमधे 'ट्रम्प' चा स्टॅम्प दिसला का कोठे? पहिल्या काही बातम्या टीपिकल रिपब्लिकन पॉलिसीज दाखवत आहेत.

टीपिकल रिपब्लिकन पॉलिसीज दाखवत आहेत. >> सगळी टीम त्यांनीच भरलेली असल्याने काय वेगळे दिसणार आहे ? एक मात्र आहे , एसीए रिपील लगेच झाले नाही कारण ट्रंप ला रिपील आणि लगेच रिप्लेस पाहिजे आहे. आणि रिप्लेस करण्याकरता त्यांच्याकडे सध्यातरी काहीही नाही. जी काही आहे त्यामुळे मिलीयन्सना इंश्युरन्स पासून वंचीत रहावे लागेल आणि हे ट्रंपला चालणार नाहीये.

आताच त्याने कीस्टोन आणि डाकोटा अ‍ॅक्सेस ला परवानगी दिली. ( ही पण रिप पॉलिसीच आहे म्हणा)

>>आता अजून महाग होईल. होऊ द्या आम्ही देऊ जास्ती पैसे. <<

ब्रेड खराब असेल तर केक खा - हे लिहायचं राहिलं... Lol

बायदवे, नेट नुट्रलिटी बासनात गुंडाळली तर ब्राॅडबॅंड सेक्टर मध्ये हेल्दि कांपिटिशन येईल, मार्केटमध्ये तग धरुन राहण्याकरता ज्याचा फायदा अल्टिमेटली ग्राहकालाच होणार आहे. ऊदाहरणादाखल - गेल्या वर्षापर्यंत मी $८० देत होतो, ६० एम्बीपीएस (३०० गिग डेटा कॅप) करता आणि आता गेले वर्षभर $७० देतो, १ जीबीपीएस (अनलिमीटेड डेटा). ॲंड दि प्राईसवाॅर हॅज जस्ट बिगन... Proud

वीकेण्डला मी ऐकलेली ऐक मौलिक चर्चा. एक ट्रम्प विरोधक व एक ट्रम्प सपोर्टर. दोघेही इमिग्रण्ट्स. पहिला टर्कीश तर दुसरा चायनीज. त्यांना सोयीसाठी आपण डे व रि म्हणू.
डे: हे ट्रेड मधले बदल का चांगले आहेत?
रि: माहीत नाही
डे: मग ट्रम्प नक्की काय आणणार आहे बदल?
रि: माहीत नाही
डे: अरे पण त्याचा प्लॅन काय आहे मला सांग. माझा (स्टॉक) पोर्टफोलिओ त्याप्रमाणे बदलायचा आहे
रि: माहीत नाही
डे: त्याच्या पॉलिसीज मुळे माझे काही स्टॉक्स (प्राइस) कमीजास्त होणार आहेत. मला त्याची माहिती हवी आहे. ट्रम्प काय म्हणतोय ते मला त्याकरता समजून घ्यायचे आहे.
रि: तू कशाला लक्ष देतोस त्याच्याकडे. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू असे निर्णय घेउ नकोस.
डे: अरे आम्ही विरोधात होतो तेव्हा तूच म्हणायचास ट्रम्प हवा म्हणून. आम्हाला या पॉलिसीज माहीत नाहीत ठीक आहे. पण तुलाही काही माहीत नाही?
रि: मी ट्रम्प यावा म्हणून मत दिले नाही. हिलरी नको म्हणून दिले
Happy

>> मी ट्रम्प यावा म्हणून मत दिले नाही. हिलरी नको म्हणून दिले

असे आपल्या तुपल्यातले कितीतरी आहेत! (मला खरंच माहित नव्हतं हिलरी बद्दल एव्हढा हेट्रेड आहे लोकांमध्ये ते)

प्रथम हा मुद्दा स्पष्ट करतो की शपथग्रहण सोहळ्याला किती लोक उपस्थित होते हा प्रश्न गौण आहे असे मी मानतो.
पण आता हा मुद्दा इतका मोठा झाला आहे म्हणून त्यावर मतप्रदर्शन करत आहे.

शपथविधी सोहळ्याला नक्की किती लोक उपस्थित होते ह्याची अचूक व नि:पक्ष आकडेवारी मिळवण्याची कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नाही असा माझा समज आहे. त्यामुळे लोक आपापल्या कुवतीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे अंदाजाने आकडेवारी देणार हे नक्की. त्यामुळे ही आकडेवारी व्यक्तीसापेक्ष असणार. आता बहुतांश माध्यमे ट्रंपला पाण्यात पहातात, चूक कुणाची हा मुद्दा वेगळा आहे. पण ट्रंप आणि बहुतांश माध्यमे ह्यांचा ३६ चा आकडा आहे ह्याविषयी दुमत नसावे. त्यामुळे ट्रंपचे नाक कापले जाईल अशी काही बातमी असेल तर संशयाचा फायदा न देता ती प्रकाशित करण्याचा प्रकार सी एन एन व अन्य माध्यमांनी वेळोवेळी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्याच्या गर्दीचे वर्णन करताना ह्या माध्यमांच्या पत्रकारांच्या अंगात अचानक हरिश्चंद्र संचारून ते सत्य आणि केवळ सत्यच सांगत असतील असे मी मानणार नाही.

