राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय जनमानस

Submitted by बावरा मन on 16 November, 2014 - 01:37

अशात बघण्यात आणि वाचण्यात आलेले दोन प्रसंग - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना वर्तमान पत्रात कुणी राजकुमारी कौल वारल्याची बातमी वाचण्यात आली . त्यांच्या अंतिम संस्काराला अरुण जेटली , ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर बरेच दिग्गज उपस्थित होते . कोण होत्या या राजकुमारी कौल ? वाचून अनेकाना धक्का बसेल पण दिल्ली च्या राजकारणी वर्तुळात त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'Constant Companion ' म्हणून प्रसिद्ध होत्या . वाजपेयी यांच्यासोबत एका घरात त्या अनेक वर्षांपासून राहात होत्या .ज्या दिवशी कौल वारल्या त्यादिवशी सोनिया गांधी वाजपेयी यांच सांत्वन करायला त्याना भेटल्या . मनमोहन सिंग यांनी पण दूरध्वनी वरून संपर्क साधला . नंतर बदनाम झालेले वाजपेयी यांचे 'मानलेले' जावई रंजन भट्टाचार्य हे कौल यांच्या मुलीचे श्रीमान . Indian Express ने 'Mrs Kaul, Delhi’s most famous unknown other half, passes away' असा मथळा देऊन हि बातमी छापली . वाजपेयी यांनी 'मै कुंवारा हु , ब्रम्हचारी नही ' असे विधान केले होते तरी हे संबंध कायम सर्व सामान्य लोकांसाठी 'under the wraps ' होते किंबहुना जाणून बुजून ठेवण्यात आले होते . अटलजी ची सर्वसामान्य लोकांमध्ये जी प्रतिमा होती ती ढासळू न देण्यासाठी हा खटाटोप होता .

दुसरा प्रसंग - १४ नोव्हे . ला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो . पण त्यादिवशी 'कुजबुज ब्रिगेड ' च्या लोकांनी फेसबुक वर नेहरूंचे सिगरेट शिल्गाव्णारे , मद्याचा चषक हातात असणारे , महिलांसोबत जवळीक दाखवणारे (त्यातले बरेचसे Photo Shopped ) फोटो पसरवायला सुरुवात केली . उद्देश अर्थात नेहरू कसे बदफैली होते हे सिद्ध करण्याचा होता हे उघड होते . पण लेखाचा मुख्य मुद्दा हा नाही . नेहरूंचे सिगारेट पितानाचे फोटो टाकणारे अनेक परिचित स्वतः सिगारेट ओढतात . नेहरूंचे स्त्रियांसोबत फोटो टाकणारे अनेकजण स्त्रियांबद्दल काय 'नजरिया ' बाळगतात हे पण माहित होत . पण त्यांची अपेक्षा नेहरू हे आपले पंतप्रधान होते म्हणून त्यांनी काही गोष्टी करू नये अशी बालिश होती .

राजकारणी हि पण माणस असतात आणि सर्वसामान्य लोकांसारखी स्खलनशील असतात हे भारतीय जनमानस का मान्य करत नाही ? धुम्रपान व मद्यपान ह्या जगातले अनेक लोक सहज करत असणारया गोष्टी पण राजकारण्याना चार चौघात करण्याची मुभा नसावी ? काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेल यांचा एका पार्टी मध्ये हातात कॉकटेल चा ग्लास असणारा फोटो आल्यावर एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने त्यावर गहजब केला होता . म्हणजे वाजपेयी यांनी आजन्म ब्रम्हचारी राहील पाहिजे किंवा कुठल्या मोठ्या पदावरच्या माणसाने धुम्रपान करू नये अशा भाबड्या अपेक्षांचे काय करायचे हा प्रश्न आहे . कुठल्याही नेत्याचे मूल्यमापन करण्याचे निकष काय असावेत ? वैयक्तिक चारित्र्य का तो /ती त्याचे काम किती कुशलतेने करतो हा ? देश अस्थिरतेच्या गर्तेत असताना देशाला एक स्थिर सरकार
देणे असो वा अर्थव्यवस्था वाढीचा वेग वाढवणे ; वाजपेयी यांचे हे कर्तुत्व ते एका महिलेसोबत राहतात यामुळे कमी होईल असे तत्कालीन भाजप नेतृत्वाला का वाटले असावे ? देशात लोकशाही रुजवणे , अनेक मुलभूत बदल घडवणे आणि स्वातंत्र्य लढ्यातल कर्तुत्व हे नेहरूंचे 'तसले ' फोटो टाकल्याने झाकोळून जाइल हा आत्मविश्वास त्यांच्या विरोधकांमध्ये कसा येतो .

