भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत महत्वाची बातमी
शेअर करा आणि सर्वांना पाठवा

लक्षात ठेवा की भारतातील बहुतेक मृत्यू उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराच्या झटक्याने होतात.
तुमच्या घरातील अशा अनेक लोकांना तुम्ही ओळखत असाल ज्यांचे वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढले आहे.
अनेक बड्या अमेरिकन कंपन्या भारतातील हृदयरुग्णांना अब्जावधी रुपयांची औषधे विकत आहेत.
पण तुम्हाला काही त्रास झाला तर डॉक्टर तुम्हाला अँजिओप्लास्टी करायला सांगतील.
या ऑपरेशनमध्ये, डॉक्टर हृदयाच्या नळीमध्ये स्टेंट नावाचा स्प्रिंग घालतात.
हा स्टेंट यूएसमध्ये बनवला जातो आणि त्याची उत्पादन किंमत फक्त 3 डॉलर (150-180 रुपये) आहे.
हे स्टेंट भारतात आणून तीन ते पाच लाख रुपयांना विकले जातात आणि तुम्हाला लुटले जाते.
डॉक्टरांना लाखो रुपयांचे कमिशन मिळते म्हणून त्यांना अनेकदा अँजिओप्लास्टी करण्यास सांगितले जाते.
कोलेस्ट्रॉल, बीपी किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचे मुख्य कारण अँजिओप्लास्टी ऑपरेशन आहे.
ते कधीही कोणासाठी यशस्वी होत नाही.
कारण डॉक्टर हृदयाच्या नळीत जो स्प्रिंग टाकतात तो पेनच्या स्प्रिंगसारखा असतो.
काही महिन्यांत, स्प्रिंगच्या दोन्ही बाजूंना ब्लॉकेज (कोलेस्टेरॉल आणि चरबी) जमा होऊ लागतात.
यानंतर दुसरा हृदयविकाराचा झटका येतो.
डॉक्टरांनी पुन्हा अँजिओप्लास्टी करा असे सांगितले आहे.
लाखो रुपये लुटले जातात आणि त्यात आपला जीव जातो.

आता वाचा
त्याचे आयुर्वेदिक उपचार

आल्याचा रस -
ते रक्त पातळ करते.
हे नैसर्गिकरित्या 90% वेदना कमी करते.

लसूण रस
यामध्ये असलेले एलिसिन तत्व कोलेस्ट्रॉल आणि बीपी कमी करते.
जे हार्ट ब्लॉकेज उघडते.

लिंबू सरबत
त्यातील अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम रक्त शुद्ध करतात.
यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

सफरचंद व्हिनेगर
यामध्ये 90 प्रकारचे तत्व असतात जे शरीराच्या सर्व नसा उघडतात, पोट साफ करतात आणि थकवा दूर करतात.

ही देशी औषधे
अशा प्रकारे वापरा

1- एक कप लिंबाचा रस घ्या;
२- एक कप आल्याचा रस घ्या;
3- एक कप लसणाचा रस घ्या;
4-एक कप सफरचंद सायडर व्हिनेगर घ्या;

चारही मिक्स करा आणि मंद आचेवर गरम करा, 3 कप राहिल्यावर ते थंड करा
आणि आता त्यात
3 कप मध घाला. आणि औषध काचेच्या बाटलीत ठेवा.

हे औषध 3 चमचे रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या.
सर्व ब्लॉक काढले जातील.

मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की हा संदेश जास्तीत जास्त पसरवा जेणेकरून प्रत्येकजण या घरातील देशी औषधाने स्वतःला बरे करू शकेल; धन्यवाद

फक्त संध्याकाळचा विचार करा
संध्याकाळचे ७:२५ वाजले आहेत आणि तू एकटीच घरी जात आहेस.
अशा परिस्थितीत, छातीत तीव्र अचानक तीक्ष्ण वेदना होते, जी तुमच्या खांद्यावरून हातातून जाते.
वरील जबड्यापर्यंत पोहोचते.

तुम्ही तुमच्या घरापर्यंत सर्वात जवळच्या हॉस्पिटलपासून 5 मैल अंतरावर आहात आणि दुर्दैवाने तुम्ही तिथे पोहोचू शकाल की नाही हे ही तुम्हाला माहीत नाही.

तुम्ही ह्याCPR मध्ये प्रशिक्षित आहात पण ते कसे वापरायचे हे तुम्हाला शिकवले जात नाही..(CPR=छातीवर दोन्ही तळहात ठेवून 10 मिनिटे सतत दाब देणे.)

