भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असले मेसेज ज्ये.नां कडून आले की दुर्लक्ष करावे असं सध्याचं मत आहे. माझे आजोबा वय ९०+ व्हॉट्सॅपवर काही बाही पाठवत असतात. त्यांचं आपल्यावर प्रेम आहे त्या निमित्ताने त्यांना आपली आणि आपल्यांला त्यांची आठवण होते इतकंच ध्यानात ठेवून शहाणे करुन सोडावे उर्मी दाबावी. फारतर एक मेसेज लिहून तो दोन तास न पाठवून उर्मी कमी झाली की तो मेसेज डिलिट करावा. या वयात मन रमवताहेत, तसंही खरं खोटं करुन फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होतं. पूर्वी त्यांनी आपल्या चक्रमपणाला पोटात घेतलं असेल आता आपली पाळी.
अगदी उर्मी जातच नसेल तर प्रत्यक्ष भेटीत काय ते बोलावे. व्हिज्युअल क्लूज समजुन आपल्या बोलण्याचा टोन बदलायला ज्ये.नां. बरोबर टेक्नॉलॉजी... टेक्स्ट ते फोन... वाईट माध्यमे आहेत. Happy उगाच माझे दोन पैसे.

अरे ते तर चालूच आहे, एक ज्येना असेल तर नं. सगळे काका, आत्या, मावश्या, मामा हेच करत आहेत. ते तर एकमेकांना विचारतातही 'ती मिऱ्याची पोस्ट वाचली का' वगैरे. मागे एकदा ड्रायव्हिंग करताना पपा मला विचारत होते ते' रशियामें मिला मंगल ग्रह का एलियन' बघितलं का ? नाही म्हटलं तर'कमाल आहे तुझी एवढा मोठा शोध लागला आणि तुला काही नाहीच' Lol

आजारी पडण्याची सोय राहिली नाही आजकाल. घरचेच ज्येना काय काय उपाय कर म्हणुन मागे लागतात, स्वतः तो काढा की रस की चूर्ण बनवूनही देतात. आणि मग त्याने फरक पडला की नाही म्हणुन मागे लागतात. जरा बरं वाटतय आज म्हटले की लगेच "पहा पडला की नाही फरक.!"
नाही उलट जास्त त्रास होतोय म्हटलं तर "काही औषधांनी असंच होतं, आधी जरा वाढते दुखणे मग कमी होते, जरा धीर धर" म्हणतात.

>>तुझी एवढा मोठा शोध लागला आणि तुला काही नाहीच >> Lol
>>काही औषधांनी असंच होतं, आधी जरा वाढते दुखणे मग कमी होते, जरा धीर धर">> Lol हे आपल्याकडलं एकदम पेटंट वाक्य आहे.

सगळेच Lol
ऑन अ सीरियस नोट-
ह्या असल्या भोंदू फॉरवर्ड्सकडे दुर्लक्ष करता येतं, हसून सोडून देता येतं (आपल्याला).
पण झालंय काय, की ज्ये.ना. जसे या अननसाच्या गुणांवर आणि मंगळावरच्या एलियनवर विश्वास ठेवतात, तसे तद्दन भडकाऊ पोस्ट्सवरही विश्वास ठेवतात. यूट्यूब व्हिडिओज ह्या प्रकाराची धास्ती वाटायला लागावी अशा प्रमाणात हे (वरून सौजन्याचा बुरखा पांघरलेले) भडकावणारे व्हिडिओज पसरवले जातात. ज्ये.नां.ना सवय होती टीव्ही, रेडिओ आणि वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून त्या खऱ्या मानण्याची. आता ते यूट्यूबवरच्या 'बातम्या'सुद्धा खऱ्या मानायला लागलेत. याचं काय करायचं?

त्यांच्या काळात लोक टीव्ही आणि प्रिंट मीडिया मध्ये खऱ्या गोष्टी बोलायचे.
'सोशल मीडिया, टीव्ही आणि प्रिंट मीडिया वर आजच्या काळात पूर्ण लक्ष आणि विश्वास ठेवू नका' असा व्हॉट्सप फॉरवर्ड पासरावल्यास उपयोग होईल(भूताने 'जगात भूत नाही' याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन करावे तसे Happy ते एक कल्पनेचा खेळ नाटक होतं त्यात डॉ समजवून जातात जगात भूत चेटूक भानामती असलं काही नसतं, आणि नंतर कळतं तेच भूत होते.)

