चामडी कडक्क नव्या बुटांना नरम कसे करावे?

Submitted by limbutimbu on 8 July, 2015 - 07:13

नुकतेच माझ्या मित्राने मला एक मिलिटरी टाईप चामड्याच्या बुटांची जोडी भेट दिली आहे.
घालुन बघता असे लक्षात आले की या बुटांचे चामडे खुपच जाड व कडक आहे.
त्यामुळे बुट पायाला चावतो. (म्हणजे त्यास दात/तोंड नसते पण कातडीला घासून घासुन जखमा होतात).
असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे चामडे कायमस्वरुपी नरम पडून बुट घालणे/वापरणे सुखकारक होईल?
पाणी वापरले असता (जसे न्हावी दाढी/कटिंग करायचे आधी लावतो) चामडे नरम पडते आहे, पण तात्पुरते. पाणी वाळून गेल्यावर जसेच्या तसे कडक होते.
तेल वापरावे असे वाटते, पण कोणते तेल जास्त उपयोगी होईल? स्व:स्त अन मस्त उपाय हवाय.
बुट कोणत्या प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेला आहे व कोणत्या प्राण्याच्या कातड्यावर तो चढविला जाणार आहे त्यावरही कडक/नरमपणा अवलंबुन असतो का?
कृपया जाणकार/तज्ञांनी सल्ला द्यावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> त्या चोरीला गेलेल्या हृदयाचं लोणचं घातलं की मिसळीच्या रश्शावर पिळून सालीने भांडी घासली याचं काही ट्रॅक रेकॉर्ड ठेवलंय काय ? <<<<
कापोच्या, येड्या, ते रेकॉर्ड माझ्याकडे कस असेल? Proud ज्यांनी चोरले त्यांनी त्याचे काय केले ते त्यांना ठावकी असणार ना?

अन मागचा धागा कुठला? कशाबद्दल काय म्हणतो हेस? तुम्ही अड्डेकरी उगाचच भारीच कोडभाषेत बोलत र्‍हाता बोवा.. बरोबरे म्हणा.. "कम्युनिस्ट गुप्ततेची" सवय अशी थोडीच जाणारे? Wink (आता दीडमा येईल अभिनंदन करायला... Lol )

लिंब्या लेका, चड्डीत फिरायचास तेव्हा तुझ्या लोंबणार्या नाड्या मीच बांधून देत असे, विसरलास का रे ?

लिंब्या डोक्यावर पडला की आपटला ? कुठेही मुर्खासारखे कम्युनिस्ट ब्रिगेडी घुसवतोय. जनाची नाही तरी मनाची लाज बाळग रे.

>>>>> लिंब्या डोक्यावर पडला की आपटला ? कुठेही मुर्खासारखे कम्युनिस्ट ब्रिगेडी घुसवतोय. जनाची नाही तरी मनाची लाज बाळग रे. <<<<<<
अरे व्वा.. हे चांगले लक्षण आहे, जरा वर साचलेली "बुप्रावादाची काळीकुट्ट" राख फुंकरली, तर आतला हिंदुत्वाच्या विस्तवाचा निखारा कसा धगधगून उजळून निघाला पहा.... Proud

बर, ते जाऊदे, तुला तो फर्स्ट ब्लड सिनेमा माहिते का? तर त्यातिल तो हिरो त्याच्या "गुरुला" गुरगुरुन सांगतो, की "पहेल त्यांनी केली" (पहिल्यांदा त्यांनी माझे ब्लड सांडवले अशा अर्थाने.. ) .
तद्वतच, पहेल या कम्युनिस्ट्/ब्रिगेडींनीच केलीये ब्राह्मणांबद्दल्/हिंदुत्वाबद्दल विषारि/विखारि धादांत खोटा प्रचार करीत ..... म.भो.आ. आ.क.फ.
मी तर क्यान्टीनला भात खाऊ लागलो, तरी चष्मा घालून शोधक नजरेने गारगोटीचे "लाल/पिवळे/पांढरे" खडे वगैरे शोधतो, अन सापडला की चिमटीत पकडून "कम्यु/ब्रि. कुठला.. शिन्चा माझ्या भाताच्या घासात कडमडतोय" असे म्हणत फेकुन देतो... Proud
(अदरवाईज तुझ्या माहितीकरता सांगतो की भारतात कम्युनिझम पहिल्यांदी आणणारे "बामणच" होते, बर्का... १९४८ नंतर परिस्थिती बदलली, अन आत्ताचे रेमेडोके आले, तरीही आजही बामणातलेच "बुप्रावादी" त्यांच्या पाठीचा कणा आहेत... Wink )

हलके घ्या हे.
बाकी चामड्याचे बूट कम्युनिस्ट ब्रिगेडी संघ या मार्गानेच गेले म्हणजे योग्य मार्गावर आहेत ते.

>>>> बाकी चामड्याचे बूट कम्युनिस्ट ब्रिगेडी संघ या मार्गानेच गेले म्हणजे योग्य मार्गावर आहेत ते. <<<<<<
अगदी अगदी, १९७० च्या दशकात मी कम्युनिस्ट-समाजवादी विचारधारेने प्रभावित होतो.
१९८० च्या दशकात आत्ताच्या ब्रिगेडी विचारधारेची पाळेमुळे रुजताना बघितलित अनुभवलीत.
१९९० च्या दशकापासुन मात्र संघिष्ट बनलो.
तू म्हणालास तस्सेच झालय बघ, आधी कम्युनिस्ट, मग ब्रिगेडी, सरतेशेवटी संघिष्ट... असाच मार्ग राहिलाय माझा.... Wink

अन कापोच्या, घोळ झालाय रे माझा... Sad
बुट तर चोरीला गेलेत.... अन आता ३ जानेवारीच्या रास्वसंघाच्या शिवशक्तिसंगम कार्यक्रमास कसा जाऊ? Uhoh
बुट नाहीत तर तो पूर्ण गणवेष होत नाही Sad
शिन्च्या त्या चोरालाहि मला "त्याच (आधी) कम्युनिस्ट (नंतर) ब्रिगेडी (सरतेशेवटी) संघ" या मार्गाने जाऊ द्यायचे नसावे..... Wink नाहीतर माझे गरिबाचे बापडे बुट तो न चोरता... Proud )

आता विनाकारण जास्तीच्या खर्चात पडत मला नविन बुट विकत घेणे क्रमप्राप्त झाले..

बायदिवे, काळे चामडि बुट किती रुपयापर्यंत मिळतील? कोणते घ्यावे?

Pages