बिल क्लिंटन यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष च्या पहिल्या टर्म मध्ये मोनिका लेविन्स्की प्रकरण उघड झाले आणि मोठा गहजब उडाला . पण अमेरिकन जनतेने दुसऱ्यांदा पुन्हा बिल यांना निवडून दिले कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले , अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा दबदबा पुन्हा प्रस्थापित केला . अमेरिकन जनतेने त्यांच्या देश चालवण्याच्या कौशल्याला दिलेली हि दादच होती . त्यासाठी त्यांनी क्लिंटन यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्या 'प्रकरणाकडे ' कानाडोळा' केला . दुटप्पी पणाची मोठी परंपरा असलेल्या आपल्या देशात असे होईल ?

भारतीय नेते पण आपली 'Holier than cow ' अशी प्रतिमा बनावी यासाठी धडपडत करत असतात . आपण धुम्रपान /मद्यपान / सुंदर स्त्रियां सोबतचे छायाचित्र प्रसिद्ध होऊ नये यासाठी त्यांची धडपड चालू असते . बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा एखादा दिलदार नेता त्याला अपवाद . आपले हेनिकेन बीअर चे प्रेम बाळासाहेब यांनी कधी लपवले नाही . त्याना सतत ओढायला पाईप लागायचा . तुमच्या आवडी निवडी बद्दल तुम्ही unapologetic असाल तर तुमचे अनुयायी पण तुम्हाला स्वीकारतात ह्याचे बाळासाहेब ठाकरे हे उदाहरण . पण बहुतांश नेते लोकापवादाला घाबरून राहण्यातच धन्यता मानतात .

राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यात येणार्या स्त्रिया हा विषय राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये चवीने चघळला जाणारा विषय . नेहरू आणि लेडी Mountbatten हे याचे उदाहरण . त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबध होते याची चर्चा आपण चवीने करणे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आपण करत असलेले आक्रमण नाही का ? सध्या मोदींच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा चालू आहे . त्यांनी सोडलेल्या त्यांच्या बायकोपासून ते 'पाठलाग ' करत असणारया स्त्रीपर्यंत अनेक विषयावर चवीने चर्वित चर्वण चालू आहे . हे सगळे जरी खरे आहे असे मानले तरी 'पंतप्रधान ' मोदी यांचे मूल्यमापन करण्याचा हा निकष असू शकतो का ? त्यांचे मूल्यमापन करण्याचा निकष त्यांनी महागाई कशी नियंत्रित केली , परराष्ट्र धोरण कसे राबवले , भ्रष्टाचार कसा नियंत्रित केला हा असायला नको का ? नेत्यांची वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यांच्यात फरक केला पाहिजे असे माझे मत आहे . (एन . डी . तिवारी सारख्या नेत्याला अपवाद ठेवावे काय ?)
अर्थातच हे अवघड आहे . लोकांना मोठ्या लोकांबद्दल आणि एकूणच gossiping करायला आणि ऐकायला आवडत . पण जेंव्हा नेता निवडीची वेळ येते तेंव्हा कुठल्या निकषांना जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे लोकांनी ठरवायचे आहे . राजकारणी हि कितीही तिरस्करणीय जमात बनली असली तरी त्याना एवढा favor भारतीय जनते ने करावा .

