भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजरा, कजरा, मुजरा ...

हे थोर आहे Happy

पुरुषांच्या 'pituitary gland ' कुठे असतात म्हणे ?

पुरुषांना गजराहीन हॉटनेसचा अधिकार नाहीए का ?

*रसोई में भोजन बनाना छोड़ने का दुष्परिणाम*

अमेरिका में क्या हुआ जब घर में खाना बनाना बंद हो गया ?
1980 के दशक के प्रसिद्ध अमेरिकी अर्थशास्त्रियों ने अमेरिकी लोगों को चेतावनी कि यदि वे परिवार में आर्डर देकर बाहर से भोजन मंगवाऐंगे तो देश मे परिवार व्यवस्था धीरे धीरे समाप्त हो जाएगी।
साथ ही दूसरी चेतावनी दी कि यदि उन्होंने बच्चों का पालन पोषण घर के सदस्यो के स्थान पर बाहर से पालन पोषण की व्यवस्था की तो यह भी बच्चो के मानसिक विकास व परिवार के लिए घातक होगा।
लेकिन बहुत कम लोगों ने उनकी सलाह मानी। घर में खाना बनाना लगभग बंद हो गया है, और बाहर से खाना मंगवाने की आदत (यह अब नॉर्मल है), अमेरिकी परिवारों के विलुप्त होने का कारण बनी है जैसा कि विशेषज्ञों ने चेतावनी दी थी।
घर मे खाना बनाना मतलब परिवार के सदस्यों के साथ प्यार से जुड़ना।
*पाक कला मात्र अकेले खाना बनाना नहीं है। बल्कि केंद्र बिंदु है, पारिवारिक संस्कृति का।*
घर मे अगर कोई किचन नहीं है , बस एक बेडरूम है, तो यह घर नहीं है, यह एक हॉस्टल है।

*अब उन अमेरिकी परिवारों के बारे में जाने जिन्होंने अपनी रसोई बंद कर दी और सोचा कि अकेले बेडरूम ही काफी है?*
1-1971 में, लगभग 72% अमेरिकी परिवारों में एक पति और पत्नी थे, जो अपने बच्चों के साथ रह रहे थे।
2020 तक, यह आंकडा 22% पर आ गया है।
2-पहले साथ रहने वाले परिवार अब नर्सिंग होम (वृद्धाश्रम) में रहने लगे हैं।
3-अमेरिका में, 15% महिलाएं एकल महिला परिवार के रुप में रहती हैं।
4-12% पुरुष भी एकल परिवार के रूप में रहते हैं।
5-अमेरिका में 19% घर या तो अकेले रहने वाले पिता या माता के स्वामित्व में हैं।
6-अमेरिका में आज पैदा होने वाले सभी बच्चों में से 38% अविवाहित महिलाओं से पैदा होते हैं।उनमें से आधी लड़कियां हैं, जो बिना परिवारिक संरक्षण के अबोध उम्र मे ही शारीरिक शोषण का शिकार हो जाती है ।
7-संयुक्त राज्य अमेरिका में लगभग 52% पहली शादियां तलाक में परिवर्तित होती हैं।
8- 67% दूसरी शादियां भी समस्याग्रस्त हैं।

अगर किचन नहीं है और सिर्फ बेडरूम है तो वह पूरा घर नहीं है।
संयुक्त राज्य अमेरिका विवाह की संस्था के टूटने का एक उदाहरण है।
*हमारे आधुनिकतावादी भी अमेरिका की तरह दुकानों से या आनलाईन भोजन ख़रीदने की वकालत कर रहे हैं और खुश हो रहे हैं कि भोजन बनाने की समस्या से हम मुक्त हो गए हैं। इस कारण भारत में भी परिवार धीरे-धीरे अमेरिकी परिवारों की तरह नष्ट हो रहे हैं।*
जब परिवार नष्ट होते हैं तो मानसिक और शारीरिक दोनों ही स्वास्थ्य बिगड़ते हैं। बाहर का खाना खाने से अनावश्यक खर्च के अलावा शरीर मोटा और संक्रमण के प्रति संवेदनशील और बिमारीयों का घर हो जाता है।
शारीरिक स्वास्थ्य और मानसिक स्वास्थ्य किसी भी देश की अर्थव्यवस्था के लिए आवश्यक है।

