भारतातील सरकारी ओळखपत्रे/ कागदपत्रे, प्रक्रिया व नियम

Submitted by नीधप on 2 November, 2012 - 09:24

आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सरकारी ओळखपत्रे हरघडी लागत असतात. या सगळ्या ओळखपत्रांच्या बाबत प्रक्रिया आणि नियम यांचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे. प्रत्येकाने आपला अनुभव (प्रक्रियेसंदर्भाने) लिहावा.
कुणाला किती पैसे चारल्यास किती लवकर काम होईल इत्यादी गोष्टींची चर्चा न केल्यास बरे.

अश्या प्रकारचा धागा असेल तर प्लीज हा उडवावा.
सरकारी कागदपत्रे असा वेगळा ग्रुप सुरू करून भारतीय आणि वेगवेगळ्या देशांतर्गत लागणारी सर्वप्रकारची सरकारी ओळखपत्रे/ कागदपत्रे यासाठी वेगवेगळे धागे केल्यास सापडायला अजून सोपे पडेल.
सध्या सोयीसाठी म्हणून या धाग्यावर फक्त भारतातील ओळखपत्रे, कागदपत्रे यासंदर्भाने माहिती जमवूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे ड्रायव्हिंग लायसन्स डिसेंबरला संपतेय. ते पुण्यात काढले होते. आणि आता नवीन रिन्यू करताना मुंबईतून करायचे आहे. त्यासंदर्भाने दोन्हीकडच्या आरटी ऑफिसेसमधून मिळालेली माहिती
जी तंतोतंत एकच आहे (यामुळे मन कसं आनंदानं भरून आलंय! Wink )

तर तुमचे लायसन्स मूळ ज्या ठिकाणचे असते तिथल्या आरटिओमधे 'माझे लायसन्स संपणार असून मला ते अमुक गावी रिन्यू करायची परवानगी द्यावी' असा अर्ज करायचा. अर्जाबरोबर २ फोटो, नवीन ठिकाणचे अ‍ॅड्रेस प्रूफ जोडायचे.
मग मूळ ठिकाणच्या आरटीओ कडून आपल्याला नवीन ठिकाणी रिन्यू करण्याचे ना हरकत प्रमाणपत्र (एन ओ सी) मिळते.
आधीचा लायसन्स, हे एन ओ सी आणि अ‍ॅड्रेस प्रूफ घेऊन नवीन ठिकाणच्या आरटीओ मधे जायचे. रिन्यूअलसाठी अर्ज करायचा. तुमचा लायसन्स संपायच्या फक्त ३० दिवस आधीच्या काळातच हा अर्ज करता येतो. त्याआधी करता येत नाही.
अर्ज दाखल झाला की लगेच पावती मिळते व ८-१० दिवसांनी नवीन लायसन्स मिळते. Happy

मी उद्या एन ओ सी साठी अर्ज करणार आहे.
या दोन्ही प्रोसिजर्ससाठी ऑफिशियल काही फी असणार ती प्रत्यक्ष प्रोसिजर होत असतानाच कळेल. ती कळली की त्याचे तपशील देईन.

नी तुला ह्या प्रोसेस मधुन जायचे नसेल तर पुण्यात लायसन्स काढने कमी कटकटीचे असु शकेल का?
एक जस्ट क्वेरी आहे. अर्थात त्यासाठी परत पुण्यातील अ‍ॅड्रेस प्रुफ वै लागेल.

माझ्या मतदार ओळखपत्रात पत्त्यात सोसायटी चुकली होती. बाकी फ्लॅट नं बरोबर होता. मला दुरुस्ती करायची होती. निवडणुक केंद्रातील अनुभवी बाईंनी सांगितले कि दुरुस्ती करायला जाल तर मतदार यादीतून नावच कदाचित गायब होईल. आहे ते राहू द्यात बाकीची माहिती तर बरोबर आहे ना! वर्तमानपत्रातून लोकांचे अनुभव पहाता मला तो सल्ला व्यवहार्य वाटला व चुकीची दुरुस्ती करण्याचा विचार रहित केला.

