मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिचा दुसरा काय पहिलाही अर्थ धड सांगितला गेला नव्हता>> Proud
आम्हाला नव्हती ती कविता

रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला - इंदिरा संत
टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले - पाडगावकर (मी वरती त्याच्या शेवटच्या ओळीचा उल्लेख केला आहे - गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे)

बाकी मयेकरांनी उल्लेख केलेला कुठलाही धडा, कविता आमच्या पुस्तकात नव्हत्या.

स्मृतिचित्रेतला उतारा आठवतोय.

टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले >>> ह्याच्यावर नाच पण केला होता Lol

Happy
बोरकरांची : गडद निळे गडल निळे जलद भरुनी आले., विंदांची 'घेता'.
बहिणाबाईंची : मन वढाय वढाय
सुरेश भटांची : एक शृंगारिक कविता ११-१२ला होती :
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो.

आणखी आधी एक जिऊ म्हणून कविता होती तीही आवडायची -
गोधूमवर्ण तीचा हरणाच्या पाडसापरि डोळे
------------ प्रसन्न विधुबिंब जेवि वाटोळे
वरदा
याच कवितेत .....गुलगुलीत मलमलीपरी करी कश्या झराझर पुरणपोळ्या.....अश्या काही ओळी या कवितेत होत्या का?
ही एक अगदी चट्का लावणारी कविता आम्हाला होती.
केवढे हे कौर्य

क्षणोक्षणी पडे उठे परिबळे
उडे बापडी
चुके पथही येउनी स्तिमित दृष्टीला झापडी
मातीत ते पसरले अतिरम्य पंख
केले वरी उदर पांडुर निष्कलंक
चंचू तशीच उघ्डी पद लांबवीले
निष्प्राण देह पड्ला श्रमही निमाले
असं काही ओळी आठवताहेत.
दमडी ... आम्हालाही होती. त्या शेवेच्या वर्णनाने वर्गात अगदी लाळ गळायची.

काणेकरांचा(?) आतले आणि बाहेरचे हा लघुनिबंध, खांडेकरांचा : सुखाचा शोध. वि.द.घाट्यांच्या पांढरी केस हिरवी मने यातला एक लेख होता.
माझ्या बहिणीला (अकरावी एसेसी) चितळे मास्तर होते.
गोदागौरव(चंद्रशेखर) ही कविता : अवयव थिजले शरीर भिजले उठले रोम तृणांकुरसे
सद्गद कंठी बुद्बुद करिते वचन घटोन्मुख नीर जसे...
...
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे भवताप हरी.

पृथ्वीचे प्रेमगीत इतकं सुंदर शिकवलं होतं की तेव्हापासून सायन्स फिकशन वाचण्याचं बीज नकळ्त पेरलं गेलं असावं? हे त्या वयात नव्हतं जाण्वलं पण आत्ता जाण्वतय.
एका शास्त्रीय सत्यावरची कविता ....तीही प्रेमकविता....अति वेड लावलं होतं या कवितेने.
आणि नल दमयंति....हेही फार आवडायचं. वेगववेगळी वृत्तं आपोआप मनात ठ्सायला या सगळ्याचा खूप वाटा होता.

यातल्या शेवटच्या ओळी :

असं कसं मन देवा असं कसं रं घडलं
काय जागेपणी तुला असं सपन पडलं

खसखसचा दाणा- त्यात आभाळ माईना (अणुरणिया तोकडा...तुका आकाशाएवढा)

स्वाती तुला आणि बुद्ध हसला धडा होता ?????? कसं शक्य आहे ? Uhoh
तुझा पण मॅराथॉन पळायचा वाढदिवस होऊन गेला ना मधे ?? Proud

'जलदाली मज दिसली सायंकाळी' >>>>> अगो, हिच ती पाऊस..
थबथबली, ओथंबून खाली आली
जलदाली, मज दिवली सायंकाळी.
रंगही ते, नच येती वर्णयाते..

वगैरे ओळी होत्या..

मर्ढेकरांचं नाव वाचल्यावर 'पितात सारे गोड हिवाळा' आठवली. पहाटेच्या मुंबईचं सुंदर वर्णन होतं ह्यात !
शिवाय आरती प्रभुंची 'मृत्युत कोणी हासे' ही कविता होती दहावीला. ती नंतर काढली वाटतं सिलॅबसमधून.

दहावीला कोलंबसाचे गर्वगीत होतं ते पण मस्त होतं एकदम.

नववीला पहिल्याच धड्याचं पहिलं वाक्य 'सांप्रत भारतीय लोक भिकारी होत चालले आहेत.' असं होतं. त्यातलं 'भिकारी' गा.जा.भ.ला यायचं. तेव्हा मी तिथे 'गरीब' लिहून मार्क घालवले होते आणि आगाऊपणे मनाचा शब्द लिहिल्याबद्दल ओरडा खाल्ला होता.. Proud

>> सुंदरता, मम त्यांची फुलविती चित्ता
व्योमपटी जलदांची झाली दाटी
कृष्ण कुणी काजळिच्या शिखरावाणी
नील कुणी इंद्रमण्याच्या कांतीहूनी
गोकर्णी, शुभ्र पांढरे तसे कुणी

पग्या, श्श! Proud

अकरावीला की बारावीला जीएंचा एक धडा होता. त्यात एका अंध वृद्धाच्या मनातली घालमेल अचूक टिपली होती. घरातली एक लाडकी अगदी लहान मुलगी मृत्यु पावते (?) पण या वृद्धाला त्याची चाहूल लागू देत नाहीत. पण नंतर तीनचार दिवसांत आजूबाजूच्या कानोश्यावरून तो वृद्ध अंदाज बांधतो. त्या मुलीचा स्पर्श, तिच्या चेहर्‍याला येणारा दुधाचा गंध, तिच्या आठवणींनी झालेली त्या वृद्धाची अवस्था. वाचताना पोटात घालमेल व्हायची. नाव आठवत नाही.