काट्याने काटा काढणे Happy
काही सांगायला गेलं की आपल्यालाच किरकोळीत काढलं जातं.

*खोबरेल तेल*

खोबरे, खोबरेल तेल किती विलक्षण आणि गुणकारी आहे! माझे स्वतःचे कितीतरी गैरसमज दूर झाले ! कृपया मित्र मैत्रिणींनो हा लेख जरूर वाचा आणि आवडला तर ज्यांच्या ज्यांच्यावर तुमचे प्रेम माया आहे त्यांना पाठवा ....! माझी तर तुम्हा सर्वांवर माया आहेच म्हणूनच तुमच्यासाठी ख़ास डॉ मीना नेरुरकर यांचा हा लेख ..!!

"कोकोनट ऑइल"
गेली तीस वर्षे नारळाच्या खोबर्‍याला, खोबरेल तेलाला आरोग्यबाधक ठरवल्यावर त्याचे ग्रह पालटले आहेत. दिवसागणिक वाढत असलेल्या अल्झायमर या रोगावर जालीम उपाय म्हणून खोबरेल तेलाला आता महत्त्व आलेले आहे.

अमेरिकेत डॉक्टर पेशंटना टोस्टवर खोबरेल तेल लावून द्या असे सांगत आहेत. इतके दिवस आजूबाजूचा काहीही गंध नसलेली अल्झायमर पीडित जनता महिनाभराच्या टोस्टवरच्या खोबरेल तेलाने एकेकाळचे परिचित जग परत नव्याने ओळखायला लागलेली आहे. कोकोनट ऑइलचे भाग्य पालटायला डॉ. ब्रूस फाइफ याच्या रूपाने गॉडफादर लाभला.

अमेरिकेच्या र्‍होड आयलंड राज्यात राहणार्‍या या न्यूट्रिशयन शेजारी पॉल सोएर्स नावाचा फिलिपिनो माणूस होता. पॉल मिरॅकल ऑइल विकायचा. आजूबाजूची फिलिपिनो जनता काहीही झाले की त्याच्या दुकानात धावत यायची व तेल घेऊन जायची.

कुतुहल म्हणून ब्रूसने एके दिवशी पॉलला विचारणा केली. पॉल म्हणाला, थायलंड वा फिलिपाइन्स देशातून नारळ आणतो, नारळाच्या डोळ्यात खिळा घालून पाणी काढतो, मग तो हातोड्याने फोडतो, आतले खोबरे किसतो, ते पाण्यात उकळत ठेवतो, पाणी आटून वर राहते ते कोकोनट ऑइल. कसल्याही व्याधीवर उपचार म्हणून देतो.

डॉ. ब्रूस न्यूट्रिशनिस्ट असल्यामुळे त्याला प्रक्रिया न झालेल्या नैसर्गिक खाद्यपदार्थामध्ये रस होता खोबर्‍यातून तेल काढण्याची किचकट प्रक्रिया सोपी करायला ब्रूसने खूप मदत केली. पॉलला खोबरे वाटायला मिक्सर आणून दिला. खोबर्‍यातून तेल काढायला द्राक्षातून वाइन काढायचा प्रेस आणून दिला. आता तेल काढणे खूप सोपे झाले. पॉलच्या सांगण्यावरून काहीही दुखत असले की, ब्रूसने चमचाभर कोकोनट ऑइल तोंडाने घ्यायला सुरुवात केली. कापलेल्या खरचटलेल्या ठिकाणी कोकोनट ऑइल लावायला सुरुवात केली. ब्रूसचे वजन कमी झाले, त्याची त्वचा तुकतुकीत दिसायला लागली. जखम पटकन भरायला लागली. ब्रूसच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.

इतके दिवस नारळाला का वाईट म्हणत होते याबद्दल त्याने खोलात जाऊन तपास करायला सुरुवात केल्यावर त्याला आढळून आले की, सोयाबीन इंडस्ट्रीने जगात पाय रोवण्यासाठी मुद्दाम खोबर्‍याविरुद्ध अपप्रचार करायला सुरुवात केली होती. सगळे जण हार्ट अटॅकला घाबरतात. खोबरेल तेलात स्निग्धांश जास्त असतात व त्याने हार्ट अटॅक येतो, पण सोयाबीनचे पदार्थ खाल्ले तर हृदयविकार कमी होतात असा खोटा प्रचार सुरू केला. झाले. घाबरट लोकांनी हा रिपोर्ट वाचल्यावर नारळाचे पदार्थ खाणे कमी केले. चाणाक्ष सोयाबीन इंडस्ट्रीने स्वत:चे घोडे पुढे दामटले.

