राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय जनमानस

Submitted by बावरा मन on 16 November, 2014 - 01:37

अशात बघण्यात आणि वाचण्यात आलेले दोन प्रसंग - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना वर्तमान पत्रात कुणी राजकुमारी कौल वारल्याची बातमी वाचण्यात आली . त्यांच्या अंतिम संस्काराला अरुण जेटली , ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर बरेच दिग्गज उपस्थित होते . कोण होत्या या राजकुमारी कौल ? वाचून अनेकाना धक्का बसेल पण दिल्ली च्या राजकारणी वर्तुळात त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'Constant Companion ' म्हणून प्रसिद्ध होत्या . वाजपेयी यांच्यासोबत एका घरात त्या अनेक वर्षांपासून राहात होत्या .ज्या दिवशी कौल वारल्या त्यादिवशी सोनिया गांधी वाजपेयी यांच सांत्वन करायला त्याना भेटल्या . मनमोहन सिंग यांनी पण दूरध्वनी वरून संपर्क साधला . नंतर बदनाम झालेले वाजपेयी यांचे 'मानलेले' जावई रंजन भट्टाचार्य हे कौल यांच्या मुलीचे श्रीमान . Indian Express ने 'Mrs Kaul, Delhi’s most famous unknown other half, passes away' असा मथळा देऊन हि बातमी छापली . वाजपेयी यांनी 'मै कुंवारा हु , ब्रम्हचारी नही ' असे विधान केले होते तरी हे संबंध कायम सर्व सामान्य लोकांसाठी 'under the wraps ' होते किंबहुना जाणून बुजून ठेवण्यात आले होते . अटलजी ची सर्वसामान्य लोकांमध्ये जी प्रतिमा होती ती ढासळू न देण्यासाठी हा खटाटोप होता .

दुसरा प्रसंग - १४ नोव्हे . ला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो . पण त्यादिवशी 'कुजबुज ब्रिगेड ' च्या लोकांनी फेसबुक वर नेहरूंचे सिगरेट शिल्गाव्णारे , मद्याचा चषक हातात असणारे , महिलांसोबत जवळीक दाखवणारे (त्यातले बरेचसे Photo Shopped ) फोटो पसरवायला सुरुवात केली . उद्देश अर्थात नेहरू कसे बदफैली होते हे सिद्ध करण्याचा होता हे उघड होते . पण लेखाचा मुख्य मुद्दा हा नाही . नेहरूंचे सिगारेट पितानाचे फोटो टाकणारे अनेक परिचित स्वतः सिगारेट ओढतात . नेहरूंचे स्त्रियांसोबत फोटो टाकणारे अनेकजण स्त्रियांबद्दल काय 'नजरिया ' बाळगतात हे पण माहित होत . पण त्यांची अपेक्षा नेहरू हे आपले पंतप्रधान होते म्हणून त्यांनी काही गोष्टी करू नये अशी बालिश होती .

राजकारणी हि पण माणस असतात आणि सर्वसामान्य लोकांसारखी स्खलनशील असतात हे भारतीय जनमानस का मान्य करत नाही ? धुम्रपान व मद्यपान ह्या जगातले अनेक लोक सहज करत असणारया गोष्टी पण राजकारण्याना चार चौघात करण्याची मुभा नसावी ? काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेल यांचा एका पार्टी मध्ये हातात कॉकटेल चा ग्लास असणारा फोटो आल्यावर एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने त्यावर गहजब केला होता . म्हणजे वाजपेयी यांनी आजन्म ब्रम्हचारी राहील पाहिजे किंवा कुठल्या मोठ्या पदावरच्या माणसाने धुम्रपान करू नये अशा भाबड्या अपेक्षांचे काय करायचे हा प्रश्न आहे . कुठल्याही नेत्याचे मूल्यमापन करण्याचे निकष काय असावेत ? वैयक्तिक चारित्र्य का तो /ती त्याचे काम किती कुशलतेने करतो हा ? देश अस्थिरतेच्या गर्तेत असताना देशाला एक स्थिर सरकार
देणे असो वा अर्थव्यवस्था वाढीचा वेग वाढवणे ; वाजपेयी यांचे हे कर्तुत्व ते एका महिलेसोबत राहतात यामुळे कमी होईल असे तत्कालीन भाजप नेतृत्वाला का वाटले असावे ? देशात लोकशाही रुजवणे , अनेक मुलभूत बदल घडवणे आणि स्वातंत्र्य लढ्यातल कर्तुत्व हे नेहरूंचे 'तसले ' फोटो टाकल्याने झाकोळून जाइल हा आत्मविश्वास त्यांच्या विरोधकांमध्ये कसा येतो .