आजच मी गॅस नविन कनेक्षन माहीती काढण्यासाठी गेलो असता असे कळले की राहत्या घराच्या पत्त्यासाठी फक्त रेशन कार्डच लागेल,घराचे नोंदणी पत्रक चालनार नाही,हे योग्य आहे का?

रेशनकार्ड ऐवजी आधार कार्ड चालेल काही दिवसांनी. पण सध्यातरी रेशनकार्ड गरजेचे आहे. (एका कुटुंबाला एक कनेक्शन व सबसिडी अशी ती आयडिया आहे. माझी ३ घरे असलीत तर ३ कनेक्शन मिळत नाहीत. तात्पर्य, रेशन कार्ड गरजेचे.)

झकोबा, प्रोसेस फारच सोपी आहे. माझे एन ओ सी झाले पण.
अ‍ॅड्रेस प्रूफ लागेल ते आता पुण्यातले नाही माझ्याकडे.
स्मार्टकार्ड वाला लायसन्स नाहीये माझा. तो असता तर इथल्या इथे झालं असतं. किंवा मुंबईलाही एन ओ सी शिवाय करता आलं असतं.
मधे काही काळ अत्यंत विचित्र आकाराच्या कार्डशीटवर छापलेला लायसन्स मिळे जो मध्यभागी दुमडून लॅमिनेट करायचा असे. लॅमिनेट झाल्यावर ते कार्ड कुठल्याही वॉलेट, कार्डांचे स्लॉटस कशातही मावत नसे. तसा आहे.

@प्रकाश:
मतदार ओळखपत्रावर आई-बाबांचा एक, अन माझा भलताच पत्ता आला होता. आई-बाबांचा पत्ताही थोडाफार तपशीलात चुकला होता. तेंव्हा अर्ज करून फक्त माझ्या ओळखपत्रावरचा पत्ता बदलून घेतला (आता तिघांच्याही ओळखपत्रांवर कन्सिस्टंटली चुकलेला पत्ता आहे Wink )

@नी:
माझ्याकडेही तेच मधे दुमडलेलं लायसन्स आहे, पण तरी ते बरं. बाबांच्या स्मार्टकार्डवरचं प्रिंटिंग ६ महिन्यात उडालं. त्यात भर म्हणजे स्मार्टकार्डावर जन्मतारीख चुकवली होती.

आरटीओ संदर्भात:
माझी बाईक ऑटोफायनान्सवर घेतली होती. हप्ते फिटल्यावर फायनान्स कंपनीचं एनओसी दिलं. मला वाटलं झालं काम. पण आता ते एनओसी आरटीओमधे देऊन तिथून एक सर्टिफिकेट घ्यायचं मगच बाईक विकता येईल. हे ना फायनान्सवाल्यानी सांगितलं ना शोरूमवाल्यानी.
तस्मात पुढल्या पुणे ट्रिपला हे काम करायचं आहे. लायसन्स स्मार्टकार्डही करून घ्यावं असा विचार आहे.

लेखाचा मूळ उद्देश्य स्तुत्य तर आहेच पण त्यापेक्षाही नीधप यानी सरकारी कागदपत्रांसाठी 'पैसा चारणे' याबाबत इथे चर्चा करू नये अशी बाळगलेली अपेक्षा तितकीच योग्य आहे....अन्यथा धागा पिकाऐवजी पाटाकडे जाण्याची भीती.

मला सांगायला विशेष आनंद वाटतो की याच एकदोन महिन्यात योग्य ती कागदपत्रे विनातक्रार आणि विनाविलंब सादर केल्यामुळे सरकारी दप्तर दिरंगाई न होता तसेच योग्य तितकेच शुल्क [तेही पावतीसह] भरून माझी कामे झाली आहेत.

पैकी....
१. नवीन गॅस कनेक्शन ~ भारतगॅस यांच्याकडून मला खालील कागदपत्रे सादर केल्यावर तात्काळ गॅस जोडणी मिळाली....आतापर्यंत मी माझ्या बहिणीकडील गॅस कनेक्शन वापरत होतो. पण तिच्या मुलाचे लग्न झाल्याने त्याच्या संसारासाठी तिकडे वर्ग करणे गरजेचे होते. ते कामही योग्य ती कागदपत्रे दाखल केल्याक्षणी झाले.