*इसलिए हमारे घर के बड़े-बूढ़े लोग, हमें बाहर के खाने से बचने की सलाह देते थे*
*लेकिन आज हम अपने परिवार के साथ रेस्टोरेंट में खाना खाते हैं..*.",
स्विगी और ज़ोमैटो के माध्यम से अजनबियों द्वारा पकाए गए( विभिन्न कैमिकल युक्त) भोजन को ऑनलाइन ऑर्डर करना और खाना, उच्च शिक्षित, मध्यवर्गीय लोगों के बीच भी फैशन बनता जा रहा है।
दीर्घकालिक आपदा होगी ये आदत...
*आज हमारा खाना हम तय नही कर रहे उलटे ऑनलाइन कंपनियां विज्ञापन के माध्यम से मनोवैज्ञानिक रूप से तय करती हैं कि हमें क्या खाना चाहिए...*
हमारे पूर्वज निरोगी और दिर्घायु इस लिए थे कि वो घर क्या ... यात्रा पर जाने से पहले भी घर का बना ताजा खाना बनाकर ही ले जाते थे ।
*इसलिए घर में ही बनवाएं और मिल-जुलकर खाएं । पौष्टिक भोजन के अलावा, इसमें प्रेम और स्नेह निहित है।*

अमा Lol

८८५ वर्षे जतन केलेले पार्थिव
फारच थोड्या व्यक्तींना माहीत असेल की रामानुजाचार्य यांचे पार्थिव गेले ८८५ वर्षे जतन करून ठेवलेले आहे.
जगभरातील सर्वांनाच इजिप्तच्या राजांचे मृतदेह (ममी) आणि भारतातील गोव्यातील सेंट झेवियरचे संरक्षित मृतदेह पाहून आश्चर्य वाटते.... परंतु फारच कमी लोकांना हे माहित असेल की इजिप्तच्या राजांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी ज्या विशिष्ट कापडाचा वापर केला जात असे त्या कापडाला हल्ली मसलीन म्हणून ओळखलं जातं ते कापड मसली(मच्छली पट्टणम) श्रीरंग पट्टणम म्हणजेआपल्या भारतातूनच आयात केले गेले होते. श्रीरंगम (जिल्हा: तिरुचिरापल्ली, तामिळनाडू) येथील "श्रीरंगनाथस्वामी मंदिर", ज्यात भारतातील सर्वात मोठे मंदिर प्रासाद असल्याची मान्यता आहे, येथे स्वामी रामानुजाचार्य (१०१७ - ११३७) यांचे पद्मासन घातलेल्या अवस्थेतील भौतिक शरीर आहे, जे “विशिष्ठाद्वैत” तत्त्वज्ञानाचे महान आचार्य आणि श्रीवैष्णव परंपरेचे प्रणेते होते. त्यांचे ८८५ वर्षे जतन केलेले भौतिक शरीर या ठिकाणी बघायला मिळू शकते. हे भौतिक शरीर श्रीरंगनाथस्वामी मंदिराच्या पाचव्या परिक्रमा-मार्गावर असलेल्या "श्री रामानुज मंदिराच्या" दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात संरक्षित आहे. स्वामी रामानुजाचार्य १२० वर्षे आयुष्य जगले.... सन ११३७ साली त्यांनी पद्मासन अवस्थेत समाधी घेतली होती. स्वतः श्रीरंगनाथस्वामींच्या आदेशानुसार, रामानुजाचार्यांच्या शिष्यांनी त्या अवस्थेत त्यांचे भौतिक शरीर जतन केले. या संरक्षित शरीरात डोळे, नखे वगैरे स्पष्ट दिसतात. या शरीरावर कुजण्यापासून संरक्षण करण्यासाठी दररोज कोणताही अभिषेक केला जात नाही. वर्षातून दोनदा हे शरीर औषधी वनस्पतींनी स्वच्छ केले जाते आणि त्या वेळी शारीरिक शरीरावर चंदन आणि केशर लावले जाते. हे उल्लेखनीय आहे की या पवित्र स्थानाचा प्रचार गोवा किंवा इजिप्त सारखा केला जात नाही. रामानुजाचार्यांनी वापरलेले एक भांडे आपण अजूनही आत बघू शकता.