बिल क्लिंटन यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष च्या पहिल्या टर्म मध्ये मोनिका लेविन्स्की प्रकरण उघड झाले आणि मोठा गहजब उडाला . पण अमेरिकन जनतेने दुसऱ्यांदा पुन्हा बिल यांना निवडून दिले कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले , अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा दबदबा पुन्हा प्रस्थापित केला . अमेरिकन जनतेने त्यांच्या देश चालवण्याच्या कौशल्याला दिलेली हि दादच होती . त्यासाठी त्यांनी क्लिंटन यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्या 'प्रकरणाकडे ' कानाडोळा' केला . दुटप्पी पणाची मोठी परंपरा असलेल्या आपल्या देशात असे होईल ?

भारतीय नेते पण आपली 'Holier than cow ' अशी प्रतिमा बनावी यासाठी धडपडत करत असतात . आपण धुम्रपान /मद्यपान / सुंदर स्त्रियां सोबतचे छायाचित्र प्रसिद्ध होऊ नये यासाठी त्यांची धडपड चालू असते . बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा एखादा दिलदार नेता त्याला अपवाद . आपले हेनिकेन बीअर चे प्रेम बाळासाहेब यांनी कधी लपवले नाही . त्याना सतत ओढायला पाईप लागायचा . तुमच्या आवडी निवडी बद्दल तुम्ही unapologetic असाल तर तुमचे अनुयायी पण तुम्हाला स्वीकारतात ह्याचे बाळासाहेब ठाकरे हे उदाहरण . पण बहुतांश नेते लोकापवादाला घाबरून राहण्यातच धन्यता मानतात .

राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यात येणार्या स्त्रिया हा विषय राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये चवीने चघळला जाणारा विषय . नेहरू आणि लेडी Mountbatten हे याचे उदाहरण . त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबध होते याची चर्चा आपण चवीने करणे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आपण करत असलेले आक्रमण नाही का ? सध्या मोदींच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा चालू आहे . त्यांनी सोडलेल्या त्यांच्या बायकोपासून ते 'पाठलाग ' करत असणारया स्त्रीपर्यंत अनेक विषयावर चवीने चर्वित चर्वण चालू आहे . हे सगळे जरी खरे आहे असे मानले तरी 'पंतप्रधान ' मोदी यांचे मूल्यमापन करण्याचा हा निकष असू शकतो का ? त्यांचे मूल्यमापन करण्याचा निकष त्यांनी महागाई कशी नियंत्रित केली , परराष्ट्र धोरण कसे राबवले , भ्रष्टाचार कसा नियंत्रित केला हा असायला नको का ? नेत्यांची वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यांच्यात फरक केला पाहिजे असे माझे मत आहे . (एन . डी . तिवारी सारख्या नेत्याला अपवाद ठेवावे काय ?)
अर्थातच हे अवघड आहे . लोकांना मोठ्या लोकांबद्दल आणि एकूणच gossiping करायला आणि ऐकायला आवडत . पण जेंव्हा नेता निवडीची वेळ येते तेंव्हा कुठल्या निकषांना जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे लोकांनी ठरवायचे आहे . राजकारणी हि कितीही तिरस्करणीय जमात बनली असली तरी त्याना एवढा favor भारतीय जनते ने करावा .

