मोमो

Submitted by दिनेश. on 9 April, 2012 - 04:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष्क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आह्हा.. मस्त दिस्तायेत..
आमच्याकडे रेडीमेड ताज्या पार्‍या मिळतात मैद्याच्या .. मेड घरीच सारण करते . चायनीज लोकं थोड्या वेगळ्या प्रकारे गुंडाळतात.. छोट्याशा करंजी सारखं..
त्याला चियाओ च म्हणतात..

jiaozhi.JPG

मस्त रेसिपी. पण मला मात्र हे मोमो खिम्याचेच आवडलेले, जास्त टेस्टी लागले होते.

वर्षूने फोटो टाकलेय त्या प्रकाराला कोरियात 'मांदू (डम्पलिंग्ज)' म्हणतात. पोर्क असतं त्यात.

मी उसगावात असताना चौकोनी आकार करुन त्यावर ३ बाजुला काट्याने नक्षी केलेली असते.[तिथे कॉस्को,ट्रेडरजोसला ] तयार मिळतात .शाकाहारी असतात .कांदा टोंमॅटो च्या भाजी बरोबर खाल्ले आहेत.
त्यात गाजर,फरसबी,चीज भरलेले असते.

दिनेश दा,हो! डिमसम च्या अगणित प्रकारांपैकी एक हे ,' चियाओ च'
आडो.- इथे हे डंपलिंग स्क्रँबल एग,चिकन,पोर्क शिवाय नुस्त्या ग्रीन भाज्यां वापरून शाकाहारी ही बनवतात.

मस्त रेसिपी! मी नेपाळमध्ये खाल्ले होते. मोमोवर दाण्याचा कूट घालून केलेले सांबार(सदृश) काहीतरी ओततात ना?

<<मोमोवर दाण्याचा कूट घालून केलेले सांबार(सदृश) काहीतरी ओततात ना?>> तू कुठल्या पृथ्वीवरच्या नेपाळात सांबार मोमो खाल्लेले? Wink Light 1 मला कल्पनेनेच कसं तरी झालं.
कलकत्त्यातलं अगदी सर्रास खाल्लं जाणारं स्ट्रीट फूड आहे मोमो म्हणजे. त्याबरोबर चिकन स्टॉकचं सूप देतात. व्हेज मोमोबरोबर एक नुस्तीच तिख्खटजाळ चटणी असते, ती फार म्हणजे फारच तोंपासु असते.

तात्पर्यः घरी कोण करत बसणार? पायात चप्पल अडकवून रस्त्याच्या कोपर्‍यावरचं दुकान गाठणं कधीही सोपं आणि सुखावह Proud

वरदा.. Lol
बित्तुबंगा बरोबर सांगतोय.. तिबेट/नेपाळ मधे काही जागी पीनट सॉस देतात खायला..
खूप टेस्टी असतं , सेम इंडोनेशिया ला साते बरोबर देतात हे सॉस..

मी नैनीताल, नेपाळ दोन्हीत खाल्ले मोमो. आता तर आमच्या जवळच्या मॉल मध्ये पण मिळतात.

पण मी हे नक्की करणार. नुसत्या कुकर मध्ये उकडले तर चालतात ना? ( मोदक पात्र काढायचा भयंकर कंटाळा)

मावे मध्ये काही करु शकणार नाही का ही उकडण्याची प्रोसेस ?

पायात चप्पल अडकवून रस्त्याच्या कोपर्‍यावरचं दुकान गाठणं कधीही सोपं आणि सुखावह >>>> मी ही तेच म्हणते. Happy

मी एकदा पालक मशरूम मोमोजही खाल्लेत. मस्त होते. बाकी नुडल्स बारचे चिकन मोमोज भारी असतात.

माधव, वाहपे आणि ठाज वरून आत स्टेशनकडे घुसल्यावर सरळ चालत गेलं की उजवीकडेच आयसीआय एटीएमच्या अलिकडे मोमोचं छोटंसं दुकान आहे Happy गर्दी असतेच तिकडे नेहमीच, दुकान छोटंच आहे, पण मोमोची चित्र पटकन नजरेत भरतात.

तपास करतो.. Happy तसा लवकरच सिक्कीमला जाणार असल्याने तिथे मुबलक मोमोज खाऊन येणार आहेच... Happy

बी केबिनमधे मस्त मिळतात >> जागेचे नाव व डीटेलवार पत्ता द्या.>>>> ठाणेला १ नंबर वरुन मिडल ला बाहेर पडल्यास, फोटो पॉईंट व आय्सीआय्सीआय एटीएम च्या पुढे चालत जा. डावीकडे कोपर्‍यावर २ नेपाळी / तिबेटीयन मुले हे करत असतात.

मस्त. Happy

आवडता पदार्थ. पण घरी करण्यापेक्षा विकतचे खाणे जास्त सोप्पं. इथे अगदी नाक्यानाक्यावर मोमो विकणारी मुलं दिसतात. हिवाळ्यात तर दर दहा पावलांवर एकजण दिसत असतो. Happy

Pages