(लेखात थोडा preaching चा टोन आला असल्यास क्षमस्व )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो,

>> मायबोली प्रशासक उजेड पाडतील का यावर? जर त्यांनी स्पष्ट केलं नाही, तर वर लिहिलेला मजकूर खरा आहे असा
>> समज होईल.

खरेखोटे कसे ओळखावे हे लोकांचं लोकं पाहून घेतील. श्री भरत मयेकर यांनी लक्ष घालायची जरुरी नाही.

तसंही पाहता माझं जुनं नाम (४०८३३) पुनरुज्जीवित झालेलं ते सुमारे वर्षभरापूर्वी (ऑक्टोबर २०१३). त्याची तक्रार भरत मयेकरांनी ऑगस्ट २०१४ मध्ये केली. याला सूडबुद्धी नाहीतर काय म्हणायचं?

आ.न.,
-गा.पै.

श्री. गामा पैलवान यांची सदस्यत्वे का रद्द करण्यात आली यावर जाहीर चर्चा
घडवून आणावी. वा त्यांची सदस्यनामे सन्मानपूर्वक परत चालू करावीत.

२. जोवर वरील क्रमांक १ मधील काम होत नाही तोवर खरेदी थांबवावी. खरेदी
केली असेल आणि पैसे भरले नसतील तर ती रद्द करावी. अगदी सवलतीच्या दारात
असेल तरीही खरेदी करू नये. आपण जो त्याग करणार आहात तो योग्य कारणासाठीच
खर्ची पडतो आहे.

३. हे संपत्र मायबोलीवरील आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवावे. तसेच
मराठीतील इतर स्थळांवर (मिपा, ऐअ, मीम, इत्यादि) आवर्जून पाठवावे.
फेसबुकावरही न्यावे, जेणेकरून कम्युनिस्ट राज्यपद्धती कशी चालते ते जगाला
दिसून येईल.

----
वरील पत्र कोणी लिहिले होते जरा स्पष्ट होईल का?

@दिवाकर देशमुख
तुम्हाला आठ आठवड्यात, इथली बरिच माहीती आहे, असे दिसतेय.

पण ते तुमचे सदस्यनाव काही सुट होत नाही तुम्हाला, त्याऐवजी 'जामोप्या' किंव्हा 'उदयन.. असा एकादा आयडी घ्या.

किरण, शांताराम, जोशी, शेखर- नंदु ग्रेटथिंकर , समिक्षक असे बरेच नाव घेता येईल
बाकी तुमचा आयडी तुम्हाला शोभुन दिसतोय Wink

बाकी गामा पळाले वाटते Wink त्यांचे डुआयडी उतरलेत वाचुन

बाकी तुमचा आयडी तुम्हाला शोभुन दिसतोय
<<
<<
अगदि, अगदि, कारण हा आमचा वरिजनल आयडी हाय! डुपलिकेट नाय काय.

बाकी बोल कुणाला मिर्ची कुणाला समजले
<<
<<
त्याच कस हाय ते मागच्या पानावर नाय काय 'भरत मयेकरांच्या' या पोस्ट नंतर त्यांच्यावतीने तुम्ही आणि 'काउ' या दोन दिवसाच्या आयडीने बोलायला सुरवात केली तसेच असतय हे.

बाकी बोल कुणाला मिर्ची कुणाला समजले

दिदे,

तुम्ही वर लिहिलेल्या घटनेनंतर प्रशासकांची आणि माझी दिलजमाई झालेली आहे. माझं सदस्यत्व रद्द करायचं का चालू ठेवायचं ते मी आणि प्रशासक पाहून घेऊ. कुण्या कंट्रीथोबड्या वा कंट्रीचोंबड्याने त्यात लक्ष घालायची जरुरी नाही.

आ.न.,
-गा.पै.

बोल कुणाला मिर्ची कुणाला

.......

मायबोलिच्या भाषेत ही म्हण अशी आहे..

ठासली कुणाची आणि दुखलं कुणाचं

Pages