(लेखात थोडा preaching चा टोन आला असल्यास क्षमस्व )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखातील भावनेशी सहमत. मागे मी धुम्रपान बंदी करावी असा एक लेख लिहिला होता त्यावर प्रतिक्रिया म्हणून एका सदस्याकडून लगेच नेहरूंचे धुम्रपान करतानाचा फोटो टाकला गेला.

विकृत मानसिकता असणारेच अश्या पध्दतीची कृत्ये करतात. त्याच बरोबर गांधी जयंतीला माथेफिरुचे समर्थन करणारे पोस्टी फिरवणे हे देखील विकृतीच आहे. अश्या लोकांवर सरकारने त्वरीत उपचार चालु करावे.
वाजपेयींच्या खाजगी आयुष्याची कोणत्याही पक्षाने अथवा कोणीही खिल्ली उडवली नाही. पण गांधीद्वेषाने भरलेले माथेफिरु लोक जागोजागी इतर पक्षांच्या पुढार्यांची अत्यंत वाईट पध्दतीने खिल्ली उडवत चुकिचा प्रचार करत फिरतात. मानसिकताच अशी असल्याने त्यांच्या डोक्यात असेच विचार येतात.

बावरा मन आणि दिवाकर देशमुख यांच्याशी सहमत. नेहरू/ गांधी यांचे मोर्फड फोटो सगळीकडे फिरत असतात. वाजपेयी यांच्याबद्दल मात्र सर्वांनी संयम दाखवला आहे. वाजपेयी, मिसेस कौल आणि मिस्टर कौल (हयात असताना) एकत्र राहायचे असे पण मध्यंतरी वाचले आहे. मोठ्या लोकांचे सगळे मोठे aste म्हणतात. मागे एका सायंदैनिकात पंतप्रधान वाजपेयी रोज रात्री अत्यंत माफक प्रमाणात मादिरासेवन करतात असेही वाचले होते. कदाचित याचा उल्ल्केख करणे jaruru नसावे. मात्र एन डी तिवारी यांच्या बाबतीत मात्र असे म्हणता येणार नाही.एका मुलाने तिवारी हे आपले 'बायलॉजिकल फादर' आहेत हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवला मात्र तिवारी खोटे बोलत हे नंतर सिद्ध झाले त्याहूनही पुढची केस म्हणजे ते आंध्राचे राज्यपाल असताना सरकारी निवासात जो बीभत्स गोंधळ (नंगानाच?) केला होता ते मात्र अजिबात समर्थनीय नाही.

सहमत आहे.

खास करून आपल्या देशात भ्रष्टाचारासारखे कृत्य एखाद्या नेत्याने केल्यास, वा तसा आरोप त्यावर झाल्यास, तो कमी प्रतीचा समजला जातो. कदाचित, हे तर काय सारेच करतात, कोण इथे धुतल्या तांदळाचा आहे, तळे राखील तो पाणी चाखेल वगैरे वगैरे अशी त्यामागे भावना त्यामागे असावी ..
पण चारीत्र्यावर शिंतोडे उडणे म्हणजे काहीतरी भयानक असा विचार सामान्य जनमाणसातही असतो, त्यामुळे नेतेही भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यास, अगदी कोर्ट केस झाली तरी पुरेसे निश्चिंत असतात आणि इतर बाबीत मात्र आपले कॅरेक्टर जपत असतात..
हे उलटे आहे आणि घातक आहे..
खरेच बदलाची गरज आहे, ते देखील या नेत्यांनी नाही तर आधी लोकांनी आपले विचार बदलणे गरजेचे आहे.. त्यानुसार नेते आपसूकच बदलतील आणि जे गुण जपणे गरजेचे आहे ते जपतील.

बाम,

बरीच समर्पक निरीक्षणे नोंदवली आहेत तुम्ही. काही मुद्यांवर माझी मतं सांगतो.

१.
>> तुमच्या आवडी निवडी बद्दल तुम्ही unapologetic असाल तर तुमचे अनुयायी पण तुम्हाला स्वीकारतात ह्याचे
>> बाळासाहेब ठाकरे हे उदाहरण . पण बहुतांश नेते लोकापवादाला घाबरून राहण्यातच धन्यता मानतात .

