भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर गायत्री मंत्र अनुराधा पौडवाल यांनी एकशे आठ वेळा गायिलेला आहे तोच आठवतो. शिवाय लता मंगेशकर यांनी सुद्धा एकशे आठ वेळा गायिलेला आहे व तोसुद्धा खूप प्रसिद्ध आहे.

पान क्रमांक १७८ वर >>> हे वाचून तांबडेबाबांची ( तू तिथे मी फेम ) साधना आठवली. पृष्ठ क्र अमुक आणि परिशिष्ट क्र तमुक Lol

कडू दुधी/काकडी बद्दल वाचून आता प्रत्येक सलाड चिरताना एक तुकडा खाऊन बघायची सवय आहे. त्यानुसार परवा दुपारी जेवणासाठी salad चिरताना बीटरूटचा तुकडा खाऊन बघितला तर तो कडसर आंबट लागला. बीट फेकून दिलेच पण जरा वेळाने (२-३) तासांनी मळमळ सुरू झाली. सारख्या त्या बीटाची चव जिभेवर येत होती. त्याच चवीच्या ढेकरा येऊ लागल्या. १५ ऑगस्ट मुळे आमचे dr available न्हवते. शेवटी जवळच्या एका क्लिनीक मध्ये जाऊन injection घ्यावे लागले. संध्याकाळपर्यंत 3 उलट्या झाल्या आणि मग बरे वाटले. जस्ट एक तुकडा खाल्ला तर असे झाले. तेव्हा बीट पासून पण सावधान

स्त्री & गायत्री मंत्र आचरट पणाची हद्द आहे. अशा मेसेज फॉरवर्ड वाल्या/वाली ला मी तत्काळ ग्रूप मधून काढेन किंवा त्या ग्रूप मधून कल्टी मारेन.
लता मंगेशकर आणि त्यांनी गायलेल्या अनेक गायत्री मंत्र ऑडीओ अनेकोनेक लोकांकडे आहेत.

Organoleptic tests मध्ये डायरेक्ट खाऊनच आधी बघायला पाहिजे असे कुठे आहे Wink बाकी निरीक्षण करून सुद्धा वापरायचं की टाकायचं ठरवता येईल लोकहो !

गायत्री मंत्र वाला मेसेज नेक्स्ट लेव्हल बकवास आहे. हे मेसेज ओरिजिनली लिहिणारे लोक ट्रोलिंग करत असतात असा नेहमी संशय येतो. पण पुढे बरेच, .. काय शब्द वापरावा... 'साधेभोळे' लोक खरा समजून ढकलतात.

मला तर शंका आहे काही नास्तिक लोकं आपला अजेंडा राबविण्यासा ठी ते गायत्री मंत्रांचे फॉर्वर्ड्स टाक्तां, ज्यायोगे लोकांमधे एकंदर घृणा निर्माण व्हावी.

तिच शंका मोदी भक्तांकरता ही आहे. की मोदीविरोधीच मुद्दाम ओ येइल इतके भक्तीप्रदर्शन करतात ज्यायोगे लंबक दुसर्‍या बाजूस हेलकावेल.

आता बायका देखील गायत्री मंत्र म्हणून शकतात कारण ऊरलेल्या दोन नाड्या परकर,सलवार,पायजमा ई मधून ऊपलब्ध होतात. तस्मात पुर्ण चोवीस नाड्या असल्याने बायांनो आता दणकून मंत्र म्हणा

पपईच्या पानांचा चहा -
कोणत्याही अवस्थेतील कर्करोग केवळ 60 ते 90 दिवसांत मुळापासून नष्ट होऊ शकतो.

पपईची पाने -
तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजचा कर्करोग केवळ 35 ते 90 दिवसांत बरा होऊ शकतो.

आता पर्यंत -
आपण मानवांनी फक्त पपईच्या पानांचा वापर मर्यादित प्रमाणात केला असेल...
(विशेषतः प्लेटलेट कमी करण्यासाठी किंवा त्वचेशी संबंधित किंवा इतर कोणत्याही लहान किंवा मोठ्या प्रयोगासाठी)

परंतु,
आज आम्ही तुम्हाला काय सांगणार आहोत -
हे खरोखर तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला तुम्ही फक्त पाच आठवड्यांत समूळ नष्ट करू शकता.

ती निसर्गाची शक्ती आहे

अनेक प्रकारच्या वैज्ञानिक शोधांमधून बरेच ज्ञान मिळाले -

पपईच्या प्रत्येक भागामध्ये जसे की फळ, स्टेम, बिया, पाने, मुळे या सर्वांमध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी आणि त्यांची वाढ थांबवण्यासाठी शक्तिशाली औषध असते.

विशेषतः -
कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याचे आणि त्यांची वाढ रोखण्याचे गुणधर्म पपईच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात.

