"इट्स ओके ! हो जाता है यार" .... पण इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2014 - 06:04

"इट्स ओके ! हो जाता है यार" .... पण इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली !

डिसक्लेमर - घटनेतील सर्व नावे बदलली आहेत.

नायक = रुपेश. आमच्या ऑफिसमधील एक अविवाहीत पण कमिटेड कर्मचारी. गर्लफ्रेंड आहे आणि प्रेमप्रकरण सिरीअस आहे.
नायिका = हेमांगी. आमच्याच ऑफिसमधील महिला कर्मचारी. विवाहीत आहे. विवाहाला ४-५ वर्षे झालीत. एक लहान मुलगी आहे.
नायक-नायिका संबंध = निखळ मैत्री !

रुपेश आणि हेमांगी हे केवळ मित्र नव्हते तर त्यांची जोडीच होती. दोघांचे कामाचे डिपार्टमेंट एकच आणि बसण्याच्या जागा गप्पांच्या अंतरावर म्हणून सतत त्यांची आपसात बडबड चालूच असायची. जेवायला जायचे असो वा अ‍ॅडमिन डिपार्टमेंटमध्ये कामाला जायचे असो दोघेही एकत्रच दिसायचे. त्यांच्यातील मैत्री किती घनिष्ट होती हे सांगायला आता किस्से रंगवत बसत नाही मात्र कॉर्पोरेट लाईफमधील सारे शिष्टाचार पाळूनही टिकलेल्या त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटावा अशी जोडी. त्याचबरोबर आपण मित्र असलो तरी स्त्री-पुरुष भिन्न लिंगाचे आहोत याची जाण ठेऊन त्या मर्यादा पाळून असलेली मैत्री.

हेमांगीने महिन्याभरापूर्वी जॉब बदलला आणि जोडी तुटली. यात रुपेशचे मात्र वांधे झाले. आधी सतत कामाचे आठ तास हेमांगीबरोबरच जोडी बनवून फिरत असलेला रुपेश आता अचानक एकटा पडल्यासारखा झाला. आम्हा इतरही ऑफिस कर्मचार्‍यांचा ग्रूप होताच आणि त्या पातळीवर तो आमच्यात कम्फर्टेबलही होताच, पण हक्काचा असा मित्र असतो तो गेल्याने त्याला गर्दीतही एकटे एकटे वाटणे साहजिकच होते. हेमांगीबरोबर फोनवरून त्याचा थोडाबहुत संवाद साधला जात असेलही पण नेहमीचे जवळ दिसणारे सवयीचे माणूस गेले होते. त्यामुळे आता नव्याने सवय होईपर्यंत निदान ऑफिसचा आठ-नऊ तासांचा वेळ त्याला खायला उठत होता.

अश्यातच हेमांगी आणि रुपेशची एका सुट्टीच्या संध्याकाळी मॉलमध्ये फिरताना अनपेक्षितपणे भेट झाली. रुपेशबरोबर त्याची गर्लफ्रेंड रुपाली होती तर हेमांगीबरोबरही तिचा नवरा हिमेश होता. अचानक दोघांचा आमनासामना झाल्याने रुपेशने आनंदाच्या भरात अनवधानाने हेमांगीला हलकेसे आलिंगन दिले (Hug केले). या आधी खरे तर ऑफिसमध्येही त्याने कधी असा प्रकार केला नव्हता ना कधी करायचा विचारही केला असावा. अगदी सहजच घडावे तसे घडले आणि लगेच तो दूरही सरला. मात्र आपण काहीतरी वेगळे केलेय, काहीतरी लिमिट क्रॉस केलेय, ते देखील हेमांगीचा नवरा तिच्याबरोबर असताना असे वाटल्याने तितक्याच पटकन तो सॉरी देखील म्हणाला. प्रसंगावधान राखत त्याच्या गर्लफ्रेंड रुपालीने, "इट्स ओके ! हो जाता है यार ..." म्हणत त्याच्या मनावरचा ताण आणि अपराधीपणाची भावना दूर सारत विषय संपवून टाकायचा प्रयत्न केला. मात्र जे व्हायचे ते घडून गेले होते. त्यानंतर तिथे आणखी काही रामायण महाभारत घडले नाही. अवघडलेल्या अवस्थेतच त्यांची ती भेट संपून दोन्ही जोड्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

