१.चिकन लेग पिसेस - ४
२.दही - ३ मोठे चमचे
३.बेसन - २ मोठे चमचे
४.गरम मसाला - १/४ चमचा
५.धनेपूड - १/२ चमचा
६.लाल तिखट - १ चमचा / आवडीनुसार
७.हिरवी मिरची - बारीक वाटून १ चमचा
८.हळद - १ छोटा चमचा
९.मीठ चवीनुसार
१. बेसन भाजून घ्यावे. अगदी खरपूस नको, फक्त रंग बदलेल असे.
२.बेसन आणि दही एका भांड्यात एकत्र करून घ्यावे. त्यातच बाकीचे जिन्नस टाकून एकजीव करून घ्यावेत.
३.चिकन लेग्ज व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावेत , स्कीन असेल तर काढून घ्यावी आणि त्यांना खाचा पाडून घ्यावात जेणेकरून मसाला त्यात मुरेल.
४.मसाला चिकन लेग्ज ना लावून कमीत कमी ३ तास फ्रिज मधे ठेवावे ( फ्रीजर मधे नाही).
५. ३ तासांनंतर एका बटर लावलेल्या ओवन सेफ ट्रे मधे हे मसाला लावलेले पिसेस ठेवावेत.
६.ओवन २२० डिग्रीज वर ५ मिनीटे प्रिहीट करून घ्यावा. मग ट्रे ओवन मधे ठेवावा.
७.२२० डि. वर ५ मिनिटे ठेऊन पुढे १८० डिग्रीज वर २० ते २५ मिनिटे शिजवावेत. अधूनमधून पलटत रहावेत जेणेकरून सर्व बाजूंनी एकसारखा रंग येईल.
७.पुदिना चटणी/ दही कांद्यासोबत खावेत
बेसन जास्त भाजू नये अन्यथा चव बिघडण्याची शक्यता.
चिकन टेंडर असेल तर लवकर शिजेल, पलटताना किती शिजलेय तेही पहावे.
लागणारा वेळ फक्त शिजवण्यासाठी लागणारा वेळ आहे. मसाला मुरवण्याचा वेळ वेगळा आहे आणि जो की जास्त आहे. सो हाताशी वेळ भरपूर असेल तेंव्हाच रेस्पी करावी किंवा दुपारी चिकन मुरवत ठेवून संध्याकाळी कबाब करावे
हे फोटो
दिसतय एक्दम मस्त. मी चिकन खात
दिसतय एक्दम मस्त. मी चिकन खात नाही. पण चव छानच असेल.
वॉव ! कसल सही दिसतय . तुमच्या
वॉव ! कसल सही दिसतय . तुमच्या पाकृ देखणेबल असतात
दक्षिणा धन्यवाद तुमच्या पाकृ
दक्षिणा धन्यवाद
देखणेबल पाकृ जास्त खाणेबल वाटतात असं आपलं माझं मत. सो प्रेझेंटेशन छान करणं आवडतं मला.
तुमच्या पाकृ देखणेबल असतात>>> धन्यवाद जाई.
छानच दिसतोय लेग !
छानच दिसतोय लेग !
फक्त चार !!!! नक्की करून
फक्त चार !!!!
नक्की करून बघेन. का कुणास ठाऊक हे कबाब वगैरे प्रकरण मला अजून घरी जमलेले नाहीये.
तों.पा.सु.
तों.पा.सु.
धन्यवाद दिनेश, कविता, नंदिनी
धन्यवाद दिनेश, कविता, नंदिनी
नक्की करून बघा
>>>>फक्त चार !!!! फिदीफिदी नक्की करून बघेन. का कुणास ठाऊक हे कबाब वगैरे प्रकरण मला अजून घरी जमलेले नाहीये.>>>>
कबाब म्हणजे खिम्याचेच असा
कबाब म्हणजे खिम्याचेच असा माझा समज होता.
हे नक्की करुन बघणार.