बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुलावाबरोबर गोड जिलबी किंवा गुलाबजाम किंवा मूगडाळहलवा किंवा बुंदीजामून किंवा रसगुल्ले.

दाल माखनी कर, पचतंय की नाही, चालतंय की नाही, आडवा हात मारायचा की नाही हे ज्येना ठरवतील.

रच्याकने, दाल माखनी असेल तर टोमॅटो सार कशाला किंवा उलट टोसा असेल तर दामा कशाला.. त्यापेक्षा एखादा फरसाण आयटम जमेल का/ आवडेल का/ चालेल का?

फरसाण आयटम म्हणजे तळण.. माझ्यात पेशन्स नाही गं. तुला माहितीये ना माझ्या घराची रचना. किचन म्हणजे आधीच भट्टी झालेली असते.

समजा दामाऐवजी मग दुसरी काही भाजी करू का?
खरंतर मला कापु, टोसा, पसॉ आणि गोड हे एवढेच बरे वाटते आहे. थोडक्यात आणि व्यवस्थित होईल परत सर्व गोष्टी मी अनेकदा केलेल्या असल्याने चुकायची धास्ती नाही. पण एका व्हॉअ‍ॅ ग्रुपात हे काय वेगळी भाजी नाही? अमुक नाही? तमुक नाही? इत्यादीमुळे पिअरप्रेशर येऊन दामा अ‍ॅडली होती मेनूत.

पीअर प्रेशर तुम्ही कधीपासून घेऊ लागलात? Wink

पसॉ हे मी लक्षातच घेतले नाही. अजून फरसाणाची गरज नाही. कापु, टोसा, पसॉ आणि गोड हा उत्तम मेनू आहे, तेव्हा एवढेच कर.

फार तर एखादी कोशिंबीर, सलाड, दह्यातलं रायतं तत्सम पदार्थ कर जोडीला. तेवढंच पान पण भरेल आणि फार कटकट होणार नाही. शिवाय हेल्दी Wink

हा सलाड/ कोशिंबीर/ रायते काहीतरी ठेवते बरोबर.
धन्स मंजू, आशू, वरदा.

गोडाबद्दल पणशीकर, फडके, रघुनाथ इत्यादींकडे काय बरे मिळेल त्याची चाचपणी करते जरा.
चितळे किंवा काका हलवाई या लेव्हलला नसतील ही पार्लेकर दुकाने तर पिताश्री वैतागतील... Happy

पार्ल्यात रुची, जसवंत, कराचिवाला, बृजवासी, स्वीट बेंगाल वगैरेही आहेत त्यांच्याकडेही करा चाचपणी Proud

जसवंतच्या बंगाली मिठाया बेस्ट असतात. त्यांच्या बाकी मिठायाही छानच असतात.

काका हलवाई आणि चितळ्यांच्या मिठाया खाल्ल्यावर फडके, रघुवीर ? निराशा करण्याची दाट शक्यता आहे Wink जसवंत आणि रुची ट्राय करण्याचे करावे Happy

नी, काश्मिरी पुलाव कसा करतात? त्याची रेसिपी इथेच माबोवर आहे की तुझी स्पेशल रेसिपी आहे?
इथे रेसिपी नसल्यास माझ्या विपूत टाकशील का प्रिटी प्लीज विथ शुगर ऑन टॉप? Happy

माझी रेसिपी माबोवर टाकली होती मी एकदा पण उडवली. जरा उत्खनन करून बघते कुठे सेव्ह करून ठेवलीये का ते.
बीएमएम ने प्रसिद्ध केलेले एक मॉम्ज किचन म्हणून पुस्तक आहे त्यातली रेसिपी मी मुळात फॉलो करायचे मग त्यात थोडे बदल केले होते.
उद्यापर्यंत टाकते विपुत.

फॅमिली दिवाळी डिनर ठरवतेय. मारवाडी, साउदी, मराठी असे साधारण १० -१२ लोक आहेत. मला सुट्टी नाहिये. बाई आहे पण तिला पार्टीसाठी "एंड टु एंड' काही सांगण्याची हिंमत माझ्यात नाही अन स्वतः खुप करण्याची पण. ती पोळ्या करु शकेल, मदत करेल. थोडं घरी करेन अन थोडं बाहेरनं मागवता येईल. पण सगळं बाहेरनं मागवणार नाही कारण मग " पर्सनल फील" निघुन जाईल.

तर काय करु? मला दिवाळीला तरी अगदी मोजके ३-४ पदार्थ ठेवायला आवडत नाही. "दिवाळी/ फेस्टिव्ह" फील असायला हवा.

बिर्याणी, भाज्या, स्वीट बाहेरून मागवता येईल. घरी पोळ्या / पराठे, रायता, स्टार्टर, सूप बनवता येईल. सलाद ऑप्शनल.