“त्याला साखळी लावली आहे का?” - Lol मंतरलेली असेल आणि खर्या भक्तांनाच फक्त त्या साखळीचं दर्शन होत असेल. Happy (संशय घेणार्यांचं ‘वाट्टुळं-वाट्टुळं हुयील‘.)

त्याला साखळी लावली आहे का? >>> Lol

या फॉरवर्ड्स मधली हिंदीतून अर्धवट भाषांतरित केलेली वाक्ये डोक्यात जातात. "...भारतातील सर्वात मोठे मंदिर प्रासाद असल्याची मान्यता आहे" म्हणे!

सुमारे शंभर-दीडशे वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये घटस्फोटिता तसेच विधवा पुनर्विवाह कायदा संमत करण्यात आला... मात्र त्या स्त्रीचे आधीच्या नवऱ्यापासून झालेले मूल दुसरा नवरा स्वीकारत नसे, यामुळे तत्कालीन धार्मिक संस्था अर्थात चर्चद्वारे अशा मुलांचा सांभाळ करण्यास सुरुवात झाली... त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीदेखील चर्चने घेतली. त्या व्यवस्थेला कॉन्व्हेंट असं म्हटले जाई... आज आपण भारतीय, विशेषतः मराठी मंडळी आमची मुलं *'convent'* मध्ये शिकतात हो...! असं अभिमानाने गावभर सांगत असतो... खरंतर कॉन्व्हेंट म्हणजे पोरक्या-अनाथ मुलांची चर्चद्वारे चालवली जाणारी शाळा. याच काळात इंग्लंडमध्ये घटस्फोट झाल्यामुळे दुसरं लग्न केलेल्या महिलांच्या मुलांना आपल्या मूळ वडिलांच्या भेटीसंदर्भात काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आणि एक विशिष्ठ दिवस ठरवून आपल्या जन्मदात्या वडिलांची भेट घालून दिली... तोच दिवस *'fathers day'* म्हणून ओळखला जाऊ लागला... *'mothers day'* हीसुद्धा याच प्रकारातून सुरू झालेली पद्धत आहे. आपण भारतीय-मराठी-हिंदूधर्मीय मात्र याच पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करण्यात धन्यता मानत आहोत... आपल्या संस्कृतीत आई-वडिलांना देवापेक्षाही श्रेष्ठ दर्जा दिला गेलाय... दररोज घरातून बाहेर पडताना आईबाबांच्या पायाला स्पर्श करून, त्यांचा आशीर्वाद घेणे हीच आपली परंपरा... त्यासाठी *fathers day* आणि *mothers day* ची एकदिवसीय नाटकं हवीतच कशाला...???

*काँन्व्हेंट स्कूल* म्हणजे काय हे कळण्यासाठी सर्वांना फॅार्वर्ड करा

फाईव्ह स्टार हॉटेलची भरभराट होण्याचं कारण विनोदी आहे!

कलेवर शब्द आपण मराठीत मृतदेहासाठी वापरतो पण हिंदीत त्याचा अर्थ 'शरीर' किंवा 'बाह्य रचना' अशा प्रकारचा आहे. https://www.hindwi.org/hindi-dictionary/meaning-of-kalevar
जगन्नाथपुरीला जगन्नाथ-बलभद्र-सुभद्रा यांच्या ज्या लाकडी मूर्ती असतात त्यांनाही 'कलेवर' म्हणतात. अधिक आषाढ महिन्यात जुनी कलेवरं बदलून नवीन कलेवरांची स्थापना करतात.