फोटोच्या जोरावर आकडेवारी सिद्ध करणेही मला ठीक वाटत नाही. फोटो कधी घेतला आहे, कुठल्या कोनातून, गर्दी कमी दिसेल असाच अँगल लावून काढला आहे का? नंतर काही फोटोशॉपिंग करुन काही गडबड केली आहे का? अशा अनेक शक्यता आहेत. त्यामुळे केवळ माध्यमे म्हणत आहेत म्हणून गर्दी कमीच असली पाहिजे असा मला ठाम विश्वास वाटत नाही. माध्यमे ट्रंपला अपमानित करण्याची कुठलीही संधी सोडणार नाहीत ह्याची मला खात्री आहे. त्याकरता वस्तुस्थितीशी तडजोड करायलाही ते मागेपुढे पहात नाहीत असा ताजा इतिहास आहे.

तरीही शपथविधीला किती लोक उपस्थित होते ह्यावर अध्यक्षाचे यश ठरत असते तर ओबामाची कारकीर्द देखील अत्यंत नेत्रदीपक ठरली असती. पण वस्तुस्थिती उलटी आहे.

माध्यमे ट्रंपला अपमानित करण्याची कुठलीही संधी सोडणार नाहीत ह्याची मला खात्री आहे. >>> अगदी सहज शक्य आहे. मग अशा वेळेस अमेरिकेच्या अध्यक्षाने/त्याच्या स्टाफ ने काय करायचे? तुम्हाला त्यांच्या क्लेम मधला फोलपणा धडधडीत दाखवून देता येत असेल तर द्यावा. नाहीतर दुर्लक्ष करावे. इथे हे चार चार टॉप चे लोक २-३ दिवस वाद घालत बसलेत. तुम्ही ऑलरेडी सत्तेत आहात. आता कशाला लक्ष देताय?

ओबामाची कारकीर्द देखील अत्यंत नेत्रदीपक ठरली असती. पण वस्तुस्थिती उलटी आहे. >>> इकॉनॉमी गाळात गेलेली पुन्हा पीक वर आणली, लक्षावधी लोकांना हेल्थकेअर उपलब्ध करून दिले, लादेन ला घरमे घुसके उडवला. आणखी काय करायला हवे होते? सिरीया मधे जायला तर कॉंग्रेसही तयार नव्हती.

ट्रम्प ने सिरीया, इराण, इराक व इतर ३-४ देश यांतून येणार्‍या लोकांना व्हिसा द्यायला बंदी घातली. आता तेथून नॉर्मल लोकही येउ शकत नाहीत हे खरे आहे, पण तसे धोकादायक नसलेले लोक सेपरेट करणे अवघड आहे. त्यामुळे हे अपेक्षित होते.

मात्र तेथून फक्त मुस्लिम्स येत नाहीत. अगदी बुश च्या काळापासून सिरीयन/इराकी ख्रिश्चन लोक अनेक आले आहेत - जे तेथील धार्मिक विरोधामुळेच तेथून बाहेर पडत आहेत. असे अजून असतील तर काय करणार ते समजले नाही.

शपथ ग्रहण समारंभाला किती लोक आले हे गौण आहे हे मान्य. पण अमेरिकेच्या अध्यक्षाने अशी हुज्जत घालणेही योग्य नव्हे. ठीक आहे, आमच्या समर्थकांना कामे असतात म्हणून ते येत नाहीत असे काहीतरी सांगून विषयावर पडदा पाडता आला असता.

विकु :). "आमच्या" चा वाट्टेल तो अर्थ लावून, किंवा ओबामाचे समर्थक म्हणजे आफ्रिकन अमेरिकन्स त्यांना उद्योग नाहीत असा अर्थ लावून मीडिया ने त्यातही रेसिस्टपणा शोधला असता.

दुर्लक्ष करणे हेच योग्य होते. डीसी हा डेम्स चा भाग आहे. साहजिकच तेथे २००९/१३ मधे जास्त लोक होते. त्यात आफ्रिकन अमेरिकन माणूस पहिल्यांदाच अध्यक्ष झाला होता.