ब्रूसने नारळ वापरत असलेल्या देशात जाऊन खोबरेल तेलावर संशोधन केले. खोबर्‍यात असतात ते Medium chain fatty acids जे शरीराला हितकारक असतात. थायलंड,इंडोनेशिया, फिलिपाइन्स, पॉलिनेशियन देश खोबर्‍यावर जगतात. त्यांच्यात हार्ट अटॅकचे प्रमाण जगापेक्षा खूप कमी आहे. ब्रूसने शोधाअंती खोबर्‍यामुळे हार्ट अटॅक येत नाही असे विधान केले.

१९९९साली त्याने Coconut Oil miracle या नावाचे पुस्तक स्वत:च प्रसिद्ध केले. ते वाचून डॉ. मेरी न्यूपोर्ट हिने २००८ साली अल्झायमरच्या रोग्यांमध्ये कोकोनट ऑइलचा उपयोग करून पाहिला. फरक बघून तीदेखील चकीत झाली. इंटरनेटमुळे तो रिपोर्ट जगभर पसरला.

यू ट्यूबवर डॉक्टर हेल्दी फूडसाठी नारळाचे दूध कसे बिनधास्तपणे वापरावे याच्या रोज नव्या रेसिपीज देतात.

माझ्या आजीच्या बटव्यात जगातल्या सगळ्या व्याधींवर अक्सर इलाज म्हणून एकच औषध होते ते म्हणजे खोबरेल तेल. परीक्षा आली की डोकं थंड राहावे म्हणून ती माझ्या डोक्यावर खोबरेल तेल थापटायची, केस काळे राहावेत म्हणून आंघोळीच्या आधी डोक्याला खोबरल तेलाचा मसाज करायची, कातडी चरबरीत होऊ नये म्हणून अंगाला खोबरेल तेल चोळायची, कान दुखला तर कानात गरम खोबरेल तेलाची धार सोडायची. सर्दी झाली, डोके खाली करून नाकात गरम खोबरेल तेलाचे थेंब घालायची. ती जेव्हा ९५ व्या वर्षी गेली तेव्हा डोक्यावरचे सगळे केस शाबूत होते व काळे होते.

सध्या माझी हॉर्वर्ड विद्यापीठातली हुशार मुलगी अदिती नियमितपणे खोबरेल तेल वापरते. पणजी सारखे डोक्याला अंगाला तर लावतेच, पण ब्रूसने सांगितल्याप्रमाणे रोज तीन चमचे तेल पिते. खोबरेल तेलात जेवण करते. खोबरेल तेलावर वाढूनही मी त्याचा वापर थांबवला म्हणून माझी कीव करते. कोकोनट गुरू डॉ. ब्रूसच्या अथक प्रयत्नांनी अमेरिकेतही कोकोनट ऑईल खूप लोकप्रिय होत आहे. आता मी ही न बिचकता वाटी वाटी सोलकढी पिते. आमट्या, उसळी, कालवणांना नारळाचे वाटण घालते. कोकोनट ऑइल अँटी एजिंग असल्याचे रोज नवनवे रिपोर्ट बाहेर येत आहेत.

डॉ. मीना नेरूरकर.... खूपच माहितीप्रद ,ऊपयुक्त लेख असल्याने फाॅरवर्ड केला आहे...
खुपच सुंदर लेख आहे अगदी सर्वांनी आवर्जून वाचावा असा..

मीना नेरूरकर एके काळी सामना च्या पुरवणीत लिहायच्या, त्यात हा लेख वाचला होता. त्यात दिलेल्या माहितीच्या सत्यासत्यतेबद्दल काही सांगता येणार नाही, पण लेख नेरूरकरांचा आहे.

परदेशात काही बँडेडमध्ये कोकोनट ऑइलचा समावेश केलेला दिसला. तसं त्यावर लिहिलेलंच होतं. 'अमेरिकेत डॉक्टर पेशंटना टोस्टवर खोबरेल तेल लावून द्या असे सांगत आहेत' हे जरा फारच ओढून ताणून केलेलं विधान असलं तरी काही अंशी त्यात तथ्य असावं.