हृदयविकाराचा झटका कसा टाळायचा
त्या साठी हा उपाय

हृदयविकाराच्या झटक्या दरम्यान बहुतेक लोक एकटे असल्याने, त्यांना कोणत्याही मदतीशिवाय श्वास घेण्यास त्रास होतो.
असे घडत असते, असे घडू शकते. ते बेहोश होऊ लागतात आणि
तुमच्या हातात फक्त 10 सेकंद असतात.
अशा परिस्थितीत, पीडित व्यक्ती जोरात खोकून खोकून स्वतःला सामान्य ठेवू शकते. झटका
प्रत्येक खोकल्यापूर्वी घेतले पाहिजे
आणि खोकला इतका मजबूत आहे की,
छातीतून थुंकणे प्रक्रिया होते.
मदत येईपर्यंत
दोन सेकंदांसाठी ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा.
हृदयाचे ठोके सामान्य असल्यास नंतर जा
चला करूया
जोरदार श्वास घेणे
ऑक्सिजन निर्माण करतो,
आणि तीव्र खोकला होतो की
ज्यामुळे हृदय आकुंचन पावते व
नियमित रक्त परिसंचरण (blood circulation)
हलवत आहे.

कृपया हा संदेश शक्य तितक्या सर्वांपर्यंत पोहोचवा. हा मेसेज प्रत्येकाने १० जणांना पाठवला तर एखाद्याचा जीव वाचू शकतो, असेही हृदयाच्या डॉक्टरांनी
( हार्ट स्पेशलिस्ट )सांगितले.

तुम्हाला सर्वात जास्त विनंती आहे
मजेशीर चित्रे पाठवण्याऐवजी
नक्की हा संदेश सर्वांना पाठवा
कुणाचा तरी जीव वाचवा.

मलाही एका मित्राने पाठवले
आता तुमची पाळी आहे SAVE LIFE .
सार्वजनिक हिताचे हे प्रसारण.

हा मेसेज 3 ग्रुपवर पाठवण्याचा प्रयत्न करा. सर्व अक्षरे उघडतील आणि तुम्हाला तुमचे नाव लिहिलेले दिसेल
हा विनोद नाही पण त्याची जादू तुम्हाला थक्क करेल.

हे खोकून खरंच हार्ट अटॅक ट्रॅफिक मधून हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत लांबवता येतो का?कोणी ओळखीच्याने ट्राय करून पाहिले आहे का?(गंमत नाही खरंच विचारतेय)

>> खोकून खरंच हार्ट अटॅक ट्रॅफिक मधून हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत लांबवता येतो का?

नाही. हे मिथक आहे. ह्र्दयविकाराचा झटका आल्यावर खोकून वगैरे लांबवता येत नाही. Cough CPR हे केवळ इंटरनेट मिथक आहे आणि ते १९९९ पासून नेटवर फिरत आहे:
https://en.wikipedia.org/wiki/Cough_CPR
https://www.bhf.org.uk/informationsupport/heart-matters-magazine/medical...

ज्या माणसाने सीपीआर दिला जात असताना पाहिला असेल तो असले मूर्ख संदेश फॉरवर्ड करणार नाही. बरगड्या तुटू शकण्याची शक्यता असते एवढ्या जोरात प्रेस केले जाते सीपीआर मध्ये. खोकून काय होणार आहे?

@मी_अनु : कमेंट तुम्हाला उद्देशून नाही. ही पोस्ट वाचून संताप आला.

>>>>>बरगड्या तुटू शकण्याची शक्यता असते एवढ्या जोरात प्रेस केले जाते सीपीआर मध्ये.
खरे आहे.
आमच्या गिनी पिगला लो बीपी झालेले व त्याला ताबडतोब हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट केलेले. तेव्हा रात्रभर तो होता तिथे. त्यावेळी डोक्टरांनी विचारले होते की त्याला वेळ पडल्यास सीपीआर द्यायचा का नाही? कारण बरगडी तुडण्याची शक्यता असते Sad आम्ही नाही म्हटले होते की नका देउ सीपीआर.
तो त्या प्रसंगातून सही सलामत बाहेर पडला वगैरे वेगळा किस्सा आहे.