पुढे जे घडले त्याला अपेक्षित म्हणावे वा दुर्दैवी वा धक्कादायक हे मी वाचकांवरच सोडतो. पण त्यानंतर दोघांची मैत्री तिथेच संपली. रुपेशच्या गर्लफ्रेंडने म्हटलेले "हो जाता है यार.." हे तेवढ्यापुरतेच नसून तिने तसेच या प्रकाराला फारसे महत्व देणे गरजेचे समजले नाही. कदाचित या आधीही रुपेशने आपल्या मैत्रीची कल्पना रोजच्या किस्स्यांकहाण्यांमधून तिला दिली असावी. मात्र हेमांगीने आपल्या नवर्‍याला ऑफिसमधील मित्राची काय किती कल्पना दिली होती हे तिलाच ठाऊक. पण तिच्या नवर्‍याला मात्र त्या दिवशीचा प्रकार पाहता त्यांची मैत्री रुचली नाही. परिणामी हेमांगीने रुपेशला तसे स्पष्टपणे सांगून त्याच्याशी संपर्क आणि मैत्रीचा संबंध कायमचा तोडून टाकला. आपल्या फेसबूकलिस्टमधूनही त्याला हटवत ब्लॉक करणे यावरून याची गंभीरता लक्षात यावी. आणि ती तशी रुपेशच्या लक्षात आल्याने त्यानेही मग आपल्या मैत्रीणीला त्रास होईल असे न वागण्याचे ठरवत स्वताहून पुन्हा येनेकेन प्रकारे कसलेही संबंध जोडण्याचे प्रयत्न पुढे रेटले नाहीत.

यापुढे रुपेशच्या आयुष्यात अजूनही मैत्रीणी येतील, मात्र हेमांगीच्या आयुष्यात यापुढे कधीही पुरुष कर्मचार्‍यासोबत मैत्रीचेच काय साधे ओळखीचेही पाऊल पुढे टाकले जाणार नाही. रुपेशच्या गर्लफ्रेंडने कितीही "इट्स ओके ! हो जाता है यार" म्हटले असले आणि तशीच वागली असली, तरी इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली होती एवढे मात्र खरे !

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफि, त्या टिंबाला काय म्हणतात? काहीतरी शब्द आहे. मी शाळेत शिकले होते पण आता विसरलेय. Uhoh

हेमांगीसाठी फार वाईट वाटले.

मात्र हेमांगीच्या आयुष्यात यापुढे कधीही पुरुष कर्मचार्‍यासोबत मैत्रीचेच काय साधे ओळखीचेही पाऊल पुढे टाकले जाणार नाही

मैत्री तोडायला लावणारा नवरा यापुढे ताकही फुंकुन पिणार, त्यामुळे यापुढे हेमांगी पुरुष कर्मचार्‍यासोबत मैत्री करणार नाही ही शक्यता वाटते.

धन्यवाद बेफ़िकीर आणि अग्निपंख.
या धाग्याच्या निमित्ताने एक नवीन गोष्ट समजली. (मित्राने अशी मीठी मारू नये ही नव्हे तर 'बेफ़िकीर' हे अचुक कसे लिहावे ही)

हायला, आम्ही आमच्या स्वतःच्याच बायकोला गेली

तीन वर्षे मिठी मारली नव्हती

दिनेशदांच्या प्रतिसादाला उत्तर देत असल्याने ते अवांतर होणार नाही इथे.

दिनेशदा, हे पण पहा ने गंडण्याची शक्यता खूप आहे. कुणाला किरणोत्सर्गाचा त्रास झालाय ते फक्त पहा. तुम्हाला हवे ते मिळून जाईल.

Personally घेऊ नका पण हा जो रुपेश आहे तो तुम्हीच आहात की काय अशी शंका माझ्या डोक्यात आली. त्या रुपेशला जर अॉफिसमध्ये फारसे मित्र नव्हते तर त्याने ही एवढी खाजगी बाब तुम्हाला कशी सांगितली? And if you are truly his friend then you are not being a good friend here. I think it's a very personal matter not to be shared on a public platform with 50k+ readership. If I was Roopesh I would have felt extremely betrayed by your act.

धमाल चालू आहे! हे कोणीतरी विरंगुळामध्ये हलवा बघू!

रुन्मेष म्ह्णजेच तुमचा_अभिषेक आयडी ना?

माझ्या कित्येक वर्षापासून मैत्री असलेल्या डॉक्टर मित्राने बर्याच दिवसांनी भेटल्यावर मला घट्ट मिठी मारली त्यानंतर माझ्या बायकोला हलकीशी मिठी मारली. त्याची बायको पण तेथेच होती. पुढे
-
-
-
-
-
-
-
-
-
-
पुढे काहीच झाले नाही. आमची मैत्री अजून उत्तम टिकून आहे.
कारण त्या मिठीत फक्त आपसातील प्रेम भाव होता. केवळ भिन्न लिंगी असल्यामुळे काहीही होत नाही.आपल्या मनात कली असेल तर आपल्याला सर्व गोष्टी संशयास्पद वाटतात. मलाही काहीही वाटले नाही त्याच्या बायकोलाहि नाही. आंतरिक उमलणे याने होणारी हि नैसर्गिक गोष्ट आहे. यात कसला अर्थ आणी अनर्थ काढता?