अ) रेशनकार्ड.....ज्यावर 'गॅस कनेक्शन' नसल्याचा उल्लेख. पांढरे कार्ड मिळाले.
ब) पॅन कार्ड झेरॉक्स,
क) फ्लॅट माझ्या नावावर असल्याचा पुरावा म्हणून म्युनिसिपालिटीची घरफाळा पावती....झेरॉक्स
ड) वीज बिल
इ) दोन आयकार्ड साईझ फोटो
~ हे इथे मान्य करणे गरजेचे आहे की, स्थानिक डीलरने गॅस जोडणी देताना त्यांच्याकडील शेगडी घेण्याची विनंती केली.....[आग्रह वा कम्पल्शन नव्हे].... जी मी मानली....परंतू मला हवी असलेल्या कंपनीचीच शेगडी देणे त्याना भाग पाडले.

~ या कामासाठी जो काही खर्च आला त्याच्या रितसर पावत्या मला मिळाल्या आहेत.

२) रेशनकार्ड ट्रान्स्फर ~
मुलाच्या विवाहानंतर त्याचे आणि त्याच्या पत्नीचे स्वतंत्र असे 'पुणे' येथील रेशनकार्ड काढणे त्या जोडप्यासाठी क्रमप्राप्त होते. कोल्हापुरातील अन्नधान्य पुरवठा खात्यामार्फत त्याचे नाव प्रथम माझ्या कार्डावरून कमी होणे; तर त्याच्या पत्नीचे माहेर पिंपरी-चिंचवड इथे असल्याने तेथील कार्यालयातून नाव कमी होणे गरजेचे होते. हे कामही योग्य ती कागद्पत्रे सादर केल्यावर अगदी दोन दिवसात झाले :
अ) माझा तसा अर्ज....सोबत मुलाच्या लग्नपत्रिकाची प्रत
ब) मुलगा पुणे इथे स्थायिक झाल्याबाबतचा पुरावा म्हणून नोकरीचा दाखला, तेथील ड्रायव्हिंग लायसेन्सची झेरॉक्स.
क) मुलीच्या माहेरच्या मंडळींनीही अशीच कागदपत्रे पिपरी कार्यालयात सादर केली.

~ आणि दोन दिवसात कोल्हापूर तसेच पिंपरी इथून 'एन.ओ.सी.' मिळाल्या. त्या जोडून पुण्यातील अन्नधान्य पुरवठा अधिकारी कार्यालयात नवीन रेशनकार्ड देण्यात यावे म्हणून रितसर अर्जही दाखल केले आहेत.

या कामासाठी सरकारी पातळीवर शून्य रुपये खर्च आला आहे. [झेरॉक्सचा खर्च विचारात धरण्याची गरज नाही असे समजतो.]

अशोक पाटील

हप्ते फिटल्यावर फायनान्स कंपनीचं एनओसी दिलं. <<

अँकी
एक लै बेक्कार प्राब्लेम बगा! त्या एनोसीवर तारीख आन किती दिवसासाठी व्हॅलीड अस लिहिलेलं आहे....
ते दिवस संपले असतील तर 'हाल कुत्रा खातो' म्हणजे काय त्याचा अनुभव येऊ शकतो. त्वरा करा अन 'बोजा' उतरवून घ्या. पुढच्या ट्रिपची वाट पाहू नका. उद्या जा.

सर्ळ साधी गोष्ट असते. तुम्ही कर्ज घेतलं की तुमची गाडि/फ्लॅट/धंदा इ. 'हायपोथिकेटेड टू अमुक तमूक बँक' असतात. याला बोजा असणे म्हणतात. (गाडीच्या आर.सी.पुस्तकात ती नोंद असते. सात-१२ च्या उतार्‍यात असते तशी.) कर्ज फिटले की तो बोजा उतरवून घ्यावा लागतो. सह्या करतानाची कागदपत्रे वाचली तर हे समजते.