*हिन्दू*

"हिंदू' शब्द 'सिंधु' शब्दाVचा अरबी अपभ्रंश आहे.असे आपल्याला आता
पर्यंत सांगितले गेले आहे-वास्तविक
"हिन्दू' हा शब्द- "हीनं दुष्यति इति
हिन्दूः।"
म्हणजे-
'जो अज्ञान आणि हीनतेचा त्याग करतो,'
त्याला हिन्दू म्हणतात'.
'हिन्दू' हा शब्द अनन्त वर्षांचा प्राचीन असलेला मूळ संस्कृत शब्द आहे.
या संस्कृत शब्दाचा सन्धीविग्रह केल्यास तो हीन+दू=हीन भावना+पासून दूर असलेला,मुक्त असलेला तो हिन्दू होय
आणि आपल्याला हे वारंवार खोटे सांगून फसविले जात होते की,'सिन्धूचे अपभ्रंशित रूप म्हणजे हिन्दू' हा शब्द आपल्याला मोगलांनी दिला.
खरे म्हणजे 'हिन्दू' या शब्दाची उत्पत्ती 'वेदकाळा पासून आणि वेदातूनच झालेली आहे.म्हणून हिन्दू हा शब्द कुठून आला आणि त्याची उत्पत्ती कशी झाली हे अवश्य जाणून घेऊयात.कारण
गेली कित्त्येक वर्षं असा भ्रम पसरविला गेलाय की,'हिन्दू' हा शब्द 'सिन्धू' या फारसी शब्दापासून निर्माण झालाय.खरे म्हणजे हे धादान्त असत्य आहे.
आपल्या 'वेद' आणि 'पुराणात'ही 'हिन्दू' या शब्दाचा उल्लेख सापडतो.
आज आपण 'हिन्दू' या शब्दाची उत्पत्ती कशी झाली ते पाहूयात.
'बृहस्पति अग्यम'(ऋग्वेद)मध्ये हिन्दू शब्दाचा उल्लेख असा आलेला आहे.
“हिमलयं समारभ्य यावत इन्दुसरोवरं।
तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते।l"
म्हणजे-
'हिमालयापासून इन्दू सरोवरा(हिन्दी महासागर)पर्यन्त ईश्वर निर्मित राष्ट्र म्हणजे हिन्दुस्थान('हिन्दूं'चे स्थान)होय.
केवळ 'वेदांत'च नव्हे,पण 'शैव' ग्रंथातही 'हिन्दू' शब्दाचा उल्लेख असा आलेला आढळतो-
"हीनं च दूष्यतेव्,हिन्दुरित्युच्च ते प्रिये।”
म्हणजेच-"जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो तो हिन्दू होय."
कमीअधिक प्रमाणात असाच श्लोक 'कल्पद्रुमा'तही आढळतो-
"हीनं दुष्यति इति हिन्दूः।”
म्हणजे-
"जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो त्याला हिन्दू म्हटले जाते."
"पारिजात हरण"या संस्कृत नाटकात हिन्दूंचा असा उल्लेख आलेला आढळतो-
"हिनस्ति तपसा पापां,दैहिकां दुष्टं।
हेतिभिः शत्रु वर्गंच,स हिन्दुर्भिधियते।।”
म्हणजे-
"जो आपल्या तप:सामर्थ्याने शत्रू,दुष्ट आणि पापाचा नाश करतो,तो हिन्दू होय."
"माधव दिग्विजय,"मध्ये हिन्दू या शब्दाचा असा उल्लेख केला गेलाय-
“ओंकारमन्त्रमूलाढ्य,पुनर्जन्म द्रढ़ाश्य:।
गौभक्तो भारत:,गरुर्हिन्दुर्हिंसन दूषकः।।"
म्हणजे-
"जोॐ काराला ईश्वर रचित रचना मानतो,ज्याची पुनर्जन्म आणि कर्मसिद्धान्त यावर श्रद्धा आहे,जो गौ पालन करतो आणि वाईटाला दूर ठेवतो,
तो हिन्दू आहे."
केवळ एव्हढेच नव्हे,तर आपल्या
ऋग्वेदात(८:२:४१)विवहिन्दू नावाच्या अति पराक्रमी आणि दानी राजाचे वर्णन आलेले आहे,ज्याने ४६००० गाईंचे दान केल्याचा उल्लेख आहे आणि 'ऋग्वेद मंडला'तही त्याचा उल्लेख येतो.
"हिनस्तु दुरिताम्।"
'वाईटाला दूर सारण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आणि सनातन धर्माचे पालन पोषण करणारे हिन्दूच
आहेत.'

