भारतातील सरकारी ओळखपत्रे/ कागदपत्रे, प्रक्रिया व नियम

Submitted by नीधप on 2 November, 2012 - 09:24

आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सरकारी ओळखपत्रे हरघडी लागत असतात. या सगळ्या ओळखपत्रांच्या बाबत प्रक्रिया आणि नियम यांचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे. प्रत्येकाने आपला अनुभव (प्रक्रियेसंदर्भाने) लिहावा.
कुणाला किती पैसे चारल्यास किती लवकर काम होईल इत्यादी गोष्टींची चर्चा न केल्यास बरे.

अश्या प्रकारचा धागा असेल तर प्लीज हा उडवावा.
सरकारी कागदपत्रे असा वेगळा ग्रुप सुरू करून भारतीय आणि वेगवेगळ्या देशांतर्गत लागणारी सर्वप्रकारची सरकारी ओळखपत्रे/ कागदपत्रे यासाठी वेगवेगळे धागे केल्यास सापडायला अजून सोपे पडेल.
सध्या सोयीसाठी म्हणून या धाग्यावर फक्त भारतातील ओळखपत्रे, कागदपत्रे यासंदर्भाने माहिती जमवूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंबा१,

>> आता मला आधारकार्ड कसे मिळेल?

नाही मिळणार. तुम्ही आता निराधार म्हणून सरकारदरबारी अर्ज दाखल करा! सरकारी नियमानुसार सोबत आधार कार्डाची झेरॉक्स लावावी लागेल, नावाचा पुरावा म्हणून. Wink Light 1

आ.न.,
-गा.पै.

Gama pailwan, u seems to be a cynic person. Everybody is discussing seriously and finding way out in cases of unsuccess and u r one who is writting useless and irrelevent stuff...

u r one who is writting useless and irrelevent stuff...

जाउ द्या हो.. ते बौद्धिकांचे मास्तर आहेत, त्याना इतकीच अक्कल असते.

नी, चांगला धागा.

माझ प्रश्न - युएसए चा पासपोर्ट असेल तर भारतात गॅस कनेक्शन मिळू शकते का? त्यासाठी काय करावे लागते?

मधे काही काळ अत्यंत विचित्र आकाराच्या कार्डशीटवर छापलेला लायसन्स मिळे जो मध्यभागी दुमडून लॅमिनेट करायचा असे. लॅमिनेट झाल्यावर ते कार्ड कुठल्याही वॉलेट, कार्डांचे स्लॉटस कशातही मावत नसे. तसा आहे.>>
नी माझ्याकडे तसच लायसन्स आहे. त्याच्या लॅमिनेटचे थर लोंबत आहेत.
आता ज्यावेळी चारचाकीचं काढेन तेव्हाच स्मार्ट कार्डावर होइल ते.

@ अ‍ॅन्की : माझ्याकडे दुचाकी होतं. त्याच लोन संपल्यावर बॅन्केतुन एनओसी घेवुन लगेच आरटिओ हापिसात गेलो होतो. दोन तीन चक्कर मारणे ह्य्व्यतिरिक्त फार काहि त्रास नाही झाला. नॉर्मल फी भरुन माझं एच पी उतरवुन मिळालं. फक्त एक इश्यु असा झाला की माझ्या दुचाकीच आर सी कार्ड जुन्या पद्दतीच होत कागद छपाइ.
फक्त ते स्मार्ट कार्ड केल्याने त्याचे चार्जेस भरावे लागले आणि फक्त त्याच कारणाने दोन तीन चक्कर माराव्या लागल्या.

आता फक्त मला माझ्या विवाहाची नोंदणी करायची आहे.
हे काम मात्र भलतचं कन्फ्युजन वालं असणार आहे.
लग्न झालय कोल्हापुरात.
आम्ही राह्तो पिंचीमध्ये.
मुलगी सोलापुरची.
६ वर्षे उलटुन गेलेत.

झकासराव
कोल्हापुरात लग्न झालं तर विवाहाची नोंदणी तिकडेच करावी लागणार, तेही ज्या एरियात लग्न झालं त्याच एरियात्ल्या ऑफिसमधे.

अवांतरः
आमच्या माहितीतला एक मुलगा होता. त्याचे नाव होते 'साजन', का? तर त्याची आई होती सायखेड्याची, वडिल रहायचे जळगावला आणि त्याचा जन्म झाला नंदुरबार मधे म्हणुन! Happy

कोल्हापुरात लग्न झालं तर विवाहाची नोंदणी तिकडेच करावी लागणार, तेही ज्या एरियात लग्न झालं त्याच एरियात्ल्या ऑफिसमधे.<<
असं काही नाही. माझं लग्न पुण्यात झालं आणि जवळजवळ ४-५ वर्षांनी आमचं रजिस्ट्रेशन मुंबईत केलं.

