१ वाटी बार्ली.
अर्धा ईंच आले.
१ हिरवी मिरची.
१/२ चमचा हळद.
१ चमचा तेल.
चवीप्रमाणे मीठ.
१ चमचा इनो.
फोडणीसाठी -
तेल,मोहोरी,जिरे,हिंग,तीळ,कढीलिंबाची पाने.
बार्ली धुवुन २ तास पाण्यात भिजत ठेवा.
नंतर या बार्लीत आले,मिरची घालुन मिक्सर मधे बारीक वाटुन घ्या.
मिश्रणात हळद,चवीप्रमाणे मीठ व एक चमचा तेल घाला.
मिश्रण नेहमीच्या डाळ -तांदुळ ढोकळ्या पेक्षा थोडे घट्ट असावे.
एका लहान काठाच्या थाळीला तेल लावुन घ्या.
गॅस वर कुकर मधे थोडे पाणी घालुन गरम करायला ठेवा.
मिश्रणात इनो घालुन फेटा.मिश्रण लगेच थाळीत ओता वरुन थोडे तीळ पसरवा्.थाळी कुकर मधे ठेवुन वर झाकण टेकवुन ५ मिनिटे गॅस मोठा व नंतर १५ मिनिटे मध्यम आचेवर करुन वाफवुन घ्या .
तेलाची फोडणी करुन त्यात मोहोरी,जिरे,तीळ ,कढीलिंबाची पाने घालावी् ही फोडणी ढोकळ्यावर घालावी .सुरीने कापुन सॉस /चटणी बरोबर आस्वाद घ्या.
नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा हा ढोकळा चवीला वेगळा लागतो.तितका मोकळा होत नाही.कारण भिजवलेली बार्ली वाटल्यावर गव्हासारखी थोडी चिकटसर दिसते.पण ज्याना तांदुळ वर्ज्य आहे त्यांच्याकरता उत्तम आहे.
ढोकळा थंड झाला कि जास्त छान लागतो.
आले-मिरचीचा तिखट्पणा चांगलाच जाणवतो.
मूळ कृति मधे २ वाटी बार्ली ला अर्धा चमचा खा.सोडा.व २ लिंबाचा रस घालायचा आहे.मी १ वाटी बार्लीला १ चमचा इनो वापरला.तसेच मी आले-मिरची वाटणात घातली आहे.मुळ कृतित चवीपुरते मीठ व १ चमचा साखर घातली आहे.वाटलेल्या मिश्रणात २ चमचे दही घातले असते तर चव अजुन छान आली असती असे मला वाटते.
मी पण हा प्रयोग करून बघणार
मी पण हा प्रयोग करून बघणार आहे, येत्या रविवारी.
ऊप्स .... चुकून एकदम बर्लिन
ऊप्स .... चुकून एकदम बर्लिन ढोकळा वाचलं. मस्त आहे रेसिपी पण देशात बार्ली कुठे मिळणार?
दिनेशदा,मी केलेल्या ढोकळ्यात
दिनेशदा,मी केलेल्या ढोकळ्यात हळद थोडी जास्त दिसतेय्.रंग येत नव्हता म्हणुन मी वाढवली तर वाफवल्यावर जास्त दिसते आहे.आंबट दही/लिंबु [इनो बरोबर]घालायला हवे होते.चव वाढली असती.
मामी, किराणा दुकानातुन च मी बार्ली [४८ रु.किलो]आणली आहे.
बार्ली बरोबर थोडी चणा/मुग डाळ भिजवुन घातल्यास वडे,दहीवडे उत्तम होतील.असे ढोकळ्याच्या चवीवरुन वाटत आहे.
बार्लीला अजून काही नाव आहे
बार्लीला अजून काही नाव आहे का? मी नाही पाहिलीये बार्ली कधी. मला डायरेक्ट लेमन्-बार्लीच माहिताय.
मामी, बार्ली ला दुसरे नांव
मामी, बार्ली ला दुसरे नांव नाही.टिन पॅक व लूज अशी मिळते.मी लूज आणली आहे. बार्ली चे सुप-टोमॅटो-कोबी-कॉर्न घालुन,तसेच घट्ट खीर -बार्ली भिजवुन तुपात परतुन पाण्यात शिजवायची वरुन दुध घालुन पुन्हा शिजवायची.खुप मस्त होते.
अरेच्चा असं आहे का? बघते
अरेच्चा असं आहे का? बघते शोधून. धन्यवाद.
एकदा करुन बघते! बार्ली कधी
एकदा करुन बघते!
बार्ली कधी बघितली नाहीये.
आयुर्वेदीक दुकानात पण मिळते
आयुर्वेदीक दुकानात पण मिळते ना बार्ली? हिच बहुदा ती. थंड असते. रात्री पाण्यात भिजवुन सकाळी खायची असते. जाणकार प्रकाश पाडा यावर.
बाकी ढोकळा मस्त. बार्ली पोटात जाण्यासाठी केला पाहिजे आता.
मस्त आहे अगदी तो.पा.सु.
मस्त आहे अगदी तो.पा.सु.

बार्ली म्हणजे गहुच वाटले प्रचि पाहुन , किती अज्ञान हे माझे
व्वा मस्तच! बार्ली उन्हाळ्यात
व्वा मस्तच!
बार्ली उन्हाळ्यात नक्की खावी. बार्लीच्या लाह्या ही बघितल्या आहेत बाजारात. देशात बार्ली वॉटर, लेमन-बार्ली सरबताच्या बाटल्या मिळतात. ज्यांना उन्हाळ्यात लघवी ला त्रास होतो, जळजळ होते त्यांनी तर नक्कीच बार्ली वॉटर प्यावे.
बार्ली भिजवून, उकडुन चाट मसाला, काम्दा, टोमेटो, दही इ इ घालुन चाट पण छान लागते.
सही! पहिल्यांदाच पाहिली
सही! पहिल्यांदाच पाहिली बार्ली!
एकदम बरोबर लाजो. किडनी
एकदम बरोबर लाजो. किडनी विकारावर बार्ली वॉटर उत्तम काम करते.
सुलेखाताई खूपच धन्यवाद ढोकळ्याबद्दल आणी बार्लीचा फोटो टाकल्याबद्दल ( स्टेप बाय स्टेप पाहुन ) पण. तुमच्या कृती नवीन आणी आरोग्यदायक पण असतात.
रंग मस्त आलाय. बार्ली= जव.
रंग मस्त आलाय.
बार्ली= जव. बहुतेक औषधांच्या दुकानात डब्बाबंद मिळत असावी. लाजो म्हणतात तसे मूत्रविकारावर गुणकारी.
बार्लीची बियर पण बनवतात
बार्लीची बियर पण बनवतात
बार्ली= जव ... हा बरोबर.
बार्ली= जव ... हा बरोबर. धन्यवाद भम.
छान पाकक्रुती! धन्यवाद .
छान पाकक्रुती! धन्यवाद .
रेसिपी छान वाटते आहे .. इकडे
रेसिपी छान वाटते आहे ..
इकडे मिळतो तो बेकींग सोडा आणि इनो ह्यात काय फरक आहे?