*ही महत्वाची माहिती वाचून फक्त स्वत: जवळच ठेऊ नका, तर ती वाचून आपल्या सगळ्या समूहांत शुद्ध मराठीत अग्रेषीत (forward) करा. सामायिक (share) करा.'
साभार
@अप्पा पाध्ये गोळवलकर;
गोळवली; कोंकण.

हिमलयं समारभ्य यावत इन्दुसरोवरं - ही भाषा ऋग्वेदाची वाटत नाही. त्यामानाने आधुनिक संस्कृत वाटते. बाकी संदर्भही खरे आहेत का तपासायला हवे.

हिमलयं समारभ्य यावत इन्दुसरोवरं - ही भाषा ऋग्वेदाची वाटत नाही. त्यामानाने आधुनिक संस्कृत वाटते. बाकी संदर्भही खरे आहेत का तपासायला हवे.
+१

*खानदानी आजार, एकत्र कुटुंब पद्धती, नोबेल प्राईज आणि मी*
काही आजार किंवा विकार जेनेटिक असतात, काही परिस्थितीजन्य असतात, काही मागितलेले असतात, तर काही बोलावलेले असतात.
*आज मी जे मांडणार आहे त्यासाठी मला नोबेल प्राईझ मिळायला हरकत नाही.*
आमचे कुटुंब आधीच खूप मोठे, त्यात आता ते अंतरखंडीय झाले आहे. अगदी चीन, जपान, युरोप, इंग्लंड, पंजाब, हरयाणा, बंगाल, गुजराथ, कर्नाटक, आंध्र, सगळी कडच्या सुना, जावई, वहिन्या, मेव्हणे आहेत. त्यामुळे आयुष्यभरात खूप पाहायला मिळाले, कुतूहल, चौकसपणा आणि प्रत्येक गोष्टीचा चिकित्सक पद्धतीने विचार करणे हा स्थायीभाव. त्यातूनच बरेचसे कार्य हातून घडले.
माझ्या आजीच्या भावाचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. पाचव्या पिढीतही ते चालूच आहे. पण आंतरजातीय प्रपोज लग्नेही झालेली आहेत.
अगदी वसुधैव कुटुंब आहे.

तर या सगळ्यातून जो निष्कर्ष निघत आहे तो असा. एकत्र कुटुंबात वाढलेल्यांना फक्त त्या खानदानातीलच रोग होतात. तर विभक्त कुटुंबात दोन्ही कडचे रोग होतात.
एकत्र कुटुंबात सासूच्या हाताखाली स्वयंपाक शिकत सुना त्या खानदानाच्या पद्धतीने स्वैपाक करायला शिकतात आणि मग ते त्यांच्या अंगवळणी पडते.
तर विभक्त कुटुंबात आईकडे शिकलेल्या पद्धतीने स्वयपाक होतो आणि माहेरचे रोगही त्या कुटुंबात होऊ लागतात.
स्वयपाक, उत्सव साजरे करण्याच्या पद्धती, पारंपारिक सोहळे, भौगोलिक अन्नधान्ये वगैरे. अगदी साधे वरणचाचेच उदाहरण घ्या. हिंग कुकर लावायच्या आधी घातला आणि नंतर घातला तरी चव बदलते.
कोणाकडे भातातही मीठ टाकतात. हो खरे आहे ते.