तात्पर्यः सही केली तो कागद वाचत चला Wink

नी छान धागा!

अँकी >>> (आता तिघांच्याही ओळखपत्रांवर कन्सिस्टंटली चुकलेला पत्ता आहे )>> Lol जाम हसू आले!! Happy

अशोक सर,
आमचे तीर्थरूप रेशनकार्डाबाबत लै पर्टिकुलर होते.
होस्टेलला गेलो, तेव्हा माझं नांव घरच्या कार्डातून वजा केलं होतं. व होस्टेलच्या रेशन कार्डावर जमा झालं होतं!
(हे प्रकरण मला होस्टेलची मेस चालवली तेव्हा कळलं)

मग होस्टेल लाईफ संपल्यावर आपसूक नवे रेशन कार्ड काढले. केवळ कागदांची पूर्तता म्हणून..

एक धडा पुस्तकात न शिकलेला शिकलोय : बी स्ट्राँग ऑन पेपर. सगळे कागद मजबूत करून ठेवा. अन 'इग्नोरन्स ऑफ लॉ इस नॉट अ‍ॅन एक्स्क्यूज;

डॉक्टर.....

तुमच्या तीर्थरुपांचे त्या कृतीबद्दल जरूर अभिनंदन करणे गरजेचे आहे. एक आदर्श नागरिक या नात्याने त्यानी आपले कर्तव्य पार पाडले [जरी त्यांची ती कृती इतरांच्या दृष्टीने अनावश्यक वाटली गेली असली तरी....]. जर सरकारने आपल्यासाठी अमुकतमुक केले पाहिजे असे जेव्हा तावातावाने [इथे आणि अन्यत्रही] आपण वाद घालत असतो त्याचवेळी आपलेही सरकारप्रती काही [जरी वरवर किरकोळ वाटत असली तरी...] कर्तव्य असू शकतात याची जाणीव अशा छोट्या म्हटल्या जाणार्‍या उदाहरणातून प्रकर्षाने जाणवत राहते. [माझ्या आईचे निधन ज्या दिवशी झाले त्याच्या चौथ्या दिवशी मीदेखील रेशनकार्डावरून तिचे नाव कमी केले होते...त्यासाठी फक्त कार्पोरेशनकडून प्राप्त झालेल्या मयताच्या दाखल्याची झेरॉक्स जोडावी लागली होती......दहा मिनिटात काम झाले होते.]

"बी स्ट्राँग ऑन पेपर......" ~ सहमत.
तुमचा कागद काय बोलतो यावर खूप काही अवलंबून असते सरकारी कामासंदर्भात. आता तर हरेक सरकारी कार्यालयाच्या परिसरात झेरॉक्स सेन्टर्स, स्टॅम्प व्हेन्डर्स अशा सेवा देणार्‍यांकडे कॉम्प्युटर+डीटीपीची सोय झाली असल्याने त्यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांची 'फीडिंग' तयारच असते. केवळ दोन मिनिटात आपली आवश्यक ती माहिती "फिल इन द ब्लॅन्क' धर्तीवर दिली की चटदिशी प्रिन्ट आऊट्स मिळतात. चार्जेसही वाजवी असतात [हे मी अनुभवले आहे]. कागद योग्य...तसेच पुरेसे... असले की कार्यालयातील बाबूलोकही अगत्याने आपल्या कामाची पूर्तता करतात असे आढळते.

केवळ पैशानेच काम होते ही कल्पना तिथे जाणार्‍यांने मूळात मनातून काढून टाकली पाहिजे.

अशोक पाटील

माझ्या आधार कार्डासाठी मी कागदपत्रे देवून व बाकी फोटो वगैरे सोपस्कार करून येऊन आता जवळपास ५ महीने होत आहे. आधार कार्ड घरी येण्यास एवढा वेळ लागतो का? आणि चौकशी कुठे करायची?