पराग,
ओरडा मनीषा कुलकर्णी बाईंचा का? त्यांचा चेहरा सुद्धा आला डोळ्यासमोर. Happy
आणि बुद्ध हसला राजा मंगळवेढेकरांचा न्हवता मला वाटतं. ग. प्र. प्रधान किंवा असा कोणीतरी विचारवंत लेखकाचा होता. Happy

अमित हो.. Happy
आणि बुद्ध हसला म्हणजे पोखरण अणुस्फोटांबद्दलचा धडा ना ? मलाही त्याचे लेखक मंगळवेढेकर आहेत असं नाही वाटत..

बारावीला 'मी आणि मर्ढेकर' हा गंगाधर गाडगीळांचा धडा होता. 'पिपात पडले ओल्या उंदिर' वरून मर्ढेकरांवर जी टिका झाली, ती करणार्‍यांमध्ये गाडगीळही होते. तेव्हाच्या त्यांच्यातल्या संबंधांबद्दलचा धडा होता. मी बारावीला मराठीची जी काही अगदी मोजकी लेक्चर्स बसलो.. त्यातला एकाला हा शिकवला होता.. त्यामुळे अजून लक्षात आहे..

ithe plz kuni poorn kimva bahutanshane kavita lihu naka re. It's a violation of copyright law. Kiti vela mabo var charcha zaliye ithe

Me lihileli nal-damayantichi kavita copyright free ahe. Bakichya ek don oli ch lihilyat. Fakt eka thikani ek kadve lihile ahe

Admin, te kadve niyamat basat nasel tar me udvayla tayar ahe

भरतजी, तुम्ही उल्लेख केलेले बरंचस मला होतं. केशवसुत आणि केशवकुमार यांची कविता एकाच वर्षी, स्मृतीचित्रेतला तोच धडा.

वरदा गवतफुला आणि टपटप पडती अंगावरती, हेपण होतं.

>>>> स्मृतिचित्रेतला एक उतारा होता. लक्ष्मीबाई एका बाईच्या घरी जातात आणि तिथली स्वच्छता टापटीप पाहून चकीत होतात.
आणि टिळक म्हणतात की 'तू तर माझ्याही पुढे गेलीस'.

स्वाती, ते बहुतेक त्यासाठी म्हंटलेलं नाही. कुठल्यातरी रोगाच्या साथीत टि़ळक गरिबांच्या वस्तीतून फिरून परिस्थिती बघतात, पण लक्ष्मीबाई तिथल्या एका लहान मुलीला घरी आणून औषधोपचार करतात त्याबद्दल होतं. (असं पुसटसं आठवतंय.)

गजाननराव.....
"...अकरावीला की बारावीला जीएंचा एक धडा होता...."

त्या कथेचे नाव "राणी"...त्या मुलीचेच नाव....१९५५ मध्ये सत्यकथेत प्रसिद्ध झाली होती ही कथा....जी.एं.च्या "निळासावळा" या कथासंग्रहात समावेश केला आहे कथेचा.

'बाबल्या चितेतून पळाला' पुन्हा कुठे वाचायला मिळेल का? तुफान अचरट आणि धमाल धडा होता.

कवी निकुंब यांची एक मस्त कविता होती. त्यात त्यांनी तीन प्रकारच्या पावसाचं वर्णन केलं होतं.

डोंगर-पायथ्याशी पडणारा पाऊस. डोंगर-मध्यावर पडणारा पाऊस आणि डोंगर-माथ्यावर पडणारा पाऊस. खूप सुंदर होती, आठवतंच नाहीये. त्या कवितेवरून मी बहिणीला निबंध सांगितला होता पावसाचा, तिच्या बाईंना तो खूप आवडला होता.

लक्ष्मीबाई ची कविता वाचून कोणीतरी म्हणत,
मोदक बहु सुबकसे आकारही सुबक साधला बाई| तव भर्त्याचे साह्य असे का कथी मला ताई |
सुबक दोन वेळा नसेल पहिल्या सुबक ला काहीतरी वेगळा शब्द असला पाहिजे.

त्यातच त्या बालकवींना विचारतात ना, ठोंबरे माणूस दाखवा बरं. आणि बालकवी म्हणतात हा बघा समोर आहे.
माहित नसलेल्यांसाठी (माणूस अक्षर काढून दाखवा)

अमितव, माणूस की 'मनुष्य' ? (जोडाक्षर). हा भाग पाठ्यपुस्तकात होता का माहीत नाही. पण स्मृतिचित्रे वाचले आहे.

मस्त मस्त मस्त!
'आणि बुद्ध हसला' ने अगदी भारावून गेल्याचे चांगलेच आठवते!
'कविता म्हण्जे आकाशीची वीज' हे संस्प साठी यायचे तो धडा कोणता होता?

घरात जीएंची सगळीच पुस्तके होती आणि त्यातली काही वाचलेलीही त्यामुळे जी एंची ती कथा पाठ्यपुस्तकात पाहिल्यावर 'अरे हे इकडे कुठे आले' असं वाटलेले!

Pages