लोकशाही हे याचं मूळ आहे. बहुतांश नेते लोकापवादाला घाबरून असतात कारण त्यांना लोकापवाद मतांवर परिणाम करतील अशी भीती असते. बाळासाहेबांनी अशी फिकीर कधीच केली नाही.

२.
>> नेत्यांची वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यांच्यात फरक केला पाहिजे असे माझे मत आहे .

माझंही हेच मत आहे. पण मला एक अडचण सतावते. नेत्यांच्या राजकीय जीवनावर खरीखुरी टिपणी केल्याने माझी मायबोलीवरील सदस्यनामे रहित झाली आहेत. त्यामुळे कमी धोक्याचा मार्ग म्हणून मी वैयक्तिक हरिद्र काढावीत का?

३.
>> दुटप्पी पणाची मोठी परंपरा असलेल्या आपल्या देशात असे होईल ?

असं झालेलं आहे. १९७७ साली पराभवाच्या गर्तेत फेकलेल्या इंदिरा काँग्रेसला भारतीय मतदारांनी १९८० साली भरघोस बहुमत प्राप्त करवून दिलं. त्यामागे इंदिरा गांधींची राज्य चालवायची क्षमता हा एकमेव निकष होता. भारतीय मतदार बराच प्रगल्भ आहे.

आ.न.,
-गा.पै.

<<बिल क्लिंटन यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष च्या पहिल्या टर्म मध्ये मोनिका लेविन्स्की प्रकरण उघड झाले आणि मोठा गहजब उडाला . पण अमेरिकन जनतेने दुसऱ्यांदा पुन्हा बिल यांना निवडून दिले कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले , अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा दबदबा पुन्हा प्रस्थापित केला . अमेरिकन जनतेने त्यांच्या देश चालवण्याच्या कौशल्याला दिलेली हि दादच होती . त्यासाठी त्यांनी क्लिंटन यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्या 'प्रकरणाकडे ' कानाडोळा' केला . दुटप्पी पणाची मोठी परंपरा असलेल्या आपल्या देशात असे होईल ?>>

ही तुमची fantasy असू शकेल Wink , reality नाहीये.

मोनिका प्रकरण क्लिंटन सेकंड टर्ममध्ये उघडकीला आलं. त्यानंतर क्लिंटन यांनी निवडणुक लढवली नाही. (कायदयानुसार तिसरी टर्म घेता येत नाही). डेमोक्रॅटिक पक्षातर्फे Al Gore यांनी पुढची निवडणुक लढवली व त्यात त्यांचा पराजय झाला. क्लिंटन प्रकरणाचा डेमोक्रॅटिक पक्षाला निवडणुकीत फटका बसला असं नंतर Gore यांनी म्हटलं आणि क्लिंटन यांनी अर्थात ते अमान्य केलं. त्यावेळी क्लिंटन यांना प्रचारातही सहभागी होऊ दिलं नव्हतं फारसं.

बाकी चालू दया. धागा गाजला (तुमच्या आधीच्या one night stand धाग्यासारखा) तर पॉपकॉर्न खात वाचण्यात येईल Happy

कुणीही कुणाच्याही खाजगी आयुष्यात नसती ढवळाढवळ करूं नये, याबद्दल दुमत नसावं. अशी ढवळाढवळ करण्यात कांहीं गैर आहे असं सर्वसाधारणपणे आपल्या देशात कुणाला वाटत नाही, याबद्दलही दुमत नसावं.
पण आपल्या राजकीय नेत्यांच्या बाबतीत मात्र याला दुसरी बाजूही आहे, असं मला जाणवतं. कांहीं नेतेच जेंव्हां स्वतःचं कार्य, कार्यक्षमता व गुणवत्ता यावर भर न देतां भावनिक आवाहनं करुन व्यक्तीपूजेचंच स्तोम माजवतात, तेंव्हा अप्रत्यक्षपणे ते जनतेला त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यावर टीका करायचीही परवानगीच देत असतात. अशा नेत्याना त्यांच्या खाजगी आयुष्यात लोकानी केलेल्या ढवळाढवळीवर आक्षेप घेण्याचा अधिकार रहात नाहीं.

