मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सातवीला की सहावीला चंदन कविता होती. माझी आवडती.
माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिहणे झिजणे
उणे लिंपायला माझे करी सुगंधाचे लेणे

तसंच मन वढाय वढाय, धीवर पक्षी, खोपा, ई. अजुनही पाठ आहेत. अगदी पहिलीच्या फुलपाखरु, केळीच्या बागा मामाच्या, चिव चिव चिव रे सुद्धा.

आजकालच्या सोकॉल्ड चकचकीत कव्हर असलेल्या बालपुस्तकांना अजिबात तसा वास येत नाही.>>>
बालभारतीच्या पुस्तकांचा तो वास बहुतेक जो डिंक / गोंद वापरायचे त्याचा असावा, (नक्की माहित नाही, कदाचित छपाई चा पण असु शकतो), चक्चकीत पानांचा वास लै घाणेरडा वाटतो बुवा, (डिंक वापरत नाहीत तरी, स्टेपल असतात बहुतेक पुस्तकं हल्ली)

अरे धड्यांची चर्चा आहे नाहीका.तर स्नेही, बोलावणं आल्याशिवाय नाही, ४ थीत एक चंदु बोर्डे चा धडा होता तो, विसरभोळा गोकुळ, आणि वर उल्लेखलेले बरेच होते.

पाचवीतली इंग्रजीची पहिलीच कविता:
Solomon Grundy,
Born on a Monday,
Christened on Tuesday,
Married on Wednesday,
Took ill on Thursday,
Worse on Friday,
Died on Saturday,
Buried on Sunday.
This is the end
Of Solomon Grundy.
आणि नंतर जॅक अँड जील, लेझी मेरी विल यु गेट अप वै. वै.

मराठीतः घाल घाल पिंगा वार्‍या, खबरदार जर टाच मारुनि जाल पुढे चिंधड्या...

संत गाडगेबाबांवर पण एक धडा होता.

एक कुठला तरी धडा आठवत नाहीये......घरात चोरी होते...नवरा बायको रेडिओ गेला सांगतात....एक जण विचारतो कुठल्या कंपनीचा रेडिओ तर नवरा बोलतो सिलोन...लोकं हसतात...मग चिडलेला नवरा म्हण्तो हसताय काय सिलोन कंपनीचा रेडिओ नसतो? ......
अशक्य भारी धडा होता

मला,
The Wooden Bridge Hotel
Kidnapped
The Golden Harp
Tenali Rama
Esop
Mahabaleshwar
हे सर्व धडे इंग्रजि चे आठ्वतात. ई. ८ वीचे बहुधा.

अनू, चोरी झालीच नाही. सातवीला होता.
आम्ही त्यावर नाटुकलं सादर केलेलं. आजही शाळेतले फ्रेण्ड्स भेटलो की ते आठवुन आठवुन हसतो

अनिश्का. ताई,
मी पण मराठी मिडियम ला होतो. के नारखेडे विद्यालय भुसावळ. १० वी, १९९५ साली पास झालो. त्यानंतर १० चा अभ्यासक्रम बदलला. वरील सर्व इंग्रजीतले धडे आठवले, ते ही इतक्या वर्षां नंतर.
मराठीत एक ब्रुहंलागुलाचार्य नावाचा धडा होता. एक वाघ पैसा खातो मग त्याचे पोट दुखते वगैरे...


ना.सी.फडक्यांचा एक टीपिकल, व्यवच्छेदक इ.इ..ललित निबंधही आठवतो, त्यांना दाढी करताना सगळ्या कल्पना सुचतात असा काहीतरी.
<<< त्या धड्याचे नाव 'काळे केस'.

भाउ साहेब की आण्णा की आप्पासाहेबांचा मुलगा युद्धामधे शहीद होतो तर ते सर्वांना ओरडतात की तो शहीद झालाय रडता कसले...आजारपणात युद्धाच्या बतम्या ऐकत ते बरे होउ लागतात....
एक दिवस रेडिओवर बातमी आली युद्धबंदीची.....आणि ते म्हणाले " युद्ध बंद?? म्हणजे?? " आणी छातीत कळ येउन ते पडले...
<<< शंकर पाटील होते का लेखक?

सावकाराछ्या मुलीला हसवणारा बंडू का कोण त्यांचे धडे होते (आई शिकवायची मुलांना तेंव्हा तिचं पुस्तक घेऊन मी वाचत बसायचे ) ते धडे आम्हाला नव्हते
<<< धड्याचे नाव - एक होता बाळू
मला नव्हता हा धडा पण माझ्या मागे दोन तीन इयत्ता असलेल्या चुलत भावंडांना होता.
शिवाय आगरकरांचा एक धडा होता अंधश्रद्धांबद्दल.. त्यात "श्वेत व धवल शुक्र सुखप्रद व बलवर्धक असावा. रक्तवर्ण मंगळाला रुधिराची प्रिती असावी.' अशी जड जड वाक्य होती !!
<<< अजून आमचे ग्रहण सुटले नाही, का? Happy
शिवाय सातवीलाही एक आगरकरांचा धडा होता त्याचे नाव आठवत नाही.
.

