बडोद्याला एका लग्नाला गेले होते..तिथे सकाळच्या ताज्या नाश्त्यामधे इडली-वडा-साबुदाणा खिचडी व २-३ गोड प्रकार त्यात खोबरे पाक,बेसन चक्की बरोबर ही बट्टी होती..खुपच छान,वेगळा प्रकार म्हणुन तिथल्या रसोइयाला कसे करतात ते विचारले..त्यानेही उत्साहाने सांगितले..थंडीत खायला हा प्रकार छान आहे..
काल च ही बट्टी करुन पाहिली.वरुन साखर न घालता,बेताची गोड झाल्याने आवडली.
यासाठी थोडी पूर्व तयारी लागते..त्यासाठी लागणारे जिन्नस..
सुके अंजीर ८
खजुर १० ते १२ बिया काढुन..
अंजीर व खजुर भिजेल इतकेच गरम दुध अंदाजाने घेवुन त्यात ३-४ तास भिजत घालावे
बदाम ८ ते १० गरम पाण्यात १५-२० मिनिटे भिजवुन साले काढुन ते सुद्धा वरच्या आंजिर-खजुर मिश्रणात भिजत टाकावे..
आता मिक्सर मधुन हे मिश्रण वाटुन घ्यावे..घट्टसर असावे ..
आता मावेत झाकण ठेवुन १-१ मिनिट असा टाइम देवुन शिजवुन घ्यावे..
एक वाटी मैदा गरम तेलाचे मोहन २ चमचे,चिमुटभर मीठ टाकुन दुधात घट्ट भिजवुन घ्यावा..
ही झाली पुर्व तयारी..
पाव वाटी साजुक तुप..
शिजवलेले सारण थंड होइपर्यंत मैद्याचा पातळ लहान लहान पुर्या लाटाव्या..
एका पुरी वर लहान चमचा भरुन मिश्रण ठेवावे.वरुन दुसर्या पुरीने झाकुन दोन्ही पुरीच्या बाजु नीट दाबाव्या..बट्टीसारखा आकार दिसेल..हे रसोइयाने सांगितले होते..मी यात थोडा बदल केला एक मोठी पातळ पोळी लाटुन त्याचे चार भाग केले..प्रत्येक भागामधे थोडे सारण ठेवुन.उरलेल्या साइड च्या भागाने झाकुन टाकले..[चौघडी सारखे] मग जाड तव्यावर [एकावेळी ५-६ बटट्या] मंद आचेवर दोन्हीकडुन गुलाबीसर भाजले.
भाजुन झाल्यावर वरुन तुपाचा चमचा फिरवला..
यातल्या काही ओव्हन मधे भाजुन केल्या. वरुन तुप लावले नाही..
या सारणात अजुन साखर घालायची नाही..खजुराची गोडी पुरते..
रसोइया म्हणाले कि यात गुलकन्द घालुन ही करतात..
छान पदार्थ आहे! बेसन चक्की
छान पदार्थ आहे! बेसन चक्की म्हणजे?
(No subject)
अरुंधती,बेसनचक्की म्हणजे
अरुंधती,बेसनचक्की म्हणजे मोहनथाळ किंवा रवेदार बेसनाचे रोट तळुन्,बारीक करुन केलेली पाकातली वडी..जरा खटाटोप आहे पण चव मात्र मस्त असते..
आपल्या साटोरयानच्या सारखी
आपल्या साटोरयानच्या सारखी वाटते ही रेसिपी.खोबरे
खवा सारणाऐवजी सुकामेवा घातलेली.चवीला तशीच लागते का?
रेसीपी छान वाटती आहे. सारणावर
रेसीपी छान वाटती आहे. सारणावर दुसरी पुरी ठेवल्यावर अजिब्बात लाटायच नाही का?
तिथे सकाळच्या ताज्या
तिथे सकाळच्या ताज्या नाश्त्यामधे इडली-वडा-साबुदाणा खिचडी व २-३ गोड प्रकार त्यात खोबरे पाक्,बेसन चक्की बरोबर ही बट्टी होती>>> बाप रे नाश्त्याला इतके पदार्थ??? चंगळ्च आहे!!!!
तुझी बट्टी मस्त आहे - लाळ गाळ्णारी बाहुली.....
रेसिपी छानच वाटतेय ..
रेसिपी छानच वाटतेय .. साटोर्यांसारखी आणि खव्यापेक्षा हे सारण बरं ..
मस्तच रेसिपी आणि फोटोतल्या
मस्तच रेसिपी आणि फोटोतल्या बट्ट्या मस्त दिसत आहेत एकदम

तुमच्याकडे वेगवेगळ्या रेसिपीजचा खजिना आहे अगदी
mast disat ahet....photo pan
mast disat ahet....photo pan sundar ahe..
सुचरिता,ही साटोरीच
सुचरिता,ही साटोरीच आहे..आकाराला लहान व जाड असते..सारण खव्या/खसखस-खोबर्याऐवजी अंजीर-खजुर चे आहे.
सीमा,सारण भरल्यावर वरुन लाटायची नाही त्यासाठी .एकतर आपण वरुन पिठी नाही लावत..तळहाताने दाबुन कचोरीसारखी मोठी करता येते.
सशल्,नेहमीच्या साटोरी पेक्षा थोडा बदल थंडीच्या दृष्टीनेही बरा वाटला..
अगो,धन्यवाद
सृष्टी,अजुन फोटो [अपलोड]चे तितकेसे नीट जमलेले नाही..तरीपण धन्स गं..