आजच्या दिवशी माझ्या आईला जाऊन ५ वर्षे झाली. तिचे नाव रेशनकार्डातून कमी केले आहे. निवडणूक कार्यालयात य खेटे घालून कमी करायला सांगितलेले आहे. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तताही अनेक वेळेला केलेली आहे.
जनगणनेला आलेल्या प्रत्येकाला सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे तरीही दर वेळेला तिच्या नावाची निवडणूक स्लिप येते.
मतदार यादीतून तिचे नाव कमी झालेले नाही.
माझे वडीलही ज्येष्ठ नागरीक आहेत आणि मी पुण्यात रहात नाही त्यामुळे विविध ऑफिसांचे खेटे घालणे याला मर्यादा आहेत.
याहून काय करावे हे कोणी सांगेल का?

नीधप.....

'जनगणने' च्या कामासाठी नियुक्त केलेल्या प्रगणकाला "मारुन मुटकून" त्या कामाला जुंपलेले असल्याने त्याच्या/तिच्याकडून एक्झॅक्ट पॉईन्ट टु पॉईन्ट कामाची अपेक्षा ठेवून चालत नाही. निवडणूक प्रक्रियासाठी जनगणना आवश्यक असली तरीही सेन्ससच्या अनेक कामापैकी निवडणूक विदा हे एक काम असते, शिवाय माहितीवरील प्रोसेसिंग हा प्रकार आऊटसोर्सिंगकडे दिला गेला असल्याने आपल्याला अपेक्षित वा हवी असलेली प्रक्रिया त्या बॉडीकडून होईलच अशी खात्री देता येत नाही.

तरीही आपल्या वरील प्रतिसादातील अपेक्षेविषयी मी इतके सांगू शकतो की तुम्ही [वा तुमच्या वडिलांना शक्य असेल तर] पुणे जिल्हाधिकारी कचेरी येथील निवडणूक कार्यालय विभाग इथे जाऊन तिथे 'NAME DELETION' संदर्भातील फॉर्म नंबर ७ भरून.....व त्यातील माहितीच्या पुष्ठ्यर्थ आवश्यक त्या कागदपत्रांची झेरॉक्स.... तुमच्याबाबतीत मातोश्रींचा मृत्यु दाखला....दिल्यास योग्य ती कार्यवाही तेथील अधिकारी करतील व तशी स्वतंत्र सूचनाही तुमच्या घरच्या पत्त्यावर येईल.

http://ceodelhi.gov.in/WriteReadData/Forms/FORM7.pdf या लिंकवर फॉर्म नंबर ७ ची पीडीएफ प्रत आहे, त्यातील मजकूर स्वयंस्पष्ट आहेच.

अशोक पाटील

नीधप.....

अगदी परवाच (म्हणजे २० ते ३१ आक्टोबर २०१२ दरम्यान) पुण्याचे जिल्हाधिकारी श्री.विकास देशमुख यानी पुणे जिल्ह्याच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामध्ये त्यानी असेही उघड केले की, 'मतदार याद्यातून मयत व्यक्तींची नावे कमी करण्यासाठी आलेल्या अर्जांची छाननी या दरम्यान केली जाईल. असे एकूण ९५,३१८ अर्ज आहेत....." इ.इ. ~ याचाच अर्थ असा की जानेवारी २०१३ मध्ये ज्यावेळी जिल्ह्याच्या याद्या 'अपडेट' म्हणून जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे, त्या याद्यातून अशी मयतांची नावे 'मतदार यादी' तून नक्कीच वगळली जातील. फॉर्म नंबर ७ तुम्ही तर भरला आहेच....त्याचा उपयोग होईल असे वाटते.

~ आय होप सो ! इट मीन्स वेटिंग इज द ओन्ली ऑप्शन अ‍ॅट प्रेझेन्ट क्रायसिस.