माझं लग्न पुण्यात झालं आणि जवळजवळ ४-५ वर्षांनी आमचं रजिस्ट्रेशन मुंबईत केलं.
>>> असेल मग! माझ्या लग्नाच्या वेळी मला रजिस्ट्रार ने असं सांगितलं होतं.

माझ्या माहितीनुसारही नोंदणी जिथे लग्न केले तिथेच करतात. नीधप यांनी वेगळी माहिती सांगितली आहे. पण माझे लग्न अन रजिस्ट्रेशनला कित्येक वर्षे लोटली आहेत. so my info might be outdated.
लग्नाचा पुरावा मात्र लागेल.
धार्मिक/वैदिक पद्धतीने केले असल्यास लग्न लावणार्‍या पुरोहिताचे अ‍ॅफिडेव्हिट, अथवा लग्नाचे फोटो (सप्तपदीचा फोटो मागत ते लोक. इतर धर्मांचे नक्की कोणते फोटो ते ठाऊक नाही), लग्नपत्रिका हे ग्राह्य पुरावे आहेत. यातील काहीच मिळत नसेल तर सरळ पुन्हा एकदा लग्न रजिस्टर पद्धतीने लावून घ्या Wink

सर्ळ साधी गोष्ट असते. तुम्ही कर्ज घेतलं की तुमची गाडि/फ्लॅट/धंदा इ. 'हायपोथिकेटेड टू अमुक तमूक बँक' असतात. याला बोजा असणे म्हणतात. (गाडीच्या आर.सी.पुस्तकात ती नोंद असते. सात-१२ च्या उतार्‍यात असते तशी.) कर्ज फिटले की तो बोजा उतरवून घ्यावा लागतो. सह्या करतानाची कागदपत्रे वाचली तर हे समजते.>>> हे कुठे करायचे असते? गाडी साठी आर्टीओ हे कळाले. घर व धंदा यासाठी??

कोणास माहिती असल्यास सांगावे.

पुरोहिताचे अ‍ॅफिडेव्हिट, अथवा लग्नाचे फोटो (सप्तपदीचा फोटो), लग्नपत्रिका >>> हे सर्व आम्ही दिले आहे. आणि आम्ही शहरातल्या मुख्य ऑफिस्मधे नोंदणी साठी गेलो असता आम्हाला सांगण्यात आले की ज्या एरियात लग्न झाले त्या ऑफिसमधे जा. तिथल्या रजिस्टरमधे नोंद होते.

@ डॉक्टर आणि माधवी_नयनीश :

"आम्हाला सांगण्यात आले की ज्या एरियात लग्न झाले त्या ऑफिसमधे जा....."
~ असे जे तुम्हास सांगण्यात आले आहे, त्याची व्यापक व्याख्या अशी आहे की.....
लग्न नोंदणी संदर्भात :
१. पतीचे गाव वा पत्नीचे गाव यापैकी कोणत्याही ठिकाणी मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी ठराविक नमुन्यातील फॉर्म सादर करता येतो. सदरचा फॉर्म 'ए' (नियम ५-१ आधारे) त्या त्या ठिकाणाच्या 'प्रबंधक कार्यालया'त विनामूल्य उपलब्ध असतो.
२. समजा पती 'अ' यांचे मूळ गाव नाशिक तर पत्नी 'ब' हिचे मूळ गाव नागपूर आहे आणि दोघेही सध्या नोकरी-व्यवसायानिमित्ताने पुणे येथील वास्तव्यास असतील तर पुणे कार्यालयातही मॅरेज रजिस्ट्रेशन होऊ शकते. फक्त दोघांच्या नावांचा उल्लेख असलेले पुणे मुक्कामाचे रेशन कार्ड अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. [पुण्यातील वास्तव्यास किमान ३० दिवसांचा कालावधी लोटला असला पाहिजे].
३. फॉर्म नंबर ए [५-१] सोबत खालील कागदपत्रांच्या गॅझेटेड ऑफिसरने अटेस्ट केलेल्या झेरॉक्स जोडाव्या लागतात :
(अ) जन्मतारीख पुरावा - एस.एस.सी.सर्टिफिकेट वा नगरपालिकेचा जन्मनोंदीचा दाखला. [लग्नाच्या तारखेदिवशी दोघांनीही वयाची अनुक्रम २१ व १९ वर्षे पूर्ण केली असणे आवश्यक असल्याने]
(ब) अर्जात दिलेल्या पत्त्यावर वास्तव्यास असल्याबाबतचा दाखला....वीज बिल, गॅस कार्ड अथवा भाड्याने राहात असल्यास मूळ घरमालकासमवेत त्याबाबत केलेला अ‍ॅग्रीमेन्ट बॉन्ड.
(क) लग्नपत्रिका....लग्नात काढलेला जोडीचा फोटो...मणीमंगळसूत्रासह.
(ड) २० रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर दोघानी लग्नासंदर्भात केलेले डिक्लेरेशन. [हा मजकूर स्टॅम्प व्हेन्डरकडे तयार असतोच].