सुबोध खरे, ग्रेट सर.
हा ग्रेटनेस सर्वांकडेच असता तर क्या बात !

जिज्ञासा,
या अनुभवातील रुपेश मी नाहीये. तसे बघायला गेले तर तो माझा खास जवळचा मित्रही नाहीये, वा फारसा लांबचाही नाहीये.

a public platform with 50k+ readership. यातील 50k म्हणजे ५० हजार असेल तर या आकड्यावर माझा विश्वास नाही. पुढील प्लस च्या जागी मायनसचे चिन्ह टाकले तर योग्य राहील. Happy

तरीही मुंबईत एवढ्या कंपन्या असताना तो रुपेश नक्की कोण हे कोणीही पटकन ओळखू शकणार नाही. मी स्वता आतापर्यंत सतरा ठिकाणी नोकरी धरली आहे त्यामुळे हा किस्सा नक्की कोणत्या कंपनीतला इथपासून शोधणे सुरू होईल. गेल्या आठवड्याभरात मला इथे चार जणांनी तीन वेगवेगळ्या नावांनी पुकारले आहे, ते पाहता लोकांना मी कोण आहे इथपासून शोधमोहीम हाती घ्यायची आहे. एकंदरीत रुपेश कोण आहे इसका पता लगाना नामुमकीन नही पर बहौत मुश्कील आहे. सो, ते बेसिकली कोणी शोधायलाच जाणार नाही. त्यामुळे मी काहीही प्रायव्हसी ओपन केली नाही असे म्हणू शकतो. तर वर्तमानपत्रातील एक सदर वाचल्यासारखे हे वाचा. पण हि घटना खरी आहे यावर विश्वास ठेवा. आपला विश्वास हाच चर्चेचा आधार !

नंदिनी <<मुळात आपल्या आजूबाजूला काम करणार्‍या लोकांबद्दल असं गॉसिपिंग करणं हेच चुकीचं नाही का? भलेही नाव बदललेलं असू देत.>>

<< लोकांच्या भानगडीमध्ये लक्ष खुपसायचंच आणि गॉसिपिंग करायचं. >>
http://www.maayboli.com/node/2060

वरच्या लिंकमध्ये उघडणारा धागा "चटपटीत गॉसिप - हा तर इथे करू या आपण गॉसिप.." हा धागा नंदिनी यांचाच आहे. ते देखील नाव न बदलता गॉसिपिंग. Uhoh

आयर्नी आयरनी म्हणतात ते हेच का तो काही वेगळा फंडा आहे. Wink

ऋन्मेऽऽष, फेसबुकवर मायबोलीचे ९३,५११ followers आहेत. सदस्य नसले तरी लोकं मायबोलीवरचे बरेचसे धागे वाचूच शकतात. तेव्हा माझा आकडा फारसा चुकला नसावा. अर्थात अजून कोणाला खात्रीशीर माहिती असेल तर योग्य आकडा सांगावा.
आणि प्रश्न माझ्या विश्वासाचा नाहीच आहे! तुमच्या मित्राने तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाचा आहे. तुम्ही तुमच्या या मित्राला सांगून त्याच्या परवानगीने इथे हा किस्सा लिहिला असेल तर मग काहीच प्रश्न नाही. पण उद्या माझ्या मित्र/मैत्रिणीने माझ्या बाबतीत घडलेले किस्से असे परस्पर सार्वजनिक फोरमवर लिहिले तर मला आवडणार नाही. जरी माझी ओळख गुप्त राहिली तरी. I still think it is none of your business. Sorry if I sound harsh but that's my honest opinion.

जिज्ञासा,
आपण आपले मत मांडू शकता, जर ते प्रामाणिक असेल तर त्यात हार्श वगैरे काही नसते.
मला स्वताला या सर्वाची शक्यता शून्य वाटल्यावरच मी हे लिहिलेय याच्याशी मी प्रामाणिक आहे.

या जगात प्रायव्हसी अशी बाकी काही नसते. असा एखादा ऑफिसमधील किस्सा आपण आपल्या घरच्यांशी वा इतर शाळा-कॉलेज ग्रूपमधील मित्रांशी अगदी नाव घेऊनही शेअर करतो. अगदी सहज आणि प्रायव्हसी, विश्वास वगैरेंचा विचारही न करता. तिथून तो आणखी पुढे कुठे किती लोकांपर्यंत जातो हे देखील मग आपल्याला ठाऊक नसते. असो, हि माझी विचार करण्याची पद्धत झाली.