[बाकी एक मजेदार योगायोग......उद्यापरवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी तिथे मतदान सुरू होणार आहे. तिथेही 'फॉल्टी इलेक्टोरल रोल्स' बद्दल ओरड सुरू आहेच. ओरेगॉन, कोलोराडो, मेरीलॅण्ड, व्हर्जिनिया, उटाह, नेवाडा आदी प्रगत समजल्या राज्यात आज....आत्ताही सुमारे १४ लाख मृतांची 'व्हॅलिड व्होटर' म्हणून नावे घोषित झाली आहेत, आणि उद्या...कदाचित ही 'मयत मंडळी' तिथे मतदारांच्या रांगेत उभीही असतील.....]
— Oregon, Colorado, Delaware, Maryland, Virginia, Utah and Nevada

रेशनकार्ड ऐवजी आधार कार्ड चालेल काही दिवसांनी. पण सध्यातरी रेशनकार्ड गरजेचे आहे. (एका कुटुंबाला एक कनेक्शन व सबसिडी अशी ती आयडिया आहे. माझी ३ घरे असलीत तर ३ कनेक्शन मिळत नाहीत. तात्पर्य, रेशन कार्ड गरजेचे.)>>.Gas cylinder sathi amhi Index 2 dila hota.>>>>
धन्यवाद ईब्लिसजी,माधवीजी.

@सुमेधा...
आधार कार्ड घरी येण्यास एवढा वेळ लागतो का? आणि चौकशी कुठे करायची?...>>>... माझा अनुभव - 'आधार-कार्ड' हातात मिळण्यासाठी कमित-कमी ६-७ महिने जातात. मला माझे आधार कार्ड ८ महिन्यांनंतर घरपोच 'पोस्टल-कुरीयर'ने मिळालेले आहे. 'आधार-कार्ड' साठी काम करणार्‍या एजन्सीज तुमच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाहीत. तेव्हां विनाकारण 'मनस्ताप' ओढवून घेऊ नका. शक्य असेल तेवढा संयम पाळा. मध्यंतरी केन्द्र-शासनाने, आपल्या 'आधार-कार्ड'ची चौकशी करण्यासाठी एक वेब-साईट जाहीर केलेली होती. त्या साईटवर शोधायला गेल्यावर This Site is Under Development हा मेसेज मिळाला. काही दिवसांनी ती साईटच गायब करण्यात आलीय...
तुमच्या माहिती करीता - सरकारने कितीही जाहिरात-बाजी केली तरी, सध्या 'आधार-कार्ड'चा उपयोग शून्य आहे (जरी त्यावर सरकारी 'राजमुद्रा - अशोकस्तंभ' छापलेली असली तरी...). सरकारी कार्यालयातच 'आधार-कार्ड' ग्राह्य धरले जात नाही... भविष्यात त्याचा काही तरी उपयोग होऊ शकेल अशी माफक अपेक्षा....

आमच्या गावात आधारकार्डाच्या वेळी गर्दीमुळे लोकांची आणि कर्मचार्‍यांची भांडणे झाली... त्यामुळे काम बंद झाले. आता मला आधारकार्ड कसे मिळेल?

माझ्या मतदार ओळखपत्रात माझे नाव चुकले आहे, परंतु पॅन कार्डात नाव बरोबर आहे. मतदार ओळखपत्रातील चुकलेले नाव दुरुस्त करण्यासाठी दोनदा अर्ज केला, अद्याप नाव तसेच चुकलेले आहे. परंतु पॅन कार्ड बरोबर असल्यामुळे अजून तरी कुठे प्रॉब्लेम आलेला नाही. मतदार यादीतही नाव बरोबर असते, फक्त ओळखपत्रात चुकलेले! Wink

अवांतर

माझ्या मतदारपत्रावर नाव आणि जन्मतारीख बरोबर आहे. पण वय चुकीचे दाखवलेय! Uhoh लोकांच्या, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेल्या सरकारच्या वजाबाकीचं उत्तर वेगळं आणि आम लोकांनी केलेल्या वजाबाकीचं वेगळं!

आता बोला मन कसं प्रसन्न झालंय किनई! Lol

-गा.पै.

तळटीप : अनेक सरकारी उद्योग अचानक नफ्यात (वा तोट्यात) कसे येतात ते जाणकारांना कळलं असेलंच! Proud

Pages