सरकारी नोकऱ्या, किंवा मोठ्या कंपन्यात नोकरी लागल्यावर बदल्या होतात. मग एकत्र कुटुंबातील व्यक्ती नव्या नवरीसह दुसऱ्या गावी जाते. मग तिथे ती सासूच्या ऐवजी आपल्या माहेरच्या आवडत्या किंवा सवईच्या पद्धतीने किंवा आजकाल आईला फोनवर विचारत विचारत स्वैपाक करते.
थोडक्यात काय तर स्वैपाक, सण साजरा करायच्या पद्धती आणि पारंपारिक पद्धती या खानदानी रोगांना कारणीभूत ठरतात.
कोणाकडे मधुमेह असतो तर कोणाकडे हार्टट्रबल, तर कोणाकडे कर्करोग. कोणाकडे हगवण तर कोणाकडे बद्धकोष्ठ.
कोणाकडे आजोळहून किडनीस्टोन येतो तर कोणाच्या आजोळकडून हार्टट्रबल जातो.
लहानपणी ज्यांचे दात किडतात त्यांना हार्टट्रबल असतो. एक अख्खे खानदान असे आहे कि त्यात एक व्यक्ती सोडून कोणीच साठच्या वर जगलेला नाही. सगळे हार्टअटॅकने जातात. तेही साठीच्या आधी. कोणीच पेन्शन घेत नाहीत.
अशाच एका मित्राकडे गेलो होतो. नुकतेच त्याचे बायपासचे ऑपरेशन झाले होते. त्यांचा खानदानी हार्टसर्जनही होता.
अचानक त्याच्या बायकोच्या दातांकडे लक्ष गेले. अतिशय सुंदर दात होते. मुलाचेही तसेच होते. विचारले, तर कळले कि दोघांचेही दात कधीच किडले नव्हते.
मित्राला म्हटले झाले तुमच्या खानदानातील रोग इथे संपला. वहिनी खुश. लगेच आणखी एक चहा आला. आता लहानमुलांचे दात किडणे हा आहाराचाच भाग असू शकतो ना?

सध्या हा आजार होऊ नये तो आजार होऊ नये म्हणून हे करा ते करा असे वाचायला मिळत असते. ते सगळे करत बसले तर चोवीस तास पुरणार नाहीत.
मग खाण्यासाठी कमावणार कधी?

त्यापेक्षा आपल्या घरचे आजार कोणते. ते पहा. एकत्र कुटुंबात मोठे झालेले नसाल तर आईच्या किंवा बायकोच्या माहेरचे रोग कोणते आहेत ते बघा. जमल्यास स्वय्पाकाच्या पद्धतीत, आवडीनिवडीत काय फरक आहे ते बघा.
असे संशोधन केल्यास नवीन रोगांचे घरात आगमन न होता. आहेत ते सुद्धा टाळता येतील.

एका मधुमेह होणाऱ्या जातीतील मित्राला मधुमेह झाला. तर त्याची काकू म्हणाली, "काहीतरीच काय? आपल्यात मधुमेह होत नाही."
याचे वडील बिहारमधून नोकरी साठी नागपूरला आले. तेथीलच एका मुलीशी त्यांचे लग्न झाले. पण ती कोकणातून वऱ्हाडात आलेल्या कुटुंबातील आणि त्यांच्या कडे मधुमेह सर्रास.
कोकणात पदार्थात खोबरे घालतात, वऱ्हाडात गुळ. बिहार मध्ये काय घालतात विचारायला हवे. अशा रीतीने जर खानदानी रोग होण्याचे कारण शोधले तर बहुतेक रोगांचा नायनाट होईल.
डॉक्टर, आहार तज्ञ वगैरे मंडळींनी यावर संशोधन करावे आणि शोधावे. अर्थात आता सजातीय लग्ने झालेली मंडळी भेटणेही कठीण आहे म्हणा पण गावागावात शोधता येईल.
जर्मन लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण खूप आहे. तसेच कोकणस्थ मंडळीन मध्येही आहे. तुर्की मुसलमान आणि कोकणी मुसलमान यांच्यातही खूप साम्य आहे.
प्रत्येकाने असा तौलनिक अभ्यास आपापल्या घरांपुरता केला आणि मांडला तरी आहारात थोडेसे बदल करून बरेचसे रोग टाळता येतील. करा पाहू सुरवात.
झाले कि सांगा, म्हणजे मी नोबेल मिळवायला पात्र होईन. खूप पैसे असतात म्हणे. मग मला माझे संशोधन आणखी जोरात करता येईल.

कर्करोगाची भीती बाळगू नका. त्यावर पुढील लेखात. तसेच सध्या लहान मुलांना आणि म्हाताऱ्यांना अति चोम्बाळल्याने आणि सांभाळण्यामुळे, विशेषतः करोना काळात, बरेच मेंदू विषयक प्रश्न निर्माण झाले आहेत.
त्यावरही लिहायचे आहे. लिहीन लवकरच.

*धनंजय केशव केळकर*
गोरेगाव पूर्व, मुंबई.
9833410231 whatsapp and google pay
9819526756 additional number

अर्धा MSG भोंदू आहे अर्धा खरा आहे.