माझ्याकडे 'गेम नाईट' ठेवली आहे २ आठवड्यात. सध्या सालसा, ग्वाकामोले, चिप्स, मोझरेला आणी चेरी टोमॅटो सलाड,मिनी दाबेली स्टार्टर म्हणुन सुचतेय. सुटसुटीत आणी जरा मराठी टच असेल असे मेन कोर्स प्रकार सुचवा. येणारे पाहुणे सगळे मराठी/गुज्जु १२ जणं आहेत (मुले नाहीत). शुक्रवारी पार्टी असल्याने ऑफीस सांभाळुन मेनु आखायचा आहे. पेय प्रकार नवरा करणार आहे. धन्यवाद!

मिसळ विचार करत होते पण मग दाबेली पण अजुन ब्रेड प्रकार आहे...त्यातही 'झणझणीत' प्रकार फारसे न झेपणारे २/३ जण आहेत.

अल्पनाची रेसिपी आहे नं "अमृतसरी छोले" ते स्लो कुकरला केले तर ऑफिसमध्ये असताना पण शिजत राहतील. किंवा नेहमीप्रमाणे शिजवून. पण मिसळ नको असेल तर कदाचीत हा पर्याय तुम्हाला चालेल का माहित नाही. सोबतीला फ्रोजन नान घेऊ शकता. रच्याकने ही रेसिपी मी झणझणीत करत नाही कारण मुलं आणि मी फार तिखट खाऊ शकत नाही.

जर दाबेली एवजी पापडी चाट,ढोकळा ठेवले तर पावभाजी,पुलाव करता येइल, पावभाजी आदल्यादिवशी बनवता येइल, पाव एन्वेळेस गरम करता येतील, ग्रिडल असेल तर एका वेळेस ८ पाव होतील,
पुलाव साठी भाज्या आणी ता.न्दुळ सगळ एकत्र परतून ठेवायच, एनवेळेस राइस कुकर ला लावले की झाल..

मागच्या एका पॉटलक बिर्याणी-रायता,पापडिचाट्,ढोकळा,दाबेली,वेज-क्रिम्चिज रोल्,कोबिच्या वड्या असा मेनु होता आवडला सगळ्या.ना!

धन्यवाद प्राजक्ता, वेका आणी शूम्पी. दाबेली ऑन डिमांड आहे. सध्या तरी पनीर टिक्का पिटा सँड्विच, वेज दम बिर्याणी, रायता ठरतेय. गोडात गाजर हलवा, ड्बल चॉकॉलेट ब्राउनी विथ वॅनीला आईस्क्रीम.

हे पोस्ट असंच :).

सालाबादाप्रमाणे शनिवारी घरी दिवाळीची पार्टी आहे. म्हणून मेन्यू असा :-

१. चिकन मसाला विंग्ज.
२. दहीवडा.
३. कोथिंबीर वडी.
४. ड्राय मंचुरिअन.
५. मिरची वडा.
६. कच्छी दाबेली.
७. छोटे उत्तपे व चटणी.

गोड - फिरनी, गुलाब जाम.

मेन कोर्स - बटर चिकन, व्हेज मुघलाई, प्लेन राईस.

नताशा, बाहेरून भाज्या मागवणार असलीस तर

पनीर (सर्वांना) आवडत असल्यास पनीरची ग्रेव्हीवाली एक भाजी, दुसरी स्टर फ्राय प्रकारातली भाजी (बेबी कॉर्न कॅप्सिकम, भेंडी फ्राय किंवा तत्सम)
पनीर नको असेल तर मग व्हेज हंडी टाईप भाजी.
बिर्याणी
गुलाबजाम / जिलबी

हे सर्व बाहेरून

घरी
मिक्स रायता (काकडी - टोमॅटो - कांदा) - हे बिर्याणीबरोबर आले तर मग बुंदी रायता किंवा पचडी
पापड, कुरडया, मिरगुंडं वगैरे अगोदर तळून किंवा बाईकडून तळून घेता येईल. तळण नको तर आलू टिक्की. ढोकळा
सूप - व्हेज क्लियर, मांचाऊ, टोमॅटो, स्वीटकॉर्न इत्यादीं आवडीनुसार निवडून त्यापैकी कोणतीही २. (तयार पाकिटे आणून जास्त सोपे होईल.)
फुलके / पोळ्या
दाल तडका (हवे असल्यास. काहींना डाळ नसेल तर जेवण अपूर्ण वाटतं)
लोणचं

कट फ्रूट्स् (ऑप्शनल, आफ्टर डिनर) - आधी चिरून फ्रीजात ढकलून आयत्यावेळी.
आईसक्रीम.

विडा (तयार) (आवडत असल्यास)

संपदा, नो रोट/पुरी/ पोळी का?

व्हेज मेन्यु वाचूनच मला सर्लप झालं jibh dakhavanari.gif
(मी बटर चिकन ऐवजी बटर पनीर इमॅजिन केलं Proud )

Pages