भाऊ-जी नमसकरजी, 'मी- एक चायवाला' या भावनिक आवाहनाबद्दल बोलत असावेत असा माझा समज होऊ घातला आहे. Wink

<नेत्यांच्या राजकीय जीवनावर खरीखुरी टिपणी केल्याने माझी मायबोलीवरील सदस्यनामे रहित झाली आहेत> खरीखुरी? जे काहे इथे लिहिलं होतं ते खरं आहे असा दावा आहे? मग भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळांवरील त्या त्या नेत्यांसंबंधी ती ती खरीखुरी माहिती नोंदवण्यासाठी पावले उचलणे काही कठीण नाही.

<< भाऊ-जी नमसकरजी, 'मी- एक चायवाला' या भावनिक आवाहनाबद्दल बोलत असावेत असा माझा समज होऊ घातला आहे. >> भरतजी मयेकरजी, साफ चूकीचा समज. मीं सर्वसाधारण विधान केलंय व तें करताना सर्वच पक्षातले अनेक नेते- आतांचे व पूर्वीचे- नजरेसमोर होते !
बेफिकीरजी, आपण संदर्भ दिलेला लेख वाचला . त्यावरची प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवत नाही. चालेल ना ?
१] नेहरू व त्यांचं मंत्रीमंडळ एवढंच नव्हे तर त्यावेळचे विरोधी पक्ष नेते, हें सर्व स्वातंत्र्याबरोबरच देशाला मिळालेलं अदभूत असं वरदान होतं, असं माझं ठाम मत आहे.
जे नेहरूंचं आतां चारित्र्यहनन करत असतील, त्यानी नेहरू व त्यांचं मंत्रीमंडळ सुरवातीला दीर्घ काळ देशाला लाभलं नसतं तर देशाची आज काय परिस्थिती असती, याचा सध्याच्या राजकारणाशीं व राजकारण्यांशीं तुलना करून फक्त विचार करावा !
२] लेखातलं "त्याच्या जोडीला नेहरूंना इतिहासजमा करून आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून देशवासीयांच्या मनावर आपली ओळख ठसविण्याची नरेंद्र मोदींची वैयक्तिक महत्त्वाकांक्षाही आहेच" हें मात्र फारच खटकलं; १७ वर्षं पंतप्रधान राहिलेल्या नहरूंवर टीका होतेय म्हणून नाराजीचा सूर लावत असतानाच, कांहीं महिनेच पंतप्रधान म्हणून असलेल्या मोदींवर आत्तांच हेत्वारोप सुरुं करणं हा विरोधाभास नाहीं ?

लोकहो,

>> मग भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळांवरील त्या त्या नेत्यांसंबंधी ती ती खरीखुरी माहिती नोंदवण्यासाठी
>> पावले उचलणे काही कठीण नाही.

त्या लोकांविषयी खरी माहीती लिहिली, तर त्यांना शासकीय संकेतस्थळांवरून हटवावं लागेल!

आ.न.,
-गा.पै.

लोकहो,

त्यां लोकांची काळजी कशासाठी करावी? सत्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे आणि अधिकृत इतिहासात, शासकीय संकेतस्थळावर सत्य माहितीची नोंद होणे हे महत्त्वाचे नाही काय?

आ.ही नाही आणि न.ही नाही
भ.म.

लोकहो,

१.
>> शासकीय संकेतस्थळावर सत्य माहितीची नोंद होणे हे महत्त्वाचे नाही काय?

आहे तर. मात्र संकेतस्थळावर जागा मर्यादित असल्याने वादग्रस्त माहीती टाळण्याकडे कल असतो. तथाकथित नेते इतके बरबटलेले आहेत की शासकीय संकेतस्थळांवर त्यांचा उल्लेखही अप्रतिष्ठेचा होईल.