शंकर पाटील होते का लेखक?>>>>>>>> हो बरोबर
३ रीत अजुन एक धडा होता ...सांगकाम्या बाळु

मराठीत :
"आनंद कंद ऐसा"
"नव्या दिशेचे नव्या उषेचे गीत सुर हे गाती"
"गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे."
हिंदी मधे
फूल की आत्मकथा, झांसी की रानी ह्या कविता.
असं काहीतरी आठ्वत आहे.

अमित M <<< तुमचा ब्लॉग पाहिलाय मी. (त्यात तुम्ही काही काही परिच्छेद मायबोलीवरच्या जुन्या धाग्यावरचे तसेच्या तसे उचललेत. Proud )

फुल्ल नॉस्ट॓ल्जिक केलं राव ह्या धाग्यानं... Happy
नवनीत गाइड, व्यवसायमाला, प्रयोगाची वही, आलेखाची वही, कार्यानुभव ची वही(यात कुंडीतील लागवड, व्यावसायिक जगाची तोंड ओळख, पाव बिस्किटे अश्या सेप्रेट) पुस्तिका. चित्रकलेची वही. बापरे....!

काय काय आठवलं आज !!! Happy

नवनीतच्या गाईडच्या (आम्ही त्याला गायड म्हणायचो. त्या शब्दाचा अर्थ पाचवीत इंग्रजी सुरू झाल्यावर कळला! ) मुखपृष्ठावर स्फिंक्स (Sphinx) चे चित्र असायचे.

तिसरीला भूगालाच्या गाईडची सेपरेट चिटुकली पुरवणी मिळायची. Proud
(याचे कारण मला वाटते, तिसरीच्या भूगोलात जिल्ह्यांचा अभ्यास होता आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या शाळांसाठी धडे वेगवेगळे असावेत. नक्की माहीत नाही.)

शिवाय आगरकरांचा एक धडा होता अंधश्रद्धांबद्दल.. त्यात "श्वेत व धवल शुक्र सुखप्रद व बलवर्धक असावा. रक्तवर्ण मंगळाला रुधिराची प्रिती असावी.' अशी जड जड वाक्य होती !!
<<< अजून आमचे ग्रहण सुटले नाही, का? >>> Happy सही लोकांना वाक्येच्या वाक्ये आठवत आहेत. अशाच एका धड्यात "पुराणातील वांगी पुराणात" असला काहीतरी वाक्प्रचार होता. अजून मराठीत ते सं. सहीत स्प्ष्टीकरण असायचे. आधी सं., मग स्पष्टीकरण आणि मग वै. असे लिहावे लागे Happy

"सुंदर" हतीवर पण एक धडा होता, "अंबाली" आणि "सुंदर" Happy

पराग, गजानन ब्लोग पाहिल्याबद्दल धन्यवाद. पराग जमल्यास ब्लोग वरच comment टाकशील का ? मी चुका दुरुस्त करेन.
गजानन हो खर आहे. ती post लिहिण्याची प्रेरणा माबो च्या जुन्या धाग्यानेच दिली. तास मी माझ्या blogpost मध्ये नमूद केल आहे Wink

हिंदीतला धडे १-२ आठवताय्त. ६वी की ७वीत होते तेव्हा.. "मामा की ऐनक' आणि 'मीना का सपना'!
मीना का सपना मधलं,"मै गिरी, मै गिरी' हे एकच वाक्य आठवतय.

'चिंतातुर जंतु' कुणाची कथा होती?>>>>
पाचवीतली इंग्रजीची पहिलीच कविता:
Solomon Grundy,
Born on a Monday,>>>>>

Kidnapped
The Golden Harp
Tenali Ram>>>>

. एक वाघ पैसा खातो मग त्याचे पोट दुखते वगैरे>>> हे सगळे होते आम्हाला. Happy

मला एक कविता आठवते ती होती अम्हाला पहिलीला.

आभाळ वाजलं ढडाम्ढुम .. वारा सुटला सुं सुं सुं.. वीज चमकली चम्चम चम.... कदाचित ही माझी सगळ्यात जुनी आठवण (अभ्यासक्रमातली)
दुसरीतील... इंजिनदादा इंजिनदादा काय करता... ड्बे मी जोडतो कोळ्सा मी खातो गावाला जातो नव्या नव्या...
तिसरीतील... घाटातली वाट काय तिचा थाट मुरकते गिरकते लवते पाठोपाठ..
या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया... टप्टप टपटप टाकित टापा चाले माझा घोडा....
नव्या मनुतील नव्या दमाचा शुर शिपाइ आहे...
खंड्या म्हणुन एक कविता होती. ... धीवराची हाले चोच जाड वगैरे...

चौथीला / सातवीत एक मस्त धडा होता. नाव आठवत नाही. पण त्यातील चित्र आठवतेय. हेलिकॉप्टर मधुन जखमी सैनिकाला वाचवण्यावद्दल होता. कॅ. प्रधानांचा एक धडा होता. त्यात 'भालो आछेन' असा उल्लेख आला होता.

हिंदीत काला कलुटा जादुगर आणि हॉकीके जादुगर (ध्यानचंद) हे ध्डे होते.

Pages