लिट्टी चोखा - एक बिहारी खाद्यप्रकार

Submitted by दिनेश. on 22 December, 2014 - 03:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
माझे केनयातले बिहारी शेजारी, नेट व प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! मस्तच दिसतोय पदार्थ.
दिनेशदा तुमच्या उत्साहाला सलाम

अवांतर ..
काही दिवसांपुर्वीच नेहमीच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर एका दुकानावर 'लिट्टी चोखा' अशी पाटी दिसली आणि मी त्यावर 'काहीही ....' असे जानुच्या(होसुमीया फेम) स्टाईलने प्रतिक्रिया दिली. आता जाऊन बघायला हवे एकदा...

मस्त . फोटो सुंदर. त्या पांढर्‍या पदार्था वर हिरव काय दिसत आहे? मस्त दिसतय. फुगी मिरची का ?

कित्ती निगुतीने करता दिनेशदा Happy
प्रत्येक स्टेप स्पष्ट, लेखन फोटो सारेच अगदी आखीव रेखीव.
किती प्रेम करता तुम्ही स्वयपाक करण्यावर Happy पदार्थ आपणहून मागे लागत असतील तुमच्या, मला करा, मला करा म्हणून Happy

आभार ..

मनीमोहोर.. ते हिरवे आहे ते मिरची उभी कापून त्याचे डिझाईन करण्याचा प्रयत्न केलाय.

अवल, एखादा नवीन शाकाहारी पदार्थ बघितला कि तो करून बघावासा वाटतो, आणि मग त्यानंतर इथे जो प्रतिसाद मिळतो.. त्याचा तर मी कायम भुकेला असतो.
त्या मिरच्यांच्या बियाही भारतातून आणल्या आहेत. मस्त चव आहे त्यांना.

आज नाश्याला मी या लिट्ट्या, कांदा टोमॅटोची मराठी पद्धतीची कोशिंबीर करून, त्यासोबत खाल्ल्या. तश्याही चांगल्या लागल्या.

पाटण्यातील एका लिट्टी चोखा स्टॉलवाल्याने अमिर खानला, बिझिनेस पार्टनर व्हायची ऑफर दिली >>>> हे भारीये. आमीरची ती मुलाखत पाहिली होती तेव्हाच हे काय असतं त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. रेसिपी खूप छान दिलीये. फोटोज सुद्धा छान दिलेत. तेव्हां करून पहायला हरकत नाही, अडचण एकच आहे मूळ चव काय असते याबद्दल पूर्ण अनभिज्ञ आहे, तेव्हां कसं झालंय हे ठरवणं अवघड आहे.

एकदम भारी पदार्थ दिसतोय .... नक्की करुन पाहिन .

दिनेशदा ----पहील्या फोटोत भाता सारखी मुद दिसते आहे ...ते नक्की काय आहे ? ह्या लिट्टी चोखा बरोबर खायचा प्रकार आहे का ?

वीणा,, आपण करू तिच खरी म्हणायची चव. मूळ घटक मिळाले तरच तशी चव येऊ शकेल.

सुहास्य , तो बटाट्याचा चोखा. बटाटा कुस्करून त्यात बा़कीचे घटक मिसळलेत.

एकदमच यम्मी .....दिनेशदा ----तुम्हाला सलाम ....नेहमीच तुम्ही मस्त मस्त प्रयोग करत असता आणी मस्त होतात पदार्थ .....फोटो तर झक्कास च असतात..... लगे रहो ..हम आपके फॉलोअर है..... Happy Happy

दिनेशदा - नॉस्टॅलजिक केलंत Happy गेल्या महिन्यापासून बिट्ट्यांचे बरेच प्रकार आले अन मला ह्या बिट्ट्याची बहीणीची आठवण झाली. मी रांचीत ह्या खालेल्ल्या, अंगीठीतल्या ( शेगडी)! एकदम भारी प्रकार, खास करुन थंडीतला. सत्तु किंवा आलू भरुन करतात. आपल्यापेक्षा त्यांचा सत्तु वेगळा असतो तो जवचा करतात. सत्तु बरोबर आलूचा चोखा अन आलू लिट्टी बरोबर बैगन चोखा! भरावनमध्ये कलौंजी हवीच...
एकदम मस्त, तोंपासू

वाह वाह. मस्तच.
नाम तो सुनाही था. Happy
उडत उडत जिन्नसही ऐकले होते. पण इन डिटेल कृती व फोटो आज पाहिले.
सातुचे पिठ ना, मग मस्तच लागणार. ते आतले सारण (मॉडीफाय प्रकारात) नुसते नाश्त्यासाठी करते मी. सातुचे मुटकुळे. आता हे असे करुन पहायला हवे.

दिनेशदा तुमच्या उत्साहाला ___/\___.

बापरे केवढी कृती, मी वाचूनच अर्धी झाले. Happy

मागे अविनाश बिनीवाले ह्यांनी लिहिलं होतं बहुतेक लीट्टी-चोखाबद्दल लोकसत्तेत.

आभार,
अन्जू मी वेगवेगळी कृती लिहिलिय म्हणून तसे वाटतेय. खरं तर दोन्ही प्रकार एकाचवेळी करता येतात. कांदा, मिरची, आले, लसुण, कोथिंबीर दोन्हीसाठी एकाचवेळी कापता येते. वांगे, टोमॅटो भाजताना लिट्टीचे काम होऊन जाते.

तरीपण दिनेशदा, तुम्ही ग्रेट आहात.

खरंच आता इथे येऊन रेस्टॉरंट काढा, मुंबईत. मी लाईफटाईम मेंबरशीप घेईन.

Pages