चला तर मग जाणून घेऊया...

फ्लोरिडा विद्यापीठ (2010) आणि अमेरिका आणि जपानमधील आंतरराष्ट्रीय डॉक्टर आणि संशोधकांनी केलेल्या संशोधनातून असे आढळून आले आहे की -

पपईची पाने कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी आढळतात.

श्री. नाम डांग - एमडी, पीएचडी जो शोधक आहे,

त्याच्या मते -

पपईची पाने कॅन्सरवर थेट उपचार करू शकतात.

त्याच्या मते -
पपईची पाने सुमारे 10 प्रकारचे कर्करोग नष्ट करू शकतात.

मुख्य म्हणजे -
स्तनाचा कर्करोग,
फुफ्फुसाचा कर्करोग,
यकृताचा कर्करोग,
स्वादुपिंडाच्या कर्करोगाने,
गर्भाशयाचा कर्करोग,

त्यात जितकी पपईची पाने टाकली जातात,
चांगले परिणाम.

पपईच्या पानांमुळे कर्करोग बरा होतो
आणि,
कर्करोगाच्या वाढीस प्रतिबंध करते.

चला तर मग जाणून घेऊया -
पपईची पाने कर्करोग कसा बरा करतात?

(1) पपई कर्करोगविरोधी रेणू Th1 साइटोकिन्सचे उत्पादन वाढवते.

जे रोगप्रतिकारक शक्तीला शक्ती प्रदान करते.
ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात.

(२) पपईच्या पानातील पापेन सॉल्ट -
प्रोटीओलाइटिक एंजाइम आढळतात,

जे कॅन्सरच्या पेशींवरील प्रोटीन लेप तोडते...
त्यामुळे कर्करोगाच्या पेशींना शरीरात टिकून राहणे कठीण होते.

अशा प्रकारे,
पपईच्या पानांचा चहा –
रुग्णाच्या रक्तात मिसळून मॅक्रोफेजला उत्तेजित करते...
रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित करून,
कर्करोग पेशी नष्ट करू लागतो.

केमोथेरपी / रेडिओथेरपी आणि पपईच्या पानांद्वारे उपचार यातील मुख्य फरक म्हणजे -

केमोथेरपीमध्ये -
रोगप्रतिकारक शक्ती 'दबली' जाते.

पपई पाने करताना -
रोगप्रतिकारक शक्तीला 'उत्तेजित' करते,

केमोथेरपी आणि रेडिओथेरपीमध्ये सामान्य पेशीही 'प्रभावित' होतात.

पपई फक्त कर्करोगाच्या पेशी नष्ट करते.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे -
कर्करोगाच्या उपचारात पपईच्या पानांचे कोणतेही 'साइड इफेक्ट' नाहीत.

*कर्करोगात पपई खाण्याचा विधी:

कर्करोगासाठी उत्तम पपई चहा :-

पपईचा चहा दिवसातून ३ ते ४ वेळा बनवा.
ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आता जाणून घेऊया -
पपईचा चहा कसा बनवायचा:-

(१) प्रथम ५ ते ७ पपईची पाने उन्हात चांगली वाळवावीत.
मग,
त्याचे लहान तुकडे करा.

आपण 500 मि.ली. पाण्यात -
त्यात थोडी वाळलेली पपईची पाने घालून चांगले उकळावे.
इतके उकळवा की -
ते अर्धवट राहते.
आपण ते 125 मिली देऊ शकता. दिवसातून 2 वेळा करी प्या.
आणि,
जर तुम्ही जास्त केले तर दिवसातून 3 ते 4 वेळा प्या.

उरलेले द्रव फ्रीजमध्ये ठेवा आणि आवश्यकतेनुसार वापरा.

याची काळजी घ्या -
ते पुन्हा गरम करू नका.

(२) पपईची ७ ताजी पाने घ्या.
हाताने चांगले मळून घ्या.
आता ते 1 लिटर पाण्यात उकळवा.

जेव्हा ते 250 मि.ली. जर ते वाढले तर ते 125 मिली फिल्टर करा. ते 2 वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी प्या.

हा प्रयोग तुम्ही दिवसातून ३ ते ४ वेळा करू शकता.

तुम्ही जितकी जास्त पपईची पाने वापराल...
जितक्या लवकर फायदा मिळेल.

टीप :-
हा चहा प्यायल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका.

* हा प्रयोग किती दिवस करायचा?

तर हा प्रयोग तुम्हाला त्याचा परिणाम 5 आठवड्यांत दाखवेल...
तथापि
आम्ही तुम्हाला ते 3 महिन्यांसाठी वापरण्याची शिफारस करतो.