अवांतर - फेसबूकवर ९३ हजार आकडा असणे वेगळे आणि हा धागा ५० हजारांनी वाचणे वेगळे. असो, तो विषय नाहीच आहे, फक्त आकड्याची दाहकता कमी करायला लिहिले होते.

मला असे वाटते आहे की हेमांगीच्या काय तिच्या नवऱ्याच्या आयुष्यातसुद्धा यापुढे कधीही पुरुष कर्मचार्‍यासोबत मैत्रीचेच काय साधे ओळखीचेही पाऊल पुढे टाकले जाणार नाही.

आपल्याच बायकोला आपल्यासमोर मिठी मारणारे हे पुरुष उद्या आपले मित्र म्हणून घरी आले तर काय घ्या....

मला तर वाटते आहे की त्या दोघांनीही आता बहुदा वर्क फ्रॉम होम सुरु केले असावे

हेमांगीने स्वतः (नवर्याच्या सांगण्याशिवाय ) मैत्री तोडली असू शकेल कारण तिला स्वतःला ते पटले नसेल - हा एक मतप्रवाह प्रतिसादांमध्ये आहे. पण त्याची शक्यता कमी वाटते. ती त्याला पूर्वीपासून ओळखते. त्याने पूर्वी कधी असे केले नाही. खूप दिवसांनी भेटल्यामुळे अव्क्वर्द मिठी मारली गेली. माफी मागितली. जर तिला स्वतःला हे पटले नसते तर ती "पुन्हा असे होवू नये" असे सांगून मैत्री चालू ठेवू शकली असती. तसेही ते रोज रोज बोलत व भेटत थोडेच होते.
असुरक्षित नवरा हेच कारण असण्याची जास्त शक्यता वाटते. खरे खोटे हेमांगी व तिचा नवरा जाने.

<<<< घनिष्ठ असलेली मैत्री अशी एका ओझरत्या मिठीमुळे आणि त्यानंतर निर्माण होणार्‍या तथाकथीत वादळामुठे तुटत असेल तर ती मैत्री म्हणावी का? >>>>>

मला वाटते, ती मैत्री त्या मिठीमुळे नाही तर ती नवर्याला आवडणार नाही म्हणून संपली. नवरा किंवा मित्र यापैकी तिने नवरा निवडला. अर्थात ते बरोबरच आहे. पण मला वाटते मैत्रीच्या घानिष्टतेचा ईथे काही संबंध नाही. केवळ नवर्याला आवडत नाही म्हणून माहेरच्या माणसांशी संबंध तोडावे लागण्याची उदाहरणे आहेत. याचा अर्थ ती नाती तकलादू होती असा नाही.

<<<< सारः- स्त्री-पुरुषात मैत्रीचे नाते असूच शकत नाही. तसे आढळल्यास त्याला कृत्रीम नाते मानावे. अशा नात्यात कधीही नैसर्गिकपणा उसळण्याची अतीव संभावना असते. >>>>>

असहमत. अश्या नात्यात समलिंगी मैत्रीसारखी शारीरिक सहजता असणार नाही, पण मैत्रीच असू शकणार नाही असे नाही. आकर्षणाची सुद्धा शक्यता आहे पण त्यामुळे मैत्रीच असू शकणार नाही असे कसे म्हणता येयील?

गुळ झाला आता काय पाक होणार काय? >>>>> की नुसतीच मळी निघतीय? पाक नको, नाहीतर चिक्की बनवावी लागेल, आणी चिक्की बनली तर खाणार कोण? चिक्कीने दात चिकटतील. पण एक फायदा आहे. चिक्कीने दात चिकटले तर मौन व्रत धारण करावे लागेल, अनायसे श्रावण सुटताना उपास पण होतील. बायकोने चिक्की खाली तर नवर्‍याला बरे वाटेल, नाहीतर व्हाईस व्हर्सा.

गुळाच्या पाकाच्या नवीन रेसेपी इथे टाकल्यास, नियम आडवे येतील.:फिदी:

ऋन्मेष जाऊ दे, तो रुपेश आणी ती हेमान्गी सुखात असतील तिकडे, (आपापल्या घरी) नका एवढा विचार करु.( आणी आम्हालाही करायला लावु नका, आम्हाला अजून ऊसाचा रस आणी पाती याचे काय होईल याचा विचार पडलाय)

केवळ नवर्याला आवडत नाही म्हणून माहेरच्या माणसांशी संबंध तोडावे लागण्याची उदाहरणे आहेत.

>>>>>>>>

राजेश,
नेमके मुद्द्यावर बोट ठेवलेत आपण !

Pages