घरा जवळ ज्यांचा व्यवसाय आहे,घराजवळ च ज्यांच्या नोकऱ्या आहेत ही कुटुंब खूप मोठ्या घरात एकदम आरामात एकत्र राहू शकतात..प्रत्येकाची privecy जपून.
आणि अशी कुटुंब सर्वात सुखी असतात...
मानसिक सुख असल्या मुळे रोग होण्याचे काहीच कारण नाही.
झाला तरी खूप उत्तम व्यवस्था होते .
अती श्रीमंत कुटुंब ह्या मध्ये नोकरी करणारे येत नाहीत.
मुंबई ,पुणे सारख्या मोठ्या शहरात स्वतःसाठी building उभी करतात.
आणि एकत्र राहतात.
ही पण सर्वात सुखी कुटुंब..
आता सामान्य .
नवरा एका ठिकाणी कामाला बायको वेगळ्याच ठिकाणी.
तूट पुंजा पगार.
ही लोक नेहमी टेंशन मध्ये असतात आणि अनेक आजाराला बळी पडतात.
घरात दीन च व्यक्ती एक आजारी पडला तर सर्व कुटुंब बरबाद होते.

गजरा का माळावा ? त्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे ? याची छान माहिती जरूर वाचा.

स्त्री चेआरोग्य सांभाळतो गजरा.

गजरा हा "old fashioned" आहे म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का ?...

गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रीया आजही रोज गजरा माळल्या शिवाय नोकरीला जात नाहीत.

'गजरा - सौंदर्य' या दोहोंमधील संबंध सर्वश्रुत आहेच. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. पण निसर्गात पाहिल तर मोगरा, चाफा, बकुळी यांना बहर आला आहे. काळजी आहे निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातचं केली गेली आहे हे लक्षात येतय का ?

आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो. मन शांत करतो. अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच.

स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते. दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या 'pituitary gland' च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वहात असतात. त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते. गजरा, किंवा फुलांचा वास नाकाद्वारे आपण जेव्हा घेतो, त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते, शिवाय ग्रंथी चे कार्य व्यवस्थित रहाण्यास मदत होते. परिणामी स्त्रीयांच्या आरोग्यामधील संतुलन रहाण्यास मदत होते..

मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे. स्त्रीयांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो. शिवाय गजरा करायच्या पध्दती पाहिल्या तर त्या पण "concentration", "moto development" करणाऱ्याच आहेत. परदेशातील बाक थेरपी, अरोमा थेरपी या काय आहेत. फुलांच्या वर आधारित चिकित्साच आहेत.

पण कसंय... घर की मुर्गी....

भरगच्च पैसे देऊन पाश्च्यात्यां प्रमाणे अरोमा थेरपी घेऊ पण भारतीय पद्धती प्रमाणे गजरा माळून घेतल्यावर "old fashioned" म्हणवून घेण्यात लाज का वाटून घ्यावी ?

Lol

स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते. >>> हे परफेक्ट आहे. शी इज सो हॉट वगैरे म्हणतात ते उगाच नाही. "तेरा आना भी गरमियोंकी लू है" असे ज्यु/सी बच्चन कजरारे मधे म्हणतात ते यामुळेच. ते गाणेही मूळचे "गजरारे" असे गजर्‍याची तारीफ करणारे होते. पाश्चात्यांच्या प्रभावाखाली येउन ते आपण कजरारे केले.

परदेशातील बाक थेरपी >>> ओह मला वाटले हे म्हणजे भारतातून लोकांना परदेशात पाठवल्यावर प्रोजेक्ट मिळेपर्यंत जे करतात त्याचे नाव आहे Happy

फा Lol

फारएण्ड Rofl
पूर्वी राजे-सरदार किंवा साधे रसिकसुद्धा 'मुजरा' बघायला जाताना मनगटावर 'गजरा' घालत तेही हा हॉटनेस सुसह्य़ करण्यासाठी घालत असावेत.

फा Lol

“ 'मुजरा' बघायला जाताना मनगटावर 'गजरा' घालत तेही हा हॉटनेस सुसह्य़ करण्यासाठी घालत असावेत.” - हे पण जबरी आहे Happy

“ 'मुजरा' बघायला जाताना मनगटावर 'गजरा' घालत तेही हा हॉटनेस सुसह्य़ करण्यासाठी घालत असावेत.” - हे पण जबरी आहे >> Lol टोटली.

Lol , गजरा, कजरा, मुजरा सगळेच...
काही काही पुरुषही हॉट असतात की. त्यांनी ही माळावा गजरा
खरचं बाक थेरपी काय आहे?

Pages