== १. इकॉनॉमी गाळात गेलेली पुन्हा पीक वर आणली,
२००८ साली अमेरिकेच्या डोक्यावर जवळपास दहा ट्रिलियन डॉलर्स इतके कर्ज होते. आज १९ ट्रिलियन आहे. ओबामाने ८ वर्षात ते जवळजवळ दुप्पट केले आहे. ह्याला आर्थिक स्थिती वर आणणे म्हणत असाल तर ठीक आहे.
== २. लक्षावधी लोकांना हेल्थकेअर उपलब्ध करून दिले,
ह्या आरोग्य सेवेचे व्यवस्थापन इतके वाईट होते की करदात्यांवर ह्या प्रकाराचा प्रचंड बोजा पडत आहे. हिलरीही ह्या गोष्टीला तसेच्या तसे स्वीकारायला तयार नव्हती आणि ह्यात मोठे बदल करणे आवश्यक आहे असे तिने एका डिबेटमधे म्हटले होते.
==३ लादेन ला घरमे घुसके उडवला.
ही एकमेव चांगली गोष्ट. पण ही अपवाद असावी असे वाटू लागले आहे.
==४ आणखी काय करायला हवे होते? सिरीया मधे जायला तर कॉंग्रेसही तयार नव्हती.
ओबामाने आपल्या परराष्ट्र धोरणामुळे अनेक देशांचे वाटोळे केले आहे. लिबिया, इजिप्त, इराक, सिरिया. सगळ्या देशात इस्लामी बंडखोरांना मदत देऊन ते ते देश यादवीत ढकलले. अनेक दशके चालणार्या यादवीला खतपाणी घालण्याचे महान काम ओबामा व त्याच्या मंत्रीमंडळाने केले आहे. ज्याप्रमाणे इराकमधून सद्दामला पदच्युत करणे मूर्खपणाचे आहे असे उघड दिसत आहे तसेच गदाफी आणि बशर असादला हाकलण्याचा प्रयत्न हा ढळढळीत मूर्खपणा आहे. पण कायम इस्लामी बंडखोरांची बाजू घेणार्‍या ओबामाला ते कळत नाही किंवा कळून घ्यायची इच्छा नाही.
आयसिस जन्माला येत असताना त्याकडे दुर्लक्ष, अनेक वर्षे तोंडदेखली कारवाई करण्याचा प्रकार हेही ओबामाचेच प्रताप.

२००८ साली अमेरिकेच्या डोक्यावर जवळपास दहा ट्रिलियन डॉलर्स इतके कर्ज होते. आज १९ ट्रिलियन आहे. ओबामाने ८ वर्षात ते जवळजवळ दुप्पट केले आहे. ह्याला आर्थिक स्थिती वर आणणे म्हणत असाल तर ठीक आहे. >>

हेच एका मुख्यमंत्र्याने भारतात केले होते त्याला मात्र तुमच्या सारख्या लोकांनी डोक्यावर घेतले. इतका भेदभाव का बरं ?

अल्टरनेट फॅक्ट चा अर्थ स्पाइसरने स्पष्ट केला आहे - त्याने सांगितले की कधी कधी फॅक्ट शी आम्ही सहमत नसतो.
याला काहीच हरकत नसावी. हजारो लोक म्हणाले की पृथ्वी गोल आहे तरी पृथ्वी सपाट आहे असे म्हणणारेहि हजारो लोक अमेरिकेत आहेत, त्यांच्या सारखेच हे ट्रंपवाले. सध्या त्यांना बहुमत आहे.

बाकी मा़झ्या मते लिबरल लोकांच्या मुळे आयते बसून खाण्याची, जबाबदारी (स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः कमवावा) न स्वीकारता केवळ फुकट मिळेल तितके घ्यायचे असली वृत्ति बळावली आहे. फार थोडे लोक असे आहेत ज्यांना खरेच मदत हवी आहे. पूर्वी पण होते - समाज त्यांची काळजी घेत असे, आता सगळे म्हणे सरकारने बघायचे. का?

==हेच एका मुख्यमंत्र्याने भारतात केले होते त्याला मात्र तुमच्या सारख्या लोकांनी डोक्यावर घेतले. इतका भेदभाव का बरं ?

कुठला मुख्यमंत्री? आणि त्याला डोक्यावर घेणारे लोक "आमच्यासारखे" होते म्हणजे नक्की कसे? ट्रंपचे समर्थक? ह्या साधर्म्याविषयी जरा विस्ताराने बोललात तर आकलनास मदत होईल!

गुजरातचे कर्ज अवघ्या ६ वर्षात दुप्पट करणारे मोदी नामक एकमेव मुख्यमंत्री भारतात आहे. इतकी माहीत तुमच्यासारख्या कोअर समर्थकाला नसावी याचे आश्चर्य वाटते.
कारण त्यांच्या प्रत्येक गोष्टींना तुम्ही अमेरिकेत बसुन समर्थन देत असतात,
आता ओबामाने कर्ज वाढवले तर तुमच्या डोळ्यात कसे खुपले बरे?

http://n.pr/2kscOSC

भारतात भाजपा सरकार आल्यावर असे नाही पण कोर्स करेक्शन (म्हणजे प्राचीन संस्कृती उदधारण) केले आहेच. चिनूक्सने याबाबत अनेकदा लिहिले आहे

Pages