~ या व्यतिरिक्त कोणतीही फी रजिस्ट्रार कार्यालयात द्यावी लागत नाही. ज्या दिवशी ह्या कागदपत्रांची पूर्तता केली जाईल, त्याच दिवशी संबंधित अधिकार्‍याने खात्री पटल्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडीस देणे बंधनकारक आहे. तथापि कार्यबाहुल्यामुळे त्याच दिवशी शक्य नसेल तर दुसर्‍या दिवशी नक्कीच सदरचे प्रमाणपत्र कार्यालयातून मिळते.....इथे दप्तर दिरंगाई होत नाही.

[वरील माहिती आणि तरतूद ही फक्त 'हिंदू + हिंदू' अशा विवाहासंदर्भासाठी लागू आहे. जोडीपैकी १ हिंदू आणि १ परधर्मीय....बौध्द, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, परदेशस्थ असेल तर त्यासाठी "स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट' मधील तरतुदी लागू होतील, पण त्याचा विचार इथे आत्ता या धाग्यात करण्याचे कारण नाही असे वाटते.]

अशोक पाटील

ज्या एरियात लग्न झाले त्या ऑफिसमधे जा. तिथल्या रजिस्टरमधे नोंद होते.<<<<
लग्नाची नोंद आपण जाऊन केल्याशिवाय कुठल्याही रजिस्टरमधे होत नसते.
हल्ली तुमचं वैदीक/ धार्मिक लग्न असेल तर तुम्हाला परत रजिस्ट्रार हपिसात जाऊन तिथे समक्ष सह्या कराव्या लागतात. नुसत्या फॉर्मवर सह्या करून भागत नाही.

नीधप
लग्नाची नोंद आपण जाऊन केल्याशिवाय कुठल्याही रजिस्टरमधे होत नसते.
>>>
माझ्या म्हणण्याचा अर्थ तोच आहे! मी गेल्याशिवाय कशी नोंद होईल? Happy Happy

अरे वा!
चांगली माहिती.
मी आता माझा अ‍ॅड्रेस बदलणार आहे म्हणुन थाम्बलोय.
ते काम झालं की विवाह नोंदणीसाठी प्रयत्न करतो.
एका वकीलाच्या मते आमची नोंद पिंचीमध्ये होते.
कोल्हापुरमध्ये जायची गरज नाही.
आपल्या प्रभागाच्या कार्यालयात जावं लागतं.

बाय द वे, शनिवारी मला एमएसईबीचा अत्यंत सुखद अनुभव आलाय.
एक युनिट लाइट रिडिन्गसाठी त्यानी ८०० रु बिल लावल होत, १५० युनिट वीज वापराचं.
ते तिथल्या लोकाना भेटल्यावर, बिलावरील मिटरचा फोटो बघुन लगेच दुरुस्त बिल करुन दिलं. २० मिनिटात काम ओक्के. Happy
फक्त ते हाताने लिहितात बिलावर त्यावर साहेबांची सही असते आणि शिक्काही, कॉम्प्युटर मध्ये एन्ट्री व्हायला हवी. तशी सोय अजुन नाहिये वाट्ट त्यांच्याकडे.

लग्नात काढलेला जोडीचा फोटो...मणीमंगळसूत्रासह.
>>
आमच्या लग्नाच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी फोटो नव्हता मागितला. आम्ही फक्त पत्रिका दिली होती. ह्याचवर्षी जुनमध्ये काढुन घेतलं मॅरेज सर्टीफिकेट.

नविन कायद्यानुसार जन्म्-विवाह्-मृत्यू हे तीनही नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायतीमधे जाता येते. (तुम्ही राहत असलेला भाग ग्रा.पं.मधे येत असेल तर) पूर्वी विवाह नोंदणी साठी रजिस्टरकडे जावे लागाय्चे.