अनेक वर्शानी माबो वर आलो अजुनहि तेच लोक किल्ला लढवत आहेत हे पाहुन डोळे पाणावले .तसे एडि ट करतना ब्याक स्पेस की दाबल्याबर अक्शराण्चा गुन्ता तसाच आहे हे पाहून अ‍ॅडमिन द ग्रेट यान्नी थोर परम्परा जपल्या बद्दल सन्तोष झाला.....

आपण आजकाल जे म्हणतो की माझं कलेवर प्रेम आहे त्याचं मूळ जाणून घ्या

ज्यांना आपण मराठी भाषेचे अभ्यासक समजतो त्या थॉमस कँडी यांच्या चुलत चुलत भावाच्या मावशीच्या नणदेचा सार्वत्र काका सर आर्थर डायर हा भारतात आलेल्या मिशनर्यांपैकी एक होता स्वतःला इंग्र्लंडात काही नौकरी धंदा नसला तरी धर्मपर्साराच्या नावाखाली उदरनिवार्ह होऊन जाइल या आषेखाली तो इकडे आला परंतू त्याला भारतीय मृतदेहांची ख्रिस्टी पद्धतीने विल्लेवाट लावण्याची कामगिरी देण्यात आली आर्थर आणि त्याचा मिञ टायगर होम्स हे दिवसभर ते काम करताना गप्पा मारत असत थॉमस कँडी साहेबाने शिकवलेले नवे मराठी शब्द आर्थर टायगरला सांगत असे त्यातच त्याला मृतदेहाला कलेवर म्हणतात हे कळलं रोजच्या कामात आलेला कटांळा घालवण्यासाठी ते त्या कलेवरांचे खिसे चापपू लागले आणि ते कलेवर कुणाच आहे ते सांगू लागले अस करताना एक दिवस त्यांच्याकडे वेंकटरमणम् सदाशिवप्पा शेट्टी आणि प्रेम सिंग अशा दोंघाचे प्रेतं आली होती. आर्थर म्हणाला की माझं कलेवर वेंकटरमणम् आहे तर टायगर म्हणला की माझं कलेवर प्रेम आहे अश्या रितिने हा संवाद पुढे मिशनर्‍यांमधे लोकप्रिय झाला

आता यापुढे तुम्ही कधी म्हणाल माझ कलेवर प्रेम आहे तर दहावेळा विचार कराल

जय हिंद

(थॉमस कँडी च्या निशेधार्त वरती विरामचिन्हे वापरलेली नाहीत)

Rofl
हपा, सुसाट. इतकं अशुद्ध लिहिणं सोपं नाही...

हपा Lol

कलेवर कलेवर करता करता त्याच दोघांनी कोलावरी डी नावाचा जगप्रसिद्ध काव्य ग्रंथ उदधृत केला पण काळाच्या पोटात तो गड़प झाल्याने श्रेय नामावाली मात्र हुकली कारण त्यांची मराठी मध्ये केलेली सही कोणालाच समजली नाही. अनेक दशका नंतर तो प्रतिभेच्या उत्खनात कोणाच्या तरी हाती गवसला आणि पुन्हा एकदा जगप्रसिद्ध झाला.

धन्यवाद वावे!
हपा Lol , सिमेंटिकली करेक्ट जोक बद्दल पेशल धन्यवाद?

ह्यांना कॉन्व्हेन्ट मधे शिकायला आ़क्षेप आहे की त्या शाळेला तस म्हणायला?

फाईव्ह स्टार हॉटेलची भरभराट होण्याचं कारण विनोदी आहे << +१ हाहा

वहेरी कलेवर हपा >> हे आवडलं .. समजायला दोन - चार सेकंदं लागली. Happy

इतकं अशुद्ध लिहिणं सोपं नाही >> फॉर्वर्ड जर अशुद्ध लिहिला नसेल तर तो फाऊल समजतात

नशिब कलेवर वरून कोलावेरि डी वर नाही पोच ले. >> वरती अज्ञानी यांनी सिक्वल लिहिला आहे

Pages