टोस्ट, सफरचंद इ. बरोबर पीनट बटर लावून फार मस्त लागतं. त्याऐवजी कोकोनट बटर सांगितलं तर विशेष नाही. कीटो डाएट मध्ये स्निग्ध पदार्थ खायचे त्यात व्हेजी असाल तर कोकोनट बटर खातातच लोक. कोकोनट ऑइल/ बटर लोकप्रिय होत आहे यातही तथ्य असावं. आणि मीना नेरूरकर सध्या डॉक्टरच आहेत ना... त्या काहीही सांगतील. त्या काय पुलं, अब्दुल कलाम आहेत का विश्वास नांगर पाटील का रतन टाटा! डोळे झाकून विश्वास टाकायला!

IMG-20230222-WA0006(1).jpg

Coconuts Butter असेल किंवा peanut.
ते बनवताना industries मध्ये अनेक नको त्या प्रक्रिया होत च असणार .
त्या पेक्षा नैसर्गिक स्वरूपात च ते खा ना

आपण बहुतेक अन्न प्रक्रिया करूनच खातो हो. किती अन्न नैसर्गिक रूपात मिळतं तसं खातो?
नारळापासून तेल काढणे ही सुद्धा एक प्रक्रियाच आहे.

नारळ शरीरास योग्य असेल .
पण कोकोनट बटर शरीरास योग्य आहे हा युक्तिवाद चूक आहे.
इंडस्ट्रीज मध्ये बनणारे कोणते ही खाद्य प्रॉडक्ट healthy आहेत ह्याची जाहिरात असते.
सत्य नसते.
अमूल बटर ,बटर म्हणजे लोणी.
फ्रेश लोणी आणि अमूल बटर काही तरी साम्य आहे का?
फ्रेश लोणी कधीच कडक होत नाही freez मध्ये ठेवले तरी.
चवी मध्ये पण विलक्षण फरक आहे.
प्रतेक उत्पादन बाबत हेच आहे.
हळद,दूध,नारळ, शेंगदाणे,बदाम,पिस्ता,सफरचंद,etc हे शरीरास चांगलेच आहेत.
पण मोठ्या industries मध्ये त्या पासून बनणारे product healthy आहेत.
हे बोलण्यास खूप हिम्मत पाहिजे.
ती इथे खूप लोकात आहे.

लोणी कडक होत नाही? आमच्याकडे होतं राव फ्रीज मध्ये ठेवलं की
नंतर बाहेर ठेवावं लागतं बराच वेळ नॉर्मलला यायला
खूप लोकांचं असंच असतं Happy

<<<लोणी कडक होत नाही? आमच्याकडे होतं राव फ्रीज मध्ये ठेवलं की
नंतर बाहेर ठेवावं लागतं बराच वेळ नॉर्मलला यायला
खूप लोकांचं असंच असतं >>>>

आमचं पण लोणी असंच वागतं...

न गोठणाऱ्या फ्रेश लोण्याची कृती येऊ देत आता..

आम्ही फ्रीजच्या आत मायक्रोवेव्ह बसवून घेतला आहे. त्यात लोणी ठेवतो.

आम्ही फ्रीजच्या आत मायक्रोवेव्ह बसवून घेतला आहे. त्यात लोणी ठेवतो.>>> हे तर काहीच नाही, फ्रीज च्या वरती माठ ठेवणारे पण आहेत जगात Happy
त्यात लोणी ठेवलं तर ते थंड होईल का नॉर्मल? Happy

एखादा बर्नर पण बसवून घेतला तर दूध खराब होणार नाही आणि बाहेर काढल्यावर नॉर्मल ला यायची वाट बघावी लागणार नाही. Wink

चूक झाली.
ते एक वाक्य सोडून अजून पण प्रतिसाद मध्ये मत व्यक्त केले आहे त्या वर पण थोडे मत व्यक्त करा.
महत्वाचा पॉइंट आहे .
खाद्य पदार्थ industries मध्ये बनतात ते व्यापारी तत्वावर बनतात.
सरळ आहे चढवून फायदे सांगितले जातात.
खाद्य प्रक्रिया उद्योग खूप मोठा आहे .
ते अनेक माध्यमातून त्यांचे पदार्थ कसे healthy आहेत हे सांगणार.
हा खरा माझ्या प्रतिसाद च अर्थ आहे.
तुम्ही एकाच पॉइंट वर अडकला आहेत

तुम्ही एकाच पॉइंट वर अडकला आहेत>>>भले 100 ओळींचा प्रतिसाद असू द्या, आपल्याला सोयीस्कर असं 1च वाक्य उचलून त्याचा किस पडायचा ही कला इथेच शिकायला मिळाली, आणि बहुतेक सगळेच तयात पारंगत पण होतील Rofl

Pages