आमच्या विवाहाची नोंदणी लग्न झाले त्याच दिवशी करण्याचा अर्ज दिला होता. अख्ख्या ग्रा.पं. ला लग्नाचे आमंत्रण दिलेच होते. बाकीची सर्व कागदपत्रे वगैरे देऊन चारपाच दिवसांनी मिळाले.

माझा प्रश्न रेशन कार्ड संदर्भातला आहे. मला रेशनकार्डबद्दलची माहिती ही "दाखला" या संदर्भाने हवी आहे. त्यावरती मिळणार्‍ञा धान्यासंदर्भात नव्हे. हे आधीच नमूद करते.

फार पूर्वी माझे रेशन कार्ड सेपरेट करून घेतले होते. सतिशचे- माझ्या नवर्‍याचे नाव अजून त्याच्या आईवडलांच्या रेशनकार्डावरच आहे. सुनिधीचे नाव अद्याप कुठल्याच रेशन कार्डावर नाही. आम्ही मंगलोरमधे गेल्यावर रेशनकार्डाची चौकशी केली तेव्हा त्यांनी तूर्तास नविन रेशन कार्ड देणे बंद आहे कारण जुन्या रेशनकार्डाची तपासणी चालू आहे असे सांगितले. त्यानंतर तिथे मुख्यमंत्री बदलला; संबंधित खात्याचे मंत्री बदलले. आणि ते सर्वच काम रेंगाळले. सध्या आम्ही चेन्नईला शिफ्ट झालेलो आहोत. इथल्या रेशन कार्ड ऑफिसमधे मला समजेल अशी कुठलीच माहिती मला अद्याप मिळत नाहीये. तसेही, चेन्नईला आम्ही अजिइन किती वर्षे राहू याचा नेम नाही. पण मला आज ना उद्या रत्नागिरीमधला निवासाचा दाखला म्हनून रेशनकार्ड लागेल. कारण, माझ्या नावावरची जमीन रत्नागिरीमधे आहे. माझे आणि सतिश दोघांचेही आधार कार्ड आलेले आहे. रेशनकार्ड ट्रान्स्फर करण्याचे काही जणांचे अनुभव ऐकून सध्या जसे आहे तसेच ठेवावे किंवा माझ्या रेशनकार्डावरती सतिश आणी सुनिधीचे नाव चढवून घ्यावे असा विचार आहे.
याबाबतीत काय करणे जास्त योग्य होइल?

why do u need ration card ? It is of no use if u donot avail grains on it. It is not considered for residential address proof. it is printed on it.Govt also clarified it several times...

That Akkal I may not have, but i can understand that this is an informative thread and does not mean for Upahasatmak Teekaa. The thread is meant for exchange of experience and info., I believe.

पादुकानन्दजी,
रेशनकार्ड फक्त निवासाचा पुरावा नाही. उदा. ग्यास कनेक्शन साठी सध्या ते गरेजेचे आहे. रेशन कार्ड हे तहसिल विभागाच्या कामांसाठी उपयोगी पुरावा आहे. इतरत्र त्याचा उपयोग फारसा नसला तरीही.

काय गापै,
झाली का सकाळ तुमच्याकडे?
तुमच्या इंग्लंडात पण सरकारी कागद लागत असतील नै? तिकडे इण्ड्या सारखे प्रॉब्लेम्स नसतील ना? यू आर सो लकी यू नो.. तुम्हाला तुमच्या सरकारवर टीका करावीच लागत नसेल नै?

इब्लिस,

>> यू आर सो लकी यू नो.. तुम्हाला तुमच्या सरकारवर टीका करावीच लागत नसेल नै?

नाहीच करावी लागत! म्हणूनच मी भारत सरकारवर टीका करतो. काही सदस्य काल्पनिक प्रश्न विचारून मला तशी संधी अनायसे उपलब्ध करून देत असतात. मी तिचं सोनं करतो. Proud साधी गोष्ट आहे! Wink

आ.न.,
-गा.पै.

वकील मित्राने फॉरवर्ड केलेली माहिती :

आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.

* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.

*गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.

* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.

* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते

.* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.

* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते

.* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते

.* गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते

.* गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.

* गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.

"आम्हाला सांगण्यात आले की ज्या एरियात लग्न झाले त्या ऑफिसमधे जा....."
म्हणजे असे की, अवं, उगाच मला ताप देऊ नका, दुसरीकडे कुठेतरी जा!!

Pages