वैदर्भीय खसखस भाजी

Submitted by मंजूताई on 1 April, 2014 - 06:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चार मध्यम आकाराचे उभे कापलेले कांदे, अर्धी वाटी दोन तास भिजवून पाट्यावर बारीक वाटलेली खसखस, पाच लसूण पाकळ्या व पेरभर आलं वाटून, एक चमचा धणे व अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ तिखट व कोथिंबीर बारीक चिरून
फोडणी - अर्धी वाटी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद

क्रमवार पाककृती: 

लोखंडी कढईत तेल टाकून फोडणी करावी. त्यात कांदा टाकावा व वाटलेलं आलं लसूण टाकावे. कांदा मऊ झाला की त्यात धणेजिरे पूड, बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर व तिखट टाकावे. दोन मि. परतल्यावर वाटलेली खसखस टाकून छान परतून घ्यावे व साधारण दोन वाट्या पाणी व मीठ टाकावे, पाच मि. भाजी शिजू द्यावी. एका काचेच्या भांड्यात काढून वरून कोथिंबीर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
चारजणांकरिता
अधिक टिपा: 

कांदा खरपूस होऊ देऊ नये.

लोखंडी कढई व पाट्यावर बारीक वाटलेली खसखस, भाजी ची लज्जत वाढवते.

विदर्भाच्या उन्हाळ्यात भाज्या कमी असतात तेव्हा खासकरून ही भाजी केल्या जाते.

भाकरी बरोबर चांगली लागते.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण - मंगला
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
ह्यालाच खसखशीचा झुणकाही म्हणतात का? मी खाल्ला आहे पण कसा करतात ते नाही माहीती. मस्त लागतो अन वर चांगल बोटभर तेलही असतं

धन्यवाद!
साती- मी एवढी घेतली नाही आय मीन खाल्ली नाही:) घेतली\खाल्ली नाहीतरी उन्हाने माणूस सुस्तावतो.
योकु - हो भाजीला भरपूर तेल घालावं लागतं.

.

chhaan aahe prakaar haa ! madhyantree lokasattaa madhe khaanDoLee haa prakaar vaahalaa hotaa. topaN khasakhashEechaa karataat.