आणि,
हे ज्यांना कळले आहे,
त्या लोकांनीही त्या लोकांचे भले केले आहे,
ज्यांचा कर्करोग 'तिसरा' किंवा 'चौथा' स्टेज होता.

हा संदेश -
सर्वांनी पाठवावे ही नम्र विनंती.
स्ट्रँड पाहिजे...
जेणेकरून गरजू इतरांपर्यंत पोहोचता येईल.

आता बायका देखील गायत्री मंत्र म्हणून शकतात कारण ऊरलेल्या दोन नाड्या परकर,सलवार,पायजमा ई मधून ऊपलब्ध होतात. तस्मात पुर्ण चोवीस नाड्या असल्याने बायांनो आता दणकून मंत्र म्हणा
>>>> इलॅस्टिकवाली सलवार/पायजमा घालणाऱ्या बायकांना एकटे पाडण्याचा या वृत्तीचा णिशेद...... Wink

बाय द वे, शोणित म्हणजे रक्त ना? मग ते बायकांनी जपून ठेवायचे आणि पुरुषांनी उधळले कि चालते हे कसे काय? का भारतीय बायका जनरली अनेमिक असतात हा शोधही भारतीयांना फार पूर्वीच लागला होता का? Wink

गणितात अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांनी नि:शेष भाग जातो.

अशी कोणतीही संख्या नाही असेच बहुतांश जणांचे म्हणणे होते.

पण हा एक आकडा खूपच विचित्र आहे आणि जगातील सर्व गणितज्ञांना धक्का बसला आहे.

ही संख्या भारतीय गणितज्ञांनी त्यांच्या अविचल बुद्धिमत्तेने शोधून काढली.

ही संख्या २५२० पहा.

ही अनेक संख्यांपैकी एक असल्याचे दिसते,

…. तथापि, प्रत्यक्षात तसे नाही,

२५२० ही अशी संख्या आहे, ज्याने जगभरातील अनेक गणितज्ञांना आश्चर्यचकित केले आहे.

२५२० या संख्येला १ ते १० पर्यंतच्या कोणत्याही संख्येने नि:शेष भाग जातो.

सम किंवा विषम:

हे खरोखर आश्चर्यकारक आणि अशक्य असल्यासारखे वाटते.

आता, खालील तक्ता पहा;

२५२० ÷ १ = २५२०

२५२० ÷ २ = १२६०

२५२० ÷ ३ = ८४०

२५२० ÷ ४ = ६३०

२५२० ÷ ५ = ५०४

२५२० ÷ ६ = ४२०

२५२० ÷ ७ = ३६०

२५२० ÷ ८ = ३१५

२५२० ÷ ९ = २८०

२५२० ÷ १० = २५२

२५२० या संख्येचे रहस्य [ ७ × ३० × १२ ] च्या गुणाकारात लपलेले आहे.

भारतीय हिंदू वर्षाच्या संदर्भात, या २५२० क्रमांकाचे कोडे सोडवले आहे.

हे या संख्येचे गुणांक आहेत.

आठवड्याचे दिवस (७),

महिन्याचे दिवस (३०)

आणि वर्षातील महिने (१२)

[ ७ × ३० × १२ = २५२० ] हे काळाचे वैशिष्ट्य आणि प्रभुत्व आहे.

महान गणिती ज्याने ते शोधले होते;
श्री श्रीनिवास रामानुजम. जयतु अखंड हिंदू राष्ट्रम्....!!!

3,84,400 kms distance of moon from earth .

At Rs 615 Cr cost of Chandrayan-3 . It’s around Rs 16 per km.

Innova crysta on rent is Rs. 22 per km .

Toll Extra...

India rocks...

World is in shock...

--+++++++++++-----

इथे थोडं गणित केल्यावर लक्षात येईल की ६१५ कोटी भागिले ३८४४०० केल्यावर रु १६००० प्रति किमी येते. १६ कुठून काढलं! Lol

इनोव्हेटिव्ह मैथेमैटिक्स ह्या नवीन शाखेचा व्हाट्सअप यूनिवर्सिटीमध्ये समावेश झाल्यापासून चंद्रावरचा १ रुपया म्हणजे पृथ्वीवरचे हजार रूपड़े असा हिशेब घेतला गेलाय त्यामुळे १६ बरोबर आहे Wink

चंद्रावर ग्रॅव्हीटेशन कमी. त्यामुळे १६००० रुपयातले हजार तर उडून जातील ना. मग राहिले किती? सोळा. असा हिशेब आहे तो. Wink

मानसतीर्थांची पोस्ट लसावी/ मसावी शिकुन रोजच्या जीवनात काय फायदा झाला स्कूल ऑफ थॉट वाल्यांना दाखवावी अशी आहे. हे सगळं का शिकायचं? तर हे असलं फॉरवर्ड करायला लागू नये म्हणून! Happy

Pages