काही महत्त्वाची माहीती अधिकृत इतिहासात नोंदवली गेली आहेच. उदा. : रिझर्व बँकेच्या एका अधिकृत कागदपत्रात एका विशिष्ट नेत्याने कोणत्या कारणासाठी एक विशिष्ट कृती केली त्याचा ठळक उल्लेख आला आहे.

२.
>> त्यां लोकांची काळजी कशासाठी करावी?

मलाही काळजी करू नये असंच वाटतं. पण आलीया भोगासी...!

त्या लोकांची पोहोच लांबवर आहे. अशा लोकांच्या आग्रहामुळे प्रशासकांना माझं सदस्यत्व रद्द करावं लागलं होतं. मायबोलीबाह्य दडपणे बरीच शक्तिशाली आहेत.

आ.न.,
-गा.पै.

>>>लोकहो<<<

वैवाहिक जीवनातील अबोल्यात पती पत्नी आपल्या मुलांमार्फत एकमेकांशी बोलतात तसे वाटत आहे

Lol

बेफिकीर,

>> वैवाहिक जीवनातील अबोल्यात पती पत्नी आपल्या मुलांमार्फत एकमेकांशी बोलतात तसे वाटत आहे

जाम हसलो हे वाचून.

त्याचं काय आहे की माझं जुनं सदस्यनाम (४०८३३) प्रशासकांनी रद्द केलं होतं. त्यासंबंधात माझी चूक नाही हे त्यांना पटवून दिल्यावर परत सुरू केलं. यामुळे भरत मयेकरांचा चांगलाच जळफळाट झाला. त्यांनी प्रशासकांना औपरोधिक संदेशही टाकला.

bharat_mayekar_jealous.jpg

मयेकरांना माझं इथलं अस्तित्व खटकतं, तर मग त्यांच्याशी थेट बोलून त्रास का द्यायचा! अर्थात, हे वैर मायबोलीपुरतंच मर्यादित आहे. बाहेर कुठे भेटले तर त्यांच्या गळ्यात गळा घालून मी नृत्य करायला तयार आहे. Proud

आ.न.,
-गा.पै.

Lol

डोळ्यासमोर दृष्य आले. गामा आणि मयेकर नाचत नाचत 'आयेगा, आयेगा आनेवाला' च्या चालीवर 'लोकहो, लोकहो अमुचे ऐका' असे गातायत.

त्यासंबंधात माझी चूक नाही हे त्यांना पटवून दिल्यावर परत सुरू केलं. > माफीनामा लिहुन दिल्यावर अशी दुरुस्ती करा गामा आणि त्यानंतर काय काय केले होते ते देखील लिहा.
गिरे तो भी टांग उपर

<<<<<त्या लोकांची पोहोच लांबवर आहे. अशा लोकांच्या आग्रहामुळे प्रशासकांना माझं सदस्यत्व रद्द करावं लागलं होतं. मायबोलीबाह्य दडपणे बरीच शक्तिशाली आहेत.

त्याचं काय आहे की माझं जुनं सदस्यनाम (४०८३३) प्रशासकांनी रद्द केलं होतं. त्यासंबंधात माझी चूक नाही हे त्यांना पटवून दिल्यावर परत सुरू केलं>>>>>

मायबोली प्रशासक उजेड पाडतील का यावर? जर त्यांनी स्पष्ट केलं नाही, तर वर लिहिलेला मजकूर खरा आहे असा समज होईल.

मयेकर जाउ द्या. त्यांना बरे वाटत नाही आहे. अश्यांना एकटे सोडावे. अ‍ॅडमिन योग्य उपचार करतील.

<< राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय जनमानस >> याऐवजीं गा.पैं.च्या आयडीवर चर्चा अडकत्येय इथली !! Wink

<< आजकाल भक्तांना देखील स्वतःचा उदो करायचा शौक लागलेला आहे >> त्यामुळे बुद्धीनिष्ठ नास्तिकांचीही नाकं मुरडायची खाज भागत असली, तर ठीकच आहे ना ! Wink

Pages