Submitted by प्रिति १ on 13 February, 2012 - 10:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१/४ किलो खजुर,
१ चमचा तुप,
१०-१२ काजु, १०-१२ बदाम,
लहान अर्धी वाटी सुक्या खोबर्याचा किस.
क्रमवार पाककृती:
१/४ किलो खजुर घ्यावा. त्यातील बिया काढुन तो स्वच्छ घुवावा. मग कोरड्या कापडाने पुसुन घ्यावा.
पुर्ण कोरडे झाल्यावर त्यात लहान चमचा तुप घालुन तो मिक्सर मधुन थोडा बारीक करुन घ्यावा. अगदी
बारीक नको.
नंतर सुके खोबर्याचा किस एका कढईत थोडासा परतुन त्याचा चुरा करावा. मग काजु आणि बदामाचे काप किंवा हवे त्या आकाराचे तुकडे करावेत. हे सगळे जिन्नस त्या खजुराच्या मिश्रणात घालुन चांगले
मिक्स करुन त्याचे छोटे छोटे लाडु वळावेत. ज्यांना खुप गोड पाहिजे आहे, त्यांनी थोडा गुळ किंवा साखर घालायला हरकत नाही. नाही तर खजुर तसा गोडच असल्यामुळे तशी गरज नाही. मी साखर किंवा गुळ घातला नाही.
मग झाले लाडु तयार.
वाढणी/प्रमाण:
आवडेल त्या प्रमाणात. एका वेळी १ च खाणे...यात १२-१३ लाडु होतात. :)
अधिक टिपा:
थंडीत खायला मस्त आणि करायला सोपा असा हा पौष्टिक पदार्थ आहे.
माहितीचा स्रोत:
माझी मैत्रिण प्रज्ञा १२३
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी लाडवाचे काही फोटो टाकत
मी लाडवाचे काही फोटो टाकत आहे.
तयारी:-

सगळे जिन्नस घातले.

या खायला

छान आहे कृती आणि लाडू
छान आहे कृती आणि लाडू दिसतातही छान. खजूरामधे भरपूर लोह असतं.
प्रिती, मस्त लाडू! खरंच बाई
प्रिती, मस्त लाडू! खरंच बाई तू सुगरण!
<<<<त्यातील बिया काढुन तो स्वच्छ घुवावा. मग कोरड्या कापडाने पुसुन घ्यावा.>>>>
ही आयडिया फारच छान!
बी धन्स.. प्रज्ञा,
बी धन्स..
प्रज्ञा, तुझ्यामुळेच मी हे लाडु करु शकले. म्हणुन तुला डबल धन्स..:)
ती आयडिया पण तुझीच.. तुझे नाव घातलेले पाहिलेस कि नाही ?
उद्या येणार असशील तर आणते चवीला...
प्रीती, थँक्स ! इतके जास्त
प्रीती, थँक्स ! इतके जास्त आणले होते खजुर, कि फ्रीजमधले खजुर संपता संपत नव्हते. ही मस्त रेसिपी आहे. सकाळी दुधाबरोबर/नंतर एक खाल्ला कि मस्त हेल्दी आणि टेस्टी दोन्ही पर्याय झाले.
तु आणि प्रज्ञा ऑफिसात बसुन निग आणि रेसिपीजच्या गप्पा मारता का गं? किती लकी !
मनिमाऊ, आंम्ही लंच च्या वेळेत
मनिमाऊ, आंम्ही लंच च्या वेळेत कधी कधी मारतो गप्पा नि.ग. आणि रेसिपि वर. ( वेळा उरला तर बाकीच्या विषयातुन )
खरचं लाडु सोपे आहेत. करुन बघ. नक्की आवडतील.
खुपच मस्त आहेत . .. पाहुन
खुपच मस्त आहेत . .. पाहुन खावे सारखे वाटले . . .
छान लाडू. गल्फमधे खजूराची बी
छान लाडू. गल्फमधे खजूराची बी काढून त्यात बदाम भरुन ठेवतात. तसेच ते विकायलाही असतात.
पण तिथले खजूर एका वेळी जास्तीत जास्त तीन खाऊ शकतो मी, इतके गोडमिट्ट असतात.
बिनसाखरेची, बिनदूधाची पण भरपूर वेलची घातलेली कॉफी (काहवा) आणि हा खजूर असे खायची पद्धत आहे.
माझ्याकडे pitted खजुर आहेत.
माझ्याकडे pitted खजुर आहेत. ते धुऊन, कोरडे करुन घ्यावे लागतील का?
अरे वा! छान दिसतायत लाडू
अरे वा! छान दिसतायत लाडू
दिनेशदा, धन्स... नवीन माहिती
दिनेशदा, धन्स... नवीन माहिती समजली. तिकडच्या खजुर आणि कॉफीबद्द्ल...:)
कांचन व दक्षिणा धन्स... तुम्ही पण लगेच करुन मला कसे झालेत ते नक्क्की कळवा.

कांचन, कुरियर ने पाठवुन देऊ का ?
सवी २०१०, ते खजुर कसले म्हणालीस? कळले नाही. खजुर कधी कधी स्वच्छ नसतो ना. म्हणुन धुवुन
घ्यायचा. ईतकेच.. चांगला स्वच्छ असेल तर धुवायची गरज नाही .
बिया काढलेले आणि मऊ, चिकट
बिया काढलेले आणि मऊ, चिकट आहेत.
अरे वा एकदम सोप्पे आणी हेल्दी
अरे वा एकदम सोप्पे आणी हेल्